सस्नेह निमंत्रण

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
7 Dec 2011 - 2:15 pm

नमस्कार,

माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे.

तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. मिपाकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे.

प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम)
कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.*

*माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम.

प्रसाद ताम्हनकर
९७३०९५६३५६

साहित्यिकसमाजतंत्र

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

8 Dec 2011 - 10:43 am | धमाल मुलगा

सही रे!
हाबिनंदन.आमचा पर्‍या लिहिणार म्हणजे काय बोलायची सोयच नाही. येक र्‍याकभर पुस्तकं लिही बेट्या तू. हातोहात खपतील बघ.

आणि मला वाटतं, 'How to' प्रकारची मराठीत लिहिली जाणारी फार कमी पुस्तकं असावीत. अशा न रुळलेल्या वाटेवर जाण्याच्या निर्णयाबद्दल मनापासून अभिनंदन. :)

अवांतरः रविवारी पुण्यात पोचायला तुला साधारण किती वाजतील? आम्ही आलरेडी टेबल अडवून बसलेलोच असू म्हणा. डायरेक तिकडंच ये. ;)

मैत्र's picture

8 Dec 2011 - 11:00 am | मैत्र

हार्दिक अभिनंदन परा...
इतक्या लांब येणं होणार नाही त्यामुळे इथूनच शुभेच्छा !! एकदम झकास !!

अभिज्ञ's picture

8 Dec 2011 - 11:03 am | अभिज्ञ

हार्दिक अभिनंदन
पराशेठ.

अभिज्ञ.

मानस्'s picture

8 Dec 2011 - 11:41 am | मानस्

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
प्रकाशनासाठी योग्य माणूस निवडलाय :०

सन्दीप's picture

8 Dec 2011 - 12:29 pm | सन्दीप

हार्दिक अभिनंदन

शेखर's picture

8 Dec 2011 - 2:08 pm | शेखर

अभिनंदन प्रसाद....
पुस्तकास चांगला रिस्पॉन्स मिळेल ह्याची खात्री आहे...

लतिका धुमाळे's picture

8 Dec 2011 - 4:16 pm | लतिका धुमाळे

अभिनंदन ! आणि शुभेच्छा!!
लतिका धुमाळे

वेताळ's picture

8 Dec 2011 - 6:36 pm | वेताळ

पुढिल वाटचालीस शुभेच्छा....

पाषाणभेद's picture

9 Dec 2011 - 7:41 am | पाषाणभेद

एकवार अभिनंदन व शुभेच्छा!

(९८ वा प्रतिसाद)

पाषाणभेद's picture

9 Dec 2011 - 7:41 am | पाषाणभेद

दोनवार अभिनंदन व शुभेच्छा!

(९९ वा प्रतिसाद)

पाषाणभेद's picture

9 Dec 2011 - 7:44 am | पाषाणभेद

त्रीवार अभिनंदन व शुभेच्छा!

(१०० वा प्रतिसाद) अशाच रितीने पुस्तकांचीही शंभरी गाठावी व मराठी पुस्तकलेखनात तुझा विरू सेहवाग व्हावा हि इच्छा!

कापूसकोन्ड्या's picture

9 Dec 2011 - 10:26 am | कापूसकोन्ड्या

प्रतिसादावरून बरेच मिपा कुंटुंबीय जमणार असे दिसते आहे. म्हणजे ठाण्यात मांदियाळी जमणार तर!
आम्हाला परदेशात राहून कार्यक्रमाचे वर्णन नंतर वाचायला मिळेलच.
अशीच प्रगती करीत रहा.
कापूसकोन्ड्या

चिंतामणी's picture

9 Dec 2011 - 12:23 pm | चिंतामणी

तीकडे विरूने डब्बल सेंचुरी मारली.

इकडे तुझ्या धाग्यानी सेंचुरी पुर्ण केली.

:bigsmile:

नीलकांत's picture

9 Dec 2011 - 12:53 pm | नीलकांत

परा अभिनंदन रे !

आणि मी सुध्दा येतोय. :)

- नीलकांत

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

जयनीत's picture

14 Dec 2011 - 5:11 pm | जयनीत

अशा पुस्तकाची फार गरज होती . रायपुर ला तर मिळणे कठीण आहे , पण नागपुर ला हे पुस्तक कुठे मिळु शकेल ?
आणि एक पुस्तक अजुन येउ द्या ' चित्रपट समिक्षे वर ' .