विडंबन करुक पडत्याती कष्ट,
दुसर्यांच्या जीवावर बांडगुळा होती धष्टपुष्ट.
विडंबन करुन थकुन जाय
चांगली कविता ह्यांच्या डोक्यावरुन जाय.
ह्यांका घरात नसा मान
विडंबना करुन नवकवीक म्हणतत, ह्यांची कविता असता घाण.
घरचो राग कवितेत काढतत
नवकवींच्या जीवावर आपलो धंदो चालवतत.
चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो
म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो.
जाउन जाउन हे लोका जाती खय
स्वताक झाकायचा सोडुन दुसर्यांक उघडो बघुची सवय.
ऑफीसातला काम ह्यांका येणा नाय
एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय.
एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय
प्रतिक्रिया
31 Mar 2012 - 2:59 pm | स्पा
=))
=))
__/\__
31 Mar 2012 - 3:02 pm | धन्या
आता समोरच्या पार्टीकडून काय उत्तर मिळते याच्या प्रतिक्षेत. त्यांनी तुम्हालाही टमरेल उचलायला नाही लावलं म्हणजे झालं. ;)
31 Mar 2012 - 3:05 pm | अमितसांगली
बघूया काय होतंय ते .....
31 Mar 2012 - 3:08 pm | निनाद
जबरी रे!
चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो
म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो.
हे तर आमच्या सारख्या उधारी कवींनाही लागू निश!
31 Mar 2012 - 3:10 pm | निश
निनाद साहेब, मी हि त्यातलाच
31 Mar 2012 - 3:23 pm | प्रास
मजेशीर रचना आहे. मालवणी का कोणती बोली कवितेमध्ये छान जमलीय.
तरीही काही बाबी नमूद करतो.
कोणत्याही कवितेचं विडंबन झालं तर मूळ कविता घाण आहे असं कोणी म्हंटलंय? उलट विडंबन झालेली कविता प्रसिद्ध झाल्याची ती एक निशाणी मानली जाते. दुसर्या एखाद्या धाग्यामध्ये याचा स्पष्ट प्रत्यय येतोय. मर्ढेकरांच्या 'पिपात मेले...' कवितेची इतकी विडंबनं झाली आहेत की मूळ कवितेच्या प्रसिद्धीचीच ती द्योतकं होतात.
आपल्या स्वतःच्या कवितांची विडंबनं झाली असल्यास निशरावांनी ती फार मनाला लाऊन घेऊ नयेत अशी मी विनंती करत आहे. त्यांचं काव्य छान आहे. पुढे प्रयत्नाने ते अधिकाधिक सुधारित होईल. निशरावांनी आपला काव्यप्रपंच असाच सुरू ठेवावा आणि कोणत्याही गमतीचा राग डोक्यात घालून घेऊ नये ही विनंती.
निशरावांच्या कवितांना शुभेच्छा!
31 Mar 2012 - 3:31 pm | निश
प्रास सर , मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल टाकायवा प्रयत्न करत आहे.
मुळात जर कोणि कविता केली आणि त्याच विडंबन झाल तर कविता प्रसिध्द पावलि अस खरच नसत.
दुसर मला तुमचे लेक आवडतात व आज लिहिलेला लेख खुप आवडला आहे. निवळ्ळ लाजवाब
31 Mar 2012 - 9:12 pm | अत्रुप्त आत्मा
छान झालाय हो प्रयत्न... :-) म्हराटी पेक्षा मालवणीत तु जोरदार आहेस हां...!
@मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल टाकायवा प्रयत्न करत आहे. >>> :-D
या...या...या...! पक्षात आपले स्वागत असो... तरुणांचा उत्साह हाच आमचा आत्मविश्वास ;-)
2 Apr 2012 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार
तुम्ही मिपावरती आधी 'सतिश' ह्या सदस्यनामाने कार्यरत होतात का हो ?
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
मला तरा आजकाल त्या पल्याडच्या कुठल्याश्या संस्थळाच्या गजालीच्या धाग्यावर आल्यासारखेच वाटते मिपावरती आल्यावर.
बाकी प्रास शेठ अभिनंदन हो. किती लेक आहेत म्हणे तुम्हाला ? बोलला नाहीत कधी. ;)
2 Apr 2012 - 12:27 pm | निश
प्रास सर , तुमचे लेख आवडतात हो.. पण
कौतुक केल तर काहि लोक जळतात.
कधिहि न दुसर्यांच्या लेखावर जळणारा, तुमच्या लेखांचा पंखा ....
निश
3 Apr 2012 - 9:18 am | जेनी...
बाकी प्रास शेठ अभिनंदन हो. किती लेक आहेत म्हणे तुम्हाला ? बोलला नाहीत कधी.
______________________
मला पण सांगा हं प्रास ..
किती ' लेक ' आहेत ? ;)
अभिनंदन :P
3 Apr 2012 - 9:40 am | राजेश घासकडवी
मिपावर शुद्धलेखनाच्या चुका, आणि त्याही प्रत्यक्ष पराच्या हातून... अहाहाहा माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. आज मी धन्य झालो....
31 Mar 2012 - 3:32 pm | सोत्रि
मस्त!
निश आता मालवणी शिकवच लेका, मजा येतेय ह्या भाषेत वाचायला.
आमचा एक ब्रिटीश दादूस होता त्याने अशीच आगरी भाषेची गोडी लावली होती, आता कुठे गायबलाय कोण जाणे?
- (मालवणी शिकावी असे वाटणारा) सोकाजी
31 Mar 2012 - 3:41 pm | निश
सोत्रि साहेब, नक्कीच शिका तुम्ही. मालवणी मस्त, सोप्पी, गोड भाषा आहे.
नक्कीच मी मदत करीन.
2 Apr 2012 - 1:10 pm | रमताराम
त्याचबरोबर पैसामावशी नि प्रीमोकाकू आपल्याला कोंकणी शिकवत होत्या त्या शिकवणी अर्धवट टाकून पळाल्या आहेत त्यांनाही तो सिलॅबस पूर्ण करावा म्हणून दबावगट स्थापन करायला हवा. कसं म्हंता?
2 Apr 2012 - 1:29 pm | निश
रमताराम साहेब, सहमत एकदम
2 Apr 2012 - 1:31 pm | पैसा
पोरं पळाली आणि होमवर्क करेनात म्हणून आमची शाळा बंद पडली. हजेरीची ग्यारंटी असेल तर रविवारपासून परत सुरू करूयात!
2 Apr 2012 - 1:45 pm | निश
पैसा ताई , खरच शिकवा. कोंकणी भाषा मस्तच आहे
पैसा ताईंचा विजय असो.
3 Apr 2012 - 9:11 am | सूड
पोरा पळाली ? ह्यां कोणी सांगितला गे तुका? क्लासाक रोज येणारी येतलीच.
3 Apr 2012 - 2:29 pm | रमताराम
टैमावर अब्यास करतोय आमी. आणि सरकारी फर्मानानुसार दहावी पर्यंत गृहपाठ नि परीक्षेची सक्ती करू शकत नाही तुम्ही. पहिल्या यत्तेतच घुरपाठ? काय मंडली, बरोबर बोलताव ना मी?
जरा थोडे नमस्कार, चमत्कार जमू द्यात मग डायरेक कविताच करू कोंकणीत हाकानाका.
3 Apr 2012 - 3:20 pm | प्रीत-मोहर
तुम्हाला नमस्कार चमत्कार जमला हे आम्हाला कसे कळावे? ;)
31 Mar 2012 - 4:17 pm | चौकटराजा
निशा, आज एक नवीन धडा ,
क म्हंजे उन हून ( पंचमी विभक्ती ) काय रे ?
झिलग्या, तू गुरुदक्षिणेचो काळजी करूचा नको .ब्यांकत खातो असा ना ?
बाकी हे काय लिहिला ते भन्नाट आसा .
शिष्य- चाउ- रा
31 Mar 2012 - 4:25 pm | निश
चौकटराजा साहेब , कशाला मला गुरु करता ?
उलट तुमच्या सारख्या विद्वान व गुणी लोकांचे शिष्य व्हायला आवडेल मला.
मला तुम्हि झिलग्योच म्हणा , कानाक ऐकुक ता गोड वाटता. जसो साजुक तुपातलो शिरो.
"क म्हंजे उन हून ( पंचमी विभक्ती ) काय रे ?"
साहेब बरोबर आहे तुमच.
31 Mar 2012 - 6:22 pm | चौकटराजा
म्येल्या निशा,
गूगल ट्रान्सलेटरात मालवणी दिसता नाय म्हनोक तुला गुरू करू आसा नायतर ये मालवणी झिल्ग्याच्या नादी लागतो कोण ?
31 Mar 2012 - 6:30 pm | निश
गूगल ट्रान्सलेटरात मालवणी दिसणा नाय, म्हणुन तुका गुरू केला आसा (किंवा गुरु केल्यानी ) नायतर तुझ्यासारख्या मालवणी झिलाच्या नादी कोण लागतलो ?
हे बरोबर आहे.
31 Mar 2012 - 8:24 pm | चौकटराजा
ए मालवणी झिलो, तू धागोच टाक कसा ! नारायण उठ , पेट्रोल पंप चालव आसा !
31 Mar 2012 - 4:42 pm | कपिल काळे
निश,
चांगलो रे प्रयत्न तुजो. हसान जीव जाय्ल की काय असा वाटता.
31 Mar 2012 - 4:49 pm | निश
कपिल काळे साहेबानु,"हसान हसान तुमच्या आयुष्यातलो आनंद अजुन उजळुन येतला."
तुमचो आभार
31 Mar 2012 - 5:39 pm | नन्दादीप
चारान्याची कोंबडी आनि बारान्याचो मसालो.....असाच असता ह्येंचा...
31 Mar 2012 - 6:32 pm | प्रचेतस
निश साहेब मस्त कविता.
काही कडव्यांत मीटरमध्ये गंडलीय पण एकंदरीत वाचनीय.
31 Mar 2012 - 6:36 pm | निश
वल्ली साहेब, नक्किच पुढल्या वेळि चुक सुधारीन.
31 Mar 2012 - 6:42 pm | पैसा
ह्यां मालवणी नाय!
31 Mar 2012 - 6:46 pm | निश
पैसा ताई, मी dabholi , vengurla येथिल आहे.
हे शब्द आजही तिथे बोलले जातात.
मुद्दाम गावाच नाव दिले आहे . खात्रि करण्याकरिता
31 Mar 2012 - 9:23 pm | पैसा
गावाचा नाव नाका! "पडत्याती" ह्या घाटावैला झालां. मालवणी शब्द व्हयां तर "पडतंत" वापर.
1 Apr 2012 - 12:38 pm | नंदन
सहमत.
2 Apr 2012 - 11:42 am | प्रीत-मोहर
+२ मागच्या एका लेखातव अशे अ-मालवणी शब्द दिसलले माका.
2 Apr 2012 - 1:31 pm | मेघवेडा
.
31 Mar 2012 - 6:46 pm | सुहास झेले
सहीच... मस्त चाललंय ;)
1 Apr 2012 - 11:18 am | जेनी...
नीश मस्त मस्त मस्त ...मजा आली वाचताना :)
रुस्तुम-ए-मिपा---विडंबन सेनेला आवाहन आहे हे ..:P
आत्मोजिपंतांकडुन भन्नाट प्रतिउत्तराची अपेक्शा आहे :D
1 Apr 2012 - 12:10 pm | प्रास
आवाहन की आव्हान...? ;-)
1 Apr 2012 - 7:03 pm | अत्रुप्त आत्मा
@रुस्तुम-ए-मिपा---विडंबन सेनेला आवाहन आहे हे ..Tongue
आत्मोजिपंतांकडुन भन्नाट प्रतिउत्तराची अपेक्शा आहे Laughing out loud >>>
शांत... नटखट बालिके...शांत....! :-)
1 Apr 2012 - 2:35 pm | सूड
अरे मेल्यां, आता विडंबकांनी खंय जावचा रे ?
3 Apr 2012 - 4:09 am | सुहास..
हाण्ण , हाण्ण !!
निश्या , मस्त , आवडल्या !!
स्साल , ते आमच ममो , आंजावर रुसल्यापासन, आमची खानदेशी कमी पडली, पण तरी बी मालवणी चा फॅन आहे ...अजुन येवु दे ...
ब्रिटीश च्या आगरी चा पंखा