Vijayraaj Bodhankar
Title: Tilak
Making Year: 1990
(Not For Sale)
Medium: Poster Colours
Vijayraaj Bodhankar
Title: Saverkar
Size:16"X20"
Medium: Oil on Canvas
Vijayraaj Bodhankar
Title: Vyapar (Business)
Size: 16"X16"
Medium: Oil on Canvas
Vijayraaj Bodhankar
Title: Village
Size: 16"X16"
Medium: Oil on Canvas
Vijayraaj Bodhankar
Title: Peshwai (Set of two)
Size: 12"X12"
Medium: Acrylic on Canvas
हे पेंटिंग जेव्हा पाहिले तर क्षणभर भान हरपले... बोधनकारांना विचारले की याला काही टायटल का नाही... ते म्हणाले या कलाकॄतीला नाव द्यायचे राहिले... पण पुढे कोणतेच नाव द्यावे वाटले नाही.
माझे मनोगतः---
बोधनकरांचे मी पाहिलेले पहिले पेटिंग हे गणपतीचे होते,एका डॉक्टरच्या क्लिनीक मधे ते लावलेले होते.बोधनकरांचे नाव ऐकुन होतो पण प्रत्यक्षात कधी त्यांची भेट झाली नव्हती ! पण मग एक प्रदर्शनाची जाहिरात लोकसत्ते मधे आलेली पाहिली आणि त्यांचे प्रदर्शन आहे हे कळले, मनात इच्छा निर्माण झाली की हे प्रदर्शन पहायला मिळावे... आणि अचानक त्यांच्याकडुन आम्हाला या प्रदर्शनाचे वैयक्तिक आमंत्रण मिळाले, मला फार आनंद वाटला आणि समाधानही. :)
ठाण्यातील ग्रीन स्ट्रोक आर्ट गॅलेरी मधे ( १७ नव्हेंबर ते २३ नव्हेंबर अशा कालावधीत) हे प्रदर्शन भरले होते... त्या प्रदर्शनाचा आनंद मला लुटता आला,तसेच स्वतः श्री.विजयराज बोधनकर आणि श्री.अरविंद वाघ यांना भेटता आले. मिपाकरानांही त्यांची ही पेंटिंग्स पहाता यावीत असे वाटल्याने ती इथे देत आहे...
*वरील सर्व फोटो काढताना या दोन्ही कलाकारांची परवानगी घेतलेली आहे.
टिपः--- फोटोत सॉफ्टवेयर वापरुन कोणतेही बदल केलेले नसुन फक्त ते रिसाईझ केलेले आहेत.
(हौशी फोटोग्राफर) :)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
17 Dec 2011 - 1:04 pm | सुहास झेले
मस्त...
शेवटचा फोटो तर अफलातून.... मानलं _/\_
अजुन येऊ द्या :)
17 Dec 2011 - 1:24 pm | किसन शिंदे
पहिल्या फोटोत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे समोरच्या चित्रांच प्रतिबिंब दिसतयं. बाकी सगळी चित्र तर सुंदरच विशेतः सावरकरांच आणी नाव नसलेलं शेवटचं.! :)
17 Dec 2011 - 1:29 pm | अन्या दातार
मस्त पेंटींग्स. शेवटचे तर मनाला चटका लावून जाणारे.
17 Dec 2011 - 2:54 pm | गणपा
सारीच सुरेख.
धन्यवाद बाणा.
17 Dec 2011 - 3:17 pm | दिपक
क्लास चित्रं आहेत. येऊद्यात दुसरा भाग
17 Dec 2011 - 4:12 pm | यकु
उत्तम चित्रे!
धन्यवाद बाणा.
आणखी येऊ द्या.
17 Dec 2011 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
सगळी छान आहेत.
17 Dec 2011 - 4:33 pm | प्रचेतस
सर्व चित्रे उत्तम.
18 Dec 2011 - 9:15 am | प्रभाकर पेठकर
सर्वच चित्रे सजीव वाटतात. अप्रतिम.
18 Dec 2011 - 11:14 am | पाषाणभेद
व्यापार्याची खोली फार रिकामी रिकामी वाटतेय. बाकी मस्तच.
आपली टिप नेहमीच आवडते.
18 Dec 2011 - 11:35 am | प्रभाकर पेठकर
अजून व्यापारात नांव कमवायचे आहे. भांडवल उभारताना घरातील सर्व किडूकमिडूक विकावे लागले. व्यवसाय चालू लागल्यावर खोली भरेल.
20 Dec 2011 - 5:55 pm | गणेशा
अप्रतिम
5 Jun 2021 - 1:47 pm | मदनबाण
आज हा माझाच धागा वर आणण्याचे कारण म्हणजे भाऊ तोरसेकर यांचा खाली दिलेला व्हिडियो माझ्या पाहण्यात आला... यात त्यांनी विजयराज बोधनकर यांनी त्यांचे व्यंगचित्र काढले आहे त्या बद्धल सांगितले आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- Plato
5 Jun 2021 - 10:00 pm | सिरुसेरि
सुरेख चित्रे / कलाकॄती . पेशवाई मधील व्यक्तीचे चित्र पाहुन स्वामी मधील गंगोबातात्या आठवले .