सुटका

सोनल कर्णिक वायकुळ's picture
सोनल कर्णिक वायकुळ in जे न देखे रवी...
29 Nov 2011 - 12:40 pm

सूर्याची जरा अधिकच फाकलेली किरणं.
जणू सुटकेच्या प्रयत्नात.
पण ब-याचदा ती समाधानी दिसतात
कैदेतल माफक स्वातंत्र्य उपभोगताना
उमटत जातात खुणा कधी कधी त्यांच्या बंडाच्या
प्रकाशाच्या सावल्या जशा,
आणि मग संध्याकाळी घाई घाईने ती गोळा करतात सगळ्या सावल्या
आणि बांधून नेतात पुन्हा ,
नकोच पुरावा त्यांच्या बंडाचा, किंवा साध्या कुजबुजण्याचा सुद्धा.

त्या सगळ्या सगळ्या सावल्यांमध्ये माझी सुद्धा सावली दिसते
माझ्यातून फाकलेल्या धगधगणा-या, पोळलेल्या, किरणांसकट
तेव्हा समजते निरर्थक धडपड,
किरणांची नव्हे तर सूर्याची
स्वतःपासून सुटण्याची!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

तेव्हा समजते निरर्थक धडपड,
किरणांची नव्हे तर सूर्याची
स्वतःपासून सुटण्याची!

अप्रतिम कविता.. क्लोजिंगही एकदम जबरी..क्लोजिंग अवघड असतं जास्त या फॉर्मॅटमधे...

सोनल कर्णिक वायकुळ's picture

30 Nov 2011 - 2:21 pm | सोनल कर्णिक वायकुळ

आभार. गगन्विहरि च गवि कधि पासुन?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Nov 2011 - 2:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__

सोनल कर्णिक वायकुळ's picture

30 Nov 2011 - 2:22 pm | सोनल कर्णिक वायकुळ

आभारी आहे. लोभ असु द्या.

नगरीनिरंजन's picture

29 Nov 2011 - 2:32 pm | नगरीनिरंजन

कविता दोन-तीनदा वाचली पण अजून नीटशी कळली नाही.
सूर्याची किरणे कैदेत कशी आणि सूर्याची स्वतःपासून सुटण्यासाठी धडपड का ते उमगले नाही. क्षमस्व.
या आधीच्या तुमच्या कविता कळल्या आणि आवडल्या होत्या.
कदाचित हे रुपक माझ्या बुद्धीला झेपले नसावे. शक्य झाल्यास कोणीतरी रसग्रहण करावे ही विनंती.

सोनल कर्णिक वायकुळ's picture

30 Nov 2011 - 2:19 pm | सोनल कर्णिक वायकुळ

नमस्कार निरन्जन
आभार.

प्रयत्न करते.
प्रत्येकाच्या आत एक युद्ध सतत चालू असत. ब-याचदा आपण आपल्या स्वतःच्याच भावना आणि अभिव्यक्तीशी लढत असतो. जगाला दिसताना जरी ती आपली अभिव्यक्ती वाटली असली तरी कितीकदा आपल्या आत एक वेगळ द्वंद्व चालू असत. आणि स्वतःचीच भीती आपल्याला जास्त वाटत असते इतरांच्या पेक्षा. आपल्यातल्या षडारीपुंचे खेळ सतत चालू असतात, आपल्याला खेळवत असतात, आपण आपल्या मनावर फार मोठ ओझ आपल्या भावनांचं वाहवत असतो. त्यातून मुक्त होण म्हणजे स्वतःपासून मुक्त होण. अहं पासून मुक्त होण आणि तोच प्रत्येकाचा अंतिम शोध. final destination .
यात थोडा perspective चा फरक सुद्धा आहे. पहिल्या भागात, किरण जी सुर्यापासून निघताहेत ती जणू सूर्यापासून स्वतःला सोडवू पाहतायत असा आभास आहे. आणि दुस-या perspective ने पाहिलं तर त्या किरणांच्या रूपाने, निमित्ताने, सूर्यच स्वतः पासून सुटू पाहतोय. आपणही व्यक्त होताना तेच करत नसतो का खुपदा?