चित्र

मकरन्दबेहेरे's picture
मकरन्दबेहेरे in जे न देखे रवी...
16 Dec 2011 - 9:26 am

त्या दीवशी मी तीचे चित्र काढले
रक्ताच्या लाल रंगाने
समोरच्या कॅनव्हॉस वर,
ज्यावर बर्‍याच अकृत्यांची
गर्दी होती,
त्यातील एका अबलक वारुला
ती आवडली आणि तो तीला घेउन गेला
कुठल्यातरी रम्य अरण्यात दूर दूर
काही सुप्रसिद्ध तारे तारकांच्या साक्षीने
जे जन्मत:च स्वयम्भू होते
मी इतका शोकाकुल झालो की
माझे अश्रु त्या कॅनव्हॉस वर पडले
म्हणून मी घेतले
तारेवर वाळत असलेले कापड
ज्याने मी कॅनव्हॉसवरचे
पाघळलेले रक्त पुसून काढले....

बेहेरे मकरंद
११०२२१६१

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Dec 2011 - 11:22 am | मिसळलेला काव्यप्रेमी

माफ करा, पण नीट कळली नाही कविता.

काही सुप्रसिद्ध तारे तारकांच्या साक्षीने
जे जन्मत:च स्वयम्भू होते

इथपर्यंत कळत होते, पण नंतरच्या ओळींचा संदर्भ लागत नाहीये.
अर्थात हा माझा नकळतेपणा असू शकतो.
पु. ले. शु.

मयुरपिंपळे's picture

16 Dec 2011 - 10:48 pm | मयुरपिंपळे

टंकलेखन मदत तक्ता :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Dec 2011 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.facebook.com/groups/162294880513927/

मुख-पृष्ठावर कविता लिहित असणारे मकरन्द बेहेरे आपणच का? :-)