तुमच्याशी कोणी उर्मटासारखे वागले, तरी तुम्ही त्या व्यक्तीशी चांगुलपणाने वागता की तुम्ही त्या व्यक्तीला "ईंट का जवाब पत्थर से" देता?
उदा - तुमची बायको एखाद्या किरकोळ कारणावरून तुमच्याशी अतोनात भांडली, खूपच आक्रस्ताळेपणाने वागली तर भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का? का तुमच्या कृतीमधून तिची चूक जाणवून देता?
जर तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठवत असाल तर मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून ते चूकीचे आहे. कारण तुमच्या कृतीमधून तुमच्या दुबळेपणाचा, चूकीचा संदेश तिच्याकडे जातो आहे. खूष होण्याऐवजी, तिच्याही नकळत तिचा ग्रह असा होतो आहे की असा आक्रस्ताळेपणा केला की गुलाबाची फुले मिळतात.
वरील उदाहरण स्पष्ट करणारा एक छानसा लेख परवा वाचनात आला. मला तो खूपसा पटला. म्हणून येथे देत आहे.
आपल्या मनावर लहानपणीच्या शिकवणूकीमुळे म्हणा पण बराचसा चूकीचा पगडा असतो जसे - "कोणी एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा." किंवा "The meek shall inherit the earth." पण अशा समजूतीतून, श्रद्धांमधून काही फायदा आपल्याला खरोखर होत असतो का? फायदा सोडा तोटाच तर होत नसतो ना या मुद्द्याचा उहापोह या लेखात केलेला आहे. अशा बुळचट विश्वासांतून आपण लोकांच्या चूकीच्या वृत्तीला खतपाणी घालत असतो. कोणीही यावे आपल्याला लाथाडावे, धुतकारावे आणि आपण मात्र चांगुलपणा दाखवावा अशा प्रकारच्या " self-defeating" वृत्तीला यातून खतपाणी घातले जाते.
लेख जरूर वाचावा. छान लेख आहे.
प्रतिक्रिया
22 Sep 2011 - 9:41 pm | प्रियाली
हे कोण, कधी, का वागले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समोरच्याशी कसे वागायचे हे त्या व्यक्तीचे आपल्या जीवनातील स्थान, तिची आणि आपली गरज, वेळ, स्थान आणि आपला स्वार्थ हे पाहून ठरवावे लागते.
गालावर थप्पड मारणार्यासमोर दुसरा गाल पुढे करण्याची कृती नेहमीच कामी येणार नाही, त्याप्रमाणेच तुमच्या कृतीतून तुम्ही ईंट का जवाब पत्थरने नेहमीच देऊ शकत नाही. कधी कधी अनोळखी माणसाला दिली जाणारी वागणूक आपण ओळखीच्या माणसाला देऊ शकत नाही आणि ओळखीच्या माणसाला दिली जाणारी वागणूक घरातल्या माणसाला देऊ शकत नाही.
परंतु सदासर्वकाळ दुसर्याला एकसारखी ट्रिटमेंट मिळत असेल तर नक्कीच कुठेतरी प्रॉब्लेम आहे असे मानण्यास जागा आहे. प्रॉब्लेम नसेल तर एकसुरी ट्रिटमेंट देणार्याला आणि घेणार्याला लवकरच तिचा उबग यायला हवा.
22 Sep 2011 - 9:50 pm | संदीप चित्रे
तिथे तू आहेस, प्रियाली..
अर्थात -- देअर यू आर :)
>> कधी कधी अनोळखी माणसाला दिली जाणारी वागणूक आपण ओळखीच्या माणसाला देऊ शकत नाही आणि ओळखीच्या माणसाला दिली जाणारी वागणूक घरातल्या माणसाला देऊ शकत नाही.>>
पर्फेक्ट
22 Sep 2011 - 10:07 pm | प्रभो
>>हे कोण, कधी, का वागले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समोरच्याशी कसे वागायचे हे त्या व्यक्तीचे आपल्या जीवनातील स्थान, तिची आणि आपली गरज, वेळ, स्थान आणि आपला स्वार्थ हे पाहून ठरवावे लागते.
प्रियालीशी सहमत आहे.
23 Sep 2011 - 1:12 am | धनंजय
+१
दीर्घकाळाच्या जोडीदारांना आलटून-पालटून नमते घेण्यात कदाचित फायदा असेल.
23 Sep 2011 - 12:09 am | शेखर काळे
हे अत्यंत आवश्यक आहे - तुम्ही जे ऊदाहरण दिले आहे - नवरा-बायकोच्या भांडणाचे त्यात.
तुम्ही जो दुवा दिलेला आहे, त्यात व तुमच्या मुळ लेखात अगदी टोकाला जावून वागण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि दुव्यातल्या लेखात या दोन्ही टोकांना जावून वागण्याचा शेवटी परीणामही वाईटच झालेला आहे.
यापेक्षा बायको भांडली किंवा भांडणाला सुरुवात होते आहे असे वाटले, तर तेव्हा आपला पारा चढवण्याऐवजी आरडाओरड्याचे नक्की कारण काय हे बघायला पाहिजे. कदाचित त्या वेळी कारण शोधणे शक्य झाले नाही तरी नंतरही हे करता येते. हां, आता जर चूक नवर्याचीच असेल, तर गुलाबाचा गुच्छ न्यायला काही हरकत नसावी - पण हा गुच्छ कां आणलेला आहे त्याचे कारणही स्प्ष्ट असावे.
बायकोची जर चूक असेल, तर नवर्याने ती चूक समजावून सांगणे आवश्यक आहे - जर बायकोला आपली चूक झाली आहे हे कळत नसेल तर. बर्याच वेळा चूक दोन्हीकडून असते - यावेळी कोणी एकाने तरी शांत राहून दुसर्याची वाफ / राग कमी होऊ देणे आवश्यक असते. नेहमी असे होईल असे नाही .. पण स्वतःहून पुढाकार घेऊन हे घडवून आणावयास हवे.
- शेखर काळे.
23 Sep 2011 - 12:32 am | शुचि
नवर्याची चूक असेल आणि त्याने गुच्छ नेला तर ते बरोबरच आहे. त्याचप्रमाणे मुद्दा न सोडता शांतपणे बोलणे हे देखील पटण्यासारखे आहेच.
_______________
पण जर लोकांनी/आपल्या प्रिय व्यक्तींनी आपल्याशी कसे वागावे याचा अप्रत्यक्ष "पॅटर्न" घडवायचा असेल, तर दुसर्याने दिलेल्या वाईट वागणूकीबद्दल नाराजी व्यक्त करणे, थोड्याफार प्रमाणात त्या व्यक्तीला सौम्य शासन करणे (ज्यायोगे परत तेच घडू नये) हे करावेच लागेल.
___________
बायकोची चूक असेल तर गुच्छ नेऊ नये असाच अंगुलीनिर्देश लेखात केलेला आढळतो. कारण चूकीचा "पॅटर्न" सेट होण्याची शक्यता वाढते.
_________________
अर्थात प्रियाली म्हणतात तसा सारासार विवेक वापरूनच करावे लागेल.
23 Sep 2011 - 1:15 am | आत्मशून्य
बच्चा समजके कंधेपे लीया तो कान मे... अशी परीस्थीती येऊ देऊ नका
थोडं टोकावर ठेवा एव्हडा सोपा फंडा आहे.
म्हणजेच थोडक्यात कॉमन सेन्स... अथवा ग्याणबाचं गनीत.....
शूची ताइ असच मागे एकदा आपण आत्मविश्वास या साध्या सोप्या गोश्टीवर पिएच डी पाडून त्याचे हेल्दी अहंकार अस नामकरण केले होते व वरती तो कसा आवश्यक आहे हे पण Xप्लेन केले होते... लहान सहान कॉमनसेन्सच्या गोश्टीस पटवायला उगाच लेखांचे रेफरन्स कशाला द्यावे लागतात हो ?
खरतर बालकांसाठीचं पंचतंत्रही पूरेसं असतं अशा गोष्टी समजायला... जर व्यवस्थीत लक्ष देऊन वाच्लं ऐकलं असेल तर....... पण असे धागे म्हणजे... एकतर आपण फार्फार लहानसहान गोश्टींचा प्रमाणाबाहेर गंभीर बनून विचार करताय अथवा दूर्दैवाने आपल्याशी नीगडीत अशी अत्यंत जवळची व्यक्ती बहूदा "self-defeating" वृत्तीची ऑलरेडी बळी आहे अशी (कू) शंका मनात येतेय. कोण आहे ही व्यक्ती ? आपले माननीय यजमान तर न्हवे वा जेश्ठ कनीश्ठ बंधू वगैरे ? (क्षमस्व जरा जास्तच खाजगी बाबी बाबत बोललो असं वाटत असेल तर, प्रतीसाद संपादीत झाला तरी चालेल, हरकत नाही, पण उद्देश या गोश्टींच उत्खनन घडावे हा नाही)...
आपण यापेक्षाही निखळ मनोरंजन करणारे धागे काढले आहेत याचा विसर पडला नसल्याने आपण पून्हा जरा मस्त मस्त कोडी व इतर वैचारीक धाग्यांचे लेखन हाती घ्यावे अशी विनंती करतो...
बाकी आपण दीलेल्या उदाहरणाबाबत इतकच म्हणता येइल की तसही पती पत्नीच्या भांडणात इतरांनी नाक खूपसावे असं मला वाटत नाही ;) आणी जी लिंक दीली होती त्यातील पहीली ओळच अशी होती
संपलं..... अशी ओळ असेल तर पूढील लेखन वाचायचा प्रश्नच येत नाही......
23 Sep 2011 - 1:22 am | चित्रगुप्त
भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का?
पाठविता म्हणजे ?
बायको अमेरिकेत आणि आम्ही पुण्यात, भांडण फोन वर आणि गुलाबाचा गुच्छ कुरियरने पाठवायचा, असे म्हणता काय?
किरकोळ कारणावरून भांडण समोरासमोर होणार, मग गुच्छ नेमका पाठवायचा तरी कुठे?
की ती भांडणानंतर लगेच माहेरी वगैरे निघून जाणार, हे गृहित धरले आहे?
23 Sep 2011 - 1:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आजकाल असा इंटरनेटवरून गुच्छ विकत घेण्याची सोय आहे. रेवतीताईला विचारा, भांडण झालेलं नसतानाही तिला बुके मिळाला होता. (संदर्भ)१
असो. ज्या माणसाची किंमत आहे२ अशा माणसाशी भांडण झालेलं असताना, दोन्ही बाजूंनी डोकी भडकलेली असताना काही न बोलणंच मला इष्ट वाटतं. काही तास, दिवस, आठवड्यांनी सहजच बोलताना तो विषय काढून दोन्ही बाजू काय आहेत याची चर्चा करून फायदा होतो असं स्वतःच्या बाबतीत निरीक्षण आहे. ही पद्धत नवरा, भाऊ, मित्र-मैत्रिणी, आई, वडील, त्यांच्या वयाचे मित्र या सगळ्यांबरोबर अवलंबून झालेली आहे. माझ्या चुकाही मान्य करताना माझा मी पणा आड आला नाही आणि इतरांच्या वागण्यातल्या विसंगतीही मला दाखवता आल्या.
बाकी थोडी भांडणं वगैरे व्हायचीच. नाहीतर मजा काय?
१. रेवतीताई, आता आणखी प्रतिसाद मिळाले तर मला प्यार्टी हवी हां.
२. बाकीच्यांना सोय-सवड पाहून एकतर फाट्यावर मारावं नायतर चांगलं कुदवून काढावं. ही तळटीप खासकरून lakhu risbud यांच्या शिक्षणास समर्पित.
23 Sep 2011 - 1:40 am | lakhu risbud
समोर असणाऱ्या प्रत्येक आय डी ला कारण नसताना धुवून,पिळून, वाळवत टाकणाऱ्या आक्रस्ताळ्या ( हा शब्द माझा नव्हे !) विक्षिप्त तैंचे या गोष्टीवर काय म्हणणे आहे ?
23 Sep 2011 - 4:24 am | चित्रा
विचारप्रवर्तक लेख आणि प्रतिसाद.
>तुमच्याशी कोणी उर्मटासारखे वागले, तरी तुम्ही त्या व्यक्तीशी चांगुलपणाने वागता की तुम्ही त्या व्यक्तीला "ईंट का जवाब पत्थर से" देता?
याला एकच उत्तर नाही. कोणी वाईट वागले म्हणून मुद्दाम अशांशी चांगुलपणाने वागण्याची गरज असते असे नाही, आणि ईंट का जवाब पत्थरसे ची सुद्धा गरज असेल असे नाही. ही दोन टोके झाली.
आपले म्हणणे पटवून देण्याचे सरळ आणि पत्थरापेक्षा कमी त्रासदायक असे मार्ग बर्याचदा असतात. तेही पटले नाही, तर अशा व्यक्तींपासून लांब राहता येते.
कोणालातरी शासन करण्यासाठी किंवा चुका दाखवून देण्यासाठी म्हणून उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करणे आणि दुसरीकडे वाक्ताडन करावेसे वाटूनही मुखदुर्बळता हे दोन्ही दोषच आहेत, दोन्हीवर सवयीने थोडाफार ताबा मिळवता येतो असे वाटते. पण अगदीच न रहावेसे वाटल्यास मात्र बिनधास्त तोंडसुख घ्यावे. मात्र त्याचे बरेवाईट परिणाम भोगण्याची तयारीही ठेवावी.
चुकीबद्दल शासन करणे - तेही नवर्याला - याचा मी खोलात जाऊन अजून विचार केला नाही. ;)
कदाचित माझ्याबरोबर राहणेच त्याला शिक्षा असू शकेल!
23 Sep 2011 - 7:04 am | रेवती
सहमत!
ईंट का जवाब पत्थरसे ची सुद्धा गरज असेल असे नाही
अगदी!
तसे करण्याचे दरवेळी कारण असेलच असे नाही.
समोरच्याला बोलल्याने आपल्यालाच त्रास होणार असेल आणि तो माणूस तसाही महत्वाचा वाटत नसेल तर वागणे/बोलणे आवडले नसल्याचे सांगून आपण आपला त्रास वाचवू शकतो.
चुकीबद्दल शासन करणे - तेही नवर्याला
हे हे हे..........हा अगदी वेगळा विषय आहे.;)
धागा सुरु केला तर खात्रीने शंभर सव्वाशे प्रतिसाद खेचू शकेन.;)
23 Sep 2011 - 8:34 pm | शुचि
विनोदाची झालर असलेला छान प्रतिसाद.
23 Sep 2011 - 9:25 am | मराठी_माणूस
कार्यालया मधे अपरिपक्व साहेब मंडळींशी "ईंट का जवाब पत्थरसे" वागलो तर ज्यास्त समस्या निर्माण होतात आणि नाही वागलो तर डोक्यावर बसतात.
23 Sep 2011 - 10:34 am | मनीषा
इट का जवाब अगदी पत्थरसे नाही तरी निदान त्याच विटेने तरी देता यावा अशी इच्छा असते, पण दर वेळेला (विविध कारणां मूळे) जमतेच असे नाही. आणि मग ते विटा मारणारे उगीचच 'जीतं जीतं ..' म्हणत फिरतात . त्याचे वाईट वाटते .
23 Sep 2011 - 12:55 pm | इरसाल
प्रत्येक ठिकाणी वीट, दगड उत्तरे चालणार नाहीत.
काही ठिकाणी काळ,वेळ आणि प्रसंगानुरूप वागावे लागते.
अट्टल गुन्हेगाराला "खरं खरं सांग हा गुन्हा तूच केलास ना ? तुला गांधीजींची शपथ आहे " म्हणून चालेल का? तिथे त्याला वेताच्या दांडक्यानेच फोडावे लागेल .
23 Sep 2011 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
बघ बाई मिपावर लेख हा आला, पांघरून अंगावर इंग्रजी ज्ञानाचा शेला
डायरीचे उघडले हे पान मिपावरी, त्यावरून डौलानें ये उपप्रतिसादांची ही स्वारी
23 Sep 2011 - 2:28 pm | प्रभाकर पेठकर
बायकोशी भांडण झाल्यावर, लेखाच्या शीर्षकाशेजारील हास्यमुद्राच जास्त कामी येते असा अनुभव आहे. (पुष्पगुच्छ वगैरे काय करायचा आहे?)
23 Sep 2011 - 8:33 pm | शुचि
हाहा :)
24 Sep 2011 - 8:22 pm | पैसा
या प्रश्नाला दर वेलेला २+२=४ इतकं सरळ आइ एकच उत्तर मिळणं शक्य नाही. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती, त्यात सहभागी असलेली माणसं याचा तारतम्याने विचार करूनच वागावं लागतं.
साधी गोष्ट आहे. मिपावर एखाद्या माणसाला "तुझं चुकलंय" म्हणून सांगणं सोपं आहे, पण तेच घरातल्या जवळच्या कोणाला, (उदा. नवरा किंवा सासू वगैरे) असं "ताड की फाड" सांगणं कोणाला शक्य होणार नाही आणि उचितही ठरणार नाही.
राहिली गोष्ट फुलांची. मला परागकणांची वगैरे अॅलर्जी आहे. त्यामुळे मला जर माझ्या नवर्याने फुलं पाठवली तर "मला आणखी त्रास व्हावा म्हणूनच तू फुलं पाठवलीस" असं म्हणून मी आणखी एका भांडणाची सुरुवात नक्की करीन! ;)
24 Sep 2011 - 10:03 pm | प्रियाली
यापुढे तुमच्याशी वाद घालताना आवर्जून तुम्हाला पुष्पगुच्छ दिला जाईल. ;)
चित्र images.free-extras.com/pics वरून साभार.
25 Sep 2011 - 11:56 am | क्राईममास्तर गोगो
गांधीगीरी काम करते हो. आमच्या सोसायटीच्या आवारात मध्यंतरी तीन दिवसांसाठी मोबाईल लायब्ररीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सोसायटीत वाचकांची यावक जावक वाढलेली. पहिल्याच दिवशी चार पाच महाग पुस्तके गायब झाली. दुसर्या दिवशीही तेच. हा पुस्तक चोर कोण हेच कळेना. मग आम्ही तिसर्या दिवशी बोर्ड लावला आणि त्यापुढे अगदी महागातली पुस्तके मांडली आणि बोर्डावर लिहिले की "फुकटात पुस्तके चोरायची असतील इथून घ्यावीत." आणि नेहेमीप्रमाणे दिवसभराच्या कामात व्यस्त झालो.
दिवसाअखेर एकही महागडं पुस्तक चोरीला गेलं नाही. त्याऊलट चोरी गेलेली सगळी पुस्तकं त्याच स्टॉल वर सापडली.
ह्याला म्हणतात "मनाची लाज".
25 Sep 2011 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> उदा - तुमची बायको एखाद्या किरकोळ कारणावरून तुमच्याशी अतोनात भांडली, खूपच आक्रस्ताळेपणाने वागली तर भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का ?
अजिबात नाही.
>>>>का तुमच्या कृतीमधून तिची चूक जाणवून देता?
करेक्ट.
बाकी, पूर्वी माझं भांडण झाल्यावर मी तुला माहेरी सोडून येईन. मला तुझी काही गरज नाही असे म्हणायचो. परंतु वयोमानाचा प्रभाव म्हणा किंवा पोरं आता मोठी व्हायला लागली म्हणा, किंवा मला ही जर सोडून गेली तर माझं कसं होईल असा विचार येऊन म्हणा. वाढत्या वर्षांचा लेखाजोगा घेतल्यावर तुलनेत असं लक्षात येतंय की हल्ली मी फार नमतं घेतोय, असं माझं मलाच वाटायला लागलं आहे.
-दिलीप बिरुटे
(प्रामाणिक)
25 Sep 2011 - 12:29 pm | विजुभाऊ
मिसळपावर चित्रे देताना ती जर अंतर्जालावरून घेतली असतील तर त्याचा तसा उहापोह करावा ही सन्माननीय सदस्याना विनंती.
25 Sep 2011 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपावर चित्रे देताना ती जर अंतर्जालावरून घेतली असतील तर त्याचा तसा उहापोह करावा ही सन्माननीय सदस्याना विनंती.
सहमत आहे.
(विजुभौ, तुमच्या सुचनेमुळे कुठे भांडण सुरु झालं तर मी माझा प्रतिसाद काढून टाकीन हं. उगाच कटकट नको. )
-दिलीप बिरुटे
27 Sep 2011 - 12:23 am | प्रियाली
विजूं*च्या सहीतील चित्र हे फडणीसांचे आहे. ते लावताना फडणीस यांची परवानगी विजूंनी घेतली होती का? ते स्वतः चुकीचे वागतात आणि वर दुसर्यांना यंव-त्यंव करा सांगतात आणि तुम्ही त्यांची बाजू घेता. ज्यांची बाजू घेता त्यांची बाजू घेणे योग्य आहे का याचा तरी व्यक्तिगत हेव्यातून बाहेर येऊन विचार करा. आपण संपादक ना? आपण आपण ज्यांना अनुमोदन दिलेत ते राजरोस दुसर्याचे कॉपीराइटेड मटेरिअल आपल्या सहीत लावत आहेत.
* सदर व्यक्ती भाऊ म्हणण्याच्या लायकीचे मला वाटत नाहीत. त्यांचा लोचटपणा उबग आणणारा आहे. माझा कोणताही भाऊ असा असू नये अशीच प्रार्थना आहे.
27 Sep 2011 - 12:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा घ्या पुरावा. प्रख्यात कलाकार शि. द. फडणीस यांच्या संस्थळाचा स्क्रीनशॉट.

संपादक आणि ज्येष्ठ म्हणवणार्या सदस्यांकडून जबाबदारीची अपेक्षा असते, पण आधी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे असं असलंच पाहिजे असं नव्हे.
सदर चित्र फेसबुकाच्या सर्व्हरवर आहे, तुमच्याकडे फेसबुकबंदी असल्यास चित्र दिसणार नाही.
27 Sep 2011 - 12:49 am | धनंजय
याला थोडा इतिहास असावा.
मागे विजुभाऊ यांनी दिलेल्या एका पाककृतीच्या बाबतीत मी विनंती केली होती -- की त्या लेखात दिलेले चित्र दुसरीकडून कुठून तरी चिकटवले होते, त्याची तळटीप द्यावी. त्यावेळी मी आणखी एका-दोघांना ही सूचना केली होती. आजकाल या बाबीकडे मी फारसा लक्ष देत नाही. (खरे तर मिसळपावावरच्या व्हॉल्यूमपैकी थोडाच भाग वाचायला मला आजकाल सवड मिळते. या मुद्द्याबाबत प्राथमिकता त्यामुळे कमी झाली आहे.)
मात्र मिसळपावाच्या मुखपृष्ठावरील चित्रांबाबत अशी सूचना मी कधी केली नाही, हे विजुभाऊ यांच्या लक्षात आले. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक सदस्याबाबत अशी सूचना करत नाही, हे विजुभाऊ यांच्या लक्षात आले आहे. हा पक्षपात म्हणा, किंवा "त्यांच्याच लेखाच्या बाबतीत कुठे गेला समजूतदारपणा" याबाबत त्यांना वाईट वाटते आहे, अपमान वाटतो आहे.
याची जाणीव करून द्यावी, म्हणून विजुभाऊ अधूनमधून असा निर्देश करत असावेत.
या ठिकाणी ते खरोखरीच ऋणनिर्देशाचा सल्ला देत नसून, त्यांचेही मत बहुधा असेच आहे की प्रत्येक ठिकाणी ऋणनिर्देश करणे सोयीस्कर नसते. त्यांना ऋणनिर्देश देण्याबाबत आग्रह करणार्यांच्या विसंगतीकडे बोट दाखवत आहेत. (असे मला वाटते.)
(माझ्या हिशोबाने माझ्या वागण्यातली विसंगती फारशी त्रासदायक नाही. समजुतदारपणा त्यांच्याच बाबतीत नाहिसा झाला नव्हता. त्या वेळी त्यांच्याशी प्रतिसादांना धार या कारणासाठी नव्हती की चुकून ऋणनिर्देश राहिला होता. नजरचुका तर सर्वच जण करतात. माझ्या टीकेला धार या कारणाकरिता होती, की ऋणनिर्देश न करण्याचे सैद्धांतिक समर्थन त्यांच्यासह काही लोक करीत होते. त्यामुळे पक्षपाताबाबत त्यांची माफी वगैरे मागण्यास मी उद्युक्त झालेलो नाही.)
27 Sep 2011 - 1:10 am | प्रियाली
हा केवळ तुमच्या पक्षपाताकडे निर्देश नसून एखाद्याला त्रास देण्याचा प्रकार आहे. हे या चित्राबाबत नाही तर इतरत्र अनेक ठिकाणी होते, झाले आहे. विजू हा प्रकार गेली ३ वर्षे करत आहेत. इतरत्र याला Stalking असे म्हणतात.
25 Sep 2011 - 5:38 pm | प्रियाली
अरेरे विजुभाऊ! किती लोचटासारखं मागे लागायचं. कंटाळा येतो तुमचा. डिसगस्टींग!!
असो. चित्र देताना एलटी असा पर्याय असतो त्यात योग्य खुलासा केलेला होता. कल्जी नसावी! चित्रावरून माऊस फिरवल्यावर तो दिसतो. परंतु काही अडाण्यांना ते कळणार नाही हे लक्षात आल्याने पुन्हा एकवार खाली खुलासा केला आहे.
काही तथाकथित संपादक यामुळे खूश होतील असे मानते.
27 Sep 2011 - 12:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि काही सर्वसाधारण प्रश्नः
किती वेळा तोच तोच गूळ काढत फिरायचं? दुर्लक्ष केलं होतं हे पण अगदी लिहून दाखवलंच पाहिजे का? आणि हो, जुने-पाने, लक्तरं निघालेले किती धागे वर काढायचे यावर मनाची बाळगण्याचा विचार होणार आहे काय?
बौद्धीक चर्चांचं वावडं आहे म्हणून हा असला लोचट प्रकार किती दिवस खपवून घेतला जाणार आहे?
27 Sep 2011 - 12:19 am | श्रावण मोडक
मालक, सांभाळा. तुमच्या सहीत दिसणारं चित्र शि. द. फडणिसांचं आहे. तुम्ही त्यांच्याकडून घेतलं आहे का? आंतरजालावर हे चित्र आहे. त्यांचं संकेतस्थळ आहे. तेथे उपलब्ध आहे. त्या संकेतस्थळावर सर्वत्र कॉपीराईट्सचा उल्लेख आहे.
इथं ते पहायला मिळेल. मला इथं चिकटवता येत नाहीये.
25 Sep 2011 - 12:53 pm | वेताळ
बायको भांडली तर तिला प्रेमाने समजवण्यापेक्षा तिला बदडणे योग्य आहे असे लेखिकेला सुचवायचे आहे कि काय?
25 Sep 2011 - 1:13 pm | शाहरुख
जर लेखिकेला असेच सुचवायचे असेल तर, 'बायको' ऐवजी 'जोडीदार' (स्पाऊज ला मराठी शब्द ?) अपेक्षित असेल. अर्थात लेखिका खुलासा करेलच.
बाकी, एका गालावर थप्पड बसल्यास दुसरा पुढे करावा हे तत्व गांधीबाबाचे आहे असे जे मला लोकांकडून ऐका/वाचायला मिळते ते खरे आहे काय ? काही संदर्भ ??
25 Sep 2011 - 8:30 pm | पैसा
हे सुप्रसिद्ध वाक्य बायबलमधले आहे हो!
Matthew 5:39 But I tell you, Do not resist an evil person. If someone strikes you on the right cheek, turn to him the other also.
25 Sep 2011 - 8:42 pm | शाहरुख
धन्यवाद.
27 Sep 2011 - 8:56 pm | विकास
या संदर्भात मला मुक्ताबाईच्या खालील काही ओळी सांगाव्याशा वाटताहेत.
...
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥
विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥
अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥
ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥
एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥
शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥
एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥
इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥
त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥
आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥
आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
...
ब्रह्म जैसें तैशा परी । आम्हा वडील भूतें सारी ॥
अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥
जीभ दातांनी चाविली । कोणें बत्तीशी तोडीली? ॥
मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
....
अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥
शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥
कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥
तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
--------------------------------
जगताना वापरायचे कुठलेही तत्व हे कायमस्वरूपी आणि आंधळेपणाने वापरू नये असे वाटते. काही वेळा या दुर्लक्ष करण्याच्या असतात तर काही वेळा या सुनावण्याच्या असतात.
वर मुक्ताबाईचे काव्य देण्याचे कारण: ज्ञानेश्वर जेंव्हा समाजाकडून होणार्या छळाला खूपच त्रासले आणि मनाची कवाडे बंद करून बसले तेंव्हा त्यांच्या धाकट्या बहीणीने सुनावलेला हा उपदेश आहे, हे माहीत आपल्या सगळ्यांना असतेच. मनाची कवाडे त्राग्याने बंद करणे काय अथवा समोरच्याशी (नको तेंव्हा) दोन हात करणे काय... यातील कुठलाही चॉईस ज्ञानेश्वरांनी केला असता तर आपल्याला ज्ञानेश्वर आज कदाचीत माहीत झाले नसते.
असो.
डिसक्लेमरः वरील ओळी या मी, "तुमची बायको एखाद्या किरकोळ कारणावरून तुमच्याशी अतोनात भांडली, खूपच आक्रस्ताळेपणाने वागली तर भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का? का तुमच्या कृतीमधून तिची चूक जाणवून देता?" या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात दिलेल्या नाहीत. ;)