कधी करावे भांडण अंधाय्रा दु:खाशी
कधी करावे स्वागत आनंदरुपी उजेडाचे
कधी भरकटावे बिन्धास विचारांच्या जंगलात
कधी उडावे उंच मनाच्या आभाळात
कधी सुटावे सुसाट वाय्राच्या जगात
कधी यावे पोहुन भावनांच्या समुद्रात
कधी बघावे बसुन अनुभवाच्या शाळेत
कधी दरवळावे होउन प्रेमाचा सुगंध
मग बनावे प्रकाश दिवा होउन
शेवटी व्हावे लुप्त मेणासारखे जळुन
तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला
जाताना ही मग खेद नसेही कुठला.
प्रतिक्रिया
16 Mar 2012 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा
मग बनावे प्रकाश दिवा होउन
शेवटी व्हावे लुप्त मेणासारखे जळुन
तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला
जाताना ही मग खेद नसेही कुठला..... ---^--- जीवनातला आध्यात्मिक आशावाद अवडला :-)
16 Mar 2012 - 10:42 pm | कवितानागेश
हुश्श... आता या कवितेचे विडंबन होणार नाही! :)
16 Mar 2012 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा
@हुश्श... आता या कवितेचे विडंबन होणार नाही! >>> आज आमचा (सर्वांचा ;-) ) उ-पास आहे ;-)
16 Mar 2012 - 10:51 pm | सांजसंध्या
:)