.

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
25 Oct 2007 - 12:12 am

.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

धनंजय's picture

25 Oct 2007 - 12:32 am | धनंजय

अरेच्चा, इकडचा गत-आत्मा-दिन आपल्या पितृपक्षाच्या इतक्या लगेच पाठोपाठ येतो हे माझ्या आधी कधी लक्षात आले नव्हते!

सर्वांचा ऑल-हॅलोज-डे असाच "भयं"कर मजेचा जावो!

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 2:38 am | प्रियाली

अरेच्चा, इकडचा गत-आत्मा-दिन आपल्या पितृपक्षाच्या इतक्या लगेच पाठोपाठ येतो हे माझ्या आधी कधी लक्षात आले नव्हते!

अलबत!

आम्ही अंधारश्रद्धाळू. पितृपक्ष आणि हॅलोवीन असे दोन्ही मुहूर्त चुकवत नाही. ;-)

प्राजु's picture

25 Oct 2007 - 1:18 am | प्राजु

काऊंट ड्रॅन्क्युला... सह्हि!
हॅलोविनच्या हार्दिक शुभेच्छा..!

- प्राजु.

गुंडोपंत's picture

25 Oct 2007 - 3:10 am | गुंडोपंत

मला कधी रेड वाइन हवी झाली तर येईन तुमच्याकडे सरळ.!!!
:))))
आपला
गुंडोपंत

जुना अभिजित's picture

25 Oct 2007 - 11:03 am | जुना अभिजित

एकदम कॅचिंग आहे लेख.

नकटा रावळ अभिजित

बेसनलाडू's picture

25 Oct 2007 - 7:20 am | बेसनलाडू

मिळाला.
(स्टोकरप्रेमी)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

25 Oct 2007 - 8:13 am | विसोबा खेचर

बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराचं वारंही सुटलं होतं. खिडकीच्या फटीतून आत शिरू पाहणारा वारा घुबडासारखे घुत्कार करत होता. संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत. बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. खिडकीबाहेरची ओकीबोकी झाडं भुंडे हात पसरून डोलत होती. वार्‍यावर उडून हवेत फेर धरणारी सुकी पानं मध्येच खिडकीच्या तावदानाला स्पर्श करून जात होती. फायर प्लेस मधल्या जळणार्‍या लाकडांचा एक मंद, जळकट वास घरात पसरला होता.

वरील वर्णन अतिशय आवडलं! ग्लेनफिडिचचे घुटके घेण्याकरता अगदी योग्य वातावरण... :)

"काऊंट ड्रन्क्युला!," असे म्हणून साहेब गोड हसले व वळून चालू पडले.

कथा बाकी मस्तच! वाचायला मजा आली...

आपला,
तात्या ड्रन्क्युला!

कोलबेर's picture

25 Oct 2007 - 8:46 am | कोलबेर

वातावरण निर्मिती सहीच..

ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? भयकथांचा अभ्यास कच्चा असल्याने "सगळ्यांना कळते आपल्यालाच कळत नाही" अशी अवस्था झाली असली तरी चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह निर्लज्जपणे दाखवतो आहे :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2007 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही दिवसापासून तुमचे लेखनाचे स्वरुप कथेचे असले की, आम्ही डचकत डचकत वाचू लागलो आहोत. वातावरण निर्मितीच्या तुमचे कसबाचे काय वर्णन करु.


ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? भयकथांचा अभ्यास कच्चा असल्याने "सगळ्यांना कळते आपल्यालाच कळत नाही" अशी अवस्था झाली असली तरी चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह निर्लज्जपणे दाखवतो

आम्हाला तर दोन्हीही कळले नाही ! त्यामुळे शेवटी आनंद घेता आला नाही.अर्थात आपण त्याचाही खूलासा कराल याबद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही.

आपला.
जे कळले नाही ते प्रामाणिकपणे विचारणारा !
प्रा.डॉ.

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 3:20 pm | प्रियाली

ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ?

काउंट ड्रॅक्युला कळण्यासाठी स्टोकरचे ड्रॅक्युला किंवा कोणताही सरळसोट ड्रॅक्युला चित्रपट पाहावा लागेल. ड्रंक्युलाचा अर्थ सांगायला नकोच. ;-)

वर गोष्टीत म्हटल्याप्रमाणे ड्रॅक्युला हा पूर्व युरोपातील सरदार घराण्यातील होता ज्यांना काउंट असे संबोधले जाते. अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Count

सर,

तुम्हालाही कोलबेरप्रमाणेच करावे लागेल. ड्रॅक्युलाची आख्यायिका माहित असल्याखेरिज गोष्टीचा अर्थ लागणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2007 - 3:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाच प्रश्न आम्ही सहजरावांनाही विचारला आणि आपणही त्याचे उत्तर दिलेच आहे.
पण, दोघांचेही उत्तरे वाचून फारच थोडे समजले , आता तर अधिकच अपराध्यासारखा वाटतंय !

सर,
तुम्हालाही कोलबेरप्रमाणेच करावे लागेल. ड्रॅक्युलाची आख्यायिका माहित असल्याखेरिज गोष्टीचा अर्थ लागणार नाही.

हे मात्र खरेच आहे.

अवांतर :- त्या पेक्षा कथा छान आहे, म्हणून निघून गेलो असतो तर आमचे अज्ञान तरी उघड झाले नसते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 5:08 pm | प्रियाली

त्या पेक्षा कथा छान आहे, म्हणून निघून गेलो असतो तर आमचे अज्ञान तरी उघड झाले नसते !

असं का बॉ? मला वेळ नव्हता म्हणून थोडक्यात लिहिलं. भारतातल्या अनेकांना ड्रॅक्युलाची कथा माहित असेलच असं नाही. त्यात अज्ञान कसलं? :-)

थोडक्यात कथा सांगते.

व्लाड ड्रॅक्युल हा पंधराव्या शतकरीतील ट्रान्सिल्वेनिया (आताचे हंगेरी) भागातील एक क्रूर उमराव (काउंट) होता. शत्रूला हालहाल करून मारणे हा त्याचा छंद होता. (ते हाल लिहून दाखवले तर अन्न जाणार नाही तेव्हा ते नकोच. ;-) ) त्याची दहशत इतकी होती की तो मेल्यावरही तो खराच मेला असे लोकांना वाटत नव्हते. तो भूत बनून किंवा ट्रान्सिल्वेनियन लोकांच्या विश्वासाप्रमाणे व्हॅम्पायर म्हणजे रक्तपिपासू भूत बनून अनंतापर्यंत संचार करतो.

स्टोकरने ही आख्यायिका उचलून एका उत्कृष्ट भयकथेची निर्मिती केली. त्यात काउंट ड्रॅक्युला इंग्लंडात येतो. दिवसा अतिशय अदबशीर, मधाळ बोलणारा, बायकांना भुलवणारा देखणा उमराव आपले बळी हेरतो आणि रात्री वटवाघळाच्या रुपात त्यांच्या घरापर्यंत पोहचून नरडीचा घोट * घेतो. पाश्चात्य जगतात ही कथा इतकी प्रसिद्ध आहे की खर्‍या ड्रॅक्युलाला लोक विसरून ब्रॅम स्टोकरचा कादंबरीतील ड्रॅक्युलाच खरा असल्याचे त्यांना वाटते.

वर फोटोत दाखवलेला बेला लगोसी याला घेऊन १९३१ मध्ये ड्रॅक्युलापट बनला. (आता तो पाहिला तर विनोदी वाटेल पण त्याकाळासाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस होता.) त्यातील ड्रॅक्युलाला पाहून लोकांचा भयंकर थरथराट होत असे. बायका तर बेशुद्ध पडत असे सांगितले जाते.

अवांतरः नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार नेमका मराठीत कसा आला असावा?

>> अवांतरः नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार नेमका मराठीत कसा आला असावा? <<

बहुदा वाघ, सिंह शिकार करतात, तेव्हा त्यांचे सावज / बळी खूप धड्पड करून सुटू पहातात. पण एकदा का वाघ-सिंहांनी त्या सावाजाचं नरडं फोडलं कि ते एकदम गपगार होतात. >:)

ह्यावरून नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार मराठीत आला असावा ...

सहज's picture

25 Oct 2007 - 8:14 am | सहज

हॅपी हॅलोवीन टू द स्केरी क्वीन!!

देवदत्त's picture

25 Oct 2007 - 9:23 am | देवदत्त

कथालेखन छान आहे.
परंतु सुरुवातीपासूनच, का माहित नाही, सर्व एकदम नेहमीसारखे होते असे वाटले.
बहुधा भूलनगरी चा प्रभाव अजूनही आहे माझ्यावर. :)

अवांतरः
इंग्रजी BUT HOWEVER प्रमाणे पण परंतु ह्यात फरक आहे ना? माझा परंतु, HOWEVER प्रमाणे घ्यावा.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2007 - 11:43 am | स्वाती दिनेश

नेहमीप्रमाणेच छान भयकथा! आणि "भयोत्सव" ची आठवण हॅलोविनचे वातावरण तयार व्हायला लागल्यापासूनच झाली होती त्यामुळे प्रियालीकडून अशा काहीतरी लेख/गोष्टीची वाटच पाहत होते ,:)
स्वाती

चित्रा's picture

25 Oct 2007 - 4:32 pm | चित्रा

वातावरण निर्मिती खास.

मितभाषी's picture

19 Jul 2010 - 4:03 pm | मितभाषी

ड्रॅक्युला!
सही!!!

विनायक प्रभू's picture

19 Jul 2010 - 4:47 pm | विनायक प्रभू

=D>