तुझी माझी प्रित जमली
तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
ती:
लपून छपून प्रेम ते केले
कधी कुणा नाही कळले
आता वाट नको पाहू
वेळ लग्नाची झाली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
तो:
कानी तुझ्या ग डूल डुले
पायी पैंजण रुणझूण बोले
गाली लाली येण्याची
वेळ जुळूनी आली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
ती:
तू या शेताचा रे राजा
येथेच आण तू बँडबाजा
तुझ्या राणीची वरात
मला स्वप्नात दिसली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
तो:
घराची होशील तू ग राणी
कसा राहू तुजवाचूणी
नको जावू आता दुर
तारीख लग्नाची ठरली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
- पाभे
प्रतिक्रिया
30 Dec 2011 - 7:18 am | अत्रुप्त आत्मा
व्वा वा पा.भे. थंडी चांगलीच बोलायला लागलीये हो...! अता लग्नाची तारीख वगैरे ठरवलेली दिसत्ये,त्यामुळे या पुढचं गाणं लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसातलं,लाजर्या/बुजर्या नवरा नवरीचं,अतिशय रोमँटिक/गमंतशिर पाहिजे बरं का..!
30 Dec 2011 - 11:21 am | निश
पा भे साहेब जिंकलत
मस्त छान कविता.