(मी कोकणातला असल्यामुळे एक मालवणी कविता)
असोच लोका उगाच देतत माका भाव
म्हणूण झालो माझा गावात नाव.
नाचु लागलो मनात मोर,
लोका म्हणती कवठा चोर,
म्हटला झाला अस माझा नाव,
मांडुन बघाया राजकारणी डाव.
मित्रान सांगितल्यानी, जाऊन तुझ्या बापाशिक विचार,
निवडणु़क लढवुचा असय, पैसो दे म्हणाव.
बापाशिक जाऊन विचाल्यानी,
पैसो देउक नाय, पण माझा मुस्काट फोडल्यानी.
आवशीच्या घोवान कधी निवडणुक लढवल्यानी,
गाववाल्यानी तुझो मामा केल्यानी.
पैसो कमवुची अक्कल नसा तुका,
शिक्षो म्हणुन कोंबडो केलो बापान माका.
जसा काय चांगल्या जेवणात मीठ जास्त पडता.
तसो मराठी माणुस आपल्याच माणसाचो पाय खेचता.
बापाशीच्या मारान घेतलो मी धडो,
राजकारणापेक्षो माझो मालवणी जेवाण अन मालवणी गजाली बरो.
माझो मालवणी जेवाण अन मालवणी गजाली बरो.
प्रतिक्रिया
21 Mar 2012 - 11:47 am | पैसा
मालवणी गजाली खरेच बर्यो!
21 Mar 2012 - 3:55 pm | निश
पैसा ताई तुम्हाला धन्यवाद व आभार.
21 Mar 2012 - 12:19 pm | नन्दादीप
मस्त मालवणी कविता.....
21 Mar 2012 - 3:59 pm | निश
नन्दादीप साहेब, तुम्हाला धन्यवाद व आभार.
21 Mar 2012 - 1:11 pm | पक पक पक
पैसो कमवुची अक्कल नसा तुका,
शिक्षो म्हणुन कोंबडो केलो बापान माका.
बरा केलान... :bigsmile:
बाकी एकंदरीत छान आहे गजाली... :)
21 Mar 2012 - 3:59 pm | निश
पक पक पक साहेब, तुम्हाला धन्यवाद व आभार.
21 Mar 2012 - 2:41 pm | चौकटराजा
माका मालव्नी नाय येता . नायतर अभिप्राय दिलो अस्ता .निश तू माका शिकवता काय मालवनी ?
21 Mar 2012 - 2:53 pm | निश
चौकटराजा साहेब , नक्की शिकवीन .
मालवणी भाषा खुप गोड व शिकायल एकदम सोप्पी भाषा आहे.
21 Mar 2012 - 6:20 pm | चौकटराजा
मेल्या निशा,
मेल्यानो, आउचा घो, बाप, कोंबडो, गावचो सरपंच, ह्ये मालवणीचा मुळाक्शरो आस्ता काय?
21 Mar 2012 - 6:26 pm | निश
आउचा घो नाही तर आवशीचा घो.
घो म्हणजे मालवणी मध्ये नवरा.
ते मुळाक्षर नाही आसा.
वडिलाना बाप नाही तर बापाशी किंवा बापुस म्हणतात. मी ज्या भागातला आहे त्या भागात तरी.
22 Mar 2012 - 6:54 am | चौकटराजा
निशा, " मालवणीचो वर्गो " असा धागाच काढ ना रे भौ !
21 Mar 2012 - 3:40 pm | उदय के'सागर
व्वा ... मज्जा वाटली वाचुन :)
21 Mar 2012 - 4:04 pm | निश
अधाशी उदय साहेब, तुम्हाला धन्यवाद व आभार.
21 Mar 2012 - 3:43 pm | सस्नेह
खुमासदार अन खुसखुशीत चिकन मालवणी....
21 Mar 2012 - 4:05 pm | निश
लीना शेड्साळेजी, तुम्हाला धन्यवाद व आभार.
21 Mar 2012 - 3:51 pm | दिपक
शिरा पडान्दे त्या राजकारणावर. घे सुरमई घे ताट तुका. :-)

21 Mar 2012 - 4:10 pm | निश
दिपक साहेब, तुम्हाला धन्यवाद व आभार.
मासे म्हंजे मालवणी लोकांचा जेवणाचो प्राण.
21 Mar 2012 - 4:40 pm | मितभाषी
निशसाहेब तुम्हाला धन्यवाद आणि आभार ;)
गजाली आवडली हेवेसांनल. :)
21 Mar 2012 - 6:05 pm | निश
मितभाषी साहेब, प्रतिसादाकरीता धन्यवाद
21 Mar 2012 - 5:30 pm | RUPALI POYEKAR
माका पण आवाडली हा तुमची कविता
21 Mar 2012 - 5:30 pm | RUPALI POYEKAR
माका पण आवाडली हा तुमची कविता
21 Mar 2012 - 6:06 pm | निश
RUPALI POYEKAR madam , प्रतिसादाकरीता धन्यवाद
21 Mar 2012 - 8:39 pm | प्रभाकर पेठकर
नुकताच मालवण-तारकर्ली दौरा केला आहे. त्यामुळे ताज्या मालवणी जेवणाची (विशेषतः सुरमईची) मस्त चव तोंडात, मनांत रेंगाळते आहे.
कविता आवडली. अभिनंदन.
22 Mar 2012 - 11:07 am | निश
पेठकर सर, धन्यवाद व आभार प्रतिसादाबद्दल
22 Mar 2012 - 11:14 am | निश
पेठकर सर , गोव्यात चणेर व अलिबाग ला जिताडा खाऊन बघा.
अप्रतिम तसच पाला म्हणुन अतिशय काटेरी पण तितकाच चवदार मासा मिळतो तोही खाउन बघा व त्यावर सोलकढी प्या मस्त ती ही तुपाची फोडणी असलेली ओवा घालुन केलेली.
22 Mar 2012 - 12:15 pm | प्रभाकर पेठकर
'चणेर' आणि 'जिताडा' हे काय पदार्थ आहेत? कशापासून बनवितात? हॉटेलात मिळतात का?
'पाला' बद्दल ऐकलेले आहे. नक्कीच ट्राय करेन.
अवांतरः हे 'सर' प्रकरण काय आहे? 'सर' म्हणू नका. त्याने उगीच डोचक्यात हवा शिरण्याची शक्यता वाढते. त्यापेक्षा 'प्रभाकर', 'पेठकर', 'प्रभाकर पेठकर', 'पेठकर काका' काहीही म्हणा.
22 Mar 2012 - 12:31 pm | निश
सर, चणेर व जिताड हे दोन्ही मासे आहेत.
कमी काटे असलेले.
जिताड हा मासा समुद्रात व नदीत पण आढळतो.
अलिबाग व त्या च्या आजुबाजुच्या प्रदेशात भात शेती करताना त्या पाण्यात जिताड्याची मत्स्य शेती पण केली जाते.
अजुन बोंबिल म्हणुन अजुन एक मासा येतो, नाजुक काटे असलेला तो तर खाउन बघाच बघा. मासा असा मउ कि तोंडात खाल्ल्या खाल्ल्या विरघळुन जातो. मस्त चव. हा मासा तळुन व आंबट तिखट नावाची आमटी करुन खातात.
22 Mar 2012 - 12:42 pm | प्रभाकर पेठकर
निश,
अजुन बोंबिल म्हणुन अजुन एक मासा येतो
बोंबिल अनेकदा खाल्ला/बनविला आहे. माझ्या अनेक आवडत्या माशातील तो एक आहे. खुप आवडतो.
धन्यवाद.
22 Mar 2012 - 5:00 am | स्पंदना
कोंबडीचा काढा पण घे गो बरोबर, चांगला लागता .
मस्त ! काही तरी छान वाचाय्ला मिळाल. बर वाटल. हलक फुलक.
22 Mar 2012 - 12:08 pm | निश
aparna akshay madam, प्रतिसादाकरिता धन्यवाद व आभार
22 Mar 2012 - 3:25 pm | पियुशा
छान आहे :)
समजायला जास्ती कठीन नाही पन गजाली म्हणजे काय ?
22 Mar 2012 - 4:00 pm | निश
पियुशा़जी, गजाली म्हंजे एकत्र येउन मारलेल्या गप्पा.
22 Mar 2012 - 6:11 pm | चौकटराजा
गजाली म्ह़ंजे तात्या सरपंचाच्या आंगणात , माडाच्या सावलीत टाकलेला कट्टा का काय ? आन जो आला नाही त्येला झोडपायचा काय मालवणीतल्या आख्या शिव्या...................................
22 Mar 2012 - 6:21 pm | निश
चौकटराजा साहेब, थोडक्यात गावगप्पा.
ह्यात राजकारण पासुन ते शेजारी ह्या सगळ्या विषयांवर गप्पा आणी त्यात आला नाही त्येला झोडपायचा ते तर आलच. मालवणीतल्या शिव्या तर आहेच. कदाचित शिव्या हा मालवणी भाषेचा गोडवा आहे अस म्हटल तरी चालेल.प्रत्येक ३ ते ४ वाक्यात एक दोन तरी शिव्या आल्या पाहिजेत असा अलिखित नियम.
22 Mar 2012 - 4:16 pm | निश
पियुशा जी , प्रतिसादाकरिता धन्यवाद
22 Mar 2012 - 9:51 pm | पक पक पक
स्वतःच्याच धाग्याचा शतक मोहत्स्व साजरा करण्याची नवीन कल्पना फार फार आवड्ली आहे... ;)
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणे.. :)
ओ साहेब कविता आवड्ली बरं का.... :bigsmile:
माना, आभार माना...... :bigsmile:
23 Mar 2012 - 7:21 am | चौकटराजा
प्रतिसा दाचो शत्काचो हार निशच्या गळ्याता घालूचा आसो . निश, चेडवा ( हे मुलगा की मुलीला ? ) तू आता पेटंट साठी अर्ज कर.
24 Mar 2012 - 12:47 pm | नन्दादीप
चेडू / चेडवा = मुलगी,
झील / झीलगो = मुलगा.
24 Mar 2012 - 12:27 pm | निश
पक पक साहेब, खरच धन्यवाद .
आणी मी प्रत्येकाला आभार मानणारा प्रतिसाद देतो कारण, प्रत्येकाने मला वेगवेगळे प्रतिसाद दिले आहेत.
जर ते त्यांचा अमुल्य वेळ देउन मला प्रतिसाद देत असतिल तर माझही हे कर्तव्य आहे की त्यांचे आभार मानणे.
माणसाने आभार मानताना मनाचा कोते पणा करु नये. भरभरुन आभार मानावे.
सगळ्यांनी मला प्रतिसाद वेगवेगळे दिले (अगदी तुम्हि सुध्या ) आहेत तर मी ही त्यांचे वेगवेगळेच आभार मानणारच.
24 Mar 2012 - 2:38 pm | चौकटराजा
निश मी तुझी नि वल्ल्ली ची मस्करी दुसर्या एका धाग्यावर केली आहे. त्तो तू वाचली असशील. माझी उलटी मिपावर एक तक्रार अशी आहे की
प्रतिसादाला उचित प्रतिप्रसाद देणे हे इथे फारसे घडत नाही. ज्याने धागा काढला आहे तो एखादेवेळी प्रतिप्रतिसाद देतो.एरवी प्रतिप्रतिसाद
गुणवत्तेवर न होता " ओळखपाळख" या निकषावर अधिक होतात.
24 Mar 2012 - 3:13 pm | निश
चौकटराजा साहेब, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे .
बहुतेक वेळा तसेच घडताना दिसत. पण लोक विसरतात की वाचणारे आहेत म्हणुनच कवी किंवा लेखकाची प्रतिभा फुलुन येते. त्यात प्रशंसा व टिका करणारे असले की अजुन लि़खाणाला रंग चढतो.
प्रशंसे मुळे लिहायला हुरुप येतो व टीके मुळे लिखाणातल्या चुका समजुन त्या सुधारता येतात.
त्यामुळे प्रतिसाद देणार्या प्रत्येकाचे मग तो चांगला कींवा वाईट प्रतिसाद असु दे आभार मानण हे कर्तव्य आहे.