व्याडेश्वराच्या मंदिरा बाबत फक्त ऐकुन होतो,पण कधी दर्शनाचा योग येईल असे वाटले नव्हते.मंदिर पाहुनच फार प्रसन्न वाटले.
देवळाच आत गेलो...शांत आणि एक प्रकारचा वेगळाच गारवा अनुभवायला मिळाला.
व्याडेश्वराचे शांतपणे दर्शन घेतले.
परशुरामचे शिष्य व्याड मुनींनी स्थापना करुन त्यावर वाडा बांधला म्हणून व्याडेश्वर किंवा वाड म्हणजे तबेल्याजवळ हे लिंग सापडले म्हणून त्याला व्याडेश्वर नाव पडले, अशा आख्यायिका या देवळा संदर्भात ऐकायला मिळतात.
समोर धष्ट पुष्ट नंदी महाराज विराजमान झाले होते,त्याच्या गळ्यातील घंटा अतिशय सुरेख दिसत होत्या...पण त्या ऑइलपेंट नी रंगवलेल्या होत्या ! :( का इतक्या सुंदर शिल्पाची सुंदरता रंग फासुन का नष्ट करतात? ते अजुन मला कळत नाही !
ही आहे देवळाची मागची बाजु.
कोकणातल्या देवळांमधे देव पंचायतन हा प्रकार पहायला मिळतो...मंदिराच्या आवारात श्री सूर्यनारायण,श्री गणपती,श्री देवी,श्री लक्ष्मीनारायण,आणि श्री व्याडेश्वर अशी पांच मंदिरे आहेत याला शिवपंचायन म्हणतात.
यातलेच हे श्री सूर्यनारायणाचे मंदिर.
श्री सूर्यनारायण,यांनाही ऑइलपेंटनी सजवुन ठेवण्यात आलेले दिसले.
श्री देवी, यांचीही अवस्था पेंटमयच !
श्री गणपती.
एव्हढी रंगरंगोटी पाहुन लक्ष्मीनारायण पहिले,पण फोटो टिपायची इच्छा मेली ! :(
दीपमाळ.सिमेंटच्या दीपमाळे पेक्षा दगडांनी बांधलेली दीपमाळ मला जास्त भावते.
पुढच्या भागात श्री व्याडेशवरी (दुर्गा देवी) दर्शन पहायला मिळेल.
(हौशी फोटोग्राफर) :)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
26 Nov 2011 - 11:56 am | अन्या दातार
मागच्या लेखात गुहागरला चालल्याचे वाचले, तेंव्हाच या मंदिरांचेही फोटो येतील याचा अंदाज आला होता.
व्याडेश्वर आणि दुर्गादेवी म्हणजे आमचे कुलदैवत असल्याने अनेक वर्षं अखंडीत जाणे होत होते. व्याडेश्वराच्या देवळात खरंच खुप थंड आणि शांत वाटते.
अवांतरः व्याडेश्वर मंदिराच्या बाहेर मुसळे हाटेलात गेला होतात ना?
27 Nov 2011 - 12:50 pm | मदनबाण
अवांतरः व्याडेश्वर मंदिराच्या बाहेर मुसळे हाटेलात गेला होतात ना?
नाही.वेनतेय या हाटिलात जेवलो होतो.
26 Nov 2011 - 2:40 pm | दादा कोंडके
गाभार्यांचे फोटो बघून आठवलं,
अवांतरः मागच्याच आठवड्यात साबण संपला म्हणून हा* शॉवर जेल आणला. त्याचा वास घेतल्यावर जाणवलं की हा खूप ओळखीचा वास आहे. अगदी भूतकाळात हरवून जाण्यासारखा जुना, ओलसर थंड वगैरे. दोनचार मिनीटांनी भानावर आल्यावर आठवलं की अरे हा तर देवळातल्या दगडी गाभार्यातला वास आहे. अगदी तसाच हळद-कुंकवाचा, उदबत्त्यांचा, चंदनाचा आणि नारळाच्या सांडलेल्या पाण्याचा सुद्धा.
गंध साठवून, पाठवायचं तंत्रज्ञान येइल तेंव्हा येइल, पण आता याची छोटी बाटली घेउन ठेवणार आहे, फक्त वासासाठी. :)
*http://www.dooyoo.co.uk/bath-shower/dove-supreme-fine-silk-beauty-bath/
26 Nov 2011 - 5:36 pm | पैसा
व्याडेश्वर म्हणजे माझ्या आईकडचं कुलदैवत, पण अजून पर्यंत कधी जाणं झालं नाही. :( तुझ्यामुळे निदान फोटो पहायला मिळाले. व्याडेश्वर नावाबद्दल कुतुहल होतं, तेही काही अंशी पूर्ण झालं. अजून एक कुतुहल आहे, आम्हा कोकणातल्या बापट लोकांची कुलदेवता घाटावरची जोगेश्वरी (म्हणजे अंबेजोगाई) कशी काय याबद्दल कोणी सांगू शकेल का?
27 Nov 2011 - 11:00 am | मदनबाण
आम्हा कोकणातल्या बापट लोकांची कुलदेवता घाटावरची जोगेश्वरी (म्हणजे अंबेजोगाई) कशी काय याबद्दल कोणी सांगू शकेल का?
योगेश्वरीचे मूळ स्थान म्हणजे गुहागर निवासीनी दुर्गा ! काही लोकांच्या मते योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी (अप्रभ्रंशीत झालेले).
कोकणातल्या कोणाचेही "कुलदैवत" कोकण सोडुन आढळत नाही,त्यावरुन हे अनुमान काढले गेले असेल.
(डॉ.आनंद खरे)
संदर्भ :---|| दुर्गाश्री||
लेखन व संकलन :--- कविता मेहेंदळे
27 Nov 2011 - 11:30 am | पैसा
धन्यवाद!
29 Nov 2011 - 7:25 pm | चित्रा
कुलदैवते ही कुळे मूळ (किंवा अतिप्राचीन) ठिकाणी असतात तेथेच असतात असे मला वाटत नाही.
कोळ्यांची एकविरा ही समुद्रापासून लांब कार्ल्याला कशी हा मला नेहमी प्रश्न पडतो.
बाकी व्याडेश्वरचे फोटो आवडले.
29 Nov 2011 - 7:34 pm | पैसा
पण हा एक अपवाद सोडता कोकणातल्या लोकांची कुलदैवतं कोकणातच आहेत. म्हणून कुतुहल.
रा. चिं. ढेरे यांच्या "लज्जागौरी" पुस्तकात याचा असा संदर्भ मिळाला की अंबेजोगाई ही रेणुकास्वरूप आहे. भूमिका, रेणुका, जोगळाई, यल्लम्मा, एकवीरा ही सगळी एकाच आदिशक्तीची म्हणजे मातृदेवतेची रुपे/नावे आहेत. रेणुका ही परशुरामाची आई म्हणून कोकणातल्या सगळ्या लोकांची देवता.
30 Nov 2011 - 1:07 am | प्रभाकर पेठकर
कोळ्यांची एकविरा ही समुद्रापासून लांब कार्ल्याला कशी हा मला नेहमी प्रश्न पडतो.
एकविरा देवी ही फक्त कोळ्यांची नाही. चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंचीही आहे.
30 Nov 2011 - 4:26 am | चित्रा
बरोबर! तेही कोकणातलेच. (ज्यांना ते काश्मीरातले वाटतात, त्यांनी तसे समजून घ्या. :) )
अवांतर- एकविरेची इतरही ठिकाणी देवळे आहेत काय?
1 Dec 2011 - 9:13 pm | आनंदी गोपाळ
कोळी फक्त समुद्रातच मासे मारीत नसतात. नद्यांच्या काठानेही वसती आहे.
26 Nov 2011 - 5:40 pm | गणपा
मस्त रे बाणा.
26 Nov 2011 - 9:15 pm | ५० फक्त
मस्त फोटो रे पुन्हा एकदा
27 Nov 2011 - 10:28 am | पियुशा
आनदो ऑर भी मामु ;)
27 Nov 2011 - 8:35 pm | रेवती
फोटू आवडले.
रंगरंगोटीचं फारसं वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही.
पुजारीबुवांचीही नवी पिढी आलेली असणार्.......त्यांची मतं वेगळी.
शिवाय मेंटेनन्सही सोपा जात असणार,
गाभार्यातला सुगंधी गारवा अगदी मनात येऊन गेला.
सिमेंटच्या दिपमाळेबद्दल सहमत.
27 Nov 2011 - 8:49 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रे आणि टिकाटिपण्णी बद्दल सहमत.
देवळातील मुर्ती, भिंती, असल्यास छोटेसे व्यासपिठ किंवा सभागृह ह्या सर्वांच्या रंगरंगोटीतून विश्वस्तांना आर्थिक फायदा होत असतो. त्यांच्याकडे 'कलात्मक' दृष्टीकोन असतोच असे नाही 'अर्थकारणात्मक' दृष्टीकोन जरूर असतो.
27 Nov 2011 - 9:58 pm | सर्वसाक्षी
मदनबाण.
श्री शंकरास पांढरे फुल वाहतात. लाल फुले, तीही जास्वंदीची म्हणजे श्री बाप्पांची आवडती.
इथे लाल फुले शंकराला वाहिलेली दिसत आहेत. काही विशेष रिवाज वा त्यामागे काही आख्यायिका आहे का?
28 Nov 2011 - 6:55 am | मदनबाण
इथे लाल फुले शंकराला वाहिलेली दिसत आहेत. काही विशेष रिवाज वा त्यामागे काही आख्यायिका आहे का?
नाही, मला तरी तसे वाटतं नाही,पण भोलेनाथांची आवड मात्र हटके आहे हे मात्र नक्की ! शंकराला धोत्र्याची फुले आणि धोत्र्याची काटेरी फळे वाहिलेले पाहिले आहे. लाल फुले वाहण्या मागे काही विशेष कारण वाटत नाहीये.
28 Nov 2011 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा...छान रे बाणा... :-)
29 Nov 2011 - 12:50 pm | नेहरिन
दिवाळित हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला तिथे हि महादेवाला लाल फुले वाहिलेलि पाहिलि पण विचारणार कोणाला? मला असे वाटले कि तिथे ब्रम्हा विष्णू महेश आणि आदिमाया या चौघांचा निवास असल्या मुळे लाल फुले वाहिलेलि चालतात कि काय???
29 Nov 2011 - 12:52 pm | नेहरिन
कोणि या बद्दल माहिति देउ शकेल का??