फुलांचा स्वर्ग – कास पठार !!

सुहास झेले's picture
सुहास झेले in कलादालन
28 Sep 2011 - 10:04 am

गेल्या रविवारी बहुचर्चित कास पठाराला भेट देण्याचा योग आला. त्याची काही क्षणचित्रे !!!

प्रचि १ - सूर्योदय

प्रचि २ - बस मधून उतरल्यावर ह्या साहेबांनी स्वागत केलं ;-)

प्रचि ३ - आधी पोटोबा

प्रचि ४ - कास पठारावर स्वागत

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९ Halunda (Vigna Vexillata) (फोटो साभार – देवेंद्र चुरी)

प्रचि १०

प्रचि ११ - Jartari (Slender Flemingia)

प्रचि १२ - Abolima (Murdannia lanuginosa) (फोटो साभार - देवेंद्र चुरी)

प्रचि १३ - खादाडी..... खास आकर्षण पुरणपोळी :D

प्रचि १४ - दीपक, चैतन्य, देवेंद्र, राजीव काका, धुंडीराज, सागर आणि भारत ...

माझा कॅमेरा - SONY DSC-W370

देवेंद्रचा कॅमेरा - KODAK EasyShare Z981

सगळ्यांनी एकदा कासला नक्की भेट द्यायला हवी, पण लवकरात लवकर. इथे मानवी वस्ती वाढली, तर ह्या जागेचं काही खरं नाही..तसे काही ठिकाणी प्लॉटस् ची बुकिंग झालेली दिसते पठारावर जाताना, कुंपणांची गर्दी होती थोडीफार :(

असो… !!

- सुझे !! :)

प्रवासमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

उदय के'सागर's picture

28 Sep 2011 - 10:28 am | उदय के'सागर

कास म्हणजे महाराष्ट्राचं Vally of flower आहे :) सुंदर!!!

प्रचेतस's picture

28 Sep 2011 - 10:28 am | प्रचेतस

फोटो अजून टाकायला हवे होते.
कासचा हा पुष्पोत्सव अजून १५/२० दिवस चालेल तेवढ्यात जाउन यायलाच पाहिजे.

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 10:51 am | सुहास झेले

वल्ली बरोबर बोललात, पण तिथे लोकांची इतकी गर्दी होती की जास्त थांबावसं वाटलं नाही... अजुन २-३ आठवडे आहे सीजन, जाऊन या, पण हो शनिवार आणि रविवार सोडून जा.. हे दोन दिवस तिथे जत्रा असते :(

मदनबाण's picture

28 Sep 2011 - 10:30 am | मदनबाण

सुहासराव... इथे हापिसातुन फोटु-शोटु दिसत नाहीत... पिकासवर टाकले नाहीस काय ?
असो... घरला गेल्यावर पाहीन. :)

अफलातून ठिकाण आहे हे.

एक वाईट गोष्ट म्हणजे तिथे बाटल्या नेऊन दारु पिण्याचं प्रमाण फार जास्त असल्याने, आणि विशेषतः फुटलेल्या बाटल्यांचा खच कास तलाव परिसरात असल्याने त्याला कास तलाव ऐवजी काच तलाव म्हटलं जात असे.

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 11:20 am | सुहास झेले

ह्म्म्म्म... सध्या तिथे बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त आहे, विदेशी पर्यटक सुद्धा होते...

सुंदर फोटो आहेत. ह्या रविवारी म्हणे १५-१६ हजार पब्लिक होती तिथे. खुप नासधुस झाली अस झाल तर लवकरच त्या पठाराचे सौंदर्य नाहीसे होइल.

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 3:04 pm | सुहास झेले

हो, तिथे जर मानवी वर्दळ अति वाढली, तर ते सौंदर्य संपल्यातच जमा आहे... :( :(

वेताळ's picture

28 Sep 2011 - 1:09 pm | वेताळ

आजकाल महाराष्ट्रशासनाने त्या स्थळाला विशेष दर्जा दिला आहे.त्याठिकाणी कोणत्याही फुलाना स्पर्श करु दिला जात नाही,खुप पोलिस बंदोबस्त असतो.सदर ठिकाण सातारा जिल्हात असुन सातार्‍यातुन ३६किमी अंतरावर आहे.ह्यावर्षीचा हा फुल बहारण्याचा काल जवळजवळ संपला आहे. हे पठार अंदाजे ७००/७५० एकर परिसरात वसले आहे. ही सर्व जमीन खा.छ.उदयनराजे भोसले ह्याच्या मालकीची आहे.त्यामुळे तिथे त्यानी कोणतेही प्लॉटीग केलेले नाही. ह्या पठाराचे महत्व ते जाणुन आहेत म्हणुन त्यानी तिथे पक्के रस्ते बांधायला विरोध केला आहे्. हे ठिकाण गेल्या ८/९ वर्षात खुपच प्रसिध्दीस आले ते पण योगायोगानेच.

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 3:11 pm | सुहास झेले

माहितीसाठी धन्यवाद...!!

त्याठिकाणी कोणत्याही फुलाना स्पर्श करु दिला जात नाही,खुप पोलिस बंदोबस्त असतो.

आम्ही स्वतः ३-४ लोकांना बाहेर काढलंय, जे तिथे लोळत होते... बंदोबस्त फक्त गाड्यांच्या पार्कींगसाठी होता, जवळजवळ १०-१२ हजार लोकं होती तिथे....

ही सर्व जमीन खा.छ.उदयनराजे भोसले ह्याच्या मालकीची आहे.त्यामुळे तिथे त्यानी कोणतेही प्लॉटीग केलेले नाही.

कासकडे जाताना जो छोटा घाट ओलांडून जावा लागतो, तिथे वर कुपंणांचे प्लॉटीग केलेले आहे ....

ह्या पठाराचे महत्व ते जाणुन आहेत म्हणुन त्यानी तिथे पक्के रस्ते बांधायला विरोध केला आहे्.

वर जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे आणि तो पठारातून बामणोलीला खाली उतरतो.. पुस्तके आणि गाईड मिळतात रस्त्यात....

शरभ's picture

28 Sep 2011 - 1:14 pm | शरभ

फारच छान..आम्ही प्लान कर्तोय mid October, Lets see जमत का ते.

वेताळ's picture

28 Sep 2011 - 1:39 pm | वेताळ

जास्तीत जास्त अजुन ५ते६ दिवसात संपेल फुलांचा महोत्सव.पुढच्या वर्षी श्रावण संपत आला कि तयारी करा.

शरभ's picture

28 Sep 2011 - 1:49 pm | शरभ

ह्या वेळी उशीर झालाय खरा...

गणेशा's picture

28 Sep 2011 - 2:04 pm | गणेशा

मस्त

प्राजक्ता पवार's picture

28 Sep 2011 - 2:04 pm | प्राजक्ता पवार

सुंदर .

खुपच सुंदर फोटो आहेत सगळे. सगळ्यात जास्त २ व ३ नंबरचे फोटो आवडले. ;)

सुधांशुनूलकर's picture

28 Sep 2011 - 5:21 pm | सुधांशुनूलकर

|| श्री गुरवे नम: ||

कासचं पुष्पपठार

दणकेबाज पाऊस संपून रिमझिम सरी पडायला सुरुवात झाली की एक निसर्गसुंदर आश्चर्य बघण्यासाठी साताऱ्याजवळच्या कास पठाराकडे फुलवेड्या निसर्गप्रेमींची पावलं आपसूक वळतात. दरवर्षीचा हा फुलांचा रंगसोहळा, कितीहीवेळा पाहिला तरी मनाचं समाधान काही होत नाही.

सातारकरांची तहान भागवणाऱ्या कास तलावाजवळचा हा विस्तीर्ण माळ, सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर. जांभा दगडाने बनलेला, काळाकभिन्न. सच्छिद्र. त्यामुळे यावर माती टिकून रहात नाही. मोठी झाडं उगवू शकत नाहीत, शेती करता येत नाही. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर दिवसात इथे फक्त काळा कातळ दिसतो. ऑगस्टनंतर मात्र इथे निसर्ग मुक्तहस्ते रंग उधळतो. खडकावर थोडी ओली माती धरून राहिल्यावर त्यावर छोटीछोटी रानफुलं बहरतात. जणु पिवळा, गुलाबी, पांढरा निळा गालीचा पसरलाय असं वाटतं. गुलाबी तेरडा, पांढरे गेंद, पिवळी सोनकी, निळी `सीतेची आसवं’, नाव सार्थ करणारं मिकी माउस..... किती प्रकार सांगावे. आठ-नऊ वर्षांनी कारवी फुलते तेव्हा सगळीकडे जांभळ्या रंगाचं साम्राज्य असतं. आणि, फुलांचे आकार तरी किती छोटेसे ? काही फुलं तर सूक्ष्मदर्शक भिंगातून बघावी लागतात.

काही जातींची फुलं अगदी दुर्मिळ, मुद्दाम शोधावी तेव्हा दिसतात. दवबिंदूच्या (कीटकभक्षी ड्रॉसेराच्या) दोन जाती इथे आढळतात. कीटकाला आपल्या पाकळ्यांत थोडा वेळ बंदिस्त करणारं कंदीलपुष्पही अधूनमधून दिसतं. हबे अमरी, पिवळी अमरी, कंगवा अमरी अशा अमरीच्या (ऑर्किडच्या) आठ-दहा जातीही दिसतात.

निसर्गाची ही रंगपंचमी सर्वस्वी पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असते. गेल्या वर्षी (२०१० मधे) श्रीगणेशचतुर्थीला फुलांचा बहर ऐन भरात होता. आम्ही त्या दिवशी पठारावर होतो. उत्सवाचा दिवस असल्यामुळे तिथे आमच्याव्यतिरिक्त कुणीही नव्हतं. या वर्षी मात्र गणेश विसर्जनानंतर फुलोरा सुरु झाला, कारण, पावसाने अचानक दमदार हजेरी लावली आणि बहरायला लागलेली फुलं कोमेजून गळून गेली. आणि आता ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा सगळा बहर ओसरून जाणार.

_____________________________________________________________________________________

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 5:48 pm | सुहास झेले

धन्यवाद...!!

कास परिसरावर लिहिलेलं दिपक श्रोतींच "कास" हे पुस्तक एकदा नजरेखालून घातल्यास, तिथल्या दुर्मिळ फुलांची इंग्रजी आणि मराठीत बरीच माहिती मिळते :) :)

सुशान्त's picture

1 Oct 2011 - 12:25 pm | सुशान्त

कास पठाराविषयीच्या उपरोक्त पुस्तकाविषयी थोडी अधिक माहिती मिळू शकेल का? म्हणजे प्रकाशक कोण, पुस्तक कुठे विकत मिळू शकेल इ.

सुहास झेले's picture

1 Oct 2011 - 1:06 pm | सुहास झेले

लेखक - संदीप श्रोत्री

पुस्तकाचे नाव - पुष्प पठार कास

प्रकाशक - डॉक्टर स्वाती श्रोत्री

किंमत - १०० रुपये

पाने - ९२

फोन नंबर - ०२१६२२३४९२२

इमेल - swatishrotri@dataone.in

पुस्तक ऑनलाईन ग्रंथालय.ऑर्गवर उपलब्ध आहे ... पुष्प पठार कास

आत्ता दिसले रे... मस्तच आहेत फोटु. :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Sep 2011 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा

झक्कास... ६ आणी ९ जास्त अवडले............. :-)

श्यामल's picture

30 Sep 2011 - 11:49 am | श्यामल

खुप सुंदर फोटो !

इरसाल's picture

30 Sep 2011 - 4:54 pm | इरसाल

हे बघा
http://www.esakal.com/esakal/20110930/5328880787550606265.htm
इसकाळ वर सापडले.

मर्द मराठा's picture

2 Oct 2011 - 10:54 am | मर्द मराठा

मस्त वाटले फुले पाहून... बर्‍याच वर्षांची अतॄप्त इच्छा आहे तिकडे जायची.. अगदी तुम्ही वरती सागिंतलेले पुस्तक ही घेऊन ठेवलेय..
छायाचित्रे सुंदर ... कॅमेर्‍यातल्या फोकस चौकोनाला वापरून फुले फोकस केली असतीत तर काही (प्रचि. ४, ८-१२) अजुन छान आली असती... प्रचि ५,६ चे फ्रेमिंग आवडले...
धन्यवाद अनुभव मांडल्याबद्दल...

रेशिमकाटा's picture

3 Oct 2011 - 3:51 pm | रेशिमकाटा

फोटो अप्रतिम्!खरोखरच सुन्दर आहे कास्.मला जायचे आहे तिथे या १५ दिव्सात.