अल्बनी ट्युलीप फेस्टिवल - २०११

लंबूटांग's picture
लंबूटांग in कलादालन
9 May 2011 - 6:55 am

ह्या वर्षी अल्बनी ट्युलिप फेस्टिवलचे ६३ वे वर्ष होते. गेल्यावर्षी पाऊस पडत असल्याने जाता आले नव्हते. ह्या वर्षी मात्र दोन्ही दिवस जाऊन मनसोक्त ट्युलिप्स पाहून घेतले.

थोडा इतिहास. जुलै १, १९४८ साली तत्कालीन मेयर Erastus Corning दुसरा ह्याने city ordinance द्वारे ट्युलिप हे अल्बनीचे अधिकृत फूल म्हणून घोषित केले. इतकेच नव्हे तर नेदरलँडची तत्कालीन राणी Wilhelmina of the Netherlands हिला विनंती केली की एखाद्या ट्युलिपला अल्बनीचे नाव द्यावे. तिनेही ह्या विनंतीला मान देत "Orange Wonder" ह्या ट्युलिपला अल्बनी ट्युलिप असे नाव दिले. ह्या प्रकारची ट्युलिप १८ इंच उंच वाढतात. ही इतरांच्या तुलनेत हळू वाढतात व काहीसे दुर्मिळ असतात.

पहिला ट्युलिप फेस्टिवल मे १४, १९४९ साली झाला होता. आजही परंपरा जपण्यासाठी तशाच प्रकारचे कपडे घालून आदल्या दिवशी रस्ते सफाई केली जाते व दुसऱ्या दिवशी Tulip queen घोषित केली जाते. मी ह्या दोन्ही गोष्टी पाहू शकलो नाही.

काही निवडक फोटो इथे डकवत आहे.




संपूर्ण अल्बम येथे पाहता येईल.

इतिहास विकीवरून घेतलेला आहे.

कलाराहती जागाछायाचित्रण

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

9 May 2011 - 7:54 am | माझीही शॅम्पेन

जबरदस्त फोटोज! इथून जवळच हॉलन्ड (मिशिगन) इथे सुध्डा होत जाता आल नाही त्याच शल्य तोड फार प्रमाणात दूर झाल !!

झकास रे....तुझं फेस्टिव्हलला येण्याचं आमंत्रण होतं पण येता आलं नाही... :(
फोटो छान आहेत...

लई लई भारी फोटो लंबुटांग, मजा केली एकदम जणू, मस्त आणि इतिहास जाणुन तर फारच मस्त वाटलं.

विनायक बेलापुरे's picture

9 May 2011 - 10:39 am | विनायक बेलापुरे

विशेषतः खालून चौथ्या फोटोतील रंगसंगती.

मुलूखावेगळी's picture

9 May 2011 - 10:45 am | मुलूखावेगळी

खुप सुंदर फोटो आहेत
शेअर केल्याबद्दल धन्यवाद हो

२००९ मध्ये आम्ही गेलो होतो अल्बानी ट्युलिप फेस्टीव्हलला. अतिशय सुंदर रंग, आणि तितकेच वेगवेगले पाकळ्यांचे आकार.
मन भरून ट्युलिप्स पाहिली होती.
आठवणी ताज्या झाल्या. :)

शिल्पा ब's picture

10 May 2011 - 12:03 am | शिल्पा ब

सुंदर.

कालच अगदी अस्सेच मस्त मस्त ट्युलिप पाहून आल्याने इनो घ्यावे लागणार नाही म्हणणार होते पण हे अप्रतिम फोटो पाहून घ्यावं लागणार बहुतेक ...

मर्द मराठा's picture

10 May 2011 - 5:53 am | मर्द मराठा

मस्त आलेत ... खालून चौथा आणि पाचवा ... मस्त compose केलाय..

यशोधरा's picture

10 May 2011 - 7:57 am | यशोधरा

सुरेख आलेत फोटो.

मृत्युन्जय's picture

10 May 2011 - 11:18 am | मृत्युन्जय

अशक्य फोटो आहेत. खुपच सुंदर.

सगळेच फोटो एक नंबर आले आहेत. कुठला कॅमेरा?

लंबूटांग's picture

10 May 2011 - 6:39 pm | लंबूटांग

Kodak Z812 IS.

DSLR नाही आहे पण त्यात मॅन्युअल मोड वापरून बर्‍यापैकी प्रयोग करता येतात. सर्व फोटो मॅन्युअल मोड वापरूनच काढलेले आहेत.

पिकासाची लिंक बघितल्यास उजव्या बाजूला बहुतेक सर्व सेटिंग्ज दिसतील.

सर्वसाक्षी's picture

10 May 2011 - 9:45 pm | सर्वसाक्षी

ताजे टवटवीत फोटो! १०-११ विशेष आवडले

शाहरुख's picture

10 May 2011 - 10:28 pm | शाहरुख

झकास फोटो !!

पियुशा's picture

11 May 2011 - 10:50 am | पियुशा

" इतना हसिन नजारा दिखाने के लिये हम आपके त्-हे-दिल से शुक्रगुजार हे" :)