इच्छा !

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जे न देखे रवी...
7 Feb 2012 - 3:15 pm

कोणते शब्द वापरू तुझे गुण गाण्या,
तू स्फूर्तीचीही मूळ प्रेरणा असशी,
मी इच्छा करतो आणि कौतुके तूही
लेखणीतून या सारे लिहवुन घेशी |

मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा,
अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी,
हे मी नच केले, घडले तुझ्या कृपेने,
ही जाणिव होता मनास लाभे शुद्धी |

हे सगळे तरिही शब्दरूप, बाह्यांगी,
तू निसटुन जाशी मना मोहवुन माझ्या
अन् पुन्हा एकदा तुझे रूप-गुण गाण्या,
अन् तुला पकडण्याची मज होते इच्छा |

- चैतन्य दीक्षित

कविता

प्रतिक्रिया

राघव's picture

7 Feb 2012 - 3:23 pm | राघव

छान लिहिलंय.

राघव

पक पक पक's picture

7 Feb 2012 - 3:25 pm | पक पक पक

मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा,
अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी,

येउ द्या ! अजुन येउ द्या !! बुद्धि नाही चालली तरी येउ द्या..छान छान आहे ,काव्य...?

पाषाणभेद's picture

7 Feb 2012 - 10:41 pm | पाषाणभेद

मस्त

चैतन्य दीक्षित's picture

8 Feb 2012 - 11:46 am | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

पैसा's picture

8 Feb 2012 - 5:47 pm | पैसा

जुन्या मराठी काव्याच्या धर्तीची रचना आवडली.