आंब्याचे फळ

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in जनातलं, मनातलं
20 Nov 2011 - 5:46 am

आज सकाळीच माझा एक म्युच्युअल फंडाचा ग्राहक ऑफिसमध्ये भेटयला आला होता, तुम्ही ती आंब्याची गोष्ट मागे सांगीतलीत म्हणून मी म्युच्युअल फंडात एसआपी सुरू केली व ती अजून चालू आहे व आता मला तिचा चांगलाच फायदा झाला आहे, धन्यवाद. मग मला ती मी त्याला सांगीतलेली गोष्ट आठवली. ७/८ वर्षापुर्वी तो ग्राहक माझ्याकडे गुंतवणूकीचा सल्ला मागायला आला होता, तेव्हा त्याने विचारले कि मला म्युच्युअल फंडात थोडी गुंतवणूक करावयाची आहे कसे काय करु ते सांगा तेव्हा मी त्याला प्रथमत: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे सगळे फायदे व तोटे सांगीतले व जर तुला यात गुंतवणूक करावयाची असेल तर मी तुला एक माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट सांगतो. माझे बाबा, आम्ही त्याना भाऊ म्हणत असू, त्यानी घरापासून सुमारे 2/3 फर्लांग अंतरावर ४०/५० आंब्याची झाडे सुमारे २५/३० वर्षापुर्वी लावली होती व त्या बागेत पाण्याची सोय न्हवती म्हणून भाऊ रोज संध्याकाळी एक कावड करायचे व दोन्ही बाजूला एकावर एक दोन घागरी पाण्याच्या विहरीवरून भरुन नेत असत व त्या झाडाना पाणी घालत असत, जवळपास ८/१० वर्ष त्याचा हा नित्यक्रम असायचा. एकदा मी असाच त्यांच्याबरोबर आंब्याच्या झाडाना पाणी घालायला गेलो होतो. मी त्याना विचारले कि भाऊ ह्या झाडांवर आंबे कधी धरतील तेव्हा ते म्हणाले किमान ८/१० वर्षानी धरायला लागतील, पण भरपूर आंबे मिळायला अजून किमान १५/२० वर्षे लागतील. आज खरंच त्या झाडाना भरपूर आंबे लागता आहेत पण भाऊनी लावलेल्या झाडांवर फळ लागण्यापुर्वीच त्यानी या जगाचा निरोप त्यांच्या वयाच्या ५४ व्या वर्षीच घेतला. मी व माझी सारीच भावंड लहानपणीच शिक्षणासाठी शहरात निघून गेलो होतो. आज आम्हाला दरवर्षी भरपूर आंबे खायलासुध्दा मिळतात व बागेतून चांगले पैसेसुध्दा दरवर्षी मिळतात. जर तेव्हा भाऊनी झाडे लावलीच नसती तर आम्ही काय लावायला तेथे गेलोही नसतो व आज हक्काने स्वत:ची फळेसुध्दा मिळाली नसती. तो ग्राहक म्हणाला खरं आहे तेव्हा मी तुमचे ऐकले व दरमहा फक्त रु.२००० गुंतवायला सुरुवात केली होती व नंतर दरवर्षी जस जसा माझा पगार वाढत गेला तसतशी म्युच्युअल फंडातील मासिक गुंतवणूक वाढवत गेलो आज मी दरमहा रु.२०००० गुंतवत आहे, आणि बाजारात एवढे चढ उतार झाले तरी माझ्या गुंतवणूकीचे मुल्य ५३ लाख रुपये झाले आहे तेव्हा आता मी काय करु, मी सांगीतले आजपर्यंत तू ग्रोथ पर्यायात गुंतवणूक करत होतास आता यापुढे तू गुंतवणूक रिटायर होईपर्यंत चालूच ठेव मात्र आता तू तुझा पर्याय बदल व नियमीत लाभांश मिळण्याचा पर्याय घे म्हणजे तुला तूच लावलेल्या झाडाची फळे दरवर्षी मिळत रहातील, मिळणा-या पैशातून तुला हवे ते कर वाटल्यास भरपूर फिर, अथवा तुला हवी ती गोष्ट विकत घे. हिच रक्कम वाढत जाऊन तुझ्या निवृत्तीनंतरच्या गरजा सुध्दा भागवणार आहे. हा संवाद सुरु होता तेव्हा माझा २६ वर्षाचा मुलगा हजर होता, रोज कानी कपाळी ओरडूनही नोकरी लागल्यापासून म्युच्युअल फंडात द.म. फक्त ५५०० ची एसआयपी करत होता, त्याने लगेच ती ४५०० ने वाढवली, आणि म्हणाला बाबा पुढच्यावर्षी पगार वाढला कि आणखीन वाढवीन, मला ५० व्या वर्षापुर्वी नोकरी सोडता येइल काय? मी म्हटले जर दरवर्षी तुझी एसआयपीची रक्कम पगाराप्रमाणे वाढवत नेलीस तर निश्र्चितच होता येईल मात्र म्युच्युअल फंडात नियमीत गुंतवणूक करत रहा, बाजाराच्या चढ उताराने विचलीत होऊ नकोस. आज बाजार कसाही असला तरी भविष्यात ह्याच गोष्टीची पुनरावृत्ती होणार आहे कारण हा माझा स्वत:चा अनुभव आहे. नेहमी दरवर्षी आंब्याच्या झाडाल जसे आंबे एकसारख्या प्रमाणात मिळतील असे सांगता येत नाही तसेच आज, उद्या किंवा येत्या नजीकच्या काळात बाजारात काय होईल हे सांगणे कठीण आहे मात्र दिर्घ काळात शेअर बाजारातून चांगले उत्पन्न मिळणारच कारण गेले २०० वर्ष हेच होत आले आहे.

अर्थव्यवहारलेख

प्रतिक्रिया

आंब्याच्या झाडांची गोष्ट आवडली. पण म्युचुअल फंडात पैसे गुंतवताना थोडं सावध राहिलेलं बरं. म्हणजे "Do not put all the eggs in one basket."सगळी गुंतवणूक एकाच प्रकारात करू नये. काही बँकांच्या फिक्सड डिपॉझिटमधे, काही पीपीएफ तर काही विमा, काही शेअर्समधे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमधे करावी. तसेच आपली सेव्हिंग्ज, आताच्या आणि भविष्यकाळात येणार्‍या गरजा, मुलांची शिक्षणं, लग्न इ.इ. चा विचार करून प्रत्येकाने आपाआपला निर्णय घ्यावा.

सदानंद ठाकूर's picture

20 Nov 2011 - 1:35 pm | सदानंद ठाकूर

बरोबर आहे. It should be diversified, but there must be mf in your portfolio, sip is the best way of investing. I do not have practice of writing marathi online, because I am creating file first in word and then uploading hence it is a problem.

सर्वसाक्षी's picture

20 Nov 2011 - 9:12 am | सर्वसाक्षी

ठाकूर साहेब,

एस आय पी मधील गेल्या दिड - दोन वर्षांमधला माझा अनुभव वाईट आहे. आजचे मूल्य गुंतवणुकीपेक्षा कमी आहे. आहेत त्या गुंतवणुकी न मोडता तशाच राहु देत, पण यापुढे या पर्यायापेक्षा दुसरा मार्ग शोधणे गरजेचेह आहे. आपण या बाबतीत काय सल्ला द्याल?

सदानंद ठाकूर's picture

20 Nov 2011 - 1:44 pm | सदानंद ठाकूर

Keep it continue for long term, it will certainly give you good results. Now a days due to global crisis market is volatile and it will remain same in near future too. MF investment is not for short term. For short term you can invest in liquid schemes, this is best option for bank savings account.

मन१'s picture

20 Nov 2011 - 11:20 am | मन१

माफ करा पण पटले नाही. म्युच्युअल फंड , एस आय पी वगैरे बाबत हिरिरिने पुरस्कार करणारे दाखवतात तेव्हढे हिरवेगार चित्र क्वचितच असते हे सखेद सांगावेसे वाटते. फायदा होइलही, पण (झालाच तर)मर्यादित.
अमुक अमुक फंडासोबत शहाण्याने व पैसाताई बोलल्या तसे पीपीफ, थोडेफार सोने, थोडेफार एफ डी इकडेही लक्ष द्यावे. शक्य झाल्यास अल्पशी रक्कम घेउन स्वतःही थेट मार्केट मध्ये उतरण्याचे धाडस करावे. आणि ह्यासर्वाहूनही महत्वाचे म्हणजे....
स्वतःमध्ये गुंतवणूक करत रहा. पैसा गुंतवल्याने जितका फायदा होणार नाही, तितका फायदा स्वतःमध्ये गुंतवल्याने लोकांना झाल्याचे सध्या बघतो आहे.

सदानंद ठाकूर's picture

20 Nov 2011 - 1:40 pm | सदानंद ठाकूर
५० फक्त's picture

20 Nov 2011 - 4:10 pm | ५० फक्त

+ १मन१

गुंतवा फक्त स्वतात, स्वतावर नाही.