मुंबईच्या लोकल मधून अचाट स्टनट्स करणारा शाहरुख उर्फ जी - वन,... भयानक वेगात फिरवलेले क्यामेरे ... ब्रेक्स नसलेली सुसाट सुटलेली लोकल .. हिरवीण चक्क मोटरमन च्या जागी .. शेवटी.. लोकल चे डबे वेगळे करून लोकांना वाचवण .. फक्त मोटरमनच्या डब्याच प्रचंड वेगाने CST स्टेशनात धडकण .. चक्क स्टेशनच्या बाहेर लोकल चा डबा येण.. त्या धक्क्याने जुन्या स्टेशनच्या इमारतीला तडे जाण, त्या वरची विक्टोरीयाची मूर्ती कोसळण....हळू हळू.. स्टेशन ची इमारतच खचण. अफाट सर्वच अफाट... हा संपूर्ण चित्रपटातला hi- point म्हणता येईल .
प्रचंड उच्च दर्जाचे VFx. compositing . करून बनवलेला रा - वन बघायला गेलो तेंव्हा खूपच अपेक्षा होत्या.. शिवाय काही मित्रही VFX च्या टीम मधले.. दिवस रात्र त्यांना या प्रोजेक्ट वर खपताना पहिल्याने.. शारुख असला तरी हा पिक्चर बघणारच होतो .
पहिल्या सीन मध्ये डोक ओउट झाल .. तेजायचं शारूक सुरकुतलेल्या बाडीने कुठल्यातरी यंत्रावर उडताना दाखवलंय.. मग उगाचच संजय दत्त ची एन्ट्री.. प्रीयाक्ना चोप्राचे दर्शन.. बाळबोध मारामारी... काहीच गरज नव्हती.. इथेच चित्रपट हातातून निसटायला सुरुवात झाली... ते त्याच्या वयापेक्षा अक्कल आणि डोक्यावरचे केस जास्त असलेल्या मुलाच स्वप्न असत. तो गेमिंग चा वेडा असतो... karina त्याची बायको दाखव्लीये.. चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणे ती शिव्यांवर थिसीस करताना दाखव्लीये (काय संबंध? ) असो . शारुख कुठल्याश्या गेमिंग कंपनीत गेम बनवत असतो.. मुलाच्या सांगण्यावरून तो असा गेम design करतो कि ज्यात विलन हिरो पेक्षा वरचढ दाखवलाय. पण तिथे अशी टेकनोलोजी त्यांच्या कंपनीने देवेलोप केलेली असते कि digital सिग्नल आपल्या डोळ्यांना दिसू शकतात.. आणि त्या द्वारे निर्माण झालेल्या चित्रांना आपण हात लावू शकतो आणि बोलू सुधा शकतो.. ( ब्वार्र ) तर अशा गेम मध्ये काहीतरी बिघाड होतो.. आणि त्यातला विलन खर्या जगात अस्तित्वात येतो . आता हा बिघाड कसा झाला. ते दाखवण्याचे कष्ट अजिबात घेतलेले नाहीत.. इथून पुढे सर्व खेळ special efects . VFX, आणि 3D चा आहे..
माया, after effects 3d max सारख्या software चा सढळ हस्ते वापर करून.. भारतीय लोकांनीही आपण कुठेही मागे नाही हे दाखवून दिले आहे... . सर्वच सिन्स मस्तच जमलेले आहेत..
तर तो विलन शारूक च्या मुलाच्या मागे लागतो.. कारण शेवटचा गेम तोच त्याच्याबरोबर खेळलेला असतो. त्याच दिवसी शारूक ला तो विलन संपवतो... मग पुढची ईश्तोरी काय सांगायची. जसा विलन खर्या जगात येतो. तसाच त्याचा अक्कल जास्त असलेला मुलगा. जी वन ला पण जिवंत करतो .. मग सगळ्या पिक्चर ची वाट लावलेली आहे.. फालतू इमोशन... उगाच सलमान छाप कॉमेडी .. मधेच बाळबोध सिन्स ... टुकार गाणी ... पिक्चर कुठलीही वळण न घेता सरळसोट मार्गाने संपतो ...
शारूक चा वय आता जाणवू लागल आहे.. तो कुठल्याही बाजूने Action हिरो वाटत नाही. त्याच्या आईवजी रितिक चालला असता
चित्रपटाच्या फसलेल्या बाजू :
१.कुठल्याही प्रकाराने सुपरहिरो वर आधारित चित्रपट वाटत नाही
२.स्वत शारुख
३.विलन च्या नावाने चित्रपटाचे नाव ठेवले.. तर तो विलन तेवढा ठळकपणे कधी समोरच येत नाही. ८०% शारूकच दिसतो
४.टुकार पटकथा
५.अमिताभ चा थकलेला आवाज , मधेच रजनी, संजय दत्त, प्रियांका चोप्रा यांच्या वापरलेल्या कुबड्या रसभंग करतात
चित्रपटाच्या जमलेल्या बाजू :
१.प्रचंड फ्रेश लुक
२.अत्त्युत्तम VFX, आणि 3D ,
३.बेमालूमपणे केलेलं compositon
४.संपूर्ण भारतीय बनावट.
बघायचाच असेल तर 3D बघा.. नाहीतर बघू नका
माझे रेटिंग : 0 .५ (चित्रपटाला)
२ (VFX, 3D , Special Effects )
२.५ / ५
प्रतिक्रिया
27 Oct 2011 - 10:29 am | अँग्री बर्ड
बघायचा उत्साह गेला. आता त्याचा सिक्वेल येईल "नो वन"
27 Oct 2011 - 11:38 am | सुहास झेले
बघायची इच्छा नव्हतीच, आता त्यावर शिक्कामोर्तब झालं... ;)
धन्स पैसे वाचवल्याबद्दल :) :)
27 Oct 2011 - 11:40 am | माझीही शॅम्पेन
स्पा - १ परिक्शन :)
27 Oct 2011 - 12:42 pm | मन१
शाहरूख किंवा खरे तर त्याचे फाल्तु हाइप केलेले पिक्चर बघणे मला माणसाने केलेली ओकारी गाढवाच्या मूत्रात मिसळून कुत्र्याच्या लाळेसह जबरदस्तीने प्यायला लावल्यासारखे वाटते.
असो. बीभत्स रसाबद्दल क्षमस्व. पण कधी कधी भावना अनावर होतात, त्या अशा.
27 Oct 2011 - 1:30 pm | मोहनराव
+१
शाहरुखचा सिनेमा फुकट दाखवला तरी बघायची हिम्मत होत नाही.
मला प्रोमोजवरुन वाटतच होतं की टुकार सिनेमा असणार आहे म्हणुन!!
27 Oct 2011 - 1:10 pm | प्रचेतस
पिच्चर बघणार नव्हतोच, १/२ महिन्यात टीव्हीवर येईल तेव्हाच बघेन.
बाकी परिक्षण झकास पण छोटेसे वाटले.
27 Oct 2011 - 4:30 pm | निनाद मुक्काम प...
स्पा ने जे वर्णन केले आहे. त्यावरून अनिवासी भारतीय(, परदेशात जन्मलेले ) व पाकिस्तानी बांगलादेशी व काही गोरे ह्यांना हा सिनेमा जबरदस्त आवडेल.(कथा आणी तिच्या सादरीकरणात रेड्डी सारख्या सिनेमांना सकस स्पर्धा निर्माण झाली आहे.) बाळबोध विनोदांचा लुफ्त घेतांना वर उल्लेख केलेल्या वर्गाला अनेकदा पहिले आहे.
त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून हा सिनेमा येथे जर्मन मध्ये संस्करीत केला आहे.
येथील लोकांमध्ये व प्रसारमाध्यमात तो चांगलाच लोकप्रिय आहे. येथील सरकार सुद्धा त्यांच्यावर मेहरबान आहे. येथील लोकांमध्ये व प्रसारमाध्यमात तो चांगलाच लोकप्रिय आहे. त्यांच्या कोणत्याही व कसल्याही शिणेमाला येथील लोक डोक्यावर घेतात.
केट ला रुकरुक खान आवडतो.( तर मला आमीर) तिच्या मते कथा , अभिनय ह्या साठी बॉलीवूड येथे प्रसिध्द नाहीच आहे. ते प्रसिध्द आहे ते त्याच्या गाण्यांसाठी
त्यात शाहरुखला शिणेमा बनविण्यापेक्षा विकता चांगला येतो . 2o हून जास्त ब्रेन्ड शी करार झाला आहे. १२५ करोड हून जास्त खर्च झालेला सिनेमा साडे तीन हजार पडद्यावर झळकला. ह्यात ४०० थ्रीडी पडदे आहेत.
ह्या सिनेमाद्वारे शाहरुख चे पुनरागमन होणार आहे. तेव्हा हा सिनेमा कमी आणी शाहरुख एक ब्रेन्ड म्हणून प्रस्थापित करण्याकडे त्याचा कल दिसत आहे.
शटर आयलेंड सारख्या दर्जेदार रहस्यमय सिनेमा आणि त्यातील नायक अर्धा जर्मन लीओनोर्डो ( जो मोडके तोडके जर्मन बोलतो) व
त्याचा सिनेमा बर्लिन मध्ये लीओ च्य जन्मगवी प्रदर्शित होत असतांना सर्व बर्लिनकर माय नेम इज खान च्या रंगात रंगलेले पाहून मी तर थक्क झालो होतो .
''माझा सिनेमा काहींना आवडले ,काहींना आवडणार नाही ,पण हा सिनेमा बॉलीवूड मध्ये मैलाचा दगड ठरेल'' - इति शाहरुख खान
बाकी दिवाळी - शाहरुख ,ईद - सलमान खान - क्रिसमस - आमीर खान
असे प्रत्येक सणाच्या दिवशी हे त्रिकुट सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात डोकावते.
पण हा लेख वाचून आमचे प्रत्येकी १३ युरो ( आणि खाण्यापिण्यावर तेवढाच खर्च वाचला )
ह्याबद्दल स्पा ह्याचे आभार मानून तेवढ्याच पैशात आता स्पा मध्ये जाता येई. .
येथे थंडी चे आगमन झाले असून जर्मन लोकांच्या परिभाषेत सध्या गुलाबी थंडी (१० सेल्सिअस ) पडली आहे.
'' चलो सौना ''
27 Oct 2011 - 6:12 pm | रेवती
अनिवासी भारतीय(, परदेशात जन्मलेले ) व पाकिस्तानी बांगलादेशी व काही गोरे ह्यांना हा सिनेमा जबरदस्त आवडेल. सहमत.
बॉडीगार्ड या लोकांनी प्रचंड एन्जॉय केल्याचे आठवते आहे. मग हा का नाही!
3 Nov 2011 - 7:39 pm | विनीत संखे
लंडनला "माय नेम इज खान" ने हॅरी पॉटरची ओपनिंग घेतलेली आठवतेय. सोनेरी केसांच्या आंग्ल ललना "वी लव शारुक! शारुक!!" म्हणून ओरडत होत्या. बिचार्या हॅरी पॉटर असलेल्या डॅनियल रॅडक्लिफला मात्र कुणी हाक मारली नाही.
त्याच सुमारास डॅनियल रॅडक्लिफला लॉर्ड्स वर आलेल्या सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी घ्यायला लायनीत उभं रहावं लागलं हेही ऐकिवात आहे.
5 Nov 2011 - 2:12 am | निनाद मुक्काम प...
त्याचा सिनेमा रिलीज होणार म्हणून कसिनो रॉयल चा लंडन मधील भव्य प्रीमियर ज्याला राणी येणार होती त्याच्या एक आठवड्या आधी हा सिनेमा भारतात प्रदर्शित केला.
रुक्रूक खानचे पर्यायाने बॉलीवूड चे वाढते वर्चस्व सुखावणारे आहे.
27 Oct 2011 - 1:32 pm | सुहास..
मित्राने घेतलेले स्टेटस !
Ra.One : A one minute short film of Rajini in which SRK does a two and half hour guest appearance"
27 Oct 2011 - 1:49 pm | स्मिता.
असंही मी थेटरात जावून पिच्चरं बघणं कधीच सोडलंय, पण घरात बघतानाही रा-वन ला किती अपेक्षेने बघायचे हे तू सांगून दिलेस त्याबद्दल धन्यु!
परिक्षण थोडं त्रोटक वाटलं... अर्थात चित्रपटातच काही मॅटर नाही तर तू तरी कुठून आणशील!
27 Oct 2011 - 2:01 pm | इंटरनेटस्नेही
स्पा यांचे हे बहारदार चित्रपट परिक्षण म्हणजे आम्हा वाचकांसाठी दिवाळी धमाकाच आहे. सदर चित्रपट तर इतका बोअर असणार, की टॉरंट वर डाऊन्लोडला देखील टाकायची गरज पडणार नाही.. अशी आमची अटकळ होती, जी की खरी ठरली. असो. स्पा यांनी वापरलेलं शारुख असला तरी हा पिक्चर बघणारच होतो हे वाक्यच सर्व काही सांगुन जातं. ;)
चित्रपट परी़क्षण आवडले. :)
27 Oct 2011 - 7:45 pm | भास्कर केन्डे
शारुख असला तरी हा पिक्चर बघणारच होतो
--- हे वाक्य म्हणजे एकदम सिक्सर! आवडले.
आपण तर बॉ हिन्दी शिनेमे म्हटले की विषय बंद करतो. त्यात या खानाचे तर बावचळलेले असतात. त्यापेक्षा आपला आणसपुरे परवडला असे म्हणायची वेळ येते. ;)
28 Oct 2011 - 8:03 am | चिंतामणी
त्यात या खानाचे तर बावचळलेले असतात. त्यापेक्षा आपला आणसपुरे परवडला असे म्हणायची वेळ येते.
तेच तर इथे थोडक्यात मांडले होते.
31 Oct 2011 - 12:11 am | आशु जोग
>> आणसपुरे परवडला असे म्हणायची वेळ येते
वा वा म्हणजे शारुक हा हिंदीतला आणसपुरे आहे वाटते !
27 Oct 2011 - 2:04 pm | यकु
मस्त फाडलंस रे स्पावड्या..
आपण तर हिंदी पिच्चर कुणी फुकट दाखवला तरी पहात नाही..
बाकी ३ डी वगैरे तुझ्या तंत्राबद्दल रा-वन च्या अनुषंगानं लिहीलं असतंस तर आणखी मजा आली असती.. आणखीही वेगळे लिही..
27 Oct 2011 - 2:06 pm | इंटरनेटस्नेही
हेच म्हणतो.
-
आंग्लभाषास्नेही.
27 Oct 2011 - 2:13 pm | अप्पा जोगळेकर
पैसे वाचवल्याबद्दल आभार.
27 Oct 2011 - 3:19 pm | सोत्रि
स्पावड्या,
फेसबुकवरच्या तुझ्या कमेंटनंतर (किसनच्या पोस्ट्वर) तुझ्या ह्या लेखाची वाट पहात होतो. पण अपेक्षेएवढी मजा नाही आली.
फार घाईत लिहीलेस असे वाटते. स्पाचे परिक्षण वाचतो आहे असे वाटले नाही (म्हणजे मलातरी) :(
असो हा सिनेमा फ्लॉप असेल असे मला प्रोमोज आल्यापासुन राहुन राहुन वाटत होते,का कोण जाणे.
- (कोणे एके काळचा शाहरुखचा चाहता) सोकाजी
27 Oct 2011 - 3:31 pm | कच्ची कैरी
मलाही शाहरुख अजिबातच आवडत नसल्याने मी त्याचा चित्रपट निदान सिनेमागृहात जाउन तरि बघत नाहीच बाकी रा-१ फालतु असेल असे आधिच वाटले होते आता त्याची खात्री झाली.
27 Oct 2011 - 5:52 pm | श्रीरंग
Ra One review perfectly summed up by a viewer : " I would have preferred watching highlights of Manchester City beating Manchester United 6-1 , and I am a United fan".
Most concise yet most comprehensive review so far :P
27 Oct 2011 - 6:06 pm | श्रीरंग
आजच्या सकाळ मध्ये (पान क्र. १ व ४) रा.वन ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल केलेली परस्परविरोधी वार्तांकने पहाच.
चित्रपट पाहून झाली नसेल तरी सकाळचा फालतूपणा बघून थोडी करमणूक होईल. :)
27 Oct 2011 - 6:15 pm | रेवती
अनेक बहिणींचे पैसे वाचवून भाऊबीजच साजरी केल्यासारखे आहे हे!;)
असेलही टुकार शिनेमा पण त्यांची कमाई होणे थांबणार आहे काय?
मुलांना आवडेल का रे? ३ डी घरी कसा पहायचा? तो थेट्रातच जाऊन पहावा लागेल.
27 Oct 2011 - 6:38 pm | अनामिक
३ डी घरी कसा पहायचा?
एखादा ३डी एनेबल्ड फ्लॅटस्क्रीन घ्या आता. त्या टिव्हीबरोबर ३डी ग्लासेस मोफत देतात म्हणे! पण चित्रपट डिव्हीडीवर यायची ३ महिने तरी वाट पहावी लागेल.
27 Oct 2011 - 7:55 pm | रेवती
अनामिकराव, एका शिनेमासाठी ते चष्मे आणले (आणि टीव्ही) तर आमचं पोरगं अभ्यासाचं नाव घेणार नाही.;)
घरात कायमस्वरूपी रावण शिरल्यासारखे वाटेल.;)
माझं तर असं मत आहे की अभिषेक बच्चनने रावण शिनेमा केला म्हणून कांपिटिसनमुळे शारूकने हा केला.
27 Oct 2011 - 9:40 pm | अनामिक
माझं तर असं मत आहे की अभिषेक बच्चनने रावण शिनेमा केला म्हणून कांपिटिसनमुळे शारूकने हा केला.
आता ऐश्वर्याने मंदोदरी करु नये म्हणजे मिळवली.
28 Oct 2011 - 4:53 am | हुप्प्या
>>माझं तर असं मत आहे की अभिषेक बच्चनने रावण शिनेमा केला म्हणून कांपिटिसनमुळे शारूकने हा केला.
आणि हे मारुतीच्या शेपटासारखे लांबवलेले सिनेमे बघताना प्रेक्षकांचा कुंभकर्ण झाला!
अजून दोन पौराणिक दाखले!
27 Oct 2011 - 6:53 pm | चिंतामणी
7 Nov 2011 - 11:23 am | मैत्र
लै भारी... काय बाजार उठवलाय ...
मक्या आणि केळं :)
तोडलं भाऊ शारुकला पार !
27 Oct 2011 - 7:05 pm | मोग्याम्बो
हे परीक्षण यायच्या आधीच हा चित्रपट पाहीला आणि फसलो.
वाटले
RA.one ....का पण?
27 Oct 2011 - 8:18 pm | सूड
मी पिक्चरला गेलो असतो तर आजच्या आसुरी आनंदाला मुकलो असतो, स्पा मित्रा धन्यवाद परिक्षण टाकल्याबद्दल !! (पाताळविजयम् नावाच्या मद्राशी सिनेमातले विकट हास्य कल्पावे.) :D
28 Oct 2011 - 6:14 am | शिल्पा ब
एवढे लेख वाचुन उत्सुकता चाळावली गेली अन युट्युबवर प्रोमो पाहीला. म्हातारा स्पायडरमॅन सदृष्य प्राणी असा काहीसा शारुकचा अवतार दिसला. .. गेममधला व्हीलन बाहेर येतो अन त्याला थांबवायला हा हीरो..आयड्या चांगली आहे पण एकंदरीत परीक्षणांवरुन प्रयत्न फसल्याचं दिसतंय.
28 Oct 2011 - 10:52 am | गवि
अगागागा..
खरंच बघायला जाणार होतो. पोरासाठी.. त्यालातरी आवडेल का अशी शंका यायला लागली.
मस्त परीक्षण.
स्पावड्या, एक सांग.. अमिताभचा थकलेला आवाज, असं म्हटलंयस. अमितजी आहेत का या सिनेमात? असतील तर जाणार.
30 Oct 2011 - 6:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>खरंच बघायला जाणार होतो. पोरासाठी.
चित्रपटात म्हणे ३ जपानी पोरी आहेत एका प्रसंगात. त्यांची नावे इसकी-ली, उसकी-ली आणि सबकी-ली अशी आहेत म्हणे. तुमच्या मुलाने अशा विनोदाला एक्स्पोज व्हावे असे वाटत असेल तर जा ;-)
28 Oct 2011 - 12:48 pm | सूर्यपुत्र
तो रावण, सहनशक्तीच्या सगळ्या सीमा पार केल्यानंतर एकदाचा संपला. त्यावेळी काही पोरांची त्यावर गहन चर्चा चालू होती. त्यावरून तो रावण, त्या गेममध्ये वायपर की वायसर की वायरस असं काहीतरी गेल्यामुळे बाहेर आला, अशी मौलिक माहीती कळाली. ( घ्या.... स्वःता शारुखला पण तो रावण त्या गेममधून बाहेर का आला, हे सांगता आले नव्हते.)
-सूर्यपुत्र.
28 Oct 2011 - 6:03 pm | कानडाऊ योगेशु
ट्रेलर पाहुनच डोक्यात तिडिक गेली.
शारुखच्या प्रत्य्के हालचालीतुन मी पाहा किती सफाईदार पणे अॅक्शन करतोय हा अॅटिट्युड दिसतोय.३ तास सहन करणे अशक्य आहे.
टी.वी वर लागल्यावर पाहायचे का नाही ते ठरवेन.
28 Oct 2011 - 9:58 pm | विकास
परीक्षण चांगले लिहीले आहे. ते वाचायच्या आधीच चित्रपट काय असेल याची कल्पना होती... तरी देखील तो डोके बाजूला ठेवून निव्वळ करमणूक म्हणून (आणि अनिवासी भारतीय म्हणून ;) ) बघेन असे म्हणतो आणि बघितला तरी फसवणूक होणार नाहीच! कारण जर फसलो तर चित्रपट चांगला आहे असा अर्थ होईल... ;)
28 Oct 2011 - 10:08 pm | निनाद मुक्काम प...
आमच्या कुटुंबाने आणी काही रुकरूक धार्जिण्या कंपूने आम्हाला हा सिनेमा पाहायचा आहे असा आदेशवजा सूचना केली आहे.
त्यांना एकोन चे गाणे ,हॉलीवूड चे तंत्रांद्यान भारतीय सिनेमात ( म्हणजे नक्की काय काय आहे अशी उत्सुकता ) आणी शाहरुख
त्याचे नाचणे गाणे सगळे त्यांना आवडते.
त्यात एकच सुख आहे, सदर सिनेमा जर्मन मध्ये असल्याने मी फक्त चित्र पाहणार काय चाललय ते समजून घेणारच नाही,
पण रुकरूक खानचे शिनेमे येथे सरकारी वाहिन्यांवर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दाखवतात. त्यामुळे भारतीय म्हणजे नेहमीच गाणी गाणारे ,प्रेम करणारे भावूक व अत्यंत रोमेंटिक असतात असा प्रवाद येथे रुजला आहे. हॉलीवूड ला रुकरुक जेव्हा येथे टक्कर देतो तेव्हा ''झुकती दुनिया ,झुकानेवाला चाहिये'' ही म्हण सार्थ ठरते
29 Oct 2011 - 9:41 am | मदनबाण
परिक्षण वाचल्यामुळे पैसे वाचले. ;)
29 Oct 2011 - 10:31 am | वसईचे किल्लेदार
छान ... आता दमादम चे परिक्षण पण होऊन जाउद्या ..
29 Oct 2011 - 11:04 am | पाषाणभेद
कोणी काही म्हणो पण आपण तर चित्रपट एंजॉय केला बाबा. काही ठिकाणी खळाळून हसलो. गाण्यांवर ठेकाही धरला. माझ्या मुलानेही चित्रपट एंजॉय केला. फक्त एका ठिकाणी कल्याण डोंबीवली महानगरपालीकेचा उल्लेख आला होता तेव्हा त्याने त्याचा अर्थ काय असा नेमका सवाल थेटरातच केला होता. त्याला ते शब्द म्हणजे साऊथची शिवी आहे असे सांगितले.शेवटचे टायटल्सदेखील वाचले. त्यात तंत्रज्ञांच्या नावाच्या यादीत कदम यांसारखे मराठी आडणावाचे तंत्रज्ञदेखील होते.
जास्त विचार न करता जरूर पहा. एंजॉय करा.
(टॉरंटस, पायरेटेड सिडीज आदींसाठी मागणी न करता थेटरातच कधीतरी चित्रपट पाहण्याची सवय ठेवा. जर शक्यच नसेल तर कमीतकमी सिडी विकतच घ्यायची तर ओरीजनलच घ्या.)
31 Oct 2011 - 10:42 pm | आत्मशून्य
होय हा अजून एक आगावपणा. ते मूलांना लैगीक शिक्षण , चर्चेमधे ओपननेस वगैरे सगळं ठिक आहे पण कोणत कार्ट अथवा फ्लिपकार्ट आपल्या आइ सोबत काँडोम-काँडोम म्हणून विनोद करतं ? शाहरूख हॅज गॉट मिडलाइफ क्रिसीस फॉर शूअर...
कशाला बघायचा हो सीडीवर ? टीव्हीवरही बघूनये :) रा-वन हा टर्मीनेटर जजमेंट डे या जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शीत चित्रपटाची भ्रश्ट नक्कल आहे , म्हणून तो बघण्यापेक्षा सरळ मूळ चित्रपटच पहावा.. कारण आइ-मूलाला मारायच्या वाचावायच्या मिशनमधील पाठलाग व अॅक्शनचा खरा थरार फक्त तोच चित्रपट देऊ शकतो.
29 Oct 2011 - 1:57 pm | किसन शिंदे
अतिशय बकवास चित्रपट...
29 Oct 2011 - 4:13 pm | स्मिता.
स्पाने दिलेले परिक्षण वाचून आणि ज्यांनी हा चित्रपट पाहिलाय त्यांच्या अनुभवावरून असा कितीक बकवास असावा हा विचार करून रा-वन डाऊनलोडवून पाहिला.
स्पाने हा चित्रपट थेटरात बसून पूर्ण बघून एवढा अत्याचार कसा सहन केला याचं वारंवार आश्चर्य वाटत राहिलं.
आयर्न मॅन, ट्रॉन आणि मिस्टर बिनचं एकत्रपणे भ्रष्ट हिंदिकरण केलेला हा अत्याचार कोणी आपल्या मुलांवर करू नये अशी कळकळीची विनंती.
3 Nov 2011 - 6:35 pm | धमाल मुलगा
पुढे खड्डा आहे कुणीतरी सांगितलं ना? मग उडी मारलीच पाहिजे, नाही का? :P
स्पापटें, मंडळ कच्चकन आभारी आहे. घरुन 'रा-वन' पाहण्याचा हट्ट झाला असता आपले हे परिक्षण वाचण्यास दिले. सोबत मान्यवर मिपाकरांच्या प्रतिक्रियाही वाचल्या गेल्या. आणि माझा जीव (+पैसे) वाचले.
30 Oct 2011 - 8:14 pm | निनाद मुक्काम प...
ह्या सिनेमात रजनी चे आगमन अनाकलनीय आहे. उथळ व संवंग प्रसिध्धीचा तो केविलवाणा प्रसंग आहे. नवरा अकस्मात वारल्याच्या धक्यातून करीना क्षणार्धात चिट्टी चे आगमन झाल्यावर पांचट विनोदी अभिनय करते.हे पाहिल्यावर तिचा बॉडी गार्ड मधील अभिनय बरा म्हणावा ( त्यात निदान ती तिच्या भूमिकेशी प्रामाणिक राहिली आहे ,)
सिनेमातील ग्राफिक्स आजपर्यत बॉलीवूड मधील अव्वल दर्जाचे आहे व त्याने बॉलीवूड मध्ये अश्या प्रकराची डिजिटल त्रिमिती सिनेमांचे पेव फुटेल .
मात्र ह्याच जातकुळीतील अनेक हॉलीवूड सिनेमे निकृष्ट कथा व ठून भिकार तिचे सादरीकरण व सुमार अभिनयाने साफ झोपले .
रा १ वर १७५ कोटी खर्च झाला असून तो कसाबसा वसूल होईल असे वाटते ( शाहरुख ने शेखर कपूर ला दिक्दर्शक म्हणून घेतले असते तर समीकरण खूपच वेगळे असते ) त्याने आमीर खान ला घेऊन कालायांत्रावर सिनेमा सुरु केला होता. पण तो काही कारणाने पूर्ण झाला नाही.
मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सिनेमा बनविण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
त्यांची हुशारीबद्दल वेगळे लिहियला नको.
पण तुटपुंज्या तंत्रज्ञान असतांना त्याने मिस्टर इंडिया बनवला. ह्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व पात्रांकडून अभिनय करवून घेतला व मिस्टर इंडियाच्या अदृश्य होण्यामागील लॉजिक दर्शकांना पटवून देण्यात यशस्वी ठरला .व त्यात नायिकेला बर्या पैकी वाव होता.
.( करीना चा त्या मुलासोबत गाडीतील प्रसंग विशेतः तिच्या डोळ्यांचा रंग व आवाज बदल्यांचा प्रसंग मस्त जमलाय तिलाच खलनायक म्हणून काहीकाळ आणले असते तर ते अर्जुन व त्या चीनी अभिनेत्यां पेक्षा नक्कीच सरस वाटले असते.)
शाहरुख यावेळच्या पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट सिनेमा व नायक ,नायिका पटकथा ,संगीत अश्या कुठल्याही गटात पुरस्कार मिळवू शकत नाही. तेव्हा आपल्या लाडक्या फिल्म फेअर मध्ये तांत्रिक बाबींमध्ये अजून काही श्रेणी निर्माण करायला लावेल.( त्या शेत्रात त्यांचे पुरस्कार नक्की आहेत.)
पण थोडक्यात रा १ सिनेमाचे वर्णन उल्हासनगरचे फटाके असाच होईल.
30 Oct 2011 - 8:28 pm | मी-सौरभ
स्पडू तू माझे पैसे वाचवलेस... :)
31 Oct 2011 - 8:55 pm | आत्मशून्य
चित्रपटांच्या कथेत फरक इतकाच की तिकड टेर्मीनेटर मूलाला व ऐला मारायला/ वाचवायला भविष्यातून आलेले असता तर इथे मूलाला व ऐला मारायला/ वाचवायला रा-वन्/जि-वन व्हिडीओ गेम मधून आलेले असतात. बाकी वाटेत येणार्या प्रत्येकाला व्हिलनने उडवने, मूलाने अर्नॉल्डला "हास्ताला विस्टा बेबी" वा "नो प्रोब्लेमो" वगैरे म्हणने शिकवणे काय किव्हा त्या कार्ट्याने जिवनला ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करणे काय... सगळी थीम तीच. खरचं कटकट आहे नाय राव ?यांना एखादी गोश्ट व्यवस्थीत ढापताही येत नाही ? ओरीजनल टर्मीनेटर मधे नसतील एव्हडे एफेक्ट्स इथे वापरले पण उपयोग काय ? बौध्दीक दिवाळी साजरी झाली....
बाकी जेम्स कॅमेरॉन तो जेम्स कॅमेरॉन व अर्नॉल्ड श्वर्झेनेगर तो अर्नॉल्ड श्वर्झेनेगर , त्यांची जागा शारूक वा चावला थोडीच घेऊ शकणार ? RAONE कसला RAW ONE चित्रपट काढला आहे हा.
2 Nov 2011 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार
झकास रे स्पावड्या !
एकदम खुमासदार लिहीले आहेस.
अर्थात काही वेडझव्या प्रतिक्रियांचे गालबोट तुझ्या लेखनाला लागले आहे म्हणा..
पण असो....
कोणी काहीही आणि कितीही गळे काढले, तरी रा-वन हा शिणिमा सुप्पर डूप्पर आणि बंपर हिट झाला असल्याचे आमचा आतल्या गोटातला बातमीदार कळवतो. ह्या चित्रपटाने (आणि चित्रपतीने) ह्या आधीच्या सर्वच भाषांमधील सर्वच प्रदर्शीत चित्रपटांचे रेकॉर्डस मोडून तोडून टाकलेले आहेत. ह्या चित्रपटाच्या आधीच घाईघाईने आपले चित्रपट प्रदर्शित करुन आयरनमॅन, सुपरमॅन इ. सुपर हिरो वाल्या हालिवूड च्या लोकांनी मूळ रा-वन च्या आयडीया कशा ढापल्या ते देखील आता उघड झाले आहे.
असो... आकाशातला बाप त्यांना क्षमा करो.
आनंदाची बातमी अशी आहे, की ह्या भव्य दिव्य चमत्कारामुळे हर्षीत होऊन आता रा-वन चा सिक्वल आणि तिसरा भाग देखील लगेचच तयार करायला घेतलेला आहे. शाहरुखचा आणि करण जोहरचा रोल असलेल्या सिक्वलचे नाव जी-वन अर्थात गे-वन असे निश्चीत करण्यात आलेले असून, ह्या चित्रपटाचा तिसरा भाग एच-वन अर्थात होमो-वन असा असेल. ज्यात शाहरुख, करण जोहर आणि अर्जुन रामपाल आपापले जलवे दाखवतील.
2 Nov 2011 - 12:29 pm | पिलीयन रायडर
http://thebigdowg.wordpress.com/2011/10/31/an-open-letter-to-srk/
2 Nov 2011 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार
सदर मजकूर हा आंग्ल भाषेत आढळला.
वेळ मिळाल्यास आपण त्याचे मराठी भाषांतर इथे देण्याची तसदी घ्याल काय ? म्हणजे मग आम्ही देखील त्याचा लुत्फ उठवु.
2 Nov 2011 - 12:46 pm | स्पा
शाहरुखचा आणि करण जोहरचा रोल असलेल्या सिक्वलचे नाव जी-वन अर्थात गे-वन असे निश्चीत करण्यात आलेले असून, ह्या चित्रपटाचा तिसरा भाग एच-वन अर्थात होमो-वन असा असेल. ज्यात शाहरुख, करण जोहर आणि अर्जुन रामपाल आपापले जलवे दाखवतील.
हॅ हॅ हॅ =))
=))
2 Nov 2011 - 11:31 pm | आशु जोग
मराठीतही याचा रीमेक येतो आहे
अशी बातमी आहे
8 Nov 2011 - 10:35 pm | सोत्रि
!@#*!@#*!@#*!@#*!@#*!@#*!@#*!@#*
मुलांच्या आग्रहाखातर आज हा तद्द्न फालतु शिनेमा बघुन पैसे पाण्यात घालवले.
सिनेमा सुरु होउन अर्ध्या तासात धाकटा 'कधी संपणार पिक्चर' असे विचारून विचारून थकला.
- (रा वन, का पण ? असे वाटणारा) सोकाजी
8 Nov 2011 - 10:38 pm | सोत्रि
स्पावड्या,
असे म्हणालास म्हणून खास 3D मधे बघितला. ३० रुपये चष्म्याचे सर्विस चार्जेस भरून.
१५० रूपये तुझ्याकडे उधार आता माझे :evil:
- (:evil:) सोकाजी