एगलेस चॉकलेट केक - प्रकार १

Pearl's picture
Pearl in पाककृती
16 Feb 2012 - 2:35 am

एगलेस चॉकलेट केक - प्रकार १


साहित्यः
१.५ कप ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा), १ कप बारीक साखर, ३ टेबलस्पून अनस्वीटन्ड कोको पावडर, १ टीस्पून बेकिंग सोडा, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून वॅनिला एक्सट्रॅक्ट (इसेन्स), १ टेबलस्पून व्हाइट व्हिनेगर, ५ टेबलस्पून तेल, १ कप थंड पाणी

कृती:
१. एका बाउलमधे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) आणि कोको पावडर पिठाच्या चाळणीने एकत्र चाळून घ्या. (चाळल्यामुळे केक जास्त फ्लपी होतो म्हणतात. मी ही चाळण्याची स्टेप (चाळणी नसल्याने :() केली नव्हती. pre-sifted ऑल पर्पज फ्लोर आणि कोको पावडर नुसतचं मिक्स करून घेतलं होतं.)
२. आता त्यात साखर, बेकिंग सोडा, मीठ घाला. एकत्र मिक्स करून घ्या. मग त्यात वॅनिला एक्सट्रॅक्ट, व्हाइट व्हिनेगर, तेल, पाणी घाला. हे सर्व एकत्र मिक्स करून चांगले आणि भरपूर फेटून घ्या.
३. आता केक पॅन मध्ये १/२ चमचे तेल घालून तेल हाताने पसरून केक पॅन तेलाने चांगला कोट करून घ्या. जास्तीचे तेल काढून टाका. त्यावर थोडे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) हाताने भुरभुरून घ्या. मग त्यात वरील मिश्रण ओता.
४. ओव्हन ३५० °F ला प्रिहिट करून घ्या. मग त्यात केक पॅन ठेवून ३५ मिनिटे बेक करून घ्या. एक टूथपिक केकमध्ये खूपसून बाहेर काढल्यावर क्लीन बाहेर आली तर केक झाला असं समजा. केक झाला नसेल तर अजून थोडा वेळ ओव्हनमध्ये ठेवा. केक झाल्यानंतर १०/१५ मिनिटं ओव्हन स्विच ऑफ करून ओव्हनचं दार उघड ठेवा. मग केक पॅन बाहेर काढून तो कूलिंग रॅकवर ( नसेल तर डिशमध्ये / कटिंग बोर्डवर) उपडा करा. एगलेस चॉकलेट केक तयार :)

टीपः
१) हा केक बेताचा गोड होतो. जास्त नाही. ज्यांना खूप गोड केक आवडतो त्यांनी साखरेचे प्रमाण वाढवावे.
ज्याना खूप चॉकलेटी फ्लेवर आवडत नाही त्यांनी ३ ऐवजी २ टेबलस्पून कोको पावडर वापरावी. आणि चॉकलेट फ्लेवर अजिबात नको असेल तर कोको पावडर घालू नये.
२) १ कप = १ आमटीची चांगली मोठी वाटी.
३) केक बेक करण्याचा वेळ ओव्हन किंवा केक पॅनचा शेप-साइज यावर अवलंबून असतो. त्यानुसार वेळ अ‍ॅडजेस्ट करून घ्या.

प्रतिक्रिया

अन्नू's picture

16 Feb 2012 - 2:50 am | अन्नू

हे काय चालवलय तुंम्ही? चांगला झोपायला जात होतो मी आणि मध्येच हे....
आता झोप तरी लागल का? Smiley

रेवती's picture

16 Feb 2012 - 2:56 am | रेवती

छान नक्षिकाम.

पिंगू's picture

16 Feb 2012 - 3:22 am | पिंगू

छान. बर्याच वेळेला बिनअंड्याच्या केकची मागणी कुणी पुरवली नव्हती. ते काम तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद..

- पिंगू

पियुशा's picture

16 Feb 2012 - 1:54 pm | पियुशा

वॉव ,ऑस्सम...............:)

केक छान दिसतोय.
पण असा अर्धाच का?
बाकीचा कुठे गेला? की सजावटी आधीच खाऊन संपला. ;)

अर्धा टेस्ट पहाण्यात संपला :)
आणि actually मी केकशॉपमधे (विकायला ठेवलेले) असे अर्धे केक पाहिले होते. म्हणून म्हटलं वेगळं डेकोरेशन करू अर्धा केकवालं ;-)

पूर्ण केक पहायचा असेल तर...
.
.
.
.
हा घ्या :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2012 - 12:45 pm | अत्रुप्त आत्मा

चला...आम्ची सोय झाली... ;-)

प्यारे१'s picture

16 Feb 2012 - 12:59 pm | प्यारे१

ही पाकृ अंडं घालून कशी करता येईल? ;)

-प्यावेदिता ;)

कितीही हसायचं नाही ठरवलं तरी फिस्सकन हसू आलंच.;)

जाई.'s picture

16 Feb 2012 - 1:00 pm | जाई.

वॉव मस्तच

मस्तच दिसतोय केक. अर्धा केक खाऊन झाल्यावर सुद्धा डेकोरेशन केलंस......... धन्य आहेस :)

कुंदन's picture

16 Feb 2012 - 5:42 pm | कुंदन

विकांताला करुन बघायला हवा.

सानिकास्वप्निल's picture

16 Feb 2012 - 10:02 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं दिसत आहे केक :)
करुन बघायचा आहे हा पण व्हिनेगर ऐवजी दुसरे काही घालू शकतो का, म्हणजे काही दुसरा पर्याय??

व्हिनेगर ऐवजी लिंबूरस वापरावा असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. प्रमाण किती बदलेल अंदाज नाही. तसं एकदा ट्राय करून पाहिले पहिजे.

या रेसिपीमध्येही व्हिनेगारमुळे केक मिश्रणाला किंचित आंबटपणा येतो. मी टेस्ट करून पाहिलं होतं. पण केक बेक झाल्यानंतर मात्र छानच लागतो. आणि अजिबात आंबटपणा जाणवत नाही. केक हलका आणि स्पाँजी होतो.

तर्री's picture

17 Feb 2012 - 8:37 pm | तर्री

चविष्ठ.
एका मागून एक , ह्या आठवड्यात दुसरा केक .