वेळ रात्रीची होती..त्यांतून अमावास्या असल्याने वातावरण काळोखात बुडून गेले होते..
त्या निर्जन भागात तो जीर्ण प्रासाद भयाण पणे उभा होता...आत एक मंद पणे मिणमिणता दीप तेवत होता..
प्रासादाच्या सोपानावर मालविका कुणाची वाट बघत बसली होती?
मुख कमल म्लान झाले होते.व पाणीदार नेत्रातली प्रभा मंद झालेली होती..नजरेत एक क्लांत शिणलेला भाव होता.तरी मालविकेचे सौंदर्य वेड लावेल असेच होते..गौरांगनेची काया फिकट पडली होती..तर अधर सुकलेले वाटत होते..
दूर बाजूला एक मरणोन्मुख असा वृद्ध बसला होता...देवदत्त असे त्याचे नाव आहे..शरीरावरची कातडी लोंबत होती..डोक्यावरचे केस गेलेले...डोळे आत खोल गेलेले ..शक्तिहीन असे ते कलेवर पायरीवर बसला होते..वय तर साधारण ९०च्या पुढेच असावे..
मात्र तोंडाने सोडव..मुक्ती ..असे क्षीण आवाजात स्वतःशीच पुटपुटतं होता
दोघेही जण कुणाची तरी वाट डोळ्यात प्राण आणून पाहतं असावे..
त्यातला तो वृद्ध देवदत्त तर मुक्तीची आस लावून बसला होता ...
दूरून कोणतरी वाटसरू येताना मालविकेला दिसत होता..
तो वाटसरू म्हणजे आपल्या कथेचा नायक आर्यपुत्र अग्निमित्र होता..विशी ओलांडलेला व राजसेवक, धैर्यवान, विर्यवान युवक..
नृपाचा महत्वाचा संदेश घेऊन तो बाजुच्या गावातील प्रमुखास देण्यास निघाला होता. रात्र होत होती त्यांतून अमावास्येने आसमंत काळवंडले होते...रस्ता पण पायाखालचा नव्हता..जवळच्या पळशीतले जल पण संपले होते..त्यालाही पाय पिटीने थकल्या सारखे वाटत होते.
त्याला दूरून त्या प्रासादाची अंधुकशी आकृती व मिणमिणता प्रकाश दिसत होता...
झप झप पाय उचलत तो प्रासाद जवळ येऊन ठेपला..अन त्याची नजर मालविके वर पडली...
तो विचारत पडला व विचार केला अश्या या निर्जन भागात हा प्रासाद अन ह्या प्रासादात हि सुंदरी एकटी काय करीत असेल??अन हा बाजूला बसलेला वृद्ध कोण असावा ?
अग्नी मित्र मालविच्या समीप गेला अन चकितच झाला सौंदर्याची ति पुतळी पाहून त्याला आश्चर्य वाटले.
मी अग्नीमित्र..नृप सेवक..सुंदरी इथे एकटी अशी का बसली आहेस? तो म्हणाला...
म्लान वदनाने मालविकेने याचना भ~या करुण नजरेने.अग्नी मित्रा कडे पाहिले.
अहो आर्यपुत्र अग्निमित्र..माझ्या शरीरात अजिबात त्राण नाही..अंगात अंमळसा ज्वर आहे..शरीर तापले आहे..घशास शोष पडल्याने घसा सुकला आहे..कुणी तरी येईल व मला आत घेऊन जाऊन जल पाजेल याचीच मी वाट पाहतं बसले होते..२ पाउले चालण्याची हि शक्ती नाही हो या शरीरात...अन तो बाजुचा माझा सेवक काही कामाचा नाही शेवटच्या घटका मोजत आहे...नाही सहन होत हो हे सारे.....अन मालविकेचा बांध फुटला तिच्या डोळ्यातून अश्रू धारा सुरू झाल्या ..
अग्निमित्र झटकन पुढे गेला व म्हणाला.. सुंदरी मी आलो आहे ..चिंता नसावी..
चल असे म्हणत त्याने मालविकेस उचलून घेतले..खाली पाडू नये म्हणून मालविकेने आपल्या कोमल कर कमलाने त्याच्या गळ्यास मिठी मारली...
अग्नी मित्र..तिला शयन गृहात घेऊन आला व शय्येवर तिला अलगद झोपवले..बाजूलाच एका मृत्तिकेच्या घटामधे पाणी होते ते एका पात्रात घेऊन आला..
जल तिच्या तोंडावर शिंपडले अन एकदम मालविकेने मंदपणे डोळे उघडले ... पोटात पाणी गेल्याने तिला तरतरी आली होती..स्वतःस सावरत ति उठून बसली अन अग्नि मित्रा कडे मंदपणे स्मित हास्य करत म्हणाली..तुमचे कसे धन्यवाद मानु तेच समजत नाही....
मी काहि विषेश केले नाहि ..पण आपण कोण? असा प्रश्ण त्याने विचारला.
मी मालविका..तुम्हाला एक विनंति करते..रात्र होत आहे आपण हि दमलेले दिसत आहात..रात्र अमावास्येची असल्याने आसमंतात अघोरी शक्ती वावरत असतील..आज आपण या प्रासादात रात्र काढावी अन सकाळीच कामास जावे असे सुचवत आहे..ति म्हणाली..
माल विकेच्या बोलण्यातले आर्जव व अधराचे अन नेत्रांचे विभ्रमी चाळे ति काय सुचवते ते आपला नायक समजला.
भय नावाचा प्रकार आम्हांस माहीत नाही..पण आपले आमंत्रण नकारण्या इतके अरसिक हि आम्ही नाही..आपल्या इच्छेस मान देत आज आम्ही इथे राहण्याचे ठरवले आहे..
धन्यवाद नाथ ..म्हणत मालविका त्याच्या समीप आली...
अग्नि मित्राने त्या कोमलांगीस आपल्या बाहुपाशात घेतले व तिच्या अधरावर अधर टेकविले...दिपाची वात मागे सारत दोघेही रतिसुखात डुंबून गेले....
रति क्रीडा पुरी झाली अन तृप्त झालेला अग्नि मित्र हतवीर्य अवस्थेत तिच्या कोमल तनु वरुन बाजूला झाला ..
शय्येला पाठ टेकून तो पडला असता..त्याच्या शरीरास विचित्र संवदना जाणवू लागल्या..डोळ्यापुढे अंधारी आल्यागत होऊ लागले अन उदरा मध्ये मोठा खड्डा पडत चालला आहे..शरीरातील सारे त्राण निघून जात आहे असे त्यास जाणवू लागले..शरीरातील सारे जीवानं सत्व कुणी तरी शोषून घेतल्याच्या संवदनाने अग्नि मित्र अस्वस्थ झाला..हे काय होत आहे आपल्याला? त्याला उमजेनासे झाले ..घशास कोरड पडू लागली व जीव हि घाबरा झाल्यागत वाटू लागले..
उठून बसू लागताच आपल्या शरीरात तेव्हढे हि त्राण नाही हे कळल्यावर तो घाबरला...जिवाच्या आकांताने तो तसाच उठून बसला..
शय्येवरून कसे बसे खाले उतरल्यावर हात पाय कंपन पावत आहेत २ पावले चालण्याची क्षमता गमावली असे त्याला जाणवू लागले...तो तसाच सारा जीव एकवटून पाणी पिण्या साठी गेला थरथरत्या हाताने त्याने पात्र उचलून पाण्याचे २ घोट घेतले अन त्याला बरे वाटू लागले..तसाच तो गेला अन दिपाची वात पुढे सरकवली..शयन गृह उजळले..
बाजूलाच शय्येवर मालविका निद्रित अवस्थेत होती..चेहे~यावर एक तृप्तीच भाव होता.दिपाच्या प्रकाशात तिची कांती उजळन निघाली होती..
अग्नीमित्राला सार शरीर हलक वाटत होत..त्याची नजर आपल्याच हातावर गेली अन तो चमकला..हात वाळुन गेल्यागत झाले होते..कातडी सुकटलेली दिसत होती..भयाची एक लहर त्याच्या शरीरातून चमकून गेली त्याने डोक्यावरून हात फिरवला तर त्याला तिथे केस हाताला लागले नाही.. बाजूला असलेल्या दर्पणात त्याने नजर टाकली अन समोर एका ९० ला आलेल्या वृद्धाचे प्रतिबिंब पाहून तो घाबरला..आपण जख्ख म्हातारा झालेला पाहून अग्नी मित्र चकित झाला नजर मंदावली होती..शरीरात त्राण नव्हते.
हे कसे झाले?/कुणी व कशी केली आपली अवस्था? ह्या शंकेने तो अस्वथ झाला...काय करावे सुचत नव्हते.."मालविके" त्याने जोरात टाहो फोडला पण शब्द बाहेर येत नव्हते..
जिवाच्या आकांताने अन सर्व शक्तीने त्याने...मालविके..बघा आमची अवस्था..हा काय प्रकार आहे?..असे म्हणाला तिला विचारले .
आवाज ऐकून मालविकेने डोळे उघडले अन उठून बसली..मोकळा केश संभार सावरत ति तारुण्य गमावलेल्या म्हाता~या अग्नी मित्रा कडे बघत होती..
तिच्या नजरेत एक पिशाच्च व अघोरी भाव पाहिल्यावर अग्नीमित्र घाबरला..तिच्या चेहे~या वरचा मोहक भाव लुप्त होऊन एक अघोरी क्रूर भाव चमकत होता..
विकट हास्य करत ति म्हणाली ..का कंठशोष करीत आहेस मुढा? असे म्हणत ति भेसूर हास्य करू लागली...
तिचा भेसूर असा भाव पहाताच अग्नीमित्र गर्भ गळित झाला आपण आसुरी शक्तीचे सावज झालो आहोत हे त्याला उमगले..व क्रोध अनावर होऊन तो म्हणाला..
अगे चांडाळ कृत्ये तू कोण आहेस? अन माझी अशी अवस्था कशी झाली???
त्या कडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकत ति म्हणाली..मी कोण आहे ??मी कोण आहे?? मी ना देव ना मानव योनीतली स्त्री आहे मी पिशाच्च योनीतली कृत्या आहे..३०० वर्षे वय आहे माझे..व या प्रासादात माझा निवास असतो..तुझ्या सारख्या तरुणाचे तारुण्य शोषण केले की मला वर्षभर ते तारुण्य पुरते..गेली ३०० वर्षे मी अशीच माझे तारुण्य टिकवून आहे..आता पुढच्या पित्री अमावास्ये पर्यंत हे तारुण्य मला पुरेल..नंतर नवे सावज..धन्यवाद अग्नीमित्रा..ति हसत क्रूरपणे म्हणाली....
सारे ऐकून अग्नीमित्र मूढ झाला काय करावे ते समजत नव्हते क्रोध अनावर झाला होता..
अगे चांडाळ कृत्ये तुझा मी प्राण घेईन..असे म्हणाला पण अंगात शक्ती नाही असे त्याला जाणवले..पाऊल पण उचलवत नव्हते....
त्याच्या असाहाय्य अवस्थेवर मालविका भेसूर पणे हसत होती..
क्रोधाचा आवेग ओसरला अन अग्नीमित्र भानावर आला आपल्या अवस्थेची जाणीव झाल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..जीवनातले सारे काही गमावले होते..मन खिन्न व विषादाने भरून आले..
तो याचना युक्त स्वरात मालविकेस म्हणाला..अगे चांडाळ कृत्ये तुझे काम तर झाले आता मला या नरकातून मुक्त कर..एव्हढी तरी कृपा करशील ना?
पुढच्या अमावास्येपर्यंत जर असाच तरुण मिळाला तर व त्याच्या तारुण्याचे प्राशन मी केले की तू मुक्त होशील..
बाहेर जा पायरीवर तुला त्या देवदत्ताचे कलेवर दिसेल..तुझ्या मुळे तो मुक्त झाला...
जा अन त्या कलेवराची विल्हे वाट लावून ये..अन मुक्तीची याचना करीत बस..
भेसूर पणे हसत मालविका म्हणाली....
अशीच एक अमावास्येची रात्र होती मालविका कुणाची तरी वाट पाहतं होती अन बाजूला कथा नायक अग्नीमित्र मुक्तीची वाट बघत होता.
Avi
प्रतिक्रिया
4 Mar 2012 - 11:17 am | अमितसांगली
तात्पर्य : फक्त सौन्दर्याकडे बघून अधाशीपणे कोणत्याही स्त्रीकडून अधाशिपणे रतिसुख घेऊ नये...पर-स्त्री मातेसमान .....
विर्यवान युवक म्हणजे काय ??
4 Mar 2012 - 11:46 am | मन१
जी ए का कुणाची तरी अशीच "जखीण" ह्याम विषयावरची शेम टू शेम पाच्-सात पानाच्ची लघुकथा आहे.
त्यातल्या कथानायकांची फक्त नावे वेगळी आहेत वेणूमाधव्,गोपाल अशी काहिशी आठवतात.
4 Mar 2012 - 1:16 pm | सांजसंध्या
मस्त कथा आहे
4 Mar 2012 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा...! चटकदार कथा आहे.. ;-) कुठे आहे हो हा प्रासाद...? अग्निमित्रास मुक्ति द्यावी असा मानवतावादी इचार करतोय..!
4 Mar 2012 - 8:26 pm | अन्नू
राम राम राम... घोर कलीयुग रे देवा!
अवांतरः- (निघताना सांगा, आंम्हीपण येतो बरोबर मग! ;) )
4 Mar 2012 - 8:53 pm | आत्मशून्य
सोबत मस्ती, कोहीनुर (शक्यतो एखादं डॉटेड) वगैरे वगैरे जवळ ठेवा म्हणजे इतरांना मुक्त करताना तुम्ही फसणार नाही याची काळजी घेतली जावी ;)
4 Mar 2012 - 10:25 pm | अत्रुप्त आत्मा
@सोबत मस्ती, कोहीनुर (शक्यतो एखादं डॉटेड) वगैरे वगैरे जवळ ठेवा म्हणजे इतरांना मुक्त करताना तुम्ही फसणार नाही याची काळजी घेतली जावी >>>> तरीच मी म्हटलं हा मनकवडा इतके दिवस झाले गेलाय कुठ्ठे..? कस्सं बरोब्बर वळीखलन मेल्यानी... ;-)
4 Mar 2012 - 8:54 pm | सूर्यपुत्र
आयडीला अक्षरशः जागले आहेत.... ;) दोन्ही आत्म्यांची जोडी जबरदस्त शोभून दिसेल.... ;)
-सूर्यपुत्र.
4 Mar 2012 - 6:40 pm | निनाद मुक्काम प...
कथेचे शीर्षक वाचून एका विदुषीचे नाव डोळ्यासमोर आले.
मालविका तिवारी
बाकी कथा मस्तपैकी जमवून आणली आहे. तिचा उमग वर उल्लेख केल्यासारखा कुठेतरी नक्की वाचल्याचे जाणवते.
मात्र तुमची लिखाणातील सफाई अव्वल दर्जाची आहे.
एक दिवस हिंदी सिनेमाच्या पटकथा सुद्धा व्यवस्थित लिहिणे जमेन तुम्हाला.
पु ले शु
4 Mar 2012 - 8:45 pm | आत्मशून्य
एकाच कथेत
१) वन नाइट स्टँड उघडं उघडं प्रमोट केला (संदर्भ अत्रूप्त आत्मा यांची बोलकी प्रतीक्रीया) व नुसता प्रमोटच केला नाही तर वन नाइट स्टँड म्हणजे आपल्याच (विर्यवान)पुर्वजांनी प्राचीन कालापासुन अनुसरलेली आपलीच (म्हणूनच पवित्र) संस्कृती आहे हे उघडं उघडं सोदाहरण पटवलेही.
२) आणी सोबतच एड्सचे परीणाम किती भयानक असतात याची लगेच जाणीवही करुन दिली. सॉलीड कँपेन केले राव तुमी. हा अत्यंत आरोग्यदायी धागा आहे असे नमुद करु म्हणतो.
तरीही अग्निमित्रास मुक्ति द्यावी असा मानवतावादी इचार करणार्यांला कोणत्याही व्यक्तीला शंका नको व पुन्हा कोणी अग्निमित्र बनताना फसु नये म्हणून तुम्ही मालविकेसोबत सुरक्षित समागमाबद्दल प्रबोधनकारक अशा दोन ओळी कथेच्या अनुशंगात लिहल्या असत्या तर सुरक्षित समागमाचे महत्वही अधोरेखीत करता आले असते असे नमुद करतो.
4 Mar 2012 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा
@तरीही अग्निमित्रास मुक्ति द्यावी असा मानवतावादी इचार करणार्यांला कोणत्याही व्यक्तीला शंका नको व पुन्हा कोणी अग्निमित्र बनताना फसु नये म्हणून तुम्ही मालविकेसोबत सुरक्षित समागमाबद्दल प्रबोधनकारक अशा दोन ओळी कथेच्या अनुशंगात लिहल्या असत्या तर सुरक्षित समागमाचे महत्वही अधोरेखीत करता आले असते असे नमुद करतो.>>> आंम्हास त्याचे महत्व आणी ममत्व दोन्ही ठाऊक आहे हो... ;-)
4 Mar 2012 - 11:04 pm | सोत्रि
एकदम मनातले लिहीलेस रे आशू !
- (सुरक्षित समागमाचे महत्व जाणणारा) सोकाजी
5 Mar 2012 - 12:06 am | शैलेन्द्र
+११११११११११११११११११११११११११११
5 Mar 2012 - 12:33 am | विनोद१८
...कथा मस्त लिहीलित .अकु. कथा वाचून व त्या वरचे प्रतिसाद वाचून अम्मळ करमणुक झाली. अजूनहि आपले 'मिपा मन्डळातील' काही मित्र हतवीर्य अवस्थे पर्यन्त अजुनही पोहोचू शकत नाहीत याचे फार फार वाइट वाटले.
असो, प्रयत्नान्ती परमेश्वर.. लगे रहो...कोशिश करनेवालोन्कि हार नहि होती .
विनोद१८
5 Mar 2012 - 2:46 am | योगप्रभू
नृपाचा तातडीचा किंवा महत्त्वाचा संदेश घेऊन जाणारे राजसेवक कोणत्याही काळात कधीच पायी जात नसत. तितका कालापव्यय करणे राजाला परवडणारे नसल्याने अशावेळी घोडेस्वार पाठवत. हे राजसेवक आपल्या कामात अत्यंत निष्णात असत. ते शक्य तितक्या जलदीने हा निरोप पोचवून न थांबता प्रत्युत्तर घेऊन माघारी फिरत. पुन्हा असा निरोप्या एकटा नसे. त्याला कुणी लुटू नये म्हणून बरोबर संरक्षक घोडेस्वारांचे पथकही दिले जाई. क्वचित रात्री-अपरात्री तातडीचा निरोप धाडायचा झाल्यास पथकाला अंधारात वाट दाखवणारे मशालजीही बरोबर देत. (ब्रिटीशांच्या अंमलात प्रथमच जवळच्या ट्प्प्याची डाक अथवा तातडीचा निरोप घेऊन पायी धावत जाणारे लोक 'रनर' म्हणून ओळखले जात. पण हा रनरही त्या परिसराचा/पायवाटांचा बारीक अभ्यास असणारा असे.) आपल्या कथेतील राजसेवक एखाद्या यात्रेकरुसारखा चालत दमला आहे. रस्ता पायाखालचा नाही म्हणजे वाट चुकला आहे. हे विश्वास ठेवायला कठीण जाते. त्यातून बाजूच्या गावातील प्रमुखाला निरोप द्यायचा तर मग इतके त्राण जाण्याइतके कशाला चालायला हवे?
अनोळखी सुंदर स्त्रीला निर्जन परिसरातील प्रासादात एकटे बघून कुतुहल असलेला कुणीही माणूस एकदम 'मी अग्निमित्र. राजाचा सेवक' अशी ओळख करुन देणार नाही. असे संवाद साधारणपणे पुढील भाषेत घडत.
'या निर्जन परिसरातील प्रासादात एकाकी वास्तव्य करणार्या हे देवी! आपण कोण आहात?'
'आर्यपुत्र! मी मालविका. ज्वराने माझा कंठ शुष्क झाला आहे. माझा सविस्तर परिचय देण्याआधी मला आतून जल आणून द्याल का? माझ्या अंगात उठण्याचेही त्राण नाही.'
अनोळखी स्त्री 'मला आत घेऊन चला आणि जल पाजा' असे एकतर म्हणणार नाही आणि अनोळखी पुरुष लगेच तिला हातावर उचलून घेऊन आत नेणार नाही. तो प्रथम प्रासादात सेवक/सेविका आहेत की नाही, हे बघेल. बायकांच्या अंगाला सहजपणे हात लावण्याची आपली संस्कृती निदान जुन्या काळात तरी नव्हती.
ज्वराने गलितगात्र सुंदर स्त्रीने दोन घोट पाणी पोटात जाताच लगेच प्रणयाचे चाळे सुरु करणे, राजसेवकाने सरकारी कामादरम्यान अनोळखी ठिकाणी मुक्काम करणे, अनोळखी सुंदर स्त्रीशी एकदम संबंध करणे. सगळी मज्जाच मज्जा. आणखी एक. 'नाथ' ही हाक तत्कालीन स्त्रिया केवळ पतीला मारत. अन्य पुरुषांना नव्हे.
5 Mar 2012 - 7:01 am | सूड
'मी अग्निमित्र राजाचा सेवक" अशी ओळख करून देणार नाही म्हणता ? हा अग्निमित्र एकेकाळी मिपाचा सदस्य असावा आणि अनोळखी मिपाकरणींना 'मज्याशि मयतरी कर्नार कं ?' विचारत असावा. त्यामुळे सवयीने त्याने सरळ स्वत :ची ओळख करून दिली असावी. लोक मिपावरुन गेले तरी मिपा त्यांच्यातून जात नाही म्हणे.;)
5 Mar 2012 - 8:09 am | ५० फक्त
अगदी बरोबर बोललास मित्रा, कथा छान आहे, पण काही संदर्भ खटकलेच, योगप्रभु म्हणतात तसे.
मालविका म्हण्ल्यावर मालविका तिवारी डोळ्यासमोर आली, मला वाटलं पुन्हा एक स्मरणरंजन की काय आता, निर्जीव ते सजीव . असो. दोन आठवड्यापुर्वी अर्चना जोगळेकरांचा उल्लेख झाला होता, आता मालविका तिवारींचा, वाढणं जाणवणा-या वयातील या दोन स्वप्नसुंदरी होत्या माझ्या, अजुन एक म्हणजे पिनाझ मसानी, गजल गायिका.
असो, पुन्हा स्वप्नरंजन नको.
5 Mar 2012 - 8:49 am | अप्रतिम
रत्नाकर मतकरींची "म्हातारीची मुलगी" ही कथा आठवली.
5 Mar 2012 - 11:09 am | कवितानागेश
कथा वाचून आठवण झाली. उन्हाळा येतोय. मृत्तिकेचा घट आणायला हवा! :)
बाकी या अग्निमित्राला त्या बिचार्या देवदत्तच्या पुटपुटण्याचा अर्थ कळला नाही, पण मालविकेच्या बोलण्यातले आर्जव व अधराचे अन नेत्रांचे विभ्रमी चाळे बरे कळले!
ही पाडलेली कथा आहे. वास्तववादी बिल्कुल नाही.
फक्त सुंदर स्त्रियांना पिशाच्च वगरै काहीतरी ठरवण्यासाठी या असल्या कथा लिहिल्या जातात.
अवांतरः पिशाच्च खरेच असते का हो?
5 Mar 2012 - 11:41 am | अन्या दातार
अजुन शंका आहे? ;)
5 Mar 2012 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार
कथा आवडली. छान फुलवली आहे, आणि मुख्य म्हणजे थोडक्यात उरकली आहे.
6 Mar 2012 - 1:25 am | प्राजु
आणि मुख्य म्हणजे थोडक्यात उरकली आहे.>>>
हलकट परा!! ;)
6 Mar 2012 - 10:25 am | दिपक
>>>>> हलकट परा!! Wink
छान प्रतिक्रिया आणि मुख्य म्हणजे थोडक्यात उरकली आहे ;-)
बाकी अविनाशरावांची कथा आवडली. अजुन येऊदेत!
5 Mar 2012 - 12:03 pm | मीनाक्षी देवरुखकर
भडक वाटली. खूप नाही आवडली .
भयकथा नाही वाटली..
इथे आधी लिहिलेल्या भयकथा वाचायला मिळतील काय?
5 Mar 2012 - 12:43 pm | प्रास
मिपाकर 'चाफा' यांच्या लिखाणाचा मागोवा घ्या....
यामध्ये मिपावरच्या काही चांगल्या भयकथा आहेत.
बाकी स्पा, बिका इ. सिद्धहस्त (भयकथा) लेखकांचे लिखाणही धुंडाळा.....
5 Mar 2012 - 12:16 pm | यकु
फालतूपणाचा विजय असो!
5 Mar 2012 - 12:20 pm | मीनाक्षी देवरुखकर
भयकथा कुठे वाचायला मिळतील हे विचारण्यात
मी काय फालतूपणा केला?
काही समजले नाही
5 Mar 2012 - 12:23 pm | यकु
देवरुखकर मॅडम, ती प्रतिक्रिया तुम्हाला उद्देशून नाही.
5 Mar 2012 - 12:37 pm | मालोजीराव
मस्त कथा...थोडक्यात संपल्याने मजा आली...!
मालविकेच्या प्रासादाचा पत्ता अथवा तिचा फोन नंबर,इमेल मिळेल का ???
- मालोजीराव
5 Mar 2012 - 3:17 pm | चिरोटा
malwika300@pishachchayoni.org
मेल पाठवला होता सकाळी.पुढच्या तीन अमावास्या बुक झाल्या आहेत म्हणाली.( फक्त incall आहे. outcall नाही असेही म्हणाली).
5 Mar 2012 - 3:30 pm | मालोजीराव
च्यामारी बाई लईच बेरकी दिसतीया...
तीन अमावश्या न्हाई म्हंजी वंगाळ काम झालं...बाकी देन्या घेन्याच कसं काय बोलली ?
...आन outcall नग व्हय तिला...एक डाव आमच्या वाड्यावर तर या म्हनाव....
- मालोजीराव भुते-पाटील
5 Mar 2012 - 3:49 pm | दादा कोंडके
आणखी थोडीशीच मेहनत (वर्णन करताना अजुन जास्त संस्कृत प्रचूर उपमा वापरल्या असत्या तर वाचक त्यामध्ये गुंतून राहून सस्पेंस शेवटपर्यंत राखला गेला असता. ) घेतली असती तर खूपच छान लेखन झालं असतं. पण जब्रा प्रयत्न.
6 Mar 2012 - 10:46 am | आत्मशून्य
Bewolf (२००७) नक्किच बघा. आवडेलच. शेवटी एंजलीना जोली आहे तिथे मालविका सद्रुश्य भुमीकेमधे :)
6 Mar 2012 - 10:43 am | सुहास..
छान !
6 Mar 2012 - 12:46 pm | डॉ.श्रीराम दिवटे
Bewolf (२००७) नक्किच बघा. अगदी खरे. कथा अगोदर कुठेतरी वाचली आहेसे वाटते, असो. उत्तम रंगवली आहे. सुरक्षित संबंध ठेवलेच पाहिजेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
6 Mar 2012 - 4:23 pm | चिगो
म्हणूनच पाण्याला "जीवन" असे म्हणतात.. ;-) पाण्यात कुठले "अॅफ्रोडेसियॅक" मिसळले होते? :p
अवांतर : हे क्रेडीट "चांदीच्या पेल्याला" दिले असते, पण लेखकाने मातीच्या भांड्यातून पाणी दिल्याचे लिवले आहे..