नमस्कार कलाकार मित्र मैत्रिणींनो!
दिवाळी जवळ आली की पणत्या, आकाशदिवे, रांगोळ्या, भेटकार्डे अशा गोष्टीं नजरेसमोर येतात. लहानपणी फटाके उडवताना मजा वाटायची तर मोठे झाल्यावर तोच प्रकाश कॅमेर्यात बंद करायची हौस असते. ठिपक्यांच्या रांगोळीत रंग भरायला आवडत असते, पण त्याचे कौतुक घरातल्यांबरोबरच लांब राहणार्या मित्रमंडळींनीही करावे असे वाटत असते. शेजारच्या बंडू, पिंटूने किंवा सॅमी, पॅमीने किल्ला करताना विनोदी प्रसंग घडलेले असतात. कधी बाजारातली चकमक भूलवून टाकत असते तर कधी आई, आजीची लक्ष्मीपूजन करणारी सोज्वळ प्रतिमा आठवत असते. घरचा फराळ हा काहीजणांसाठी आठवणीतच राहिला असेल. तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ केलेत? आजूबाजूचे दिवाळीचे वातावरण कसे आहे? कोणत्या आठवणी कॅमेर्यात बंदीस्त केल्यात ते आपल्या मिपा परिवाराला पाहू द्या. आपल्याकडे बरेच सदस्य हे हौशी फोटोग्राफर आहेत. त्यांनी (आणि इतरांनीही) छायाचित्रांचा खजिना उघडा केला तर त्याची मजा सगळ्यांना लुटता येईल. सर्वांना यात भाग घेता यावा म्हणून आपल्याला आवडलेली एक किंवा दोन छायाचित्रे आपण मिपावर चढवू शकता.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
20 Oct 2011 - 4:21 pm | पियुशा
अरे व्वा ! मस्त मजा येइल मग तर
उपक्रमात नक्की सहभागी होउ :)
21 Oct 2011 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
[विजेच्या पणत्या]
-दिलीप बिरुटे
22 Oct 2011 - 11:21 am | मयुरपिंपळे
मस्तच.
22 Oct 2011 - 11:47 am | कुंदन
१२-१२-२०१२ पर्यंत महाराष्ट्र भार नियमन मुक्त होणारे हे नक्की.
22 Oct 2011 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> १२-१२-२०१२ पर्यंत महाराष्ट्र भार नियमन मुक्त होणारे हे नक्की.
नैच भारनियमनापासून मुक्ती मिळाली तर सौर उर्जेवर आम्ही पणत्या पेटवू तुम्ही कल्जी करु नये.
काही दिवाली-बिवालीचं फोटू बिटु डकवा ना. किती ओव्हर टैम करणार. पाहा आमच्या करंज्या. :)
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 12:35 pm | विजुभाऊ
विजेच्या पणत्यांसारख्याच विजेच्या करंज्या ............... ;)
1 Nov 2011 - 3:06 pm | वपाडाव
विजुच्या पणत्यांसारख्याच विजुच्या करंज्या....
वायफळ लोकांनी या कमेंटला काही-बाही वाचु नये....
21 Oct 2011 - 10:54 pm | आशु जोग
>> विजेच्या पणत्या
वा छानच आहेत. न सांगितल्यास नेहमीच्या पणत्या वाटताहेत
23 Oct 2011 - 9:02 pm | पैसा
ही आमची गेल्या वर्षीची पणती.
23 Oct 2011 - 9:43 pm | सूड
23 Oct 2011 - 11:22 pm | दादा कोंडके
आणि यासाठी वेगळा धागा न काढता याच धाग्यावर फोटू टाक्ल्याबद्द्ल आभार!
1 Nov 2011 - 3:09 pm | वपाडाव
आभार नाय काय हबिणंदण...
23 Oct 2011 - 10:49 pm | रेवती
सगळे फोटू मस्त आहेत.
दोन वर्षांपूर्वी मिपाकर शाल्मलीनं भेटल्यावर सुंदर पणत्या दिल्यात.
मागल्या वर्षीची दिवाळी जरा अशीतशी झाली म्हणून त्या वापरल्या गेल्या नाहीत.
या वर्षी नक्की लावणार आणि फोटू काढणार.
24 Oct 2011 - 1:11 am | चतुरंग
हे चापत चापत प्रतिसाद देत आहे! ;)
(चकली आणि बेसनलाडू प्रेमी) रंग ली
24 Oct 2011 - 1:53 am | स्मिता.
रेवतीताई, चकल्या एकदम मस्त दिसत आहेत. :)
24 Oct 2011 - 2:25 pm | चेतन सुभाष गुगळे
चतुरंग आणि रेवती हे दोन्ही एकाच व्यक्तिचे आयडि आहेत का?
24 Oct 2011 - 2:28 pm | पैसा
चतुरंग आणि रेवती हे आयडी असलेल्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न केलेलं आहे. तेव्हा 'चतुरंग' यानी त्यांच्या घरी केलेल्या चकल्या आणि लाडूंचे फोटो दिले ते 'रेवती'ने केलेले असणार हे ओघाने आलंच!!
24 Oct 2011 - 2:51 pm | चेतन सुभाष गुगळे
मला याची आयडियाच नव्हती
तरी मी विचार करत होतो की एकाच्या मेहनतीचं दुसर्याला का देत आहेत?
खुलाशाबद्दल धन्यवाद.
24 Oct 2011 - 2:57 pm | दादा कोंडके
वरच्या प्रतिसादात "श्रेय" राहिलं बघा.
24 Oct 2011 - 3:03 pm | चेतन सुभाष गुगळे
मला तेच म्हणायचं होतं. राहून गेलं.
पण ही चूक दादा कोंडकेंच्याच नजरेला सापडणे हा खचितच योगायोग नव्हे.
24 Oct 2011 - 3:45 pm | स्मिता.
तरी मी विचार करत होतो की एकाच्या मेहनतीचं श्रेय दुसर्याला का देत आहेत?
नाही हो. उलट ज्या व्यक्तीची मेहनत असावी तिलाच श्रेय देण्याचा प्रयत्न होता. असो. पैसाताईंनी खुलासा दिलेलाच आहे.
24 Oct 2011 - 7:47 pm | चतुरंग
मी चकल्या तळायला केली आहे मदत आणि हो मी 'चवप्रमुख' म्हणूनही काम केलं आहे! ;)
-रंगा
24 Oct 2011 - 7:55 pm | स्मिता.
रंगा भाऊजी, चकल्या एकदम मस्त तळल्या आहेत हो!
एकसारख्या रंगाच्या, खुसखुशीत चकल्या तळायलाही कौशल्य लागतंच :)
24 Oct 2011 - 10:23 pm | प्रशांत
म्हंजे तुमची भुमिका महत्वाची होती.... १००%
मी हि तेच काम करत आहे..
24 Oct 2011 - 7:27 pm | रेवती
धन्यवाद!
24 Oct 2011 - 1:51 am | स्मिता.
गेल्या वर्षी मी काढलेली रांगोळी:
रंग भरायच्या आधी
![](https://lh3.googleusercontent.com/-u_qKv8l6LsQ/TqR2bMi698I/AAAAAAAAFF0/j3qC1iVFC6k/s640/DSC00359.JPG)
रंग भरल्यानंतर
![](https://lh4.googleusercontent.com/-mKcpkIja_GU/TqR2azq0U0I/AAAAAAAAFF4/bElCMQ7xan8/s640/DSC00361.JPG)
24 Oct 2011 - 4:42 am | गणपा
सुरेख.
रंगसंगतीही मस्त.
24 Oct 2011 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला अशाच ठीपक्यांच्या रांगोळ्या आवडतात. पण आमच्या घरी फ्री हँड किंवा त्या पाचबोटाच्या रांगोळ्यावर लै भर. ठीपके वाकडे तिकडे पडतात म्हणून असावं. ;) मागच्या वर्षी दीपावलीला आमच्या अंगणात काढलेली रांगोळी ( कुठं सेव्ह करुन ठेवली आहे कोणास ठाऊक) सापडली तर इथे डकवतो.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 2:20 pm | स्मिता.
@ बिरुटेसर आणि गणपा, धन्यवाद!
ठीपके वाकडे तिकडे पडतात म्हणून असावं.
ते ठिपके काहीही साधनाशिवाय सरळ पडणे फारच अवघड आहे. त्याकरता मी एका मोठ्या जाड कागदावर आधी पट्टीने मोजमापं घेवून चौकट आखून घेतली आणि त्या चौकटीच्या प्रत्येक छेदनबिंदूवर अगरबत्तीने भोकं पाडून घेतली.
आता प्रत्येक वेळी हा कागद जमिनीवर पसरून त्यावरच्या भोकांवर तेवढी पटापट रांगोळी सोडली की काम होतं :)
24 Oct 2011 - 3:20 pm | गणपा
लहान असताना आम्ही पण अश्याच पद्धतीने 'ठिप कागद' बनवायचो. :)
24 Oct 2011 - 7:32 pm | रेवती
स्मिता, रांगोळी अतिषय सुरेख आलेली आहे.
त्यावर चकमक तू टाकलेली आहेस की मिळणार्या रंगांमधूनच आली आहे?
ठिपक्यांची रांगोळी पाहून किती मस्त वाटलं सांगू शकत नाही.
या वर्षीही काढणार आहेस काय?
माझ्याकडे पूर्वी ठिपके काढलेला कागद होता.
ठिपके काढून झाल्यावर तो काढताना भोकांमधून रांगोळी सांडून राडा व्हायचा. तो कसा टाळावा?;)
24 Oct 2011 - 7:50 pm | स्मिता.
रांगोळीवरची चमक मी वरून टाकली आहे. आजकाल रांगोळी विकणार्याकडेच अशी चमकीची पूड मिळते म्हणे. (आईने घेवून ठेवली होती)
ठिपक्यांची रांगोळी माझ्याप्रमाणेच बर्याच लोकांना अजूनही आवडते हे बघून बरे वाटले. आजकाल सगळीकडे संस्कार भारती किंवा मुक्तहस्त रांगोळीच दिसते त्यामुळे मला फारच 'ओल्ड फॅशन' वाटायचं!
ठिपक्यांच्या कागदावर ठिपके टाकून झाल्यावर त्याला अलगद जसाच्या तसा (घडी न पाडता) उचलून बाजूला केल्यास रांगोळी सांडून राडा होत नाही ;)
या वर्षी परदेशात असल्याने अंगण नाही की रांगोळी नाही :(
प्रिया ब ताईंनी सांगितलेला आकाशकंदिल केलाय. फोटो काढला की टाकते इथे.
24 Oct 2011 - 8:00 pm | रेवती
ओक्के!
24 Oct 2011 - 11:39 am | मराठमोळा
वीकांताला गाजराचा हलवा आणि पेढे बनवले होते.. काहीच शिल्लक आहेत. घ्या. तोंड गोड करा. ;)
24 Oct 2011 - 2:50 pm | पैसा
पण हलवा आणि पेढे दोन्ही एक्दम केलेत तुम्ही?
24 Oct 2011 - 7:33 pm | रेवती
छान फोटू.
मीही मायक्रोवेव्ह पेढे करणार आहे.
24 Oct 2011 - 7:56 pm | मोहनराव
तोंपासु!!
24 Oct 2011 - 1:09 pm | गणपा
कुछ मीठा हो जाए !!!
बेला आणि खोला
(बेसन आणि खोबर्याचे लाडू.)
24 Oct 2011 - 2:46 pm | पैसा
वेळ मिळेल तेव्हा पाकृ देणे.
24 Oct 2011 - 3:52 pm | स्मिता.
ते साखर पेरलेले बेसनाचे लाडू फारच टेम्टींग दिसत आहेत. जमेल तेव्हा पाकृ द्या.
24 Oct 2011 - 7:34 pm | रेवती
हेच म्हणते.
24 Oct 2011 - 7:56 pm | बिपिन कार्यकर्ते
रांगोळ्यांचे फोटो सुरेखच आहेत. पदार्थांचे फोटो बघितले नाहीत! ;)
24 Oct 2011 - 8:29 pm | मदनबाण
नरक चतुर्दशीच्या दिवशी हे फळ नरका सुराच्या वधाचे प्रतिक म्हणुन पायाखाली फोडले जाते. :)
काय बरं याचे नाव ?
24 Oct 2011 - 8:33 pm | स्मिता.
आजच सकाळी हे वाचले. मला तरी हा प्रकार माहिती नाही. आम्ही नरकासुराच्या वधाचे प्रतिक म्हणून पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून सुतळी बॉम्ब फोडत असू ;)
24 Oct 2011 - 8:35 pm | पैसा
माझ्या माहितीप्रमाणे 'कारिट' म्हणतात, 'कार्टं' नव्हे. कार्टं हे नाव दुसर्या काही मंडळींसाठी राखीव आहे.
2 Nov 2011 - 3:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय बरं याचे नाव ?
च्यायला, आम्ही खेडवळ लोक याला 'चिभडं' म्हणतो. थोडे सुशिक्षित लोकांना याला मी 'शेरनी' असं म्हणतांना पाहिलंय. काही ठिकाणी 'कारटं' 'कर्टुले' असं म्हणतांना वाचलंय. वरीजनल याचं नाव काय आहे, कोणी सांगू शकेल काय ?
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 9:07 pm | जयंत कुलकर्णी
उद्या फोटो काढायला जाणार आहे. बघू काही चांगले फोटॉ मिळतात का ते !
24 Oct 2011 - 9:25 pm | निनाद मुक्काम प...
कृपया दिवाळीचे ,रोषणाई चे भरपूर फोटो येथे अडकवा .
तेवढीच दुधाची तहान ताकावर
फोटो प्रेमी
मुक्काम पोस्ट जर्मनी
24 Oct 2011 - 10:30 pm | मोहनराव
मागील वर्षी माझ्या बहिणीने काढलेली रांगोळी..
![](https://lh5.googleusercontent.com/-8hJUnMw0LCU/SRfiBGSp5YI/AAAAAAAAA1w/yDO03rYLVbM/s640/PA290001.JPG)
माझे काम फोटो काढायचे.. ;)
24 Oct 2011 - 10:31 pm | रेवती
मस्त दिसतिये!
श्री लिहिलेला भाग हीसुद्धा रांगोळी आहे की काही छापील चित्र ठेवलय?
चित्र असलं तर आयडीया भारीये. चित्र नसलं तर कला उच्च दर्जाची आहे.:)
24 Oct 2011 - 10:39 pm | मोहनराव
मधले चित्रच आहे. माझ्या बहिणीला संस्कार भारती रांगोळी हा प्रकार मस्तपैकी येतो. फोटो अजुन असतील तर डकवतो.
25 Oct 2011 - 8:57 pm | आशु जोग
रांगोळी अतिसुंदर !
पण वरून फोटो काढणार्याचेही कसब कौतुकास्पद
24 Oct 2011 - 10:36 pm | अप्पा जोगळेकर
छान धागा आहे. फोटो, रांगोळ्या, पाककॄती,पणत्या पाहून लय भारी वाटतंय .
31 Oct 2011 - 7:18 pm | पैसा
दिवाळीत सांगलीला गेले होते. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला भेट देऊन येताना रस्त्यात गौळणी दिसल्या. मस्त कलंदरच्या "गौळणींची" आठवण ताजी झाली.
लगेच फोटो काढायला धावले,
परवानगी विचारायला एक छोटा ६/७ वर्षाचा मुलगा फक्त होता, त्याला विचारलं "फोटो काढू कारे?"
तो जाम खूष झाला, आणि त्याच्या अक्काला हाका मारायला लागला, "ए अक्का, फोटो काढायलाल्यात ग!" पण जास्त वेळ नव्हता, त्यामुळे त्याच्या अक्काची वाट न बघता तिथून निघाले.
31 Oct 2011 - 7:31 pm | दादा कोंडके
कित्ती वर्षांनी बघतोय ह्या गौळणी! आणि तो झोपलेला पेंद्याच आहे ना?
लहान असताना पेंद्याच्या बेंबीत फटाके ठेउन उडवायला मजा यायची! :)
1 Nov 2011 - 2:56 pm | स्पा
आमची दिवाळी
अजून टाकेन फोटो ,
तूर्तास एवढेच आहेत