मर्कट फोटोग्राफीचा एक प्रयत्न

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
27 Apr 2011 - 1:39 pm

शरद व स्पा यांच्या धाग्यामुळे मीहि खूप प्रभावित झालो, आणि नुकतेच माथेरानला काही काढलेले फोटो उकरून बघितले... ;)
त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत..
डकवतोय बघा आवड्तायेत का?

माथेरानच्या लुईझा कडेटोकावर बसलेले हे मर्कट, उन्हातान्हाचे वैतागलेले, उदास भाव असलेले.

हे एक छोटे कुटुंब. दंगा चालला होता यांचा. सध्या हे पिल्लू थोडेसे अजून मोठे झाले असेल.


सनसेट पॉईंटवर बसलेली ही मर्कटमाता काळजी घेतीय पिल्लाची

ह्या दोन मर्कटमैत्रीणी गप्पा मारता मारता पिल्लांकडे पण बघताहेत.

हा माकडांचा म्होरक्या. काय भयानक होते याचे डोळे.
माझ्यात काय दम मी अजून जवळ जाउन काही फोटो काढेन. क्यामेराच हिसकावून नेला तर??

माथेरानवर आमचेच राज्य

विडंबनछायाचित्रण

प्रतिक्रिया

हा हा हा हा हा

वल्ल्ल्या... लय भारी रे...
आयला कला दालनात सुद्धा "विडंबनास" सुरुवात झाली तर :)

छोटी माकडं.. जाम क्युट आहेत रे :)

टारझन's picture

27 Apr 2011 - 2:20 pm | टारझन

१. ह्या प्राण्यांची परवाणगी घेतली होतीत का टाकण्यापुर्वी ? ;)
२. काही नैसर्गिक फोटो शक्यतो ब्लर करावेत ( उदा वरुन खालुन पहिला फोटो , पिक्सल कॉर्डिनेट्स सांगायची गरज ? )
३. वा वल्ली वा
४. असे फोटु अंडी घालुन काढता येतील काय ?
५. वरुन चौथ्या फोटो मधे एकाच वेळी अनेक लिला दाखवण्याच्या तुमच्या हातोडीला सलाम.

- खल्ली

निवेदिता-ताई's picture

27 Apr 2011 - 7:15 pm | निवेदिता-ताई

हा हा हा हा .........

पंगा's picture

27 Apr 2011 - 7:29 pm | पंगा

१. ह्या प्राण्यांची परवाणगी घेतली होतीत का टाकण्यापुर्वी ?

पॉइंट आहे!

२. काही नैसर्गिक फोटो शक्यतो ब्लर करावेत ( उदा वरुन खालुन पहिला फोटो , पिक्सल कॉर्डिनेट्स सांगायची गरज ? )

हो कधीकधी गजानन महाराज इफेक्ट येऊ शकतो खरा, पण तरीही (माकडांची हरकत नसेल तर) ब्लर करण्याची आवश्यकता वाटत नाही.

३. वा वल्ली वा

+१. सुंदर फोटो.

४. असे फोटु अंडी घालुन काढता येतील काय ?

'अंडी' म्हणजे 'अंडरवेअर' का? अंडी नेमकी कोणी घालायची? माकडांनी, की फोटोग्राफरने?

५. वरुन चौथ्या फोटो मधे एकाच वेळी अनेक लिला दाखवण्याच्या तुमच्या हातोडीला सलाम.

सहमत. तो शेपूट ओढण्याचा प्रकार फारच मस्त आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2011 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

आज खरे समाधान वाटले. श्री. वल्ली यांचे पहिला, दुसरा व तिसरा फोटो छानच आहेत (म्हणजे वल्ली यांनी काढलेले. वल्लींना मर्कट म्हणण्याचा हा प्रयत्न नाही). आता छान फोटो जास्त छान करण्यासाठी थोडी शेपटीची मदत घ्या. पहिल्या फोटोत न दिसणारा शेपटीचा भाग डिस्ट्रॅक्टिंग वाटतो. जोडून टाका. श्री टारु यांनी ते निराळ्या शब्दात सांगितले आहे.
माकडू सरळ पहात आहे, त्याची शेपटी कमी येऊ दे. ती तर आपणास कमी करता येत नाही. उपाय शेपटीला आग लावणे.

प्रचेतस's picture

27 Apr 2011 - 2:59 pm | प्रचेतस

खी खी खी,
आमची काही हुकूमत नाय हो फोटूशॉपवर. हे सगळे माथेरानच्या निसर्गातले नैसर्गिक फोटू हायेत. जास्तीचे जोडकाम, बिनजोडकाम श्री. स्पा यांचेकडे सोपवण्यात येत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2011 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार

ते येड माकडाची शेपटी 3D करायचं.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Apr 2011 - 3:44 pm | llपुण्याचे पेशवेll

हां आणि मग ती ३डी शेपूट स्क्रीनमधून बाहेर येते आहे असे वाटेल.

=))

लेको किती बाजार उठवाल :D

शरद's picture

27 Apr 2011 - 7:52 pm | शरद

श्री परा साहेब, आम्ही माथेरानला फोटू काढला तेव्हाच्या माकडाची शेपटी फ़्रेमबाहेरच आली होती.
शरद

onkey with tail copy

प्रचेतस's picture

27 Apr 2011 - 11:07 pm | प्रचेतस

एकदम जबरा.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Apr 2011 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या !

मीनाक्षी देवरुखकर's picture

27 Apr 2011 - 2:57 pm | मीनाक्षी देवरुखकर

nice photos

sagarparadkar's picture

27 Apr 2011 - 4:35 pm | sagarparadkar

सर्वच मर्कटे ... ही निसर्गतःच 'बेंजामिन बटन' असतात कि काय? :) :) :)

नाही म्हणजे बाल्-मर्कटांचे चेहरे अतिशय सुरकुतलेले आणि प्रौढ्-मर्कटांचे चेहरे मात्र (त्यातल्या त्यांत जरा) चांगले, कमीतकमी सुरकुतलेले दिसले ... त्यावरून 'क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन' हा ब्रॅड पिट चा चित्रपट आठवला :)

५० फक्त's picture

28 Apr 2011 - 10:34 am | ५० फक्त

वल्ली फोटो जाम भारी आलेत, विशेषत: ह्या सतत हालचाल करत राहणा-यांचे फोटो काढणे फार अवघड प्रकार आहे, तु खुप मस्त जमवला आहेस.

आधी माणसं आणि आता माकडं, आता ह्या पुढं फोटो टाकायचे म्हणजे डायरेक्ट डायनोसोरचेच टाकायला पाहिजेत. कॉलिंग टारझन आफ्रिकेत आहेत काय रे डायनोसर आता ? कट्ट्याला सांगत होता ना तु, एक दोन उरलेत.

अवांतर - शेवटच्या फोटोत एक सरकारी चुक आहे, कोणि सांगेल काय ? माझ्याकडुन दुर्गा मध्ये एक कोल्ड कॉफि.

sagarparadkar's picture

28 Apr 2011 - 11:54 am | sagarparadkar

M.S.L. ABOVE 803.450 m च्या ऐवजी 803.450 m ABOVE M.S.L असं लिहायला पाहिजे होतं ...

दुर्गा मधे कधी जायचं बोला ... :)

पंगा's picture

30 Apr 2011 - 1:52 am | पंगा

चालायचेच! अहो, इथे भल्याभल्यांना 'पायावर डोके ठेवतो'च्या ऐवजी 'डोक्यावर पाय ठेवतो' म्हणताना पाहिलेले आहे. तिथे हे तर सरकारी काम आहे. त्याचे एवढे काय घेऊन बसलात? 'टायपो' म्हणून सोडून द्या ना!

त्यापेक्षा त्या पाटीवर कसे छानसे माकड बसलेले आहे, त्याकडे का नाही बघत?

५० फक्त's picture

28 Apr 2011 - 12:47 pm | ५० फक्त

चला, सागर या रविवारी जायचं ? बक्षिस वितरण व समारंभ खर्च धागाकर्ते करतीलच .

प्रचेतस's picture

28 Apr 2011 - 2:13 pm | प्रचेतस

हरकत नाय हो आपली.
आपण स्पॉन्सर करूच.

RUPALI POYEKAR's picture

28 Apr 2011 - 1:18 pm | RUPALI POYEKAR

फोटो एकदम छान

मृत्युन्जय's picture

28 Apr 2011 - 1:28 pm | मृत्युन्जय

कडक फोटो. कुठले फोटो "कडक" वाटले असले प्रश्न विचारुन आमचा बाजार उठवु नये.

आणि पराच्या आणि टार्‍याच्या प्रतिसादांसाठी एक _/\_

विकाल's picture

28 Apr 2011 - 5:13 pm | विकाल

नाद भरी....................!!!!

अस याक याक वान्नेर झ्याक आलय म्ह्ण्ताना...!!

'वल्ली... भौत बढीया...'

गणेशा's picture

28 Apr 2011 - 5:51 pm | गणेशा

छान एकदम ,,

अवांतर :
आमच्याकडे कढलेला एक मस्त फोटो आहे असाच.. पण येथे देता येत नाही

मदनबाण's picture

29 Apr 2011 - 8:34 am | मदनबाण

खी खी खी...लयं भारी नमुने टिपले आहेत !!! :D

किल्लेदार's picture

30 Apr 2011 - 1:31 am | किल्लेदार

आवडली.... :)

अन्या दातार's picture

6 Apr 2012 - 1:50 pm | अन्या दातार

मा. वल्लीशेठ यांचे इतर लिखाण वाचत असताना हा धागा दृष्टीस पडला. हणूमानजयंतीचा मौका साधून धागा वर काढत आहे :)

जय बजरंगबली की जय!

भारि रे सागर ..
छोटी माकडं खूप आवडलि :)

वा! हुप्प्याची काय पोझ काढलीय!! आवडली.

अमोल केळकर's picture

7 Apr 2012 - 10:44 am | अमोल केळकर

इथली मा़कडे माणसांपेक्षाही लै डेंजर आहेत असे एकले आहे :)

अमोल

अविनाशकुलकर्णी's picture

7 Apr 2012 - 12:20 pm | अविनाशकुलकर्णी

वल्ली मस्त..
एकदम डेक्कनच्या प्रवासाची आठवण झाली.
फर्स्ट क्लास चा पास काढुन पास होल्डर च्या डब्यातुन प्रवास करणे म्हणजे मजा असायची.
८०-८१ साल असेल.
त्या काळी नाष्ट्याला ओमलेट बरोबर केळ पण द्यायचे..
सकाळची वेळ असल्याने बहुतेक लोक केळ खात नसत..
डब्यात एक सिंधी सह प्रवासी होता..
तो सारी केळे गोळा करायचा व मंकी हिल च्या आसपास डेक्कन चा प्रवास सुरु झाला कि माकडाना केळी द्यायचा..मजा यायची "मर्कट लिला" बघताना..
लेख वाचला व आठवले.