(इथे हा वरचा दिवा काही मला चुकवता आला नाही. :( )
माझे प्रेरणा स्थान.
माझे मनोगतः ---अनेक वेळा मी पाहिले आहे की...रस्त्यावर कोळशाने /खडुने एखादा चित्रकार साईबाबा,शंकर इं चित्र काढतो,त्यात रांगोळी किंवा रंगाने ते चित्र जिंवंत करतो ! काय जादु आहे अश्या कलाकारांच्या हातात नाही का ? कसे जमते यांना इतकी सुंदर रेखीव चित्रे काढायला ? अत्यंत चिकाटीने साध्य होणारी ही कला विविध विषयांचा सहज वेध घेते,बघणार्याला भारावुन टाकण्याची एक अनोखी शक्ती या कलेत आणि कलाकाराच्या हातात असते...
अजुनही ही रांगोळीची कला या मेहनती कलाकारांच्या अथक परिश्रमामुळे जिंवत आहे याचा मला आनंद आहे,आणि असे अनेक कलाकार निर्माण व्हावे अशी माझ्या मनाची इच्छा आहे... दिवाळीत या कला प्रदर्शनाचा जो आनंद मला उपभोगता आला,तोच आनंद मिपाकर वाचकांना घेता यावा यासाठीच मी हे फोटो काढले.
माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो...
प्रदर्शन स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.
(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
15 Nov 2011 - 10:12 pm | विलासराव
तिन्ही भाग आवडले.
आम्हाला गिरगावात राहुनही खबर नाही लागली.
पुढच्या वेळेस असा काही कार्यक्रम इकडे असेल आनी तुम्हाला शक्य झाले तर मलाही कळवा.
आमच्या़कडचे चहापाणी घ्यायलाही या.
16 Nov 2011 - 9:00 am | मदनबाण
धन्यवाद... :)
नक्की. :)
15 Nov 2011 - 10:44 pm | गणपा
काही रांगोळ्या तर इतक्या जिवंत वाटताय की आता आपल्याशी हितगुज साधतील की काय असा भास होत आहे.
ग्रेट.
16 Nov 2011 - 10:58 am | पैसा
अगदी अगदी!
15 Nov 2011 - 10:47 pm | रेवती
जय द्वारकेशवाल्या रांगोळीत काळा आणि राखाडी रंग भरण्याची कमाल केली आहे असे वाटले.
15 Nov 2011 - 10:59 pm | ५० फक्त
हा पण भाग मस्त रे, धन्यवाद.
15 Nov 2011 - 11:53 pm | सुहास झेले
सुंदर रे बाणा ... !!
16 Nov 2011 - 3:13 am | पाषाणभेद
झकास. कलाकारांची कदर करावी तेवढी थोडीच आहे.
16 Nov 2011 - 11:10 am | ऋषिकेश
तिनही भागात अनेक उत्तमोत्तम रांगोळ्या आहेत. त्या कलाकारांना अभिवादन!
त्या आमच्यापर्यंत अत्यंत सुंदर छायाचित्रांतून पोहोचवल्याबद्दल मदनबाणाचे आभार! :)
16 Nov 2011 - 11:48 am | प्रचेतस
गौतम राजाध्यक्षांची रांगोळी विशेष आवडली. क्यामेरा अगदी थ्रीडीगत बाहेर आल्यासारखा वाटतोय.
16 Nov 2011 - 12:09 pm | झकासराव
रांगोळी काढणार्या कलाकाराना आपला सलाम. :)
बाणा आमच्याशी सुंदर रांगोळ्या शेअर केल्याबद्दल धन्यवाद रे मित्रा. :)
24 Nov 2011 - 4:23 am | पिंगू
बाणा अतिशय छान धागा काढला आहेस..
- पिंगू
24 Nov 2011 - 2:39 pm | वपाडाव
द्वारकेश अन राजाध्यक्षांची रांगोळी लैच आवडली.....
द्वारकेशवाली थोडी लांबट की काय तशी वाटते आहे.... म्हणजे चेहर्यावर फोकस नाही आला....
अवांतर :: स्पावड्या सारख्या एखाद्या हडकुळ्या माणसाला कडेवर उचलुन मग रांगोळीचा फोटो काढल्यास चांगली दिसेल असे वाटते........
24 Nov 2011 - 3:33 pm | गणपा
काल अशीच एक अप्रतिम रांगोळी फेसबुकच्या कृपेने पहायला मिळाली.
इच्छुकांनी इथे भेट द्यावी.
28 Nov 2011 - 12:09 pm | संजयशिवाजीरावगडगे
अप्रतिम ! speechless यार
30 Nov 2011 - 12:29 am | अत्रुप्त आत्मा
हा भाग---मंजे रांगोळ्या- ठिकठाक आहेत :-)
30 Nov 2011 - 2:29 am | पिवळा डांबिस
तिन्ही भागांतील रांगोळ्या अप्रतिम आहेत.
कलाकारांचे अभिनंदन!
आणि त्या इथे दाखवल्याबद्दल बाणाचेही अभिनंदन!!