गंधासवे श्वास पुलकीत होती..
उरी मोगर्याचे उसासे.. नव्याने!
"आषाढ येईल लवकर तसाही.."
निवळत्या धरेला दिलासे नव्याने!
नको तेच पुन्हा-पुन्हा का दिसावे?
(कशाला जुने दु:ख सलते नव्याने?)
जाणिव नाही कशी जाणिवेला..
अवचित पुन्हा भास होती नव्याने!
पणतीस नाही तमा काळोखाची..
तमाचीच काया उजळते नव्याने!
अरे..कल्पनांचे खुजे विश्व माझे..
शब्दांस स्वरसाज चढती नव्याने
राघव
प्रतिक्रिया
21 Jun 2011 - 8:16 pm | गणेशा
सुंदर गझल...
अवांतर : 'तमाचीच काया' अर्थ कळला नाहि. सांगाल काय ?
22 Jun 2011 - 1:06 pm | शैलेन्द्र
तम.= अंधार..
पणतीच्या प्रकाशाने अंधाराचीच काया परत उजळतेय..
21 Jun 2011 - 9:47 pm | अत्रुप्त आत्मा
मार डाला...शेवटची २ कडवी तर अतीशय सुंदर...
होती रहे शायरी,पढते रहेंगे हम
कभी कभी मिलता है, ऐसा दर्दो गम
21 Jun 2011 - 10:26 pm | अनामिक
पणतीस नाही तमा काळोखाची..
तमाचीच काया उजळते नव्याने!
व्वा! सुंदर गझल. राघव - बर्याच दिवसांनी टाकलीय कविता/ग़झल. अजून येऊ द्यात.
21 Jun 2011 - 10:47 pm | राजेश घासकडवी
एकच अनुभव नव्याने येण्याचे अनेक पैलू छान हाताळले आहेत.
'तमा' वरचा श्लेष आवडला.
अवांतर: कवितेची विडंबनं होणार राव...
'जुन्या दारवेचे नव्या बाटलीतुन
पुन्हा पेग भरले जरासे नव्याने'
वगैरे...
27 Jun 2011 - 8:59 pm | पल्लवी
'तमा' वरचा श्लेष आवडला.
संपुर्ण गझलच जमुन आलीये मस्त लयीत..
आवडली :)
22 Jun 2011 - 12:14 am | प्राजु
काय राघव राव!! बरेच दिसांनी आलासा!! :)
मस्त जमलिये कविता!
22 Jun 2011 - 1:14 pm | शैलेन्द्र
सुंदर गझल..
22 Jun 2011 - 2:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर गझल!!
कोणते वृत्त?
22 Jun 2011 - 6:24 pm | राघव
तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
पण ही गझल नाही.. धाटणी जरी थोडी तशी असली तरीही रूढार्थानं गझल म्हणणे योग्य नाही. :)
बाकी वृत्त वगैरे मला खरोखरच कळत नाहीत. त्यामुळे त्याबद्दल जाणकारच सांगू शकतील.
राघव
22 Jun 2011 - 7:05 pm | क्रान्ति
सुंदर रचना!
23 Jun 2011 - 6:13 pm | दत्ता काळे
फार सुंदर
पणतीस नाही तमा काळोखाची..
तमाचीच काया उजळते नव्याने!
व्वा व्वा
23 Jun 2011 - 6:40 pm | चतुरंग
भासे गजल परि आहे कविता
ओळींमधून मोद देते नव्याने!
-रंगा
24 Jun 2011 - 2:38 pm | राघव
पुनःश्च धन्यवाद! :)
राघव
24 Jun 2011 - 3:58 pm | पद्मश्री चित्रे
खूप दिवसांनी इथे आले, तुमची कविता लगेच वाचली.. छान आहे.. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती गझल नाही आणि मला वाटतं कुठले वृत्त पण नाही . पण छान आहे रचना..