चेरी ब्लॉसम , वॉशिंग्टन डी सी आणी ओबामा

प्रभो's picture
प्रभो in जनातलं, मनातलं
11 Apr 2011 - 1:10 am

चेरी ब्लॉसम म्हटलं की गेल्या २-३ वर्षा आधीपर्यंत एकच गोष्ट आठवायची.....बूट पॉलिश...त्याच्या त्या जाहिरातीतला चार्ली चॅप्लीन आणी त्याच्या करामती..

पण हे सगळं २-३ वर्षा आधीचं. मित्र या त्या कारणाने अमेरिकेला जाउ लागले आणी त्यांच्या फेसबुक - पिकासा अल्बम्स मधे दिसू लागले 'चेरी ब्लॉसम्स'. जपानने अमेरिकेला दिलेल्या चेरीच्या झाडांना मार्च अखेरीस येणारा बहर... आमच्या नेहमीच्याच फाटक्या नशीबाने आम्ही जायचा निवडलेला दिवस होता बहर संपायच्या शवटच्या आठवड्याचा विकांत. आदल्या दिवशी पाउसही पडून गेलेला. असो...तर त्याच चेरी ब्लॉसमचे हे काही फोटो.

चेरी ब्लॉसम बघण्यासोबत बाकीचा वेळ वॉशिंग्टन डी सी मधली प्रसिध्द स्थळे बघण्यात घालवला.

लिंकन स्मारक बघायला गेलो असताना तिथे सिक्रेट सर्विसवाले (कानात इयरफोन आणी लाँग कोट) दिसले.रस्ता वगैरे रोखून ठेवला होता. इथे २०-३० फूटावरून अमेरिकेचे अध्यक्ष श्री.बराक ओबामा दिसले.

आवांतर फोटो : आमचे काही मॅक्रो किडे आणी इकडच्या तिकडच्या क्लिका..

अतिआवांतर : 'शो मस्ट गो ऑन' असे माझ्या बहिणीला हॉस्पिटल मधे ऑडमिट व्हायच्या आधी सांगणार्‍या, दोन महिन्यापुर्वी दिवंगत झालेल्या माझ्या कै. बाबांच्या स्मृतीस वरील सर्व लिखाण आणी फोटू अर्पण.

प्रवासमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्रआस्वाद

प्रतिक्रिया

कुंदन's picture

11 Apr 2011 - 1:12 am | कुंदन

छान फोटो रे प्रभो.
या निमित्ताने प्रभोही लिहिता झाला म्हणायचे.
अशीच आम्हाला चित्रमय अमरिकेची सैर घडवत रहा.

फोटो आवडले.
विशेष करुन लेफ्ट राईट करत मार्च करणारा निळ्या मानेचा कावळा(?) :)

'शो मस्ट गो ऑन'

+१

मेघवेडा's picture

11 Apr 2011 - 9:01 pm | मेघवेडा

असेच म्हणतो!

बाकी लिखाणात झालेली प्रगती पाहून बरे वाटले. यावेळेला मागल्या धाग्यापेक्षा दसपट शब्द आहेत! ;)

फोटू कडकच!

असुर's picture

11 Apr 2011 - 10:05 pm | असुर

बाकी लिखाणात झालेली प्रगती पाहून बरे वाटले. यावेळेला मागल्या धाग्यापेक्षा दसपट शब्द आहेत!
+१००
'प्रभोला लिहीता येतं' हा आमचा गैरसमज हल्ली दृढ होत चालला आहे! ;-)

--असुर

अनामिक's picture

11 Apr 2011 - 3:32 am | अनामिक

फोटू आवडले... पण चेरी ब्लॉसमबरोबर येते ती पोलन अ‍ॅलर्जी, जी माझ्यापुरता चेरी ब्लॉसम नावडता करून जाते!

आनंदयात्री's picture

11 Apr 2011 - 6:25 am | आनंदयात्री

मग काय, माझाही एक दिवस त्या अ‍ॅलर्जीने झोम्बी झाला होता. सध्या बहरलेले झाड दिसले की शब्दशः नाक मुठीत घेउन चालतो !!

रामदास's picture

11 Apr 2011 - 11:13 am | रामदास

सध्या बहरलेले झाड दिसले की शब्दशः नाक मुठीत घेउन चालतो !!

म्हणजे एखाद्या अतीनव कवितेची सुरुवात वाटते आहे.

आनंदयात्री's picture

11 Apr 2011 - 10:18 pm | आनंदयात्री

>>म्हणजे एखाद्या अतीनव कवितेची सुरुवात वाटते आहे.

हाणा हाणा !!

राजेश घासकडवी's picture

11 Apr 2011 - 4:36 am | राजेश घासकडवी

आयला, पंढरीत सहज फिरायला गेलात तर विठोबाच मंदिराबाहेर आलेला दिसला. नशीबवान आहात.

विशेष करुन लेफ्ट राईट करत मार्च करणारा निळ्या मानेचा कावळा(?)

दगडावरचे हिरवळीचे स्टडी, झाडाचे पोताचे फोटो देखील आवडले.

आस्पेक्ट रेशो मात्र थोडा गंडला आहे. सगळं उभट दिसतं. फोटो डकवण्यात काही घोळ आहे की तुमचे फोटोच १६:९ चे आहेत...

>>आस्पेक्ट रेशो मात्र थोडा गंडला आहे. सगळं उभट दिसतं. फोटो डकवण्यात काही घोळ आहे की तुमचे फोटोच १६:९ चे आहेत...

फोटोंचा आस्पेक्ट रेशो १६:९ आहे....फोटोची लांबी धाग्यासाठी असलेल्या पांढर्‍या जागेपेक्षा जास्त असल्याने हे उभट दिसणं/आस्पेक्ट रेशो बिघडणं झालं असावं. :) पुर्वी फोटू उजव्या बाजूच्या मेनू वर ओव्हरलॅप व्हायचे, जास्त लांबी असेल तर.

रिसाईझ करून टाकले आहेत. :)

सहज's picture

11 Apr 2011 - 6:22 am | सहज

मस्त रे प्रभो.

चेरी ब्लॉसम जाहीरात बरेच वर्षांनी पाहीली :-)

अजुन येउ दे!

फोटो छानच आलेत.
बाकी गप्पा खरडवहीत मारू.

मदनबाण's picture

11 Apr 2011 - 7:31 am | मदनबाण

मस्त रे...
मॅक्रो आवडले. :)

प्रभो सगळेच फोटो अतिशय छान आहेत, आता तु इथं आलास की तझ्याकडुन शिकेन म्हणतो फोटोग्राफि. मला तो एका पायावरचा कावळ्याचा आणि झाडाच्या सालीचा फोटो जास्त आवडले.

चित्रा's picture

11 Apr 2011 - 8:03 am | चित्रा

(एवढ्या गर्दीतून) ओबामा दिसला :)

फोटो आवडलेच, पण पक्षी आपल्याच मस्तीत चालतानाचा फोटो विशेष आवडला.

sneharani's picture

11 Apr 2011 - 10:18 am | sneharani

मस्त फोटो! पक्ष्यांचे मस्तच!

प्रास's picture

11 Apr 2011 - 11:29 am | प्रास

.

शिल्पा ब's picture

11 Apr 2011 - 10:29 am | शिल्पा ब

मस्त फोटो.

यशोधरा's picture

11 Apr 2011 - 11:32 am | यशोधरा

लय भारी रे प्रभो! :)

sagarparadkar's picture

11 Apr 2011 - 12:29 pm | sagarparadkar

पु. लं. च्या 'पूर्वरंग' मधील 'निक्को'च्या 'साकुरा' चे वर्णन आणि 'निक्को पाहिल्याशिवाय केक्को म्हणू नये' ही म्हण आठवली.

अरिगातौ गोझैमासु (धन्यवाद) प्रभोसान :)

प्रीत-मोहर's picture

11 Apr 2011 - 1:16 pm | प्रीत-मोहर

मस्त फोटो प्रभो!!!

कवितानागेश's picture

11 Apr 2011 - 1:25 pm | कवितानागेश

एकदम मस्त आहेत फोटो.
न विचारताच कॉपी करुन घेण्यात आले आहेत.
चालेल ना? :)

आम्ही गरीबानी 'चेरी ट्री' फक्त फार्म्विलेवर पहिले होते! ;)

विकास's picture

11 Apr 2011 - 4:29 pm | विकास

फोटो एकदम सॉलीड आले आहेत!

फोटो मस्तच

एक उगाच आठवलं:
"ते वरच्या खांबाच्या पाठीमागे दिसताहेत ना ते आमचे जावई. पुढे उभे आहेत ते नेहरू.. हो.. आमच्या जावयाचा फोटो काढला तेव्हा ते पण होते म्हणे तिथे"
:)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2011 - 7:07 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा प्रभो वा वा !

साला तुला फोटू काढताना बघायला खुद्द ओबामा आलेला बघुन तुझा अभिमान वाटला. कालच ओबामाच्या फेसबुकवर अपलोडलेल्या काही फटूत तुझे फोटो बघितले तेंव्हाच शंका आली की तूझापण आता लेख येणार.

पैसा's picture

11 Apr 2011 - 9:52 pm | पैसा

यावेळेला फोटोंबरोबर काही वाक्य बघून बरं वाटलं. जरा आणखी लिही की रे प्रभ्या!

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Apr 2011 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll

मस्तं रे प्रभ्या. साक्षात विठोबाचे दर्शन.

नंदन's picture

12 Apr 2011 - 10:44 am | नंदन

झकास आलेत फोटू!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास आलेत फोटू !

-दिलीप बिरुटे

प्रभो's picture

12 Apr 2011 - 6:32 pm | प्रभो

सर्व वाचक प्रतिसादक मित्र-मैत्रिणी-काका-काकू-आज्यांचे आभार.. :)

प्राजक्ता पवार's picture

12 Apr 2011 - 10:47 pm | प्राजक्ता पवार

फोटो आवडले .

पुष्करिणी's picture

12 Apr 2011 - 11:01 pm | पुष्करिणी

मस्त फोटो