जेव्हा जेव्हा सीमेवर गोळी वर गोळी चालली
तेव्हा तेव्हा मॄत्युची गिधाडे आस पास वावरली.
झेलले घाव छातीवर होउन रक्तबंबाळ कितीदा
घेतले पाय मागे न कधीही लढलो परी शूरासारखा.
घर ठेवले मागे, नाती सगळी विसरलो
झुंजता झुंजता शत्रुशी, नमकहराम दोस्तामुळे घायाळ हा झालो.
श्वास असे जोपरी तनात, करीन शत्रुवरी मात.
मेलो जरी रणात तरी, अमर होउन राहिन नेहमी जिवंत तुमच्या मनात.
राहिल देशभक्ति मनात
राहिल देशभक्ति मनात
प्रतिक्रिया
19 Mar 2012 - 7:24 pm | सांजसंध्या
निश
पद्यात लिहायचा प्रयत्न करतो आहेस हे चांगलं आहे. हळू हळू लय, ताल समजू लागले, शब्दयोजना आणि काव्य समजले कि खूप सुधारणा होईल. लिहीत रहा :)
19 Mar 2012 - 10:24 pm | प्रचेतस
चौराकाकांचा प्रतिसाद हायजॅक केलास की गं.
20 Mar 2012 - 4:47 pm | प्यारे१
ट्युशन सुरु आहे ना चौरा काकांची. वाण नी गुण का काय म्हणतात तसं. ;)
19 Mar 2012 - 8:20 pm | गणेशा
कविता छान ! अजुन थोडे रणभुमीवरील वर्णने दिल्यास आनखिन छान वाटेल ..
अवांतर :
मागे एकदा सुधीर काळेंनी एका सैनिकाची इंग्रजी कविता दिली होती. त्याचे केलेले भाषांतर आठवले.
19 Mar 2012 - 10:44 pm | शैलेन्द्र
चांगला प्रयत्न, मुख्य म्हणजे प्रयत्न आहे..
कविता जरा वरवरची झालीय.. कवितेचा गोल्ड्न रुल म्हणजे जेंव्हा स्वत:ची कविता लिहुन २-३ दिवस तशीच ठेवायची.. नंतरही ती बरी वाटली तरच पोस्टायची..
19 Mar 2012 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा
निश...मित्रा गल्ली-बोळ भयंकर चुकलेत... अर्थाच्या पाठी लागताना, स्ट्र्क्चरनीच मार खाल्लाय,,, विषय चांगलाच निवडलाय... पण त्यात वेगळं म्हणावं असं काहिच चिंतन नाही... व्यथेची मांडणीही उपरोक्त कारणांमुळे हरपली आहे... वरती संध्येनी दिलेल्या प्रतिसादावर मनन कर... :-)
20 Mar 2012 - 10:47 am | निश
तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार व धन्यवाद
तुम्ही सागितलेली प्रत्येक सूचना अमलात आणण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.