चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
31 Dec 2011 - 4:24 pm

आता व्याडेश्वराचे दर्शन घेउन झाले होते,मग देवीचे दर्शन घ्यावयाचे असे ठरवले. देवीसाठी काय घ्यायचे असा विचार चालला असतानाच जवळच एक फुलांचे दुकान दिसले...
अगदी ताजे हार केलेले दिसत होते...

मग अजुन त्या दुकान मी डोकावलो,तर ताज्या फुलांनी टोपली भरलेली दिसली.

हारवाल्या मुलाला सांगितले की या फुलांचा हार करुन दे,त्याने तसा त्या सुगंधी फुलांचा मस्तपैकी हार बनवुन दिला.मग देवीचे दर्शन घेण्यास निघालो...

नारळ सुपारीची झाडे मन मोहुन टाकतात...कितीही पाहिले तरी समाधान काही केल्या होत नाही.
शेवटी दुर्गा-देवीच्या देवळाच्या बाहेर पोहचलो, तिथे एक मोठा धर्मस्तंभ नजरेस पडला.

फार-फार वर्षांपूर्वी ज्या जागी हा खांब आहे,त्या जागी रस्त्याच्या खाली साधारण १०-१२ फूट खोल जागेत देवीचे मंदिर होते. याच संदर्भात एक दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे,समुद्री चाचे,लुटारु यांचा गुहागरवासी लोकांना फार त्रास झाला,तेव्हा देवीने या आक्रमकांशी युद्ध केले आणि त्यांना परतवुन लावले.त्याचीच साक्ष म्हणुन रुईची पानावर तिच्या नथीतला मोती या स्तंभाच्या जागी आढळुन आला.हेच ते देवीचे स्वयंभू स्थान होते.

प्रवेशद्वारा पासुन मंदीराकडे जाण्यासाठी सुंदर रस्ता आहे,याला "दुर्गेची पाखाडी" असे म्हणतात.आधी हा रस्ता चिखलाचा होता,पण वेळो वेळी भक्तमंडळींनी मदत करुन आजचे दिसणारे पक्के बांधकाम करुन घेतले आहे.ही वाट संपल्यावर देवळात प्रवेश होतो आणि लगेचच त्या आवारात दोन समाध्या दिसतात,त्या अनुक्रमे कै.शिवरामशास्त्री शारंगभट खरे आणि दुसरी या मंदिराची रचना करणारे कै.पद्माकरभट्ट दातार यांची असल्याचे मानले जाते.

नगरात प्रवेशले पंडु नंदन| ते देखीले दुर्गा स्थान |
धर्मराज करी स्तवन| जगदंबेचे तेधवा ||
लहानपणी हे युधिष्ठिर विरचीत स्तोत्र वाचताना कधीही मला असे वाटले नव्हते की ज्या देवीचे असे वर्णन केले आहे त्या देवीच्या दर्शनाचा योग माझ्या आयुष्यात येईल.
देवीची मूर्ती अष्टभुजा आहे,तिच्या एका हातात चक्र्,दुसर्‍या हातात अंकुष्,तिसर्‍या हातात सर्प,तर चौथ्या हातात त्रिशुळ आहे.पाचव्या हातात शंख, सहाव्यात घंटा,सातव्यात परशु आणि आठव्या हातात महिषासूराची शेंडी धरलेली आहे.देवीचे वाहन असलेल्या सिंहाने महिषासुराच्या पाठीत त्याचे पंजे आणि दात रोवलेले आहे.
पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाचे होते,श्री दुर्गा देवीचा उल्लेख दुर्गा व्याडेश्वरी असा सापडतो.
इस्लामी हल्ल्यात मुसलमानांनी देवळे तोडली मूर्ती फोडल्या,तेव्हा जगन्नाथ दातार यांनी महिषासुरमर्दीनीच्या २ सुरेख मूर्ती करवुन घेतल्या,त्यातली एक संगमरवरी गुहागरला तर काळ्या पाषाणातली मूर्ती मुरुडला बसवली आहे.
देवीचे दर्शन घेउन मनाला अत्यंत आनंद व शांतता लाभली... आणि आम्ही पुढच्या प्रवासास जाण्याचा बेत ठरवला.

पुढच्या भागात गुहागर समुद्र दर्शन.
चित्रमय कोकण दर्शन (भाग २) श्री व्याडेश्वर मंदिर

* देवीचा फोटो काढण्यास मनाई आहे, परंतु मला फक्त या देवस्थाना बद्धल माहिती द्यायची आहे,आणि फोटोचा कुठलाही व्यायसायिक वापर करायचा नाही असे सागितल्यावर पुजार्‍यांनी फोटो काढण्याची परवानगी दिली.
** या लेखातील माहिती देताना मी, दुर्गाश्री आणि गुहागर निवासिनी श्री दुर्गादेवी या दोन माहितीपर पुस्तकांचा संदर्भ /आधार घेतला आहे.

( हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

प्रवासछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

31 Dec 2011 - 4:37 pm | प्रचेतस

सुंदर फोटो बाणा. पण इतके कमी का टाकलेस?

पियुशा's picture

1 Jan 2012 - 11:11 am | पियुशा

मै भी ययिच बोलती ! इतने कम फोटु क्यु डाले रे मामु ? ;)
चल अभी ने़क्स्ट धागे मे ज्यादा से ज्यादा फोटु डालनेका मामु ,क्या समझे ;)
अपुन राह देख रैली है ;)

मामु क्या हय, इस टेम अपुनसे गलती से मिस्टक हुएला हय ! बोलो तो... समज गये ना ? ;)
अभी वांदा नय... मस्त समुंदर का सिनेरी देखनेका...और वो जो उपरवाला सुरजचाचा है ना.. वो कैसे सो जाने के लिये कलटी मारता हय, वो एकदम शांतीसे देखनेका...
सच्ची बोलताय मामु... सब कुछ भुल जाने होता हय... ;)
उसके लिये जरा इतंजार करना पडता हय लैकीन.... ;)

धनुअमिता's picture

31 Dec 2011 - 4:39 pm | धनुअमिता

खुपच छान माहिती दिलीत. फोटो पण सुरेख आले आहेत.

पैसा's picture

31 Dec 2011 - 6:18 pm | पैसा

फुलांचे फोटो फारच छान आलेत आणि देवीच्या मूर्तीचा फोटो अगदी प्रसन्न दिसतो आहे.

चित्रा's picture

1 Jan 2012 - 5:44 am | चित्रा

फोटो आवडले, विशेषतः मोगर्‍याच्या कळ्यांचा फोटो छान आहे.

किसन शिंदे's picture

2 Jan 2012 - 2:51 pm | किसन शिंदे

तो मोगरा नसुन 'काकडा' आहे आणि ती फुलं मोकळी नसून त्यांचा गजरा दिसतोय.

वपाडाव's picture

29 Jan 2012 - 7:14 pm | वपाडाव

तंतोतंत सहमत...

अन्या दातार's picture

31 Dec 2011 - 11:11 pm | अन्या दातार

देवीच्या देवळाबाहेरच्या स्तंभाबद्दल माहिती नव्हती. ती तू दिलीस याबद्दल आभारी आहे. फोटो अंमळ कमीच वाटले. देवीचा फोटो काढायची परवानगी मिळाली म्हणजे खरंच आश्चर्य आहे.

मदनबाण's picture

1 Jan 2012 - 12:32 am | मदनबाण

ह्म्म... खरयं फोटो कमी टाकले आहेत.पुढच्या भागात सुधारणा केली जाईल. :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2012 - 12:48 am | अत्रुप्त आत्मा

छान माहीती व फोटो.. :-)

फोटो आणि वर्णनही अप्रतिम. पुढच्यावेळी अजून फोटो अपलोडावेत.
कोकण रॉक्स.

फोटो आणि वर्णन सुंदरच, मस्त वाटलं.

मबान माहिती दिलिच आहे, तरी एक अनाहुन विनंती, सदर फोटोचा डाउनलोड करुन किंवा कॉपी करुन कोणीही व्यावसाहिक वापर करु नये ही विनंती.

मदनबाण - हा फोटो, जर तुझ्या पिकासात असेल तर गुगल सर्च अ‍ॅलर्टला रजिस्टर करुन ठेव, जेंव्हा जेंव्हा हा फोटो अ‍ॅक्सेस केला जाईल तेंव्हा तुला कळेल.

मदनबाण's picture

1 Jan 2012 - 9:06 am | मदनबाण

धन्यवाद... :)

मदनबाण - हा फोटो, जर तुझ्या पिकासात असेल तर गुगल सर्च अ‍ॅलर्टला रजिस्टर करुन ठेव, जेंव्हा जेंव्हा हा फोटो अ‍ॅक्सेस केला जाईल तेंव्हा तुला कळेल.
ओक्के... अलर्ट रजिस्टर केला.पण एक सांगा याचा फायदा काय ? म्हणजे या फोटोच्या लिंकचा अलर्ट तर कोणीही तयार करु शकेल ना ? म्हणजे त्याला सुद्धा कळेल की हा फोटो केव्हा केव्हा अ‍ॅक्सेस केला गेला आहे ते.

धन्यवाद मदनबाण... नववर्षाच्या सकाळी "दुर्गा व्याडेश्वरी"चे सुमंगल दर्शन करवुन दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!...

अधिक फोटोंसाठी प्रचन्ड उत्सुक्क!!!!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2012 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक अनाहुन विनंती, सदर फोटोचा डाउनलोड करुन किंवा कॉपी करुन कोणीही व्यावसाहिक वापर करु नये ही विनंती.

मदणबाणाने काढलेला फोटो डाऊनलोड करुन मला काही व्यवसाय करायचा नाही. पण असा वापर कोणीच करु नये असं का ? देवस्थानाने फोटो काढून विकले तर चालतात काय ?

काय विशेष कारण.

-दिलीप बिरुटे

अमोल खरे's picture

1 Jan 2012 - 9:38 am | अमोल खरे

आम्ही गुहागरला गेलो होतो तेव्हा ह्याच देवळात उतरलो होतो. दुर्गादेवी मंदिराचे स्वतःचे उत्तम भक्तनिवास आहे. दोन शिफ्ट्स मध्ये पुजारी आहेत. राहण्याबरोबर जेवायची सोयही केली जाते. साधे जेवणच असते पण मुख्य म्हणजे मेन मार्केट पर्यंत जावे लागत नाही (जेथे हॉटेल्स आहेत). देवस्थानाचा परिसर इतका स्वच्छ आहे की आपोआप मन प्रसन्न होते. हे देवस्थान म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुना आहे. देवळाच्या समोरुनच बीचला जायचा रस्ता आहे. मदनबाण बीचचे फोटो टाकेलच. बीच पण अप्रतिम आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2012 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाणा, फोटो आणि माहिती मस्तच.

-दिलीप बिरुटे

दीपा माने's picture

2 Jan 2012 - 9:32 am | दीपा माने

मदनबाण,
नविन वर्षात पदार्पण करताना श्री दुर्गादेवीच्या प्रसन्न मुर्तीचे दर्शन घडविल्याबद्दल आपले आभार.

फोटू छानच आलेत.
गजरे आणि हार पाहून मन सुखावलं.