तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

santosh waghmare's picture
santosh waghmare in जे न देखे रवी...
30 Dec 2011 - 10:26 pm

दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे,
तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत,
गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत,
सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे ,
तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत,
शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत,
पण मृगजळात तहान नाही भागत रे,
तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत,
पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत,
पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे,
तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत,
जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत,
मग छिद्र पडुनी झोळीस सारा बाजार निघुनी जात रे,
तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

नकळतच एखाद्याच्या मोहात ते अडकत,
ती गोष्ट दूर होण्याच्या भीतीने त्यास वेधत,
पण व्यक्ती, वस्तू आणि प्राण कधी न कधी सोडून जात रे,
तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

कविता

प्रतिक्रिया

निश's picture

31 Dec 2011 - 12:42 pm | निश

खरच मस्त छान कविता

समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत,
जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत,
मग छिद्र पडुनी झोळीस सारा बाजार निघुनी जात रे,
तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

ह्या ओळी अतिशय सुंदर आहेत.

santosh waghmare's picture

31 Dec 2011 - 8:57 pm | santosh waghmare

धन्यवाद