Skip to main content

पेटिंग्स बाय विजयराज बोधनकर अँड अरविंद वाघ (भाग १)

लेखक मदनबाण
Published on शनीवार, 17/12/2011
Vijayraaj Bodhankar Title: Tilak Making Year: 1990 (Not For Sale) Medium: Poster Colours Vijayraaj Bodhankar Title: Saverkar Size:16"X20" Medium: Oil on Canvas Vijayraaj Bodhankar Title: Vyapar (Business) Size: 16"X16" Medium: Oil on Canvas Vijayraaj Bodhankar Title: Village Size: 16"X16" Medium: Oil on Canvas Vijayraaj Bodhankar Title: Peshwai (Set of two) Size: 12"X12" Medium: Acrylic on Canvas हे पेंटिंग जेव्हा पाहिले तर क्षणभर भान हरपले... बोधनकारांना विचारले की याला काही टायटल का नाही... ते म्हणाले या कलाकॄतीला नाव द्यायचे राहिले... पण पुढे कोणतेच नाव द्यावे वाटले नाही. माझे मनोगतः--- बोधनकरांचे मी पाहिलेले पहिले पेटिंग हे गणपतीचे होते,एका डॉक्टरच्या क्लिनीक मधे ते लावलेले होते.बोधनकरांचे नाव ऐकुन होतो पण प्रत्यक्षात कधी त्यांची भेट झाली नव्हती ! पण मग एक प्रदर्शनाची जाहिरात लोकसत्ते मधे आलेली पाहिली आणि त्यांचे प्रदर्शन आहे हे कळले, मनात इच्छा निर्माण झाली की हे प्रदर्शन पहायला मिळावे... आणि अचानक त्यांच्याकडुन आम्हाला या प्रदर्शनाचे वैयक्तिक आमंत्रण मिळाले, मला फार आनंद वाटला आणि समाधानही. :) ठाण्यातील ग्रीन स्ट्रोक आर्ट गॅलेरी मधे ( १७ नव्हेंबर ते २३ नव्हेंबर अशा कालावधीत) हे प्रदर्शन भरले होते... त्या प्रदर्शनाचा आनंद मला लुटता आला,तसेच स्वतः श्री.विजयराज बोधनकर आणि श्री.अरविंद वाघ यांना भेटता आले. मिपाकरानांही त्यांची ही पेंटिंग्स पहाता यावीत असे वाटल्याने ती इथे देत आहे... *वरील सर्व फोटो काढताना या दोन्ही कलाकारांची परवानगी घेतलेली आहे. टिपः--- फोटोत सॉफ्टवेयर वापरुन कोणतेही बदल केलेले नसुन फक्त ते रिसाईझ केलेले आहेत. (हौशी फोटोग्राफर) :) मदनबाण.....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 9054
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

पहिल्या फोटोत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे समोरच्या चित्रांच प्रतिबिंब दिसतयं. बाकी सगळी चित्र तर सुंदरच विशेतः सावरकरांच आणी नाव नसलेलं शेवटचं.! :)

क्लास चित्रं आहेत. येऊद्यात दुसरा भाग

सर्वच चित्रे सजीव वाटतात. अप्रतिम.

In reply to by पाषाणभेद

अजून व्यापारात नांव कमवायचे आहे. भांडवल उभारताना घरातील सर्व किडूकमिडूक विकावे लागले. व्यवसाय चालू लागल्यावर खोली भरेल.

आज हा माझाच धागा वर आणण्याचे कारण म्हणजे भाऊ तोरसेकर यांचा खाली दिलेला व्हिडियो माझ्या पाहण्यात आला... यात त्यांनी विजयराज बोधनकर यांनी त्यांचे व्यंगचित्र काढले आहे त्या बद्धल सांगितले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- Plato

सुरेख चित्रे / कलाकॄती . पेशवाई मधील व्यक्तीचे चित्र पाहुन स्वामी मधील गंगोबातात्या आठवले .