बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही
सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?
तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ
माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?
वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला
ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?
सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला
वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?
प्रतिक्रिया
20 Sep 2011 - 3:11 pm | नितिन थत्ते
काय धनाजीराव? प्रवास जास्त झाला वाटतं ! ;)
20 Sep 2011 - 3:15 pm | प्रचेतस
खपल्या गेलो आहे.
_/\_
धनाजीराव, आमचा दंडवत घ्यावा.
20 Sep 2011 - 3:21 pm | अन्या दातार
कविता प्रवासानंतर सुचली की प्रवासादरम्यान??
20 Sep 2011 - 3:48 pm | धन्या
प्रवासामध्ये झालेली सामानावरची चर्चा, कालचा आयटमला काय म्हणता वाला धागा, आणि मी ऐकत असलेली शिंदे बंधूंची अजरामर गीते अशा सार्यांचा एकत्रित परीणाम होऊन ही कविता सुचली.
22 Sep 2011 - 11:08 pm | मालोजीराव
_/\_ कमाल केलीत धनाजीराव
'कामावर जायला ....रिक्षावाला' आणि 'तुझा झगा ग' याच्या मुस्कटात मारणारं गीत आहे......चाल बिल लावली कि नाइ अजून ?
20 Sep 2011 - 3:24 pm | स्पा
हा हा हा हा हा
20 Sep 2011 - 3:35 pm | किसन शिंदे
:D :D :D
20 Sep 2011 - 5:37 pm | मी-सौरभ
फक्कड काव्य जमलयं..... ;)
कधी? कुठे?? या परीस काय सुचलं हे म्हत्वाच...
20 Sep 2011 - 5:43 pm | सुहास झेले
हा हा हा ... फुटलो :D :D :D
20 Sep 2011 - 5:53 pm | राजेश घासकडवी
फक्कड कविता.
बाजूच्या ज्ञानेश्वर तुकारामांना काढून टाकावं या सूचनेवर विचार करतोय.
(पळा आता, नाहीतर ओव्यांची फोडणी मिळतेय...)
20 Sep 2011 - 5:57 pm | स्वानन्द
तुकारामांचा फोटो ठेवता येईल बहुतेक..
20 Sep 2011 - 6:24 pm | धन्या
तुकाराम अध्यात्माच्या मार्गाला लागण्याच्या आधी वाण-सामानाचे व्यापारी होते.
20 Sep 2011 - 6:03 pm | सूड
+१
20 Sep 2011 - 6:32 pm | धमाल मुलगा
आजपासून तुमचं नाव 'धनाजी शिंदे' :D
-(रेतीवाला) ध.
20 Sep 2011 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा
:-D मेलो मेलो मेलो .... वाचवा वाचवा वाचवा... कामाक्षीप्रीय काममय कामोत्तम कामोत्सुक कामेश्वर मि.धनाजी राव वाकडे...यांस :bigsmile: हसुन हसुन अडव तिडव पडून गडबडा लोळून ...नंतर प्रत्येक कडव्यातल्या दुसय्रा ओळी साठी ;-) शिर सा-ष्टांग नमस्कार....
आज आंम्ही हसुन हसुन मरणार,आणी वरती गेल्यावर तिथुन धनाजी रावांवर पुष्पाचा वर्षाव करणार... ''पुष्पाचा''--आरं तिच्यायला अनुस्वार ह्रायला की राव ;-) स्वारी हो.. पुष्पांचा ...अता अनेकवचन..बोंबल्लं...आज काही कुठल्याही वाक्याचा सरळ अर्थ लागायचा योग दिसत नाहीये .... धनाजी राव,तुमचा रोग आमाला झाला हो...
@-आजपासून तुमचं नाव 'धनाजी शिंदे' ... :-D ध मु शी +१०००००००००००००००००००००००००००००० टक्के सहमत
अवांतर- या कवितेसाठी,,,पुनर्भेटीत आमच्या कडुन तुंम्हाला येक ''खटाक'' लव्हें-डर अत्तर भेट देण्याचे याच धाग्यावर ठरवीत आहे... कुठं भेटायचं?त्ये तुंम्ही सांगा... :-)
21 Sep 2011 - 1:14 am | Nile
भटजीबुवा भलतेच रंगेल दिसतां हां!! ;-)
21 Sep 2011 - 2:14 am | पाषाणभेद
चांगलेच दिवे लावतात.
जबरा काव्य धनाजी वाकडे
:-) :-)
21 Sep 2011 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा
@---दोन तीन दिवसांपासून पाहतोय!
तुंम्ही मला फारच निरखुन पहाताय.... ;-)
आरश्यात पाहिल्या सारखं वाटत असेल नाइ....(ल्या) ....... :-p
अवांतर-या खेळांचा कंटाळा आल्यावर लोक करतात पूजापाठ
आमी बी तिकड कंटाळलो,की फोडतो कदीकदी इश्काचा माठ :-D
20 Sep 2011 - 7:47 pm | बिपिन कार्यकर्ते
भां** बा***!!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
21 Sep 2011 - 1:13 am | Nile
हे काव्य चांगलं हाताळलंय! लै भारी हो धनाजीराव.. तुकारामाचे अभंग पाठ करायला सांगितले होते त्याचा फायदा झालेला दिसतो! ;-) चालूंदे चालूंदे, आराधना चालूंदे!
19 Jan 2013 - 8:15 pm | पप्पु अंकल
खरोखरच
21 Sep 2011 - 7:40 am | ५० फक्त
मिपा पुन्हा मुळ चांगल्या रुपात येताना बघुन बरं वाटलं.
21 Sep 2011 - 9:09 am | ऋषिकेश
=)) =)) =))
21 Sep 2011 - 11:57 am | चित्रगुप्त
श्री श्री श्री १०८ धनाजीस्वामी चाळेकुन्द्रीकर महाराज यांस
शिरसाष्टांग दंडवत.
स्वित्झर्लंड मधील अतिरम्य दरीत एक नवीन वात्स्यायनपुरी नामक नगरी उभारण्यात येत आहे. जगभरातील अगदी खास व्यक्तींनाच हिचे नागरिकत्व देण्यात येत आहे.
या नगरीत आपला आश्रम उभारून अन्य नागरिकांना प्रेरणाप्रद मार्गदर्शन द्यावे, म्हणून विशेष आमंत्रण पत्र आपणास लवकरच पाठवण्यात येत आहे.
आपण स्वीकार कराल अशी आशा आहे.
21 Sep 2011 - 12:11 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो त्यांना कसले आमंत्रण देताय... त्यांचेच आहे ते प्रोजेक्ट म्हणे! ;)
चाळेकुंद्रीकर : =))
21 Sep 2011 - 12:52 pm | धन्या
बिपिनरावांनी वस्तूस्थितीवर प्रकाश टाकलाच आहे. आमच्या स्वप्नातल्या त्या प्रोजेक्टचं काम चालू असतानाच आम्हाला अचानक भारतात यावं लागलं. लोकांना आसनं शिकवण्याचं महान कार्य सोडून देऊन आमच्या कामदेवबाबांना देशाला भ्रष्टाचामुक्त सरकार दयायचे डोहाळे लागले. त्यामुळे यावं लागलं.
असो. आता मेनका सावंत त्यांच्याकडे जातीने लक्ष देत असल्यामुळे ल्वकरच आम्ही स्वितझरलंडात येत आहोत "रुद्र्पुजा" करण्यासाठी. तेव्हा भेटूच.
आपलाच,
श्री श्री श्री १०८ धनाजीस्वामी चाळेकुन्द्रीकर महाराज
कामकोटी पीठ
21 Sep 2011 - 1:07 pm | शैलेन्द्र
आय्य्चा घो... जाम फुटलो... वाइट्ट बेक्कार..
आनंद शिंदेसारख रेकुन म्हणायचा प्रयत्न चालु आहे..
21 Sep 2011 - 1:38 pm | दिपक
:)
21 Sep 2011 - 3:00 pm | नगरीनिरंजन
वाकडे, वाकडे, वाकडे,
कमाल केलीत तुम्ही! आज ह.भ.प. दादामहाराज कोंडके असते तर त्यांनी तुमच्यासाठी 'माझं सामान तुझी पिशवी' नावाचा चित्रपट काढून तुमच्या सामानाला ग्लॅमरस पिशवी देऊन तुमच्या मेहनतीचं 'चीज' केलं असतं!
असो.
गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी सामानातून सांडलवंड होऊन पिशवी ओली होण्याबद्दल एकही अवाक्षर न काढल्याबद्दल निषेध! कविमनाच्या माणसाने असं दुसर्याच्या पिशवीबद्दल बेफिकीर असणं शोभत नाही!
21 Sep 2011 - 3:59 pm | शैलेन्द्र
"गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी सामानातून सांडलवंड होऊन पिशवी ओली होण्याबद्दल एकही अवाक्षर न काढल्याबद्दल निषेध! कविमनाच्या माणसाने असं दुसर्याच्या पिशवीबद्दल बेफिकीर असणं शोभत नाही!"
तेल नी तुप, दुध नी दही, मावामिठाई घेतली काहीबाही,
मधीच सांडायची धास्तीच ग, तु पिशवी धुवुन मागशिल का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?
बघा जमतय तरं
21 Sep 2011 - 5:15 pm | धन्या
मस्त जमवलंय...
आमचा वारसा चालवणारं कुणीतरी आहे. जसा शिंदे बंधूंचा वारसा आम्ही चालवत आहोत तसा आमचा वारसा तुम्ही चालवाल याची आम्हाला खात्री आहे. ;)
22 Sep 2011 - 3:15 pm | शैलेन्द्र
वारसाच काय हो... अजुनही बरच चालवतो आम्ही..
(बारश्यावाला) शैलेन्द्र
21 Sep 2011 - 9:22 pm | प्रभो
खतरी आहे!!
22 Sep 2011 - 10:52 pm | मेघवेडा
आरारा! बेक्कार!
=)) =)) =))
23 Sep 2011 - 4:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बेक्कार
28 Sep 2011 - 8:37 pm | अप्पा जोगळेकर
हसून पुरेवाट झाली आहे. कमाल आहे धनाजीराव .
1 Oct 2011 - 5:47 pm | मी-सौरभ
ह्या धाग्याने पन्नाशी पार न करताच हा जुना झाला?????
हे बरं नाय हां....
धन्या: या कवितेवर गाणं काढणार आहेस त्याचं काय पुढे???
त्यात हीरो म्हणून वप्याला घे असं सुचवतो...
1 Oct 2011 - 7:32 pm | धन्या
उत्तम सल्ला दिला आहे तुम्ही. सध्या चित्रीकरण सुरेख व्हावे यासाठी युटयुबवरील "वाट माझी बघतोय रीक्षावाला" या गीताच्या चित्रफीतीचा अभ्यास सुरु आहे. तो झाला की लगेच सखूच्या शोधाला लागू. हीरोच्या भुमिकेत तुम्ही म्हणताय तसा वप्या आहेच. :)
2 Oct 2011 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
हीरोच्या भुमिकेत तुम्ही म्हणताय तसा वप्या आहेच. ---आईईई....गं !काय हे ...?म्हणजे तुमचं काम काय नक्की यात? सखू अणी वप्याचं मनोमिलन? की त्या दोघांच्या मधे येणारा व्हिलन....? ;-)
2 Oct 2011 - 1:01 am | धन्या
आम्ही दिग्ददर्शक. आणि वप्या पडदयावर दिसणार आहे. आणि पडद्यावर दिसतं ते खरं नसतं. पडद्यामागे जे घडतं ते मात्र खरं असतं. तुम्ही सुज्ञ आहातच. बाकी सांगणे न लगे. ;)
2 Oct 2011 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा
@-आणि पडद्यावर दिसतं ते खरं नसतं. पडद्यामागे जे घडतं ते मात्र खरं असतं.... म्हंणजे तुम्ही अभिषेक बच्चन आणी वप्या विवेक ओबेरॉय असच ना? ;-)
6 Mar 2012 - 6:40 pm | वपाडाव
शराब छलक गइ तो क्या हुआ, लोग तो यही कहेंगे ना के प्याले को छुके निकली है !!!
6 Mar 2012 - 11:22 pm | धन्या
खुप दिवसांनी वर आला हा धागा.
हे महान काव्य मीच लिहिलेलं असूनही वाचून बेक्कार हसतोय राव.. तेव्हा नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे मी हे काव्य प्रसवलो याचा विचार करतोय. :)
7 Mar 2012 - 12:40 am | अत्रुप्त आत्मा
@तेव्हा नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे मी हे काव्य प्रसवलो याचा विचार करतोय. >>> ते अत्ता नै कळनार...! पुन्हा तसं झाल्यावरच कळेल...! ;-)
30 Aug 2022 - 2:49 pm | विजुभाऊ
तेच म्हणतो
7 Mar 2012 - 11:19 am | मी-सौरभ
काही गप्पांवर विश्वास ठेवला तर...
धन्या: बिग ब आणि वप्या: अभिषेक ब
अशीही जोडी जमवता येइल.
7 Mar 2012 - 12:30 pm | धन्या
बाकी काहीही म्हणा, ब नका म्हणू राव. ब म्हटलं की लोक अनिवाशी, आम्रिकावाले, तिकडचे असा उद्धार करतात. ;)
7 Mar 2012 - 6:30 pm | शैलेन्द्र
हहहहाआआ
हा धागा बघुन मला माझा धागा आठवला आणी तिथे ब वर्गातल्या लोकांशी झालेला वाद आठवला.. मजेदार..
7 Mar 2012 - 6:46 pm | मी-सौरभ
माझ्या वरील प्रतिक्रियेतील ब म्हणजे बच्चन बरं का.
उगाच माझा 'ब' कसा काय वापरला असा वाद करु नये ;)
6 Mar 2012 - 11:36 pm | रेशा
हा हा हा हा
भारी
19 Jan 2013 - 9:57 am | मोदक
मा. धनाजीराव वाकडे,
तुमच्या सखूने आम्हास (कवीतेची) प्रेरणा देवून मिपाच्या काव्यविभागाची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही आपले आणि आपल्या सखूचे तहेदिलसे आभारी आहोत. :-))
बरोब्बर आपल्या चरणकमलावरून चालणारा.
मोदक.
19 Jan 2013 - 11:32 am | धन्या
कसचं कसं.
एक मात्र नक्की की हे काव्य आम्ही बहुतेक आमच्या मेंदूत काहीतरी "हार्मोनल इम्बॅलन्स" वगैरे होऊन आम्ही ट्रान्समध्ये गेल्यावर जन्माला आलेलं आहे.
कारण त्यानंतर अशा पद्धतीच्या कविता लिहिण्याचा गेले वर्षभ प्रयत्न करत आहोत, त्यासाठी अखंड ज्ञानसाधनाही* करत आहोत. परंतू शब्द साथ दयायला तयार नाहीत. असो.
* या क्षेत्रातील दोन नामवंतांची "तशी" अठरा वीस गाणी आहेत. त्या गाण्यांचं खुप वेळा पारायण करणे.
19 Jan 2013 - 11:33 am | प्रचेतस
>>>या क्षेत्रातील दोन नामवंतांची "तशी" अठरा वीस गाणी आहेत. त्या गाण्यांचं खुप वेळा पारायण करणे.
आपल्या एका सभ्य मित्राला मात्र तशी गाणी असभ्य वाटतात म्हणे.
19 Jan 2013 - 11:41 am | धन्या
त्यावर पुन्हा कधीतरी. सध्या नको. कालपासून जो धुरळा उडतोय तोच खाली बसू दया आधी. :)
19 Jan 2013 - 5:01 pm | ५० फक्त
ध्रुरळा का खाली बसु द्या, अहो गर्दी में गुड सस्ता ही म्हण माहित नाही का तुम्हाला ?
20 Jan 2013 - 5:11 pm | मोदक
आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत, ही नवीनच माहिती कळाली. :-D
लोककलांचा वारसा चालवणार्या शिंदेंना असभ्य म्हणणार्या आपल्या मित्राचे नाव कळवता का?
21 Jan 2013 - 12:31 am | धन्या
असं म्हणणं हे आपल्या (म्हणजे तुमच्या आणि आमच्या) त्या सभ्य मित्राचा अपमान आहे.
कर्मधर्मसंयोगाने आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) ते मित्रही शिंदेच आहेत. ;)
21 Jan 2013 - 9:05 am | नाखु
जरा सभ्यतेची (?) व्याख्या/परिमाण ठोकताळे सांगितले तर बरे होईल म्हणजे आम्ही सभ्य (च) आहोत का/सभ्य (च)लोकांच्या कट्ट्याला जातो का हे कळेल्..तुमच्याकडे अचूक माहिती नसली तर तसे जरूर कळवा म्हणजे मोदकांना सा़कडे घालू ( तुम्हाला चालेल ना)
निरागस (नाद खुळा)
21 Jan 2013 - 9:55 pm | धन्या
तुम्ही मोदकरावांनाच विचारा कसें. हल्ली ते खुपच फॉर्मात आहेत. आमच्या टुकार कवितेचे अतिटुकार विडंबन पाडूनही ते खोर्याने प्रतिसाद ओढत आहेत.
आमच्या या प्रतिसादात कुणाला ज़ळजळ दिसली तर तो आमचा दोष नाही.
22 Jan 2013 - 1:52 am | मोदक
ह्म्म..
21 Jan 2013 - 9:43 pm | जेनी...
काका हि कवितापण चान चान .
21 Jan 2013 - 9:49 pm | धन्या
काका लोकांच्या लेखनाला फाटयावर मारण्याच्या दिवसांमध्ये चक्क तू माझ्या कवितेला चान चान म्हटलंस. खुप बरं वाटलं बाळा. मी ही तुझ्या कवितेला असंच चान चान म्हणेन हां.
ते कुणीतरी म्हटलंच आहे ना, एकमेकां साहाय्य करु, अवघे भरु अकाऊंट !
21 Jan 2013 - 10:15 pm | जेनी...
अय्या काका पण मी कविता लिवितच नै !
तुमी लिवलेली एकदम चान हं काका :)
तुमी मला बा़ळा म्हणलात ... केवडं भरुन आलं म्हनुन सांगु ...
काका तुमी कुप चान आहात :)
:D
21 Jan 2013 - 10:28 pm | इनिगोय
लब्बाड, "मी आता कविता लिवितच नै!" किंवा "मी अशा कविता लिवितच नै!" असं म्हणायचंय काय तुला?
21 Jan 2013 - 10:41 pm | जेनी...
इश्श्य ... कित्ती कित्ती मनकवडीयेगं तु :)
तु पण कुप कुप चान आहेस हं इनो तै ;)
21 Jan 2013 - 11:24 pm | पैसा
कित्ती कित्ती शाणी ती! हा घे तुला पुस्प्गूच!
21 Jan 2013 - 11:31 pm | जेनी...
अय्या सासुबैनी फष्ट टैम मला इतका सुंदर पूस्प्गुच दिलाय :)
वाकुन नमस्कार करते हं सासुबै !
:D
21 Jan 2013 - 11:32 pm | पैसा
पाय ओढून पाडशील नक्की!
21 Jan 2013 - 11:37 pm | अभ्या..
हे तुम्हाला लै आधी सांगितलं होतं खरडफळ्यावर. ;)
21 Jan 2013 - 11:39 pm | जेनी...
=))
आयडीया भारीये :) पण मला झेपेल का वजन तुमचं सासुबै ?? :(
आणि तरी झेपलच न तुमी पडलाच तर शेवा मलाच करावी लागेल :-/
आमचे हे पण रागवतिल बै माझ्याव :-/
कायबी चालेल पण ह्यांचा रुसवा नको बै :-/
सो पाडायचा इचार केंसल
:P
22 Jan 2013 - 12:18 am | धन्या
माझ्या धाग्याचा सिंहगड रोड झाला. :(
22 Jan 2013 - 4:43 am | जेनी...
=))
वाइस कळ काढाय तयार असलाव त तुमास्नी गडाव पोचवायची तयारी हाय ;)
झेपन का??? =)) ( प्रवास बर्का :D)
22 Jan 2013 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा
बालिका...कोण गं तुझे हे??? नाव घे नां.....!!!!! =))
21 Jan 2013 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा
@एकमेकां साहाय्य करु, अवघे भरु अकाऊंट !
8 Oct 2013 - 11:38 am | ब़जरबट्टू
आयला, फुटलो राव, कशी सुटली नजरेतुन..
मस्तच सखू.. :)) :)) :))
10 Oct 2013 - 10:48 am | सुमीत भातखंडे
हा हा हा...सॉलीड
10 Oct 2013 - 3:01 pm | अद्द्या
=)) =)) =)) =))
10 Oct 2013 - 3:40 pm | मदनबाण
हॅहॅहॅ...
असाच एक जुना धागा आठवला ! ;)
तुझी घागर नळाला लाव...
17 Jan 2015 - 11:07 pm | टवाळ कार्टा
भन्नाट
मिपावरच्या "अश्या" खजिन्याची रत्ने कोणी एकत्र करुन लिंका ठेवल्या आहेत का कुठे? ;)
19 Jan 2015 - 2:05 pm | मदनबाण
हा धगा वरती आला... आणि काही दिवसांपूर्वीच ऐकलेल गाणं आठवलं बघा !
शिटी वाजली... गाडी सुटली... अन पदर गेला वर... पोरी जपुन दांडा धर !
बाकी हल्लीच कानावर पडलेलं गाणं सहीत देत आहे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)
19 Jan 2015 - 2:21 pm | बॅटमॅन
या विषयाचा तुमचा व्यासंग दांडगा असावा. तरी 'वाट तुझी बघतोय रिक्षावाला' या मुग्ध कवितेची पूर्ण संहिता कुठे मिळाल्यास हवी आहे. आगाऊच धन्यवाद.
19 Jan 2015 - 2:29 pm | मदनबाण
कसला व्यासंग ? आम्हाला फकस्त "रस ग्रहण" करण्याचच सुचतं बघा ! ;)
तरी 'वाट तुझी बघतोय रिक्षावाला' या मुग्ध कवितेची पूर्ण संहिता कुठे मिळाल्यास हवी आहे.
ही घ्या :- http://marathisongs.netbhet.com/2014/02/rikhawala.html
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)
19 Jan 2015 - 2:32 pm | बॅटमॅन
हा हा हा, बहुत धन्यवाद!
15 Jul 2015 - 9:25 pm | जडभरत
धन्य धनाजीराव!!!
फुल टैमपास!!!
मस्तच
9 Feb 2017 - 1:40 pm | अद्द्या
ऑफिस मध्ये असलेले फुकटचे नेट आणि नसलेले काम ..
याचा रिजल्ट म्हणजे हि कविता खोदून काढणे ..
आणि येड्या सारखा एकटाच हसणे
9 Feb 2017 - 2:27 pm | सूड
+१
9 Feb 2017 - 3:48 pm | जेपी
हे राम .!
घरी जाऊन आधी आंघोळ करतो..
13 Aug 2018 - 11:19 am | खटपट्या
या गाण्यावरुन आनंद शिंदे यांचे "एका हातानं साडी वर करा, दुसर्या हातात सामान धरा" हे महाकाव्य आठवलं
30 Aug 2022 - 10:01 pm | कर्नलतपस्वी
काय सांगू काका......
सामानानं पिशवी माह्यी
अदुगरच भरलेली हाय
तुह्या सामाना करता
जागा उरलेली नाय
आसलं तुहं सामान भारी
पण जागा तुही चुकली
लई उशीर केलासा
काका....तुही संधी हुकली.....
मस्त काव्य....
लईच,
31 Aug 2022 - 3:24 am | शाम भागवत
वळचणीला गेललं पाणि एकदम जाग्यावर आणलत बघा.
:)