चित्रमय कोकण दर्शन (भाग १)

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
24 Nov 2011 - 8:29 pm

कोकणात जाण्याची माझी ही पहिलीच वेळ नाही...पण ट्रेन ने प्रवास करुन जाण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता.
मुंबई -मडगाव .मांडवी एक्स्प्रेस ने या वेळी कोकणात जाण्याचा योग आला,अगदी धावता दौरा केला...धावता केला कारण सुट्टी मिळायचे वांदे ! ;)
तर वरच्या फोटुत दिसतय, ते आहे ठाणे स्टेशन... जरा लवकरच फलाटावर येउन पोहचलो होतो, आपल्या देशात संप,रि़क्षा बंद,दंगल,ट्रॅफिक जॅम हे कधीही होउ शकते, त्यामुळे लवकर पोहचुन फलाटावर वेळ काढलेला परवडेबल वाटतं.लवकर पोहचलो... मग वेळ काही जाईना ! इस्टेशन भैयामय झालं होतं,कारण गोरखपुर एक्स्प्रेस यायची होती,ती शेवटी आली ! मगं जमेल तसा तिचा फोटु टिपला (वरचा) भैया मंडळींची ट्रेन मधे चढण्यासाठी झोंबाझोंबी सुरु झाली... हमार तोहार... बिटुवा...ठीक बा ! असे अनेक आवाज कोलाहलातुन कानावर आदळत होते...बोगीत शिरण्यासाठी २ दरवाजे असुन सुद्धा हे सर्व लोक एकाच दरवाज्याने का चढत होते ते मला काही केल्या समजेना !

ती ट्रेन शेवटी तुडंब भरुन रवाना झाली...मग परत मढगाव एक्स्प्रेसची वाट बघणे सुरु झाले... तो पर्यंत करायचे काय ? मग एका विक्रेत्या कडुन वर्तमानपत्र विकत घेतले...पण ते तिर्थरुपांच्या हातात गेले ! माझ्या हातात कॅमेरा...मग विचार केला मागच्या त्या धाग्यात (एक प्रवास लोकलचा) इथल्या काका मंडळींना गर्दी दिसली नाही ! जरा गर्दी टिपुया... (म्हणुन हा वरचा फोटो) ;)


शेवटी एकदाची आमची एक्सप्रेस आली आणि आम्ही स्थानापन्न झालो... दिव्या मार्गे हा प्रवास पुढे चालु झाला...मी या मार्गावरुन पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने या मार्गाचा फोटो काढायची लहर आली...:)

प्रवास व्यवस्थीत झाला,कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही...चिपळुन स्टेशनला उतरलो तर समोरच गुहागरला जाणारी एसटी उभी होती...पटकन जाउन बसलो त्यात... आत पाहतो तर स्वामी समर्थांचे दर्शन झाले. :) मागच्या वेळी गणपतीपुळ्याला प्रवास करताना घड्याळ पहायला मिळाले होते...

बस निघाली तेव्हढ्यात जवळ असलेल्या एका मंदिरावर नजर गेली "झोलाई देवी" असे नाव दिसले ! च्यामारी मी काही चुकीचे वाचले असावे असं क्षणभर वाटलं...कारण झोल्,झोलर हे आमचे मुंबईछाप शब्द आणि देवीचे नाव काही ताळमेळ बसेना, परत वाकुन वाचले तर "झोलाई देवी" असेच लिहलेले दिसले; म्हणजे ३३ कोटी देवां मधे यांचा पण नंबर लागतो अशी माझ्या ज्ञानात भर पडली !

थोडेसे अंतर एसटी ने कापल्यावरच मला या सुंदर नदीचे दर्शन झाले...खडखडणार्‍या एसटी मधुन कसा बसा कॅमेरा सावरला आणि तिला टिपले...प्रवास चालु होता...छोटो मोठे थांबे घेउन एसटी धावत होती...

मग एक सुंदर शाळा दिसली..इतक्या निसर्ग रम्य शाळेत शिकणार्‍या विद्यार्थांच्या मला जरा हेवा वाटला... मला माझ्या शाळे बद्दल फार प्रेम आहे...शाळेतले दिवस हे आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस असतात असं माझं ठाम मत आहे.
बस धावत होती,आणि मी बाहेर दिसणार्‍या गोष्टी पाहत होतो...आवडते ते टिपत होतो...

त्या दिवशी शनिवारचा बाजार भरलेला दिसत होत...रस्त्यावर गर्दी असल्याने बसचा वेग जरासा कमी झाला... तेव्हढ्यात मला एक बाई विवध पदार्थ (धान्य) घेउन बसलेली दिसली.येणार्‍या जाणार्‍या ग्राहकांवर तिची व्यवस्थीत नजर होती...

गुहागरला पोहचलो...जरा पोटपुजा आटोपली आणि एसटी स्टॅडच्या अगदी जवळ असलेल्या व्याडेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला...
कसा ते आता पुढच्या भागात पहा... :)

(हौशी फोटोग्राफर)
मदनबाण.....

प्रवासछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Nov 2011 - 9:29 pm | पैसा

मस्त फोटो आणि वर्णन! येवा येवा, कोकण आपलच आसां! पण मुंबईहून निघताना मांडवीला गर्दी नसते काय? कारण कोकणकन्यामधे रिझर्व्हेशनच्या डब्यात प्रवेश मिळाला तरी नशीब असं काही लोकांकडून ऐकलंय. (मी नेहमीच गोवा रत्नागिरी प्रवास करते त्यामुळे गर्दीशी कधी संबंध येत नाही! :D)

पण मुंबईहून निघताना मांडवीला गर्दी नसते काय?
असावी...पण बहुधा ऑफ सिझन असल्यामुळे गर्दी नव्हती शिवाय यावेळी तिर्थरुपांनी एसी चे तिकट काढले होते,त्यामुळे गर्दीचा आणि उकाड्याचा त्रास काही झाला नाही. :)

अरे अजुन फोटो येउ देत की जरा :) कोकण दर्शन मुक्त हस्ताने घड्वा की , कन्जुषी काय को ;)
सर्किट -मुन्ना स्टाईल " कमरा शुरु हुवा नही भाइ के लगीच खतम हो गया " ;)

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 11:23 am | मदनबाण

कोकण दर्शन मुक्त हस्ताने घड्वा की , कन्जुषी काय को
मामु जरा रुको तो सही... अभो तो अपुन ने डेमो दिया हय, पिक्चर तो अभी बाकी हय ! ;)

पियुशा's picture

25 Nov 2011 - 11:28 am | पियुशा

ठीक हे ,ठीक हे
अपुन वेट करिन्गा पिक्चर का ;) आनदो ;)

प्रचेतस's picture

24 Nov 2011 - 10:06 pm | प्रचेतस

मस्त फोटो आणि झकास वर्णन.
रेल्वेगाड्यांचे फोटो काढण्यात बाणाचा हातखंडा आहे हे नमूद करु इच्छितो.
गुहागरच्या फोटोंची वाट पाहतो आहे.

मेघवेडा's picture

24 Nov 2011 - 10:25 pm | मेघवेडा

अरे वा आणखी एक! असेच येत राहा आणि वर्णनं फोटू येऊ देत राहा! पुभाप्र.

दिवाणखवटी स्टेशनातून पाऊणएक मैलभर खाली उतरल्यावर खवटी गाव लागतो. कोकण रेलवेवरील संबंधित गावा-शहरापासून सर्वात जवळ असणार्‍या मोजक्या स्टेशनांपैकी हे एक असावं. :)

बाकी चिपलून-गुहागर यष्टी बघून अंहझा. हा आपला फेव्हरीट पट्टा! येऊ द्या फोटो. शृंगारतलीवर आंगुली केलांव्त की नाय? :D

शृंगारतलीवर आंगुली केलांव्त की नाय?
नाय बॉं... ते आता पुढच्या टायमाला. :)

५० फक्त's picture

24 Nov 2011 - 10:39 pm | ५० फक्त

मस्त आलेत रे फोटो, जमलं तर पुढची कोकण ट्रिप रेल्वेनंच करावी असं वाटतंय.

''मला माझ्या शाळे बद्दल फार प्रेम आहे...' + १००० रे, मि प्रत्येकवेळी सोलापुरला गेलो की शाळेच्या मुख्य पोर्चजवळ असलेल्या पाय-यांवर डोकं ठेवतो अन त्या दगडी पोर्च मध्ये चपला काढुन मांडी घालुन बसतो, जाम भारी वाटतं तिथुन उठताना.

सगळेच फोटो मस्त रे बाणा!
आता मिपाकर कोंकण टूर काढत आहेत तेव्हा प्रत्यक्ष पाहूच कोकण.

ठाण्याच्या ठेसनावर उत्तरेकडे जाणार्‍या भय्याचं भलंमोठं लगेज बघून एक अस्सल ठाणेकर त्याला तिथल्या तिथेच विचारता झाला होता -
'क्यों? इतना सामान? घर छोड के जा रहे है क्या?' ;-)

ठाण्याच्या ठेसनावर उत्तरेकडे जाणार्‍या भय्याचं भलंमोठं लगेज बघून एक अस्सल ठाणेकर त्याला तिथल्या तिथेच विचारता झाला होता -
'क्यों? इतना सामान? घर छोड के जा रहे है क्या?'

हॅहॅहॅ... यशंवंता खरेच असं झालं असतं तर किती बरं झाल असतं नै ? ;) ठाण्यात दुसरे युपी वसलेले आहे ! हल्ली मराठी माणसं ठाण्यात दिसणे कमी होत चालले आहे.

पिवळा डांबिस's picture

25 Nov 2011 - 12:03 am | पिवळा डांबिस

वा, वा, छान फोटो आणि वर्णनही...
...मग विचार केला मागच्या त्या धाग्यात (एक प्रवास लोकलचा) इथल्या काका मंडळींना गर्दी दिसली नाही ! जरा गर्दी टिपुया... (म्हणुन हा वरचा फोटो)
आता कसं एकदम घरी आल्यासारखं वाटलं!!!!
:) :)

बाणा जरा अजून फोटू येऊदेत..

- पिंगू

हे फोटू सहल ष्टार्ट केल्याचे आहेत.
अजून कोकण सहल सुरु झाल्यासारखं वाटत नैय्ये.
पुढे फोटू लवकर चढवावेत ही इनंती.
सध्या सगळ्यांना कोकण फिव्हर झालाय काय?;)

मीसुद्धा नुकताच कोकण दौरा करून आलो आहे. पण मोह आवरला आहे.

बाणा- बाकी फटु छान आहेतच. पण एका भागाचे पाच भाग करू नकोस अशी विनंती आहे.

पाषाणभेद's picture

25 Nov 2011 - 4:36 am | पाषाणभेद

कोकणरेल्वेत सारे प्रवाशी शिस्तीचे दिसत आहेत. (म्हणजे डब्याबाहेर एकही दिसत नाही.) :-)

सुहास झेले's picture

25 Nov 2011 - 8:42 am | सुहास झेले

वाह.. अजुन येऊ द्यात :) :)

मानस्'s picture

25 Nov 2011 - 2:17 pm | मानस्

पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.

कोकण दर्शन या धाग्यात कमी आहे. पुढचा धागा लवकर येउद्या.

ऋषिकेश's picture

25 Nov 2011 - 3:27 pm | ऋषिकेश

मस्त रे! आणि तेच ठिकाण असलं तरी सामान्यतः येणार्‍या फटुंपेक्षा वेगळे फटु काढले आहेस ते अधिक आवडले. सोबतचे खुमासदार लेखनही झ्याक!

>>२ दरवाजे असुन सुद्धा हे सर्व लोक एकाच दरवाज्याने का चढत होते ते मला काही केल्या समजेना !
ठ्ठो! :))

किसन शिंदे's picture

25 Nov 2011 - 5:13 pm | किसन शिंदे

च्यायला, आम्ही फक्त वाटच पाहतोय कि कधी आम्हाला कोकणात जाण्याचा मुहूर्त भेटतोय आणी इथे कलादालनात तर कोकणच्या धाग्यांचा एकावर एक रतीब घालून उगा लोकांना जळवायचं काम चालुये! :(

जागु's picture

25 Nov 2011 - 7:06 pm | जागु

सुंदर.