शून्यात सामावलेला समुद्र
त्याची एक आठवण ..एक मोती
हवेहवेसे वाटणारे ते रत्न
पण नकोशा वाटणाऱ्या लाटा वाहून नेणाऱ्या
रत्नांचे मोल किनाऱ्याला कधीच नसते
वाहून आणलेले ते ओझे असते
कुणाच्या आठवणी बनून राहतात ते
कुणी व्यवहार करतात त्याचे
रेतीवरचे नाव वाहून जाते पाण्यासवे
दगड काही शिल्लक राहतात उन्हासवे
रत्न पुसत राहते कथा त्याच्या वैभवाची
चांदण्यानाही हेवा वाटे त्या स्फटिकाची
नसणे असूनही आणि असणे नसूनही
लाटांबरोबर वाहत जाणे रत्न बनूनही
वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी
आणि खेचणा-याच्या नशिबाची जुगारी
संपत नाही कधीच त्यांच्या जीवनाची उधारी
नवीन किनाऱ्यावर नव्या लाटांना
सलाम त्या रत्नाला आणि या जीवनाला !!
प्रतिक्रिया
21 Dec 2011 - 10:26 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर!! आवडली.
21 Dec 2011 - 10:38 am | वाटी
फारच सुंदर सुरेख शब्दात अत्यंत रेखीव रचना :)
21 Dec 2011 - 2:30 pm | निनाव
खूप आवडली कविता. प्रत्येक कडवे सुंदरच रचले आहे.
"रेतीवरचे नाव वाहून जाते पाण्यासवे
दगड काही शिल्लक राहतात उन्हासवे
रत्न पुसत राहते कथा त्याच्या वैभवाची
चांदण्यानाही हेवा वाटे त्या स्फटिकाची "
-
हे खूपच छान!