पण........!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
7 Dec 2011 - 10:16 am

तुझ्यासाठी राखून ठेवले होते शब्द,
परवा शब्दांची ची एकच घाई उडाली,
कागदावर उमटण्यासाठी त्यांची अगदी रांगच लागली
भेटणार होतास तू , ठरवले होते म्हणूनच ,
सांगावे सारे सारे तुला,.......पण .............

न धाडता फक्त लिहिलेली पत्र
एक न अनेक, वाचावीत घडा घडा
ऐकत राहशील तू फक्त या आशेने
सांगत राहावे सारे सारे तुला.......पण.......

विणले होते धागे ,गुंतले होते मन
कळत होते फुलांनाही आता उमलणे ,
वाटेवर डोळे लावून बसलेल्या राधेला सतावणे ,
येशील तेव्हा सांगेन खरे सारे सारे तुला.....पण......

अनोळखी म्हणून भेटलास खरा
आत्ताच ओळख झाली म्हणालास खरा
जे माझे नव्हते कधीच, मी गमावून बसले होते,
तू मात्र गमावले, जे फक्त तुझेच होते ,
आहे खुशीत मीही हेच भासवले मग तुला
कळलेच अस्फुट तरीही ते सारे सारे तुला ....पण........

कविता

प्रतिक्रिया

फिझा जी,

खूप छान लिहिले आहे. भावनाप्रधान काव्य आहे. पुलेशु.

- निनाव.