थोडे मजला कळाया लागले.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
27 Nov 2011 - 6:14 pm

थोडे मजला कळाया लागले.
तव रुप छळाया लागले.

काजलनेत्र वा पिन पयोधर
दोघेहि मला खुणवु लागले.

गंधित मादक केश संभार
मन त्यात अडकू लागले..

पहाताच तव यौवन रुप
सारे आईने तडकु लागले.

पहाता रसाळ अधर फोडी
मन कविता प्रसवू लागले.

निरखता मादक आक्रुति बंध
द्वैताद्वैत रहस्य उकलू लागले.
अविनाश

कविता

प्रतिक्रिया

प्रास's picture

27 Nov 2011 - 7:26 pm | प्रास

काकाश्रींची मस्त कविता.

"थोडे मजला कळाया लागले

तव रुप छळाया लागले"

ऐवजी

"थोडे मजला कळू लागले

तव रुप मनाला छळू लागले"

असतं तर अधिक योग्य झालं असतं असं वाटतंय.....

:-)

अन्या दातार's picture

27 Nov 2011 - 7:49 pm | अन्या दातार

पहाताच तव यौवन रुप
सारे आईने तडकु लागले.

आईने तडकु लागले म्हणजे मिरर ब्रेकिंग मटेरिअल आहे असा अर्थ घ्यावा का? ;)

फिझा's picture

28 Nov 2011 - 9:39 am | फिझा

छान .. आहे कविता !!!