हा माझा एकदम आवडता केक. आणि बनवायलाही सोपा आहे. तर बघू आज एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री कशी बनवायची.
यासाठी लागणारे साहित्यः
१) तयार बेसिक एगलेस चॉकलेट केक:
चौकोनी/गोल/हार्ट शेप जो आवडेल त्या आकाराचा कोणताही तयार बेसिक चॉकलेट केक घ्यावा. मी यासाठी खालील रेसिपी वापरून केक केला होता.
एगलेस बेसिक (व्हॅनिला/चॉकलेट) केक : (दही घालून)
२) केकवर स्प्रिंकल करण्यासाठी/शिंपडण्यासाठी,
फ्रीजमधलं थंडगार,
ऑरेंज ज्यूस / (गार पाणी + साखर + चिमूटभर इन्स्टंट कॉफी) / (गार पाणी + साखर) / गार पाणी
मी केकवर स्प्रिंकल करण्यासाठी साखर-पाणी असं तयार करते,
एक छोटी वाटी भरून बारीक साखर घ्या. त्यात साखर बुडेल इतके पाणी घाला. मग हे मिश्रण एका छोट्या पातेल्यात घेऊन गरम करायला ठेवा. चमच्याने हलवत रहा. साखर विरघळली की गॅस बंद करून पातेलं खाली उतरवा. त्यात चिमूटभर इन्स्टंट कॉफी घाला. आणि हे मिश्रण थोडं रूम टेंपरेचरला आल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.
३) व्हिप्ड क्रिम आणि चेरी
४) चॉकलेट बारचा चुरा:
तुम्हाला आवडेल त्या स्वीट / सेमी स्वीट / डार्क चॉकलेट चा बार घ्या. आणि चॉकलेट बार हातामध्ये उभा धरून त्यावर दाब देऊन मोठ्या खिसणीने चॉकलेट खिसून घ्या. किंवा सालकाढणी वापरून चॉकलेट बारचे फ्लेक्स बनवून घ्या.
५) डेकोरेशन करण्यासाठी केक डेकोरेशनचा कोन किंवा मेंदीचा करतो तसा मोठा प्लास्टिकच्या कागदाचा / पार्चमेंट पेपरचा कोन.
६) (ऑप्शनल) मिक्स फ्रूट जाम किंवा गोड स्ट्रॉबेरी जाम/स्प्रेड
जाम/स्प्रेड वापरल्याने केकचे लेयर्स एकमेकाला छान चिकटतात.
कृती:
१) प्रथम एक फ्रीजमध्ये ठेवून गार केलेला चॉकलेट केक घेऊन त्याचे धारदार सुरीने आडवे दोन भाग करून, दोन लेयर तयार करून घ्यावे. हे करताना केक गोल फिरवून सुरीने कापून घेतल्यास केक जास्त समसमान कापला जाइल. केकचा वरचा भाग(लेयर) बाजूला काढून ठेवा.
२) आता केकवर स्प्रिंकल करण्यासाठी साहित्यात लिहिल्याप्रमाणे (गार पाणी + साखर + चिमूटभर इन्स्टंट कॉफीचे) तयार केलेले मिश्रण घ्या. ते केक थोडासा ओलसर होईल इतपतच चमच्याने केकवर शिंपडा किंवा ब्रशने केकला लावून घ्या. जास्त नको. नाहीतर केक जड होईल. त्याचा स्पाँजीनेस जाऊन केक खाली बसेल. (यावेळी मी इन्स्टंट कॉफी घालायची विसरले होते.)
३) आता त्यावर भरपूर व्हिप्ड क्रिम लावून घ्या.
४) नंतर त्यावर चेरीचे तुकडे घाला.
५) आता त्यावर गोड स्ट्रॉबेरी जाम अधेमधे घाला.
६) आता त्यावर बाजूला ठेवलेला केकचा वरचा थर(लेयर) ठेवा.
परत स्टेप २) आणि ३) रिपिट करा.
७) वेळ असेल तर ही स्टेप करा, वेळ नसेल तर ही स्टेप गाळली तरी चालेल.
हा केक आता फ्रिजमध्ये १५/२० मिनिटे ठेवून परत बाहेर काढा. आणि परत एक व्हिप्ड क्रिमचा थर द्या. आता हा थर केकवर जास्त चांगला बसेल.
हा चॉकलेटचा चुरा.
८)आता कोनमध्ये व्हिप्ड क्रीम भरून केकवर जिथेजिथे चेरी ठेवणार असाल तिथेतिथे गोलाकार नक्षी करून घ्या. आता त्यावर चेरी ठेवा. आणि केकवर चेरीच्या आजूबाजूला चॉकलेटचा चुरा/फ्लेक्स घाला. केकच्या बाकी सर्व बाजूंनाही चॉकलेटचा चुरा/फ्लेक्स लावा.
अशी मस्त एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री तयार आहे. चला आपापले फोर्क घेऊन या आणि पटकन गट्टम करा :-)
माझ्या याआधीच्या एगलेस केक पाककृती:
१) एगलेस चॉकलेट केक (व्हाइट व्हिनेगर घालून)
प्रतिक्रिया
6 Apr 2012 - 10:35 am | रुमानी
मस्तच!
6 Apr 2012 - 10:36 am | पियुशा
ऑस्सम , यम्मीईईईईईईईईईईईईईईईई :)
माझा अतिप्रिय ब्लॅक फॉरेस्ट केकची पा.क्रु दिल्याबद्द्ल धन्स अ लॉट :)
6 Apr 2012 - 11:43 am | पिंगू
चित्रात केक बघून काय होणार. कधीतरी समोर असा केक आण, मग मानलं तुला.
- (फसलेला केकवाला) पिंगू
6 Apr 2012 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार
कधी खायला घालताय ?
6 Apr 2012 - 12:01 pm | जेनी...
वॉव पर्ल मस्त ..
6 Apr 2012 - 2:16 pm | स्मिता.
एकदम मस्त दिसतोय ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री केक.
6 Apr 2012 - 3:51 pm | ५० फक्त
जबरा, झालाय.
६) आता त्यावर बाजूला ठेवलेला केकचा वरचा थर(लेयर) ठेवा. - या वाक्याच्या खालचा फोटो अँड्राईडवाल्यांना विका, आय्सिएस्च्या जाहिरातीसाठी, अगदी अगदी तसंच दिसतोय तो केक. मी तर याच लेव्हलला संपवला असता, बाकी उरलेल्या चेरी / स्टॉबेरी अशा तशाच बिगर नोंदीच्या संपवल्या असत्या.
6 Apr 2012 - 9:17 pm | मुक्त विहारि
आता बाहेरचा केक विकत आणायला नको...
6 Apr 2012 - 9:26 pm | जाई.
मस्तच
7 Apr 2012 - 1:12 pm | निवेदिता-ताई
सुंदर.........फ़ोटो अप्रतिम .
7 Apr 2012 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा
8 Apr 2012 - 8:51 am | प्राजु
अफाट!!!
एकदम मस्त!
8 Apr 2012 - 8:53 am | Pearl
सर्वांचे मनापासून आभार :-)
@पिंगू - कुठला केक ट्राय केला होता आणि तो कसा झाला (किंवा कसा बिघडला ;-)) ते सांग. म्हणजे नेमके काय घडले-बिघडले ते सांग. मग आपण त्यावर उपाय शोधू.
@प.रा. - कधी येताय केक खायला :-)
10 Apr 2012 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार
नेकी और पुछ पुछ ?
तुम्ही या म्हणालात की आम्ही हजर. फक्त पत्ता कळवायला विसरु नका म्हणजे झाले.
10 Apr 2012 - 4:53 pm | सानिकास्वप्निल
माझी सगळ्यात आवडती पेस्ट्री
फोटो पण क्लास आले आहेत :)
10 Apr 2012 - 4:53 pm | सानिकास्वप्निल
माझी सगळ्यात आवडती पेस्ट्री
फोटो पण क्लास आले आहेत :)