चोरून चोरून, हो ना?

उदय के'सागर's picture
उदय के'सागर in जे न देखे रवी...
4 May 2011 - 8:01 pm

कधी कधी हलकासाच पेपर उचलून
मुद्दाम त्यावरच भाजी चिरून
कधी उगाच रद्दी निट रचून
नि रचेलेली रद्दी मुद्दाम पाडून
       चोरून चोरून तू वाचतेस, हो ना?

कधी धूळीवर, झाड़त असतांना
कधी भांडयांवर, ते घासतांना
काचेवर खिडक्या पुसतांना
तर पानांवर पाणी घालतांना
       चोरून चोरून तू लिहितेस, हो ना ?

कधी ते "तेलकट रंग" भिंतींच्या अडून
कधी त्या "पेंसिल" तिरक्या डोळ्यातुन
कधी ती "पुस्तकं" अरशाच्या नजरेतून
तर कधी "वह्या" फरशिच्या प्रतिबिम्बातुन
       चोरून चोरून तू बघतेस, हो ना?

बापरे! किती गं रोज रोजची तुझी चोरी ही
वाटलं होतं प्रमाणिक कामवाली छोरी ही
चोरी ती चोरीच, शिक्षा हवीच प्रत्येक चोरीला
विचार करतोय अता "शिक्षा" द्यावीच ह्या पोरीला :) ("शिक्षा" = शिक्षण)
       ए! चोरून चोरून हेही ऐकलस, हो ना ? :)

शांतरसकविता

प्रतिक्रिया

रामदास's picture

4 May 2011 - 8:16 pm | रामदास

सर्व शिक्षण अभियानाच्या प्रसारासाठी छान आहे पण प्रचारकी कविता नाही वाटत याचा आनंद वाटला.

गणेशा's picture

4 May 2011 - 8:50 pm | गणेशा

खुप आवडली कविता ..
मस्त एकदम .. किती सुंदर शब्दात छान सांगितले आहे तुम्ही...

असेच लिहित रहा... वाचत आहे...

हा हा मस्त!!! सुंदर विचार.

मुलूखावेगळी's picture

4 May 2011 - 9:37 pm | मुलूखावेगळी

आवडली कविता
पुर्ण वाचल्यावर च कळले तुम्हाला काय सांगायचेय ते.
शिक्षा शब्दावरची कोटी पण मस्त

पाषाणभेद's picture

4 May 2011 - 11:36 pm | पाषाणभेद

अरे चोरा, ती वाचत होती अन तू तिच्याकडे चोरून चोरून पाहत होतास काय? अं? वहिनींना सांगायला लागेल की एवढी कामवाली छोरी काढून टाका अन बाई लावा म्हणून!!
:-)

सुनील's picture

5 May 2011 - 12:04 am | सुनील

हा हा हा!!!!!!

बाकी कविता वेगळीच आणि आवडली हेवेसांनल!

पिवळा डांबिस's picture

5 May 2011 - 2:51 am | पिवळा डांबिस

चांगली आहे कविता!
आवडली!!

प्यारे१'s picture

5 May 2011 - 9:59 am | प्यारे१

आवल्डी कविता....