मराठी गझल.

तर्री's picture
तर्री in कलादालन
11 Mar 2012 - 9:52 pm

आपले मित्र गंगाधर मुटेसाहेबानी काल हझल पेश केली. तेंव्हा पासून मराठी गझलेकडे परत आलो. माझ्याकडे गझलां संग्रह अगदीच थोडा आहे. ( तुलना :नाट्य-संगीत / शा.संगीत / भावगीत). गझल कवितेसारखी वाचून मजा घेता येत नाही. त्यामुळे ज्या गझलांना चाली लावण्यात आल्या त्याच माझ्या ऐकण्यात आल्या.पण त्यांची संख्या अगदीच कमी.मुख्यत: प.हृदयनाथांच्या काही गझला व भिमरावांच्या थोड्याफार.
हा संग्रह वाढवायला मिपा सारखे माध्यम नाही. तर दोस्तहो आपल्या आवडत्या गझला गुंफत चला.
माझ्याकडच्या काही गझला सांगतो :-
१. तू नाभातते तारे ( भीमराव)
२. आंदाज आरश्याचा ( भीमराव)
३.आयुष्य तेच आहे ( भीम राव )
४. सुन्या सुन्या मैफोलीत माझ्या (पं.हृदयनाथ )
५. त्या कोवळ्या फुलांचा ( श्रीधरजी)

* असा धागा पूर्वी आला होता का? तर दुवा देवून ह्याला उडवा.
**गझलकारांचा नामोल्लेख माहिती आभावी केला नाही.

वाङ्मय

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Mar 2012 - 9:55 pm | प्रचेतस

गल्ली चुकली का भाऊ?

तर्री's picture

11 Mar 2012 - 10:01 pm | तर्री

आज तर तसलं काही नाही हो. का नळी च्या आशेने आलात आणि शिक्रण ताटात असे झाले ?

प्रचेतस's picture

11 Mar 2012 - 10:13 pm | प्रचेतस

छे हो.
कलादालनात धागा बघून अंमळ आश्चर्य वाटले इतकेच.

चौकटराजा's picture

12 Mar 2012 - 9:02 am | चौकटराजा

आमचा काहीतरी घोळ होतोय किंवा तुमचा तरी ( तर्री ) !

सागर's picture

12 Mar 2012 - 6:08 pm | सागर

भीमराव पांचाळेंची 'हजार दु:खे मनास माझ्या' ही माझी सर्वात आवडती गझल आहे.

शब्द सामर्थ्य लक्षात यावे यासाठी संपूर्ण गझलच खाली देतो आहे - :)

हजार दु:खे मनास माझ्या,हजार जखमा उरात माझ्या
वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या

तुझ्याविना ही जगावयाचे जरी इथे शेकडो बहाणे
असे खरा रंग जीवनाचा तुझ्यामुळे जीवनात माझ्या...

समोर मृत्यू उभा तरीही,नसे तुझे वेड सोडिले मी
तुझीच गाणी अजून असती थरारणार्‍या स्वरात माझ्या..

- मूळ गझल खावर यांनी लिहिली आहे.

चौकटराजा's picture

12 Mar 2012 - 7:06 pm | चौकटराजा

ही गझल मी वाचली आणि एकदम चाल लावून म्हणूनही टाकली. राग किरवाणी वर आधारित चाल आपोआपच आतून वर आली. असे तर यशवंत देव , खळेकाका यांचे झाले नसेल ना?

चौकटराजा's picture

12 Mar 2012 - 6:59 pm | चौकटराजा

विद्ध झालो वाचुनी मी, साहले कसे ज्याने भोगलेले ?
असे कसे असतात सारे कुणाशी तरी असे वागलेले ?

मला ग बाई , गजलेची इंगळी डसली !

प्राजु's picture

13 Mar 2012 - 12:16 am | प्राजु

सुरेश भटांची बरीचशी गाणी गझल या काव्यप्रकारातील आहेत.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Mar 2012 - 7:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आयुष्य तेच आहे अन तोच पेच आहे
तु भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे.(भिमराव पांचाळे)