थोडी जास्तच झाली असावी. चार की पाच आठवत नव्हतं.पाय कापसाचे झाले होते. मी व्हीटी स्टेशनच्या बाहेर बस स्टॉपवर जेमतेम उभा होतो. समोर व्होडाफोनची जाहिरात चमकत होती. टॅक्सी की बस कन्फ्युज् झालो होतो. दमणच्या एअरपोर्ट वर कसं जायचं आठवत नव्हतं.मला व्होडाफोनचा राग आला .दूर हो या यार. तुमचा लोगो मेलेल्या जंतासारखा दिसतो. मी दुसरी जाहिरात बघीन.वा. वा. पार्ले... पण पार्ले तुम्ही सुद्धा फसवता. बिस्कीट आत्महत्या कपात करतं पण तुम्ही मऊच बिस्कीट बनवा.जाऊ दे.टॅक्सी....टॅक्सी इधर आव. दमण एअरपोर्ट चलो.. फास्ट चलो. विमान उडनेवाला है. टॅक्सीवाला झूम्झूम निघाला. दमण एअरपोर्ट. दारात आलो. टॅक्सीवाला हलकट पैसे न घेता फुर्रकन पळाला. इमिग्रेशन काउंटरला चक्क बाई होती. माधुरी ओह माधुरी..पासपोर्ट वर शिका मारला. आय लव्ह यू.. वा. वा.. हाउ रॉमँटीक.. पाठीमागून कोणीतरी कॉलर पकडली..बाप रे बायको. तीच्या हातात चाबूक होता.. ए .. इधर आव. पासपोर्ट काढून घेतला. दहा फटके.. बादमे जाव..
माझ्या आयुष्याचा कोंडवाडा केलास आता पळतोस काय..पाच फटके.. तू असताना मी विधवा ... पाच फटके. ..मी पळणारच होतो.. समोरून टॅक्सीवाला आडवा आला. साक्षात विरकर हाहाहाहा..त्याच्या हातात जॅक होता. आता तुझी गाडी डीमर्यावर भटा... परत मागे वळलो तर सासरे उभे .त्यांच्या हातात चिमटा मोठा लोखंडी चिमटा... तयासारखे भोगणे प्राप्त झाले असं म्हणून त्यांनी माझ्या जांघेत चिमटा खुपसला..ज्जाळ नुस्ता ज्जाळ.. आग लागली....
-------------------------------------------------------------------
बाळकृष्ण जोशी.. जोशी ... जोशी साब .
उठ लवकर .आ कर. हां आ कर . शाबाश. डोळे उघड.
परत जाळ उठला. झपकन फोकस आला. हॉस्पीटलचा बेड. हाताला ड्रीप.. एक दोन .. एक दोन...
स्साला तुमी पोलीस लोक केटला मारते.. यानी काय केला .. मर्डर के रेप
शांती ..... आरे, हा शॉक मधी गेला तर तुमी काय बोलते ते ३०२ अने ३०४..
मी पूर्ण जागा झालो . वेदना डल झाल्या . समोर एक कोट घातलेला डॉक्टर उभा होता.माझ्याकडे बघून म्हणाला
दवा दिला तुला मी. ..तुम्ही जंटलमन ... कसा काम करते..
खोदाके वास्ते विरकर मी सांगते ते प्रॉमीस लिव तू..आगळा टाईम मी नाय त्रीट करणार..
-------------------------------------------------------------------
-परत डोळ्यावर गुंगी आली.एकेक चित्र पुन्हा समोर यायला लागलं.
बँक ऑफ क्रेडीट अँड कॉमर्स . वेल. यु वेर सिनीयर मॅनेजर क्रेडीट, सॉरी , जंटलमन वी वाँट टो बी बिगर बँक ..पण आमची बीसीसीआय नाही ..साधी कॉऑपरेटीव आहे...परवडणार नाही आम्हाला..छे ..पगाराचा प्रश्न नाही....स्टाफचं मोराल जपावं लागतं ..तशी तुम्हाला पैशाची कमी नसावी.. तुमची बँक बुडलीच आहे.
आत बाहेर येत जात राहीलो रात्रभर.उजळणी सात दिवसाची चुकीच्या क्रमात येत होती. अलट पलट. अलट पलट.
-------------------------------------------------------------------------------------------------
विरकर जागचा उठून उभा राहीला.
आईये सर. इब्राहीम मुल्ला .
सर, आपको कौन नही पहचानता. मै विरकर. आयो. इस केसका.
महाडीक जोशीला आणा.
ये साब कौन है?
ये मेरा पीए. पिल्ले. एफ.आय. आर. इसने लिखा था. यस. ही होल्ड्स माय पॉवर ऑफ
ऍटर्नी...
पिल्ले आप इधर बैठीये.
विरकर आप जरा मेरा स्टेटमेंट लेकर ..
ऑफकोर्स..
मी समोर उभा राहिलो.
आप इनको पहचानते है? दोघांनीही नकार दिला.
इसके खातेमे आया था आपका दस लाख रुपया. ये है मास्तर माइंड. जबतक ये प्रोडुस करता वो शेट्टीको तबतक..महाडीक त्या रां..विरकर थांबला, त्या मिसेस शेट्टीचे फोटो दाखवा त्यांना..
बँक रेकॉर्ड मधले फोटो महाडीकनी दाखवले.पिळ्ले उठून उभा झाला.
ये चोर ..माय गॉड..
क्या हुआ पिल्ले.
सर यही है वो मोबाईल चोर्.
पिळ्ले विरकर कडे वळून म्हणाला
साब ये लडकी हमारे ऑफीस मे आयी थी. मेरा मोबाईल चोरके गयी मैने कंप्लेंट लिखाया था कोलाबा पोलीस स्टेशनमे. मै कॉपी देता हूं कल.
और क्या लेके गयी थी? और क्या? विरकर चा आवाज बदलला. पिळ्ले कडे रोखून बघत म्हणाला
याद करो . करना पडेगा.
आता त्यानी लेटरहेडची कॉपी समोर टाकली.
ये साईन तुम्हारा नही है? ये लेटरहेड तुम्हारा नही है? इसमे लिखा है ये दस लाख रुपाया जमा करो मिसेस शेट्टीके खातेमें.
पाच मिनीटे गोंधळ. एकाच वेळी मुल्ला. विरकर , पिळ्ले एकमेकांन अकाहीतरी सांगत होते.विरकनी आता पिळ्ले ला बाजूला घेतले.
मेरेको बता कौन है ये शेट्टी तेरी .. बोल ..
तेरेको क्या लगा कंप्लेंट लिखके काम निकल जायेगा तेरा.
पिल्ले थरथरा कापायला लागला. मुल्लासाहेब शांत बसून होते.
आय विल नॉट इंटरफिअर बट नो थर्ड डीग्री विरकर
मै तबतक ये जंटलमन से बात करूंगा.
माझ्याकडे बोट दाखवत त्यानी विचारलं.
महाडीक या मादर... जोशीला तीन नंबर मधे घेउन जा साहेब येतील .
तुम्ही बाहेर थांबा
-----------------------------------------------------------------------
इब्राहीम मुल्ला साधारण साठीचे असावेत. वर्षानुवर्ष भोगलेली मिरासदारी चेहेर्यावर दिसत होती. लाल गुलाबी चेहेरा .परफेक्ट कट चे कपडे. हातात एक सॉलीटेर. साधारण चार कॅरटचा. ब्राउन गुस्सी शूज. एक बेफिकीरी.यशाची कायम खात्री.दहा मिनीटात ते मूळ विषयाकडे आले.
तुमने चोरी की है तो पैसा वापस दो. अगर नही तो पैसा मै भरूंगा.
आप को मालूम होना चाहीये ये एस्क्रो अकांउंट का पैसा है. अगले हप्ते वैती चिटणीस का डीमांड आयेगा. हमारे फर्म के इज्जत पचास -साठ लाखमे नही बिकेगी.पैसा मिला तो मै कुछ कर सकता हूं.
मैने अभीतक होम मे बात नही किया है.
एक बार बात करू तो ...आपको मालूम नही...
इथे त्याचा फ्लो तोडायचा मी ठरवलं.
तो क्या होगा ? परेशानी? वो तो पहलेही हो गयी है?
थर्ड डीग्री आपके पीए को नही .
मुझे क्यू?
वो भी तो चोर हो सकता है. शायद उसने और मैने मिलकर ..
नही डिक्रा.. नॉट दॅट इझी.. यु कांट प्रोव्होक मी.
म्हातारा अचानक खुषीत आला.
वो लडकी तुम्हारी पार्टनर थी.
तूम मार खाओगे. उसको बचाओगे.
मुझे मालूम है. चार दिन बाद तुम जाओगे जेसीमे. बादमे विरकर भी तुम्हारा दोस्त बनेगा. आज वो आयो है. चार दिन बाद नही. मुझे पैसा चाहिये अगर है तो.मै वखत ...
आता मला परत बोलायला चान्स मिळाला.
दस लाख मेरे खातेमे आया. मैने ये कब कहा की मै नही जानता मनोरमा को.
कैसे जानते हो?
एक एमेलेम मिटींग मे मिली थी. चार महीने पहले. मै पैसोके तंगी मे था. डर्बी नजदीक आयी थी. मेरे खातेमे आया पैसा मैने खर्चा किया.
बीस दिअन यही बात समझा रहा हूं मै.
मै समझ रहा था मनोरमा को मै उल्लू बना रहा हूं.सी गँबलर आय मे बी. बुट नॉट थीफ.
यू मिन तूम पैस लौटाना चाहते हो?
जितना मेरे खाते मे आया .
बाकी का साठ लाख?
मेरे खातेमे नही आया था वो? अनिल सिंग और संदीप बहल . उनके खातेमे गया था वो.मै नही पहचानता उनको.
येस . आय मे बाय द स्टोरी.
लेकीन तुम्हारा आयो मानेगा . ?
आयो आपका है. आप कंप्लेनंट हो मै नही.
एक लांब श्वास घेऊन तो खाली बसला.
ठिक है.
अगर दस लाख आया तो ..?
नो ...नो..... धिस विल नॉट वर्क.
धिस विल. मी डोळ्याल डोळे भिडवत सांगीतलं.
कैसे? मी दहा मिनीटं बोलत होतो. इब्राहीम मुल्ला मन लावून ऐकत होता.
लेकीन एक शर्त है. मी दम खायला थांबलो.
ये कुछ भी डिस्क्लोज नही होगा जुम्मेरात तक.
वादा है.
खोदा के वास्ते दगा नही.
जब रुपया मिलेगा तब आप का वकील आयेगा.
ठिक है?
ठिक है.
इससे अपना फायदा क्या होगा . मिश्रा विचारत होता.
देख मिश्रा अपने अकांउंट मे पैसा आया ये बँकींग ट्रँझेक्शन है.अब ये गलत है फिर भी एंट्री रिवर्सीबल है.मेहेताका आया हुआ पैसा जमा कर दे वो खातेमे.
दो अलग अलग केस बनती है.
साठ लाख से अपना कोई वास्ता नही बनता.
दस लाख बँक मे गये मेहेता केस के बाहर्.लेकीन थोडा ड्रामा जरूरी है. विरकर नही मानेगा इस बात को.
मेहेता छूट जायेगा लेकिन संदिप और अनील सिंग जबतक नही आते तबतक अपना बेल नही होगा.
अपना फायदा बादमे होगा .
-------------------------------------------------------------------
पिळ्ले चं स्टेटमेंट संपत आलं होतं. त्याला विरकरनी एकेक बारीक प्रश्न विचारला.
दस लाख का चेक लेने बँका प्यून आया था?
यस सर.
बँक से फोन आया था?
यस सर.
फिर बादमे पचास लाख का चेक लेने भी बँकका प्यून आया था?
यस सर.
मेरेको एक बात बता तुमने बँकमे फोन किया था?
नो सर.
तो बँकवालेको कैसा पता चलता है की तुम्हारे पास चेक तयार है?
जो दस लाख का चेक लेके गया वो प्यून पचास लाख का चेक लेके गया था?
यस सर्.तो पिळ्ले अब ये बताव बँकवालेको कैसा पता चलता है के तुम्हारा चेक तयार है?
मै दलाल को फोनकरता हूं. इसमे भी दलाल?
यस सर्.कौन है बे ये दलाल.पिळ्लेचे धाबे दणाणले.बुला ले उसको .ये तो मालूम पडे.तेरा और उसका क्या चल रहा है?
क्या नाम है उसका. बोल भाई जल्दी बोल.विरकरला धागेदोरे सापडल्यासारखं वाटत होतं
बोरकर ? ठीक है कल बुला ले उसको तू.
बहोत दलाली जमा हो गयी है तेरे पास.
होम मे कौन है रे तेरा? बहोत फोन आ रहे थे उनके. उसको भी बता देता हूं तेरे दलाली का चक्कर .अगले टाईम सोचेगा फोन करनेसे पहले.
मुल्ला साहेबाला हे सगळं नविन होतं .पिल्ले चपापला.तपासकामाची दिशा बरोबर असल्याची विरकरची खात्री होत आली .
-------------------------------------------------------------------
मुल्लासाहेब जाताना विरकरला म्हणाले
"वेल , ऑफीसर ऑल दी बेस्ट."
म्हातार्याची पाठ वळल्यावर विरकरनी पिळ्लेला ऐकू जाईल अशी शिवी दिली."सिनीअर सगळे हरामी. आरोपीशी हे डायरेक्ट बोलणार. आयो पेक्षा हे मोठ्या लवड्याचे."
"भटा काय डील झालं रे त्याच्यासोबत?"
"तो म्हणाला आज पिळ्ले नाही सुटला तर तो मला इस्टेटीचा वारस बनवेल.फक्त बाई कुठे ते सांग?"
पिळ्ले सकट सगळे हसले. पण पिळ्ले जास्तच हसला.
विरकरनी त्याला विचारलं
" क्या रे ..बहोत हस रहा है ..."
पिळ्ले म्हणाला
" मराठी नही आता लेकीन इतनाही समझा ....फक द बाई किधर है...."
चार टेबल सोडून प्रधान च्या नाकातून चहा बाहेर आला .
----------------------------------------------
स्साला, हसत हसत मारतो विरकर,
प्रधान म्हणाला.
हो ना . मी म्हणालो. मला टायपींग येत हे कळल्यानंतर प्रधानचा मी टायपीस्ट झालो होतो.
मला एक कळत नाही विरकरला यात अजून कमाई कशी झाली नाही.
म्हणजे कशी केली नाही असं विचारा ना.
प्रधान खुदकन हसला.
स्साला मी विसरतोच तू दोन नम्बरचा आरोपी आहेस.भटा किती दिलेस रे तू?
देण्यासारखा पुरावा कुठे आहे त्याच्याकडे अजून.
प्रधान परत विचारात पडला.
माझ्याकडे ही केस येणार होती पण आमचा एसीपी नविन आहे ना. डायरेक्ट आला आहे. विरकर त्याचा ट्रेनर होता ना. प्रोबेशनला.एकसुस्कारा.
योग्य ती संधी आली होती.
समजा तुमच्याकडे केस आली तर ...? प्रधान माझ्याकडे बघत राहीला.
म्हणजे विरकरला प्रमोशन मिळतय का ?आजकाल तुम्ही त्याला जवळचे.
मी हसलो. तसं नाही. पण ..
तू माग ते देतो.
मला काही नको . मी सांगतो तेव्हढं करा.
काय करू बोल.?मी आरोपी आहे हे तो विसरला होता.
विवेक जाळण्याची ताकद मत्सरात असते.
दोन कामं कराल?
सांग.
बस एव्हढंच.
हो आत्त्तातरी.
चलो डन.
-------------------------------------------------------------------
हिल रोडच्या गल्लीत त्या इमारतीच्या खाली उभं राहून तो विचार करत होता. करावा का खर्च? वासना जिंकली. दुसर्या मजल्यावर दरवाजा ढकलून आत गेला.थंडावा. सुगंध. आणि समोर स्पागेटी टॉपमध्ये एक मुलगी. एक वयस्कर दांडगा मिड-डे वाचत होता.आओ. ओळख पटली होती.
आज क्या?
डार्क रूम .येस. वॉटर बेड?
येस,
अंदर जाव.वॉश लेना. कपडा रख्खा है .पहन लेना. मोबाईल इधर. पाच जमा करो. बादमे हिसाब.
बरंच ऐकलं होतं पण पैसे जमतच नव्हते.आज किकबॅक मिळाला होता. आजच.कपडे बदलून तो उभा होता. स्पागेटी आत आली. चलो. हात धरून धरून ती त्याला रूमच्या दरवाजापर्यंत घेऊन गेली.
दरवाजा स्टूडीओच्या दरवाज्यासारखा जाडजूड होता. आत मोठा बेड . भिंती काळ्या. दरवाजा बंद. आत बाहेरचा आवाज पण येत नव्हता. हिस्स करून दरवाजा बंद झाला आणि काळोखात रूम बुडून गेली. एसी वाढला. भिंतीवर छतावर चांदण्या चमकायला लागल्या. तो बेडवर आडवा झाला. एक भिती वाटत होती. पण एका ओळखीचा सुगंध आला. सोबत ती आल्याचं कळलं.
मै हू स्वीटहार्ट.
हात हातात आला. त्याचे कपडे कधी दूर झाले ते त्याला कळलं नाही. दोघामधलं अंतर दूर झालं.
पुढची पंधरा मिनीटं अवयवांचा चाळा.
आता तो लीडर झाला. संकोच संपला. हे त्याचं हक्काचं ठिकाण होतं. इथे तोच राजा होता. ही दासी त्याच्या मर्जीची. उष्ण ओले हूंकार. अधीर होउन त्याच्या घशातून विचीत्र आवाज यायला लागले होते.
वॉटरबेड वर होडीत बसल्याचा भास होत होता. लाटांची गती वाढत होती.
म्युजीक? ....हां ..
ना जाने कोई .. कैसी ये जिंदगानी..
हमारी अधूरी कहानी..
आंखोमे कैसी नमी है .. आ आ हा
भिगी राते .. भिगी भिगी बाते कैसी मुलाकाते...आ आ..आ
नंतर श्वापदांच्या चित्कारानी चारी बाजू कसकसल्या.
लाईट ..हां
बेडच्या तळाशी एलीडी लँप .मून लाईट.
पुन्हा एक धसमुसळी खेळी .ती स्फुंदायला लागली. आ .. आ..हा..
मूनलाईट मध्ये तिच्या अंगाचे वळण वळण चमकत होते. अंगाला चमकी लावली होती. कुठे कुठे जांभळा रंग..दूर बेल वाजली.. तो मोकळा झाला .
फिर एक बार .. ती थांबायला तयार नव्हती.
मैने सिर्फ...ओठावर बोट .. मै दूंगी..... परत नवी खेळी तो परत जिंकला. या खेळाचा तो राजा होता . ती एक दासी
अब बस. हां...डार्लींग अब लाईट...
एका क्षणात तिनी त्याला आणि त्यानी तिला ओळखलं.
तू...उसळून त्यानी हात गालावर चालवला..अंगठी लागली असावी, ओठ फाटला.. चोर साली.. दुसरी झापड .तिनी पायाला घट्ट मिठी मारली ...परत हात उगारला.. डाव्या स्तनावर रक्ताचा ओघळ..
ये मैने क्या किया.. सॉरी...लेकीन तू चोर है...
हा चोर हू.. फिरसे मारो एक तमाचा जोरसे.. मारो ना
तो भानावर आला...
त्याच राज्य संपलं होतं...
मैने क्या किया ये..
कुछ नही ...मारो ना एक जोरसे.....तिनी हात धरून परत विनवलं
...ओके..
हा खेळ त्याला आवडला...एक वार परत .ओठातून परत रक्त...
अब ले लो मुझे...ले लो ना..... अंधार ..आता रंगत आली ..
निघताना त्यानी तिला वचन दिलं तो रोज येणार..
चोरीची शिक्षा द्यायला..
रोज येणार ..रोज रोज ....रोज...नवा खेळ
-------------------------------------------------------------
आत बोरकर बसला होता. रेड्डी आणि त्याचा वकील. तारीक , नार्वेकर ...दलाल मंडळी चुळबुळत बसली होती.मला परत बोलावलं विरकरनी. मला पाह्यल्यावर मंडळी उठून उभी राहिली. विरकर नी एकेकाला बोलावलं.
इनको पहचानते है.
हा सर. इनके साथ दस साल काम किया हू. ये बँकोकी लिस्ट. फोन करीये ना. कन्फर्मेशन मिल जायेगा.--रेड्डी
साहेबांना ओळखत नाही असं कोण आहे आमच्या मार्केटमध्ये, हो सर , पिळ्लेला ओळखतो. किकबॅक सगळेच घेतात. तो पण घेतो. आम्ही पण देतो.मी ऑफर केली होती पिळ्लेच्या डिपॉजिटची. साहेबांनी नाकारलं होतं.---बोरकरचं स्टेटमेंट.
नार्वेकर , तारीक सगळ्यांची एकसारखी स्टेटमेंट.विरकरनी सगळ्यांना हाकलून दिलं.
भटा , तुझ्याविरुद्ध पुरावा तूच देऊ शकतोस.पण एकदा सांग कसं केलं मॅनेज?
मी माझी स्टोरी रिपीट केली.मनोरमाच्या खात्यातून पैसे माझ्या खात्यात आले. मी खर्च केले.मेहेता कोण मी ओळखत नाही. होय.मिश्रा माझा माणूस आहे. पण त्यात काय? नोकरीतून सुटल्यावर तो काय काय करतो ते मला माहिती नाही.
विरकरचा पेशंस संपला. ठिक आहे. पुरावा मिळेपर्यंत रिमांड मागीन असं म्हणून एसीपी कडे गेला.मला दोन महत्वाची कामं करायची होती. मेहेताला मी खूण केली.सांबळ मेहेता. माधुरीके साथ विरकर बुधवारको दमण जायेगा. तू बिबिको इधर बुला ले.दुसरा काम. तेरे पोंडा से मेरी बात करा.बुधवारकोही पोंडा इधर आना चाहिये.माधुरीला फोन करणं आता फार जरूरीचं झालं होतं. मी प्रधानच्या कानाशी लागलो.मोबाईल घेतला. माझं सिम कार्ड घातलं
"माधुरी दमणमेही टाइमपास करना. वो मेहेताके बिबिके घर नही जाना चाहिये. तू समझ रही है ना?"
"बुधवार रातकोही लेट वापस आना.
"दुसरी बात दस लाखका एक डीडी बनाके बुधवारको किसीके हाथो भिजवा देना.
पोंडा बुधवारको मेरे पास आयेगा.
दोनो काम तेरे हातमे है...ये समझ की मेरी जान तेरे हातमे है.
विनीता का फोन आया था क्या?"
विनीताचा फोन बंद.माझ्या मनात संशयाचे ढग जमायला लागले होते.प्यादी घर सोडून पळायला लागली की समजावं खेळात अनोळखी भिडू घुसलाय.पण कोण.?
साठ लाखाचा घोळ काही सुटेना.
एव्हढ्यात विरकर आनंदात नाचत आला. बहल आणि अनील सिंग चा बेल ऍप्लीकेशन सेशननी फेटाळला होता.रात्रीपर्यंत दोघंही जमा होणार होते. मला जरा बरं वाटलं .मला कळेल तरी अनोळखी भिडू कोण आहे पटावर्.बहल आणि अनील नक्की नाही. दोघंही मिश्रासारखे पंटर होते. त्यांचा खेळिया कोण?
----------------------------------------------------------------
(जवळ जवळ सगळ्यांची स्टेटमेंट घेऊन झाली होती. शनीवार आला होता. सोमवार रजा होती. मंगळवारी विरकर हायकोर्टात साक्षीसाठी जाणार होता. बुधवारी माधुरी बरोबर दमण. दिवसातून चारवेळा एकमेकांना फोन.छान चाललं होतं प्रकरण.मला एकच टेंशन माधुरी त्याला दमणला किती दमवेल ते महत्वाचं.दमला तर मेहेताकडे न जाता परत येईल. तसं नाही झालं तरी काय करायचं हे माहिती होतं. फक्त चार दिवस वाट बघणं महत्वाचं होतं.)
----------------------------------------------
एसीपी समोर मला उभं केलं विरकरनी.
अनिल बर्वे. आयपीएस. त्यांनी फाईल वाचली. एकदा मला विचारलं.
डू यू प्लिड गिल्टी?
नो सर.
ठिक आहे.
विरकर दीज व्हाइट कॉलर क्रिमीनल . आय हेट देम. आता हा माणूस तुम्हाला काय वाटतं ? खरं बोलतोय?सात दिवस झाले तुम्हाला खेळवतोय.मनोरमा शेट्टी अस्तित्वात नाही. धिस बास्टर्ड इज जस्ट फूलिंग.सात दिवसाचा रिमांड वाढवून घ्या. हवं तर जनरल ब्रँचचा आयो मदतीला घ्या.पुरावे जमवा.बट नेल धिस बास्टर्ड.
या आता.
विरकरचा मूड गेला. तेव्हढ्यात माधुरीचा फोन.
पंछी बन मे पिया पिया गाने लगा.
प्रधानकडे वळून त्यानी सांगीतलं सर, मी बुधवारी दमणला जातोय. या भटाला बाहेर काढून टायपींग करून घ्याल का?
स्टेशन डायरीला एंट्री मारली का साहेब?
हो तर. तसं काही असलं तरं साहेबांकडून परवानगी घ्या.
ओके सर. प्रधान म्हणाला.
हा, आणि मेमो साईन करून जातोय. हवालदाराला सांगा आरोपींना कोर्टात हजर करायला.
-------------------------------------------------------------
बुधवारी विरकर दमणला गेला आणि मेहेताची बायको ऑफिसमध्ये हजर.आता मला प्रधानची आवश्यकता होती. प्रधाननी साहेबांची परवानगी घेऊन स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतलं.तिला एक कॉपी दिली. पोंडा कॉपी घेऊन गेला.दुपारी आलेला ड्राफ्ट त्याच्या हवाली करून
मी माझ्या खात्यात जमा करायला सांगीतला.
आता एकच काम बाकी होतं.प्रधान साहेब तुम्ही उद्याची रजा टाका. दिवसभर मोबाईल बंद ठेवा. संध्याकाळी चार वाजता चालू करा. नशिबानी साथ दिली तर ही केस तुमची.प्रधानला तेव्हढं पुरेसं होतं.
ती रात्र मला झोप नव्हती. मेहेता , मिश्रा दोघही तर्क चालवत होते. मी बोलत नाही म्हटल्यावर दोघही झोपले.
------------------------------------------------------------------------
अकरा वाजता कोर्ट बसलं तेव्हा विरकर धावत पळत आला. मी निश्वास सोडला. डायरेक्ट आला. फायली आणि आरोपी सकाळपासून कोर्टात हजर.
पिपिनी (सरकारी वकील) रिमांड वाढवून देण्याची विनंती केली. पोंडानी हरकत घेतली.
मला विचारलं वकील कुठे आहे? मी स्वताच बोलायची परवानगी मागीतली.
कोर्टानी विनंती मान्य केली.
सर, पैशाची चोरी एकाच ठिकाणी दोनदा झाली असं सरकारतर्फे सांगीतलं जातं. माझं म्हणणं असं आहे की मी कबूल आहे की माझ्या खात्यात पैसे आले. पण मी हे कधीच म्हटलं नाही की मी ते जमा करणार नाही.मला पैसे जमा करायची संधी द्यावी. साठ लाखाचा अपहार मी नाही केलेला. दुसर्या आरोपीना आज जमा केलं आहे त्यांनी शपथेवर सांगीतलं आहे की त्यांची माझी ओळख नाही . तरी मला पैसे जमा करायची संधी दिल्यावर दोन्ही खटले वेगवेगळे चालवावेत.
तुम्ही आज हे सांगताय ते आयोला सांगीतलं होतं का?
मला संधी मिळाली असती तर सांगीतलं असतं.आयोनी या दिशेनी विचार केला नसावा.
विरकर गोंधळात पडला. हे असं होईल याचा विचार केला नव्हता.
पण अनुभव कामास आला. त्यानी मान्य केलं की रिकव्हरीला त्याची काहीच हरकत नाही.
पोंडाला चान्स मिळाला. त्यानी युक्तीवाद केला की जर रिकव्हरी होत असेल तर त्याच्या अशिलाला जामिनावर मोकळं करावं.
विरकर ऑब्जेक्शन घेउ शकला नाही पण अजूनही स्टेटमेंट रेकॉर्ड करणं बाकी आहे हा मुद्दा त्यानी उपस्थीत केला.
पोंडानी आयोला प्रश्न विचारण्याची परवानगी मागीतली.
होळंबे साहेब नाराज झाले. ही वेळ क्रॉस करण्याची नाही.तरीपण थोडक्यात काय ते विचारा असं म्हटल्यावर पोंडा म्हणाला
सर,माझ्या अशिलानी मला सांगीतल की त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही काल वापीला जाणार होतात त्याचं काय?
विरकर कोर्टाला म्हणाला की आरोपीच्या बहिणीला घेउन तो काल वापीला गेला होता परंतू आरोपीची पत्नी हॉस्पीटलमध्ये असल्याचं समजल्यावर ते शक्य झालं नाही.
हे रेकॉर्डवर घेण्याची विनंती पोडानी केली. मान्य झाली.
आता कोर्ट संतापलं "विरकर तुम्ही तुमची फाईल निट वाचता का?"
होय सर..
तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आरोपीची पत्नी बुधवारी स्टेटमेंट रेकॉर्ड करून गेलेली आहे.
पोंडानी कॉपी हातात धरून विरकर समोर नाचवली.
विरकरच्या डोळ्यासमोर काजवे चमकले असावेत.
यानंतर पंधरा मिनीटे पोंडानी विरकरचे वाभाडे काढले.
विरकरसाहेब तुम्ही आरोपीच्या बहिणीसोबत गेलात असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे. पण मला कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की आरोपीला बहिणच नाही तर आपण गेलात ते कुणाबरोबर?
विरकरच्या डोक्यावर बाँब फुटला.
आपण स्टेशन डायरी ला एंट्री केली असेलच असं म्हणेपर्यंत तो मटकन खाली बसला होता. पिपिनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला पण
तोपर्यंत डँमेज हाताबाहेर गेलं होतं
कोर्टात एकच गोंधळ. कोर्टानी पोंडा आणि विरकरला चेंबरमध्ये बोलावलं.
पंधरा मिनीटानी कोर्टानी निर्णय दिला.
मेहेताला पन्नास हजाराच्या बॉंडवर जामीन मंजूर झाला.
मी पासबुक मध्ये दहा लाख जमा केल्याचे दाखवले.मिश्राच्या वकीलाला काही बोलण्याची आवश्यकता पडली नाही.
मला पस्तीस हजाराच्या आणि मिश्राला दहा हजाराच्या जामीनावर सोडण्यात आलं. विरकर कोर्टातून निघून गेला होता.
----------------------------------------------------------------------
मी हलायचा प्रयत्न केला. पोटातून जोरात कळ आली. ये रातको भाग जायेगा तो नही विरकरचा आवाज आला.
ना रे ना कॅथेटर लगा है ना.मला काही कळत नव्हतं.परत परत दमण एअरपोर्ट ...
प्रतिक्रिया
2 Jul 2008 - 11:10 pm | रामदास
पूर्ण कथा. नीलकांतने हे शक्य केले
3 Jul 2008 - 12:02 am | झकासराव
मिसिन्ग आहे का????
कोर्टातला गेम कळाला, प्रधानला सोबत घेवुन केलेला गेम कळाला.
पण सुरवातीचा, मधला आणि शेवटचा इटालिक मधला भाग कळालाच नाही.
वीरकरने दमण एअरपोर्ट वरुन जोशीला पकडून आणल का??
तो होस्पिटलात कसा काय??
पहिला पॅरा वाचुन आधी अस वाटल की वीरकरने काहितरे गेम केलाय.
रामदास काका माझ काहि समजुन घ्यायला चुकत असेल तर सांगा.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
3 Jul 2008 - 12:14 am | भडकमकर मास्तर
हेच म्हणतो...
..
म्हणजे वीरकराने वैतागून जोशीला पिटून काढला काय?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Jul 2008 - 6:49 am | रामदास
मध्ये लिहीलेला सुरुवातीचा भाग जोशीला बडवून विरकर हॉस्पीटलात आणतो.
तिथे फ्लॅशबॅक सात दिवसाचा.
ब्रॉथेलचे वर्णन=पिळ्ले आणि विनीताची भेट.
असे तंत्र वापरून पाह्यले.
फसले का?
3 Jul 2008 - 11:45 am | बिपिन कार्यकर्ते
नाही, नाही, काका तंत्र नाही फसले.... पण हे भाग पाठोपाठ आणि लवकर लवकर आले तर होणारा गोंधळ टळेल. कथा जमतेय फक्कड. ट्वीस्ट मस्त आहे...
प्रत्येक भागाच्या आधी मागच्या भागांची लिंक आणि भाग क्रमांक दिलात तर सुसंगति येईल आणि अजून मजा येईल.
बिपिन.
4 Jul 2008 - 4:48 pm | अनिल हटेला
रामदास जी !!!
सुरुवातीचा भाग जोशीला बडवून विरकर हॉस्पीटलात आणतो.
तिथे फ्लॅशबॅक सात दिवसाचा.
ह्यामुळे समजण्यास मदत झाली....
नाहीतर मेन्दुचा भुगा झाला असता.....
असो...
एक्दम सही बर का........
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
4 Jul 2008 - 6:37 pm | विद्याधर३१
आत्ता कोठे लिंक लागली.
आयला.. वीरकरऐवजी जोश्यावरच गेम झाली के काय?
पण स्पॅघेटी टॉपचे प्रकरण काही उलगडले नाही. .
...विद्याधर
4 Jul 2008 - 9:02 pm | रामदास
पिळ्ले ब्रॉथेल मध्ये जातो.तिथे त्याची भेट होते विनीताशी.विनीताची प्रोफाईल अगोदरच्या भागात आलीच आहे.ती एक कॉलगर्ल आहे.मोबाईलची चोर तीच.पुढे आता कळेलच काय काय होतं ते.
4 Jul 2008 - 6:53 pm | झकासराव
कोर्टातला गेम जब्बरदस्त झाला.
दोन वेगळ्या केस झाल्या आणि जोशीबुवा दहा लाख भरायला तयार आहेत ते देखील चुकुन त्यांच्या खात्यात आलेले. वा!
म्हणजे केस निकालातच निघाल्यासारखी आहे.
परत त्याची आणि माधुरीची ओळख नाही. (अस तो सुरवातीला दाखवण्यात यशस्वी आहे) ती मेहताची बहिण बनुन आली होती. तिने वीरकरला फसवले. आणि वीरकरवर कोर्टात मान खाली घालावी लागली. ह्यात स्पष्टच अस दिसतय की ह्यामागे मेहताचा हात आहे. म्हणजे घंटा मेहताच्या गळ्यात गेली.
ग्रेट गेम. :)
पण तरिही सगळेच जामिनावर सुटले.
मग वीरकरला हे कस कळाल की ह्याच्या मागे मास्टर माइन्ड जोशीच आहे????
मुल्ला आणि जोशी मधला संवाद जरा लक्षात आला नाही. त्या बॅन्केचा आणि मुल्लाचा काय संबंध??
संशयाची सुई पिल्लेकडे वळाली होतीच मग त्याला वीरकरने कसा काय सोडला??
ह्यात जो तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला??
एवढ जरा कळाल नाही.
जे कळाल ते जबराच आहे.
कथेत जबरदस्त पोटेन्शियल आहे. २ तासाचा वेगवान कथानकाचा जबरदस्त चित्रपट तयार होउ शकतो. :)
जुन्या सगळ्या लिन्क इथे एकत्र देणार का? परत वाचुन बघेन म्हणजे एखादा दुवा निसटणार नाही.
अवांतर : वीरकरच्या हाती जोशी सापडला. वाइट वाटल राव. एवढा भारी गेम प्लॅन होता त्याचा.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
4 Jul 2008 - 9:06 pm | रामदास
मुल्ला ला दहा लाखाची रिकव्हरी मिळाली.
त्यानी मोबदल्यात मेहेताच्या बेल ला ऑब्जेक्शन घेतले नाही.
तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला??
त्याचा उलगडा पुढे होईल.
6 Jul 2008 - 1:40 pm | रामदास
http://www.misalpav.com/node/1708
http://www.misalpav.com/node/1724
http://www.misalpav.com/node/1809
http://www.misalpav.com/node/1815
http://www.misalpav.com/node/2015
http://www.misalpav.com/node/2122
http://www.misalpav.com/node/2167
http://www.misalpav.com/node/2314
आता लिंक लागेल.
4 Jul 2008 - 10:01 pm | ऍडीजोशी (not verified)
जामीन मिळून सुटलेल्या जोशी ला विर्कर ने बाहेर पकडले का?
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
4 Jul 2008 - 11:04 pm | रामदास
कसं ते कळेलच पुढच्या भागात.
4 Aug 2008 - 8:08 pm | मिसळ
ह्याचा पुढचा भाग प्रकाशित झाला का? असल्यास कृपया मला लिन्क द्याल का? धन्यवाद.
26 Jul 2019 - 11:56 pm | diggi12
Krupaya puchha bhag liha