भंगलेल्या मनाचा अभंग ..२

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
10 Jun 2011 - 12:26 am

फव्वारा सुगंधी
लावतो शरिरा
आणि त्याचा तोरा
मिरवितो...

तरी येइ घाम
थांबवू हा कसा..?
किती जरी पुसा
घमघमे..

असे किती लेप
माझ्या मुखावरी
गंध पावडरी
भस्म माझे..

पुटावरी पुटे
सत्यासंगे खोटे
समागमे खाटे
लाज आली....

कविता

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

10 Jun 2011 - 7:57 am | नगरीनिरंजन

पुटावरी पुटे
सत्यासंगे खोटे
समागमे खाटे
लाज आली....

उच्च दर्जाचे आहेत तुमचे अभंग!

धन्या's picture

11 Jun 2011 - 6:40 pm | धन्या

असे किती लेप
माझ्या मुखावरी
गंध पावडरी
भस्म माझे..

या ओळी आजच्या बुवाबाबा बापूमहाराज यांना अचूक लागू होतात.

असो. तुम्ही "मी माझा" वाले चंद्रशेखर गोखले का?

- धनाजीराव वाकडे

पाषाणभेद's picture

12 Jun 2011 - 9:27 am | पाषाणभेद

चन्द्रशेखर गोखले महाराज की जय!