सध्या परिसरात पोपट बहरले आहेत. माझ्या आणि रामदासशेठच्या घरादरम्यान असलेल्या वृक्षराजीत सकाळी सकाळी पोपटांचे थवेच्या थवे इकडुन तिकडे उडत असतात. आमच्या इमारतीच्या परिसरातील लाल तुर्यांच्या फुलांच्या झाडावर या पोपटांची नजर असते, त्यांना ही फुले खायला विशेष आवडत असावीत. फांदीवर बसुन उलटे लटकत चोचीने फुले खुडणारे पोपट रोज पाहावयास मिळतात. आज सकाळीच एक पोपट सदिच्छा भेटीस येऊन गेला.
साहेब जरा सावध पवित्रा घेत हळुच छज्जावर येऊन बसले.
छज्जावर बसून साहेबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला.
एकुण सर्व ठिकठाक असुन आपल्याला काही धोका नसल्याचे लक्षात येताच महाशय स्थिरावले.
आता दोस्ती झाली असे समजुन मी थोडा पुढे सरसावलो
"फोटो काढताय का? हं. मग जरा सरसावुन बसतो. आता टिपा....."
मग आणखी पुढे होत एक चित्र जवळुन घेतले. "आता बास, पुन्हा भेटुच" असे म्हणत तो भुर्रकन उडाला.
मीही कॅमेरा बंद केला आणि आवरायला निघालो
प्रतिक्रिया
15 Apr 2011 - 2:06 pm | गणपा
साक्षीजी तुमचा/ची मॉडेल आवडला/ली. :)
आम्ही पोपट पाहिलाय पण तो पिंजर्यातलाच.
15 Apr 2011 - 2:14 pm | टारझन
< टिंग्या > अश्लिल अश्लिल ... < / टिंग्या>
बाकी ऑफिसातुन फोटु दिसत नसल्याने घरुन पाहुन पत्रीक्रीया दिल्या जाईल.
- पोपटलाल
15 Apr 2011 - 2:18 pm | गणपा
झालंना समाधान आता. गेल्यावेळी तुझी प्रतिक्रिया ढापल्याचा आळ घेतला होतास मेल्या.
आता फिट्टंफाट झाली आपली. आता तु माझी काढायची नाही आणि मी तुझी काढणार नाही....... खोडी.
15 Apr 2011 - 2:21 pm | ५० फक्त
फोटो जाम भारी आलेत, पण फोटोशॉप का केलेत कळालं नाही. वरिजनल फोटो टाकता येतील का इथं. ?
15 Apr 2011 - 5:55 pm | प्रास
:-)
15 Apr 2011 - 8:17 pm | सर्वसाक्षी
वापरले ते पार्श्वभूमी सुधारण्यासाठी!
आपल्या लक्षात आले असेल की मुख्य विषयाच्या मागील परिसर हा प्रखर प्रकाशात आहे. अर्थातच खोलितून बाहेर चित्र टिपताना कॅमेरा प्रकाशयोजना साधणार ती मागील परिसराच्या अनुशंगाने. आणि तसेच चित्र टिपले तर पक्षी अप्रकाशित राहुन काळसर झाक आली असती आणि तपशिल लुप्त झाला असता. म्हणजेच स्वयंयोजित प्रकाशरचनेवर मात करुन प्रकाश विषयाला पोषक इतका योजला पहिजे आणि ते करताना साहजिकच उजेडातली पार्श्वभूमि भगभगीत होऊन तिचा तपशिल नाहीसा होणार आणि तेच झाले. मग चित्र सुखद दिसण्यासाठी फोटोशॉपचा वापर केला.
डिजिटल फोटोग्राफीमध्ये चित्रणाप्रमाणे फोटोशॉपही महत्वाचे मानले जाते आणि जोपर्यंत विषयात फेरफार केला जात नाही (म्हणजे असलेले अनावश्यक असे काढणे वा पोषक असे काही समाविष्ट करणे ) तोपर्यंत ते निषिद्ध वा गैर मानले जात नाही - अगदी स्पर्धांमध्ये सुद्धा. चित्र टिपताना कृत्रिम झोत, परावर्तक वा निरनिराळे फिल्टर्स जसे चित्रण करताना वापरतात तसेच हे चित्रणानंतर.
हे पहा मूळ चित्र
धन्यवाद.
15 Apr 2011 - 3:55 pm | चतुरंग
बाकदार लालचुटुक चोच, मानेभोवतीचा कंठा अगदी सुरेख आलेत!
--------------
लहानपणी वाड्याच्या गच्चीवर एक पोपटाचे पिलू जखमी अवस्थेत येऊन पडले. त्याला पिंजर्यात ठेवले होते. जवळजवळ वर्षभर तो पिंजर्यात होता. चांगला भरदार आणि धष्टपुष्ट झाला. एके दिवशी त्याला गच्चीवर नेऊन पिंजरा उघडला आणि सोडून दिले. थोडावेळ इकडे तिकडे नाचत उडून बघितलेन आणि एकदा पंखातल्या ताकदीचा अंदाज आल्यावर मस्त भरारी घेऊन उडून गेला. पुन्हा फिरकला नाही. त्याची ती स्वातंत्र्याची भरारी अजून आठवते!
15 Apr 2011 - 4:08 pm | विनीत संखे
येकदम शेम टू शेम माझ्या बरोबर पण झालंय. लहानपणी माझ्या मोठ्या टारगट भावाने पोपट पकडला आणि मी तो सोडवला... पण त्या पोपटाने उडताना चोच मारून बोट जखमी केलेले... त्यावर बाबांनी अभ्यास सोडून नको ते कार्यक्रम केल्याने मला धपाटे घातलेले आठवतात...
बाबा आणि पोपट दोघांशी कट्टी केलेली बरेच दिवस मग...
बाबांसोबत साटंलोटं झालं जेव्हा मला सिनेमागृहात जुरासिक पार्क दाखवला आणि डबल स्कूपचं पिस्ता आईस्क्रीम खायला घातलं...
पोपटाने अजून तसे केलेल नाही... केले तर बट्टी होईल ही आशा धरतो.
18 Apr 2011 - 2:25 pm | नगरीनिरंजन
>>पण त्या पोपटाने उडताना चोच मारून बोट जखमी केलेले
अरेरे, म्हणजे जाता जाता पोपट करून गेला म्हणायचा. :-)
15 Apr 2011 - 4:10 pm | पक्का इडियट
अच्छा हा पोपट होय ..
मला वाटले कुठला पोपट आणि कुठे भेट देऊन आला की काय ..
तेच हो आपलं होंडा सिटी आणि काय काय...
15 Apr 2011 - 4:16 pm | श्रावण मोडक
साला, दिलखेचक आहे हा अगदी.
15 Apr 2011 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार
कोण ?
पोपट का प्रतिसाद ?
15 Apr 2011 - 11:43 pm | टारझन
कोणाचा ? :)
15 Apr 2011 - 4:30 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मला वाटले तुम्हाला पण टारोबांसारखा प्रेमाचा पोपट भेटला की काय? ;)
फटु मस्तच!!
15 Apr 2011 - 5:00 pm | अलख निरंजन
सर्वसाक्षींचा धागा असुनही गांधींविषयी काहीच नसल्याने हा धागा उघडाल्याने आमचाच पोपट झाला.
15 Apr 2011 - 8:25 pm | तिमा
मला तर मूळ फोटोत पोपटाच्या डोक्यावर गांधी टोपी दिसतीये.
15 Apr 2011 - 6:28 pm | रेवती
फोटू छान आलेत.
16 Apr 2011 - 2:12 am | प्राजु
जबरदस्त फोटो.
एकदम राजस दिसतोय पोपट. :)
यावरून मला माझा हा लेख आठवला.
16 Apr 2011 - 8:20 pm | सूर्य
मस्त फोटो.
- सूर्य.
18 Apr 2011 - 2:07 pm | sagarparadkar
मी सातवी / आठवीत असताना एका परिचितांनी वारजे येथे नवीन बंगला बांधला होता, त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा वारजे हा भाग पुण्यापासून खूपच लांब वाटत असे आणि तिथे चक्कं शेती आणि जंगल होतं.
दुपारी चारच्या सुमारास एकदम अनेक पोपटांचा थवा त्यांच्या घराजवळ आला. त्यांचा मुलगा म्हणाला ते बघ आमचे पाळलेले पोपट आले. मला समजेना कि पाळलेले म्हणतोय पण ते तर मुक्तपणे हिंडताहेत, असं कसं? तर तो म्हणाला कि त्यांना फक्त खाउ घालतो पण पिंजर्यात बंद करून ठेवले नाहीये.
हा प्रकार नवीनच वाटला. तेव्ह्ढ्यात एक पोपट त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीत येऊन बसला. खिडकीच्या ग्रिलला एक प्लास्टिकची वाटी अडकवली होती त्या एक मोठी लाल मिरची होती. पण तो पोपट काही ती मिरची खात नव्हता. मी पुढे होवून ती मिरची त्या पोपटाच्या चोचीपुढे केली. मी त्याला अनोळखी वाटलो असेन कदाचित, पण त्यामुळे तो एकदम रागावला आणि माझ्या हाताचा चावा घेऊन कर्कशपणे ओरडला. रागाने त्याचे डोळेपण मोठ्ठे झाले होते आणि डोक्यावरचे केस पण सरळ उभे झाले होते. एव्हढा छोटा पक्षी एकदम इतका रागावू शकतो हे त्यावेळी माझ्यासाठी एक अप्रूपच होतं.
मग त्या मुलाच्या बाबांनी पुढे होवून त्या पोपटाच्या डोक्यावरून अलगद हात फिरवला आणि एखाद्या छोट्या मुलाची समजूत घालावी तसं त्याच्याशी थोडावेळ बोलले, तेव्हा कुठे त्या पोपटाचा राग शांत झाला.