२) एगलेस बेसिक (व्हॅनिला/चॉकलेट) केक : (दही घालून)

Pearl's picture
Pearl in पाककृती
22 Feb 2012 - 3:55 am

एगलेस केकचा मागे जो प्रकार दिला त्यामध्ये व्हिनेगर वापरले होते. या केकमध्ये दही वापरले आहे.

साहित्यः १.५ कप चाळलेला ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा), १ कप बारीक साखर, १ कप दही, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, सव्वा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप तेल, १ टीस्पून वॅनिला एक्सट्रॅक्ट (इसेन्स)
(चॉकलेट फ्लेवर हवा असेल तर) २ टेबलस्पून अनस्वीटन्ड कोको पावडर

कृती:
१. ओव्हन ३९० °F (२००°C) ला प्रिहिट करायला लावा. १० मिनिटे प्रिहिट करा. केक पॅन बटरने कोट करून घ्या.
२. दही फेटून घ्या. मग त्यात साखर घालून साखर विरघळेपर्यंत फेटा. बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून फेटा. ३ मिनिटे मिश्रण बाजूला ठेवा. आता मिश्रणातून हवेचे बुडबुडे येताना दिसतील.
३. मग त्यात तेल आणि इसेन्स घालून फेटा. आता त्यात थोडे थोडे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) घालून फेटत रहा. हळूहळू सगळे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) घालून मिश्रण चांगले फेटून घ्या.
(चॉकलेट फ्लेवर हवा असेल तर यामध्ये २ टेबलस्पून कोको पावडर घालून मिश्रण फेटून घ्या.)
४. मग हे मिश्रण केक पॅनमध्ये घालून प्रिहिटेड ओव्हन मध्ये ३९० °F (२००°C) ला १० मिनिटे बेक करा. मग ओव्हन ३५० °F (१७५°C) ला ठेवून अजून २०/२५ मिनिटे बेक करा.
५. एक टूथपिक केकमध्ये खूपसून बाहेर काढल्यावर क्लीन बाहेर आली तर केक झाला असं समजा. केक झाला नसेल तर अजून थोडा वेळ ओव्हनमध्ये बेक करा. केक झाल्यानंतर १०/१५ मिनिटं ओव्हन स्विच ऑफ करून ओव्हनचं दार उघड ठेवा. मग केक पॅन बाहेर काढून तो कूलिंग रॅकवर ( नसेल तर डिशमध्ये / कटिंग बोर्डवर) उपडा करा. एगलेस बेसिक व्हॅनिला केक तयार :-)
आणि मग हवा तसा सजवा.

मी केकचा वरचा खडबडीत भाग सुरीने काढून टाकून केकचे ४ भाग करून थोडं बटर आयसिंग आणि (चेरी नसल्याने) मिक्स फ्रूट जॅमने सजवलं आहे :-)

टीपः
१) १ कप = १ आमटीची चांगली मोठी वाटी.
२) ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) चाळल्यामुळे केक जास्त फ्लपी होतो म्हणतात.

प्रतिक्रिया

जाई.'s picture

22 Feb 2012 - 8:48 am | जाई.

वाह

पियुशा's picture

22 Feb 2012 - 10:07 am | पियुशा

मस्त ग :)

पिंगू's picture

22 Feb 2012 - 4:33 pm | पिंगू

जरा आणखी फोटो हवे होते.. म्हणजे केकृ खुलून दिसली असती.

असो. ही केकृ वाचनखूण म्हणून नोंदवली गेलेली आहे.

- पिंगू

हा केक कपकेकच्या कागदी साच्यांमध्ये केला तर चांगला होईल का?

Pearl's picture

23 Feb 2012 - 12:50 am | Pearl

मी आतापर्यंत कोणताही कपकेक ट्राय केला नसल्याने माहिती नाही :-(

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

पहात क्षणीचअशी इच्छा होतीये

सानिकास्वप्निल's picture

22 Feb 2012 - 10:55 pm | सानिकास्वप्निल

छान आहे :)

निवेदिता-ताई's picture

22 Feb 2012 - 11:43 pm | निवेदिता-ताई

छान..छान....:)