पूर्वी कसे छान दिवस होते
तारुण्याचे कसे एक गाणे होते
पत्र येईल येईल म्हणून मन वाट बघायचे
निळ्या पत्रात मन हरवून जायचे
शब्दांची रांगोळी कशी छान वाटायची
निळ्या निळ्या आभाळात कशी पाखरे उडायची
तिच्या घरासमोरचा पिंपळ सळसळताना दिसायचा
संध्याकाळी ती खिडकीतून दूरवर नजर टाकीत वाट बघायची
[अशी कल्पना त्याच्या डोक्यात यायची]
नुसत्या आठवणीने किती बहरून जायचे मन
जुनी पत्र चाळताना
किती हरवून जातेय मन ...!
पोस्टमनची वाट बघता बघता
कसा दिवस हरवून जायचा
स्वप्नात तिचा भास छळत राहायचा ..!!
पत्राची एक निराळीच गंमत होती
तिच्या लिहिलेल्या शब्दाशब्दावर जीव फुलत होता
अधून मधून चोरून पत्र वाचत राहणे
एक व्यसनच होऊन गेले होते
कशी छान दिसायची पत्रातून
कशी छान आठवायची पत्रातून
नवीन नवीन तिला आठवणे शप्पत सुख होते
तिची आठवण जीव कालवीत होते
आता ह्या वयात सेलवर बोलणे किती नीरस झाले आहे
बोलणे निव्वळ सोपस्कार
निळ्या निळ्या शब्दांची हुरहूर आता संपून गेली आहे
पत्राचे दिवस संपलेत असेच आता वाटतेय
निळे निळे पाखरू आता हरवून गेले आहे
सेलची बेल कधीपण वाजतेय
असे नुसते भास होऊ लागलेत ...!!
प्रतिक्रिया
21 Apr 2011 - 7:38 am | स्पंदना
खरय प्रकाश!!
समोरा समोर बोलत असताना बर्याच दा संदर्भ बदलतात, पण पत्र लिहिताना आपण आप्ल्याला काय म्हणायच आहे ते व्यवस्थित मांडु शकतो. मला पण पत्र फार आवडतात. फिरुन फिरुन वाचता येतात, बोललेल विसरुन जात पण पत्र उघडल की पुन्हा तीच भावना , तेच शब्द , तसेच ताजे तवाने होउन सामोरी येतात.
21 Apr 2011 - 10:26 am | टारझन
खरंच .. पत्राचे दिवस गेलेत आता .. :)
तेवढे सुक्का , सोनिया आणि आण्णा एवढीच लोकं पत्राचा वापर करतात हल्ली !
बाकी प्रकाश१११ यांनी पुन्हा एकदा हृदयाला घरे पाडली . ३
22 Apr 2011 - 11:57 am | नरेशकुमार
काय, रेट काय काढलाय २ BHK चा ?
21 Apr 2011 - 11:13 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच रचना!!
21 Apr 2011 - 6:28 pm | निनाद
मुक्त छंद असे म्हणतात का?
खरे तर हा पत्र छंद आहे :)
21 Apr 2011 - 6:29 pm | निनाद
मुक्त छंद असे म्हणतात का?
खरे तर हा पत्र छंद आहे :)
21 Apr 2011 - 6:31 pm | विदेश
कशी छान दिसायची पत्रातून
कशी छान आठवायची पत्रातून
नवीन नवीन तिला आठवणे शप्पत सुख होते
खास !
सेलची बेल, पोस्टमन या भासातच रमायचे आता-