गेल्या विकांती फॉल कलर्स बघायला व्हाईट माउंटन्स, न्यु हँपशायर इथे गेलो होतो. आमच्या इथून साधारण ३५० मैलाच्या अंतरावर आहे हे ठिकाण. पहिल्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला पोहोचून रेल्वेने (माउंट वॉशिंग्टन कॉग रेल्वे) माउंट वॉशिंग्टन या अमेरिकन उत्तरपुर्वेच्या सर्वात उंच शिखरावर जायचे ठरवले होते. पण शिखरावर जोरदार वारा चालू असल्याने वरपर्यंत जायला बंदी होती. रेल्वे ३/४ उंचीपर्यंत जाऊन परत येणार असे सांगण्यात आहे. त्याचे काही फोटो.
बेस स्टेशन
बेस स्टेशन वरून दिसणारे माउंट वॉशिंग्टन
सुर्यदेवांचा लपंडाव
बेस स्टेशनवरील एक इमारत
या ठिकाणचे एक जुने रेल्वे इंजिन
दुसर्या दिवशी जवळच्याच फ्रँकोनिया नॉच स्टेट पार्क मधे जाऊन फॉल टिपला.
तसेच कॅनन माऊंटन या डोंगरावर ट्रामवेने जाऊन दर्याखोर्यांची दृष्ये नजरेत टिपली. त्याबद्दल पुढच्या भागात. :)
प्रतिक्रिया
19 Oct 2011 - 9:00 pm | मेघवेडा
सगळेच फोटो मस्त आहेत.. शेवटून दुसरा बेष्ट!
19 Oct 2011 - 9:09 pm | यकु
वा..वा.. बेस्ट फोटो.
फोटोसोबत दोन दोन परिच्छेद लिहीले असते तर आणखी मजा आली असती.
20 Oct 2011 - 2:44 pm | गणपा
यशवंतराव, एक चित्र १००० शब्दांचे काम करते यावर प्रभ्याचा ठाम विश्वास आहे.
मग धारा बोटे आणि मोजा किती शब्द टंकलेत ते. ;)
19 Oct 2011 - 9:09 pm | आत्मशून्य
.
19 Oct 2011 - 9:10 pm | गणपा
सगळेच फोटु मस्त आलेत रे. :)
19 Oct 2011 - 9:12 pm | चतुरंग
दोन वर्षापूर्वी फॉल कलर्स बघायला गेलेलो आठवले.
तुला जायला एखाद दोन आठवडे उशीर झालेला दिसतो बरीचशी पानगळ होऊन गेलेली आहे. नाहीतर आणखीन मनोहारी रंगांची उधळण मिळाली असती..
19 Oct 2011 - 9:20 pm | गणेशा
अप्रतिम
19 Oct 2011 - 9:28 pm | अनामिक
मी एका विकांतापुर्वी (८ तारखेला) इथेच आणि माउंट वॉशिगटन या दोन्ही ठिकाणी जाऊन आलो. त्यावेळी शरद ऋतूतले रंग अगदी भरात येत होते. शिवाय माउंट वॉशिंगटनला ड्राईव्ह करत वर पर्यंत जाता आले. रस्ता अगदीच अरुंद असल्याने आणि बरीच वर्दळ असल्याने जरा कसरत झाली. वर गेल्यावर वारा जरा जास्तंच जोरात होता. अगदी उडून जातो की काय असे वाटण्या इतपत! रंगाशेट म्हणतात तशीच मनोहारी रंगांची उधळन पहायला मिळाली!
19 Oct 2011 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
19 Oct 2011 - 10:35 pm | ५० फक्त
मस्त रे , शेवटुन तिसरा फोटो घेतला आहे वॉलपेपर साठी. धन्यवाद.
19 Oct 2011 - 10:42 pm | पैसा
यापुढे प्रभोच्या लेखनाला "चित्रांकन"म्हणावं ही माझी सूचना. यावेळचे फोटो इतके छान आहेत की सोबतच्या अदृश्य मजकुराबद्दल माफी देण्यात येत आहे.
19 Oct 2011 - 10:47 pm | रम्या
मला शेवटची जंगलातील वाट फार आवडली
19 Oct 2011 - 11:14 pm | रेवती
मस्त फोटो!
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
19 Oct 2011 - 11:23 pm | नंदन
फोटो आवडले. आता दक्षिणेकडच्या राज्यांत सरकले असतील ना फॉल कलर्स?
20 Oct 2011 - 12:35 am | प्रशांत
सगळेच फोटु मस्त... :)
20 Oct 2011 - 8:20 am | निवेदिता-ताई
अतिशय सुरेख.
20 Oct 2011 - 9:11 am | प्रचेतस
अप्रतिम फोटो.
20 Oct 2011 - 9:47 am | मदनबाण
मस्त फोटो... :)
वेळ आणि संधी मिळाल्यास सुर्यदेवाचा लपंडाव मी वेगळ्या पद्धतीने टिपेन.
20 Oct 2011 - 10:08 am | अमोल केळकर
मस्तच :)
अमोल केळकर
20 Oct 2011 - 11:15 am | इरसाल
अत्युत्तम फोटो.
अवांतर: तुम्ही जे जुने इंजिन म्हणत आहात त्याचे पुढचे चाक रोड रोलर सारखे का आहे या बद्दल काही माहिती देवू शकाल का ?
20 Oct 2011 - 11:26 am | यशोधरा
किती सुरेख फोटो प्रभ्या.
20 Oct 2011 - 11:41 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त फटू आहेत सगळे.
ते फोटो बघून काही आठवणी जाग्या झाल्या.. असो.
20 Oct 2011 - 2:21 pm | मदनबाण
अरे लोबो...एक आगाऊपणाचा सल्ला द्यायची खाज आली आहे मला...;)
तू या साईटला अधुन मधुन वेळ मिळेल तशी भेट देत जा....
http://www.boston.com/bigpicture/
मी या साईटवर अधुन मधुन जात असतो..नुसते काढलेले फोटो पाहुन देखील बरेच काही शिकायला मिळते...
आपल्याला काय दिसते या पेक्षा आपल्याला दुसर्यांना काय दाखवायचे आणि कसे यावर विचार केलास ( मी करण्याचा प्रयत्न करतोय अजुन) तर अजुन फायदा मिळेल...
तुझा सुर्यदेवाचा लपंडाव हा प्रकार माझ्या मनात बरेच दिवस आहे....
आत्ताच या साईट वर Scenes from Kashmir नावाचे फोटो आहेत त्यातला पहिला फोट जमल्यास नक्की पहा. :)
20 Oct 2011 - 8:38 pm | प्रभो
धन्यवाद मंडळी.
20 Oct 2011 - 8:57 pm | प्राजु
आम्हिही गेलो होतो... ८ - ९ च्या विकांताला.. तिथेच. व्हरमाँट ही पाहिले.. चीज फॅक्टरी पाहिली. बेन एन्ड जेरी पाहिलं..
माझे आमचे फोटो.. पिकासावर आहेत. लिंकवते. प्रायव्हेट आहे लिंक सध्या.. पब्लिक करते .
20 Oct 2011 - 10:06 pm | सर्वसाक्षी
सुरेख चित्रण. मजा आली. रंगसंगती झकास
21 Oct 2011 - 12:59 am | चित्रा
मस्त फोटो.
आम्ही लहानशी ट्रीप केली यंदा. फार लांब नाही.