शाईचा पेन व पेनचे निब

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Mar 2012 - 1:41 pm

श्री सुधांशू यांचा शाईचा पेन हा लेख वाचला व काही आठवणी जाग्या झाल्या त्या शब्दांकित करीत आहे.
९२-९३ सालातील गोष्ट आहे .नुकतेच मुक्त धोरण सुरू झाले होते.नव नवीन प्रोजेक्ट्स भारतात येत होते
आम्ही त्या सुमारास रेव्हेलोन पेन कंपनीचे काम करत असू.दादर ला भवानी शंकर रोड वर तो कारखाना होता/आहे.
ति कंपनी बॉल पेन्स तयार करीत असे.
बॉल पेन्स चे रिफिल्स च्या ज्या टिप्स असतात. ते बनवण्या साठी मशीनं कंपनीने स्विस वरून आयात केले होते..व तशी डुप्लिकेट मशीन्स बनवण्या साठी जे मशीन्स चे पार्ट्स असतात ते आम्ही बनवत होतो..त्या निमित्ताने मी पूर्णं दिवस कारखान्यात काढला..
जुन्या कामगाराशी गप्पा मारताना समजले.
भारतीय बनावटीचा पेन बनवायचा या जिद्देने मूळ पुरुष श्री म्हात्रे यांनी हा कारखाना सुरू केला.
प्लॅटो पेन जुन्या पिढीतील सभासदाना परिचित असतिल.
पेन चे बाकीचे पार्ट्स तर तयार झाले पण निब तयार घोडे करताना अडले ..
निब बाकी तयार होती..पण निबेला चित्रातल्या प्रमाणे होल पाडून टिपे पर्यंत कसे स्लिट करायचे या ठिकाणी अडले होते.

तंत्रज्ञान नव्हते व त्याला लागणारे मशीन पण...
पण श्री म्हात्रे यांनी जिद्द सोडली नाही व कारखान्यातच मशीन बनवले व ग्राईंडींग व्हील च्या साहाय्याने इतकी सूक्ष्म व बरोबर रीतीने निब स्लिट केली व पेन बाजारात आला..
पुढे कारखान्यात कामगार संघटनांचा आडमुठे पणा..संप व खास करून निबेला जे सोन्याचे प्लेटिंग करतात त्या धातुच्या चो~या वाढल्या व त्यांनी पेन बनवणे बंद केले...
त्यांच्या जिद्दीला सलाम व असे मशीन बनवून निब चे उत्पादन सफल करणा~या श्री म्हात्रे व त्यांच्या कुशल कामगारांना सलाम

इतिहास

प्रतिक्रिया

गणेशा's picture

22 Mar 2012 - 1:52 pm | गणेशा

लेख..आठवण आवडली..
माणसाचे आयुष्यात येणार्‍या असंख्य घटना माणसास खुप काही शिकवत असतील ना ?

छान वाटले वाचुन..
काळ हा कधीच थांबत नसला तरी असे आठवणींचे थांबे मात्र सतत आपल्यापुढे येत राहतात.

कुलकर्णीसाहेब थोडी माहितीत अजुन भर घालत हा लेख फुलवता आला असता.
या कारखान्या बद्दल अधिक वाचायला आवडलं असत. :)

>>>>>पुढे कारखान्यात कामगार संघटनांचा आडमुठे पणा..संप व खास करून निबेला जे सोन्याचे प्लेटिंग करतात त्या धातुच्या चो~या वाढल्या व त्यांनी पेन बनवणे बंद केले...

---- अरेरेऽ !
आठवण मस्तच..!

इरसाल's picture

22 Mar 2012 - 2:13 pm | इरसाल

कुलकर्णीसाहेब, तुम्ही धोकवडे, अलिबाग मधल्या म्हात्रे पेन कंपनी बद्दल बोलत आहात का? त्यांचा एक कारखाना दादरला होता.

ही लिंक बघा : http://www.fountainpennetwork.com/forum/index.php?/topic/69194-discoveri...

अविनाशकुलकर्णी's picture

22 Mar 2012 - 2:22 pm | अविनाशकुलकर्णी

होय ..९२-९३ साली त्यांच्या ३ ~या [बहुतेक]पिढितल्या म्हात्रे यांनी रेव्हेलोन नावाखाली बोल पेन बनवण्याचा उद्योग सुरु केला होता..
प्ल्याटो पेनचा काहि भाग कदाचित दादर ला बनत असे..
गणपा भाऊ...कारखाना व कामगार याम्च्या ब~याच आठवणी आहेत..नक्कि लिहु..
कंटाळा येतो हो हल्ली टंकायचा.

म्हात्रे सायबांना सलाम आणि अविनाश कुलकर्णी यांचे आभार या लेखासाठी!

प्रभाकर पेठकर's picture

22 Mar 2012 - 3:28 pm | प्रभाकर पेठकर

दादरला लोहमार्गाशेजारी 'म्हात्रे पेन्स' हा कारखाना दिसायचा. तो दत्ता सामंतांच्या युनियनने बंद पाडला अशी ऐकीव माहिती आहे. जुन्या आठवणी जागृत झाल्या.

पैसा's picture

22 Mar 2012 - 4:09 pm | पैसा

पण मराठी माणसाचा कारखाना मराठी माणसानीच बंद पाडला असं दिसतंय.

स्वातीविशु's picture

22 Mar 2012 - 4:39 pm | स्वातीविशु

रोचक माहिती. अविनाशजी, टंकाळा सोडून पुढील माहिती सविस्तरपणे नक्की लिहा.