दृष्टीआडच्या बोलण्या-प्रतिसादावरून
त्यांचं खळखळतं व्यक्तिमत्व
एकमेकांच्या गंमतीशीर फिरक्या घेतंय
असंच वाटलं असतं कुणालाही.....................
मात्र,
त्या अवखळामागे दडली होती
त्यांची अव्यक्त संपृक्त संवेदना
आणि
गुदमरलेल्या संवेदनेपाठची
जुळी वेदना..........
अगतिक......हतबल....चंचल........
रिक्तातील कल्पना,.....
अव्याहत,.....
वास्तवातले अपेक्षाभंग तुडवत,
आयुष्याला,
मनस्वी....स्वप्नमय......मुग्धगात्र
करू पहात होत्या................
आवाजातला मधुतम अंदाज
श्वासांतला चिरसंध अश्वास
श्रवणातला हवाहवासा दृढविश्वास
साकारत होता त्यांच्यात
एक
रंजक-रंजित-मयरत-रसाळ-मेघाळ-मधाळ
नीरव-एकांत-शांत-संथ
दुष्यंत सहवास...................
भेटीची ओढ आणि एकरूपतेची उत्प्रेक्षा
हसण्यातून खिदळत असली तरी
वळचणीतला कोमल गंधार
शृतींवरचा त्याचा प्रभाव लपवू शकत नव्हता...............
पलिकडल्या गच्च अंधारात
तरंगत होते
दोघांचेही संसार-संस्कार.........
सोबत,.........
आसक्त-अतृप्त-आतर्क्य-अटळ
जन्मालंकार............................... !!!
.............अज्ञात
प्रतिक्रिया
20 May 2011 - 5:53 am | दत्ता काळे
आशय जरासा कळाला पण सगळे शब्द नाही कळाले.
वळचणीतला कोमल गंधार म्हणजे नक्की काय ते कळाले नाही.
20 May 2011 - 7:04 am | अज्ञातकुल
गंधार म्हणजे सारेगामा मधला "ग" हा स्वर त्याचा खालचा स्वर "रे" कडे झुकला की त्याला "कोमल गंधार" असे म्हणतात. असा लागलेला स्वर (रे,ग,ध,नी हे स्वर कोमल होऊ शकतात) हा मनात हुरहुर/अस्वस्थता निर्माण करतात. वळचणीतला कोमल गंधार म्हणजे "अंतरमनातली हुरहुर"
22 May 2011 - 10:32 am | अरुण मनोहर
श्वासांतला चिरसंध अश्वास