हेमंत -अप्पू -सुधन सगळे बॉडी बिल्डर उभे राह्यले. पोरांना अशा वेळी साखळी लावलेल्या कुत्र्यासारखं मागे धरून दाबून ठेवायला लागायचं. धंद्यावरच्या पोरांचा हाच प्रॉब्लेम. थोडे डिस्टप झाले की एकाएकी बिथरायचे. सगळी पोरं घरातून डिस्टर्प. घरी वनवास म्हणून धंद्यावर बसायची.इतर दिवशी दिवसभर बाकड्यावर नखं खात -मुरुमं टोचत -दात कोरत बसणारी पोरं अशावेळी कधी बिथरून काय करतील ह्याचा भरवसा नव्हता.
आमचा शेठ अनुभवी माणूस .त्याच्या जरबेत पोरं असायची.
'बारक्या गलीका गेट खोल' शेठनी सांगीतलं.
मागचा गेट आणि टाटा मिलची दिवाळ यामध्ये एक पातळ गल्ली होती. या गल्लीत टुपलायटी- पाईप-बांबू चा स्टॉक .काचा टाळत बारक्या सरळ मिलच्या गटराच्या आतून एकदम स्टेशनच्या संडासाच्या मागे .
बारक्याला बघून कोणी राडा सुरु करणार ?
बारक्या म्हणजे खडी तो लौंग बैठी तो इलायची.
बारक्या बराच टाईम आला नाही. मग थोड्या वेळानी शटर खडखडलं.
'शेठ , खोलो शटर. हलका खोलो. बेहोष है. पियेला लगता है. '
रुमच्या आत मध्ये टेन्शन कमी झालं.
सुगुन रायटर पुढे झाला. शटर खोल्लं आणि जाड्या अर्धा आत पडला.
डोळे खुल्ले पण छाती जोरात हापशी मारत होती.दारु पिऊन वतारलेली पोरं .
शेठनी काही बोलायच्या आधीच चार लाथा पडल्या.
'"पिछू हो जाव रे." शेठ केकाटला.
शेठनी ग्लासमधून पाणी छिडकलं . डोळे खुल्लेच. जवाब नाही.
"इसकू थोडा बाहर निकालो रे "शेटनी सांगीतलं.
चार पोरांनी हातपाय धरून ढुंगणावर फरफटत जाड्याला बाहेर काढलं. थोडा खुर्दा -छुट्टा -चिल्लर सांडली. जाड्याची हापशी एकदम वाढली . मग कोणीतरी चिल्लर त्यांच्या अंगावर टाकली.
सगळ्यांची नशा खराब झाली. एकानी जाड्याच्या गळ्यातली थैली काढली.
आतून क्वार्टर बाहेर आल्यावर पोरं खूष. पण बाटलीत पाणी आहे बघीतल्यावर पुन्हा चार लाथा .
"आय झवाडा पाणी पिउन बेहोश झाला".
"खाटला निकाल ला रे'"शेठचा आवाज आला.
"शेठ कायको खाटलेपे रखते जाने दो ना पटरीपें ."फंटरपैकी कोणीतरी पुटपुटलं .
"गांडू अगले टाईम तू लास हो गया ना तो तेरेकोच डालता मै पटरीपे" शेठनी खुन्नस दिल्यावर फंटर मागे झाला.
"स्साला तुम लोगोको नशे के सामने कुच्च भी नही दिखता ."
"लेकीन सेठ ये भी तो पियेला है ना ."
शेठचं लक्ष नाही असं पाहून कोनतरी कचकून एक लाथ जाड्याच्या बरगडीत घातली.
टसन काढायला चान्स नाही भेटला की धंद्यावरची पोरं कशावरही राग काढतात.
एक मिनीट हापशी थांबली .मग धुस्सकन हवा आली आणि हापशी परत चालू.
"किशन आ रे ये गांडूको खाटपे ले "
कोणीतरी सूर्यप्रकाशची शिशी आणली .
दोन थेंब जाड्याच्या नाकात गेले.जाड्या खाटकन शिंकला .
नाकातून बोटभर बलगम बाहेर लोंबायला लागला. पोरं दूर.
कोणीतरी पाणी मारलं.
जाड्या उठून बसला आणि परत पडला. मग आणखी पाणी .
नाकातली घाण बघून अर्धी पोरं पळालीच होती.
आता जाड्या उठून बसला. सदर्यानी नाक पुसून परत झोपायच्या तयारीला लागला.
आता पर्यंत गप असलेल्या एका फंटरनी त्याचे केस धरून त्याला बसतं केलं .
त्याच्या हातात थैली दिली. 'निकल भोसडीके ...म्हणत त्याला खाटेवरून ढकललं .
जाड्यानी थैलीत हात घालून चाचपलं .
माझी गंगा ..
कौनसी गंगा बे तेरी ..
कोणाच्या तरी डोक्यात प्रकाश पडला. दूर पडलेली क्वार्टर त्याच्या हातात दिली.
शेठ हात पुसत पुढे झाला.
"जाव रे बाबा तुम अभी.फोकटका नस्टर नही चाय्ये धंदेपे. किदरसे आया रे तुम "?
"राजापूरसे." हातातली गंगेची बाटली दाखवत जाड्या पुटपुटला.
सगळ्यांचा इंटरेस्ट आता संपला होता.
राडा नाही म्हटल्यावर सगळ्यांना नशेची चिंता लागली.
शेठनी स्कूटरची चावी बारक्याकडे फेकली.
"जा. डिकीमे दो खंबा है. ले के आ."
खंबा आहे म्हटल्यावर सगळे परत गाळ्याच्या बाहेर आले.
जाड्या खाटेवरून खाली उतरून उकीडवा बसला होता .आणखी दोन खाटा बाहेर आल्या. ग्लासं भरली गेली.
शेठ घरी गेले. खायला काहीच नव्हतं .मी कच्चीच ओतून घेतली. भाया माझ्या बाजूला बसला.
कोणीतरी जाड्याला धक्का दिला. जाड्या फतक्कन धुळीत बसला.
"थोडा देव रे उसको भी"
जाड्यानी नकारार्थी डोलावली. सगळीजण आपसात रमली.
स्टेशनवरून शेवटची गाडी गेली.
छक्क्यांची एक टोळी ढोलक वाजवत गाणी म्हणत गेली .त्यांचंच गाणं पुढे चालवत कोणीतरी बाटलीवर अंगठीनी ताल धरला.
प्लॅटफॉर्मचे दिवे बंद झाले.
स्पिकरचा घुर्र-घुर्र आवाज बंद झाला.
जाड्या हळूच उठून कधी चालत चालत दादरापर्यंत पोहचला -बराच वेळ दादरावर बसून मग तो लायनीवर चालत गेला की दादरावरच झोपला हे काहीच कळलं नाही.
-----------------------------------------------------------------------------------------
काही पोरं खाटल्यावर पडली .काहींनी सिगरेटी पेटवल्या.
मग शांतता सहन होईनाशी झाल्यावर ओंगळ गप्पा सुरु झाल्या.
मग पुन्हा सगळं काही शांत .
भय्याच्या दुकानात एक छोटी बत्ती लागली . दुकानाच्या गटारात थुर्रकन पाणी पडल्याचा आवाज आला.
"ये ल्ले बहेनी लगी गंगा .सुशान बोलला.
"हट बे ये पुत्तुभैया का पोग्राम खलास हो गया. उसका लास का मुझीक भय्यानी मार रही है."
जागी असलेली काहीजण खदखदून हसली.भयाणीला आलटून पालटून वापरणारी त्यांची बारी येण्याची वाट बघत गप्प राह्यली
"हट बे भैया मुत रहा है"कोणीतरी सूचना केली.
रोज रात्री गाळ्यावर झोपणारापैकी एकजण म्हणला
"ये भय्याणीच.भय्या मुतेगा तो आवाज नही आती."
"तू देखनेकू गया जाता क्या ..
मग शिवी हासडून कोणतरी बोललं "नही बे ! भय्या बहुत पतला मुतता है ना इसलीये मै बोला .
आता नशेसोबत घाण करायला कारण मिळालं .क्रिकेट कॉमेंटेटरच्या आवाजाची नक्कल करत पक्याची रनींग कॉमेंट्री सुरु झाली
"कान लगाके सून अभी थुर्र थुर्र आवाज आयेगी ."
"फिर ? "
"उसके बाद छप छॅक चीपॅक ऐसा आवाज आयेगा."
फिर बत्ती बंद .बत्ती बंद झाली.
"अभी भैय्या शटर खोलेगा. "
मला आता दारु चढली होती. दिवसभर टेन्शन होतंच पण अचानक किळस वाटायला लागली होती.
मी भायाच्या बाजूला लवंडलो.
भय्याच्या दुकानाचे शटर उघडले.भय्या एका पोराला घेऊन बाहेर आला.
पोर झोपेत हातपाय झाडत होतं .त्याला मुतवून शटर परत बंद झालं .
परेल वर्कशॉपमधल्या कामाचे आवाज सोडले तर बाकी रात्र शांत होती.
मी पण डोळे मिटले.
___________________________________________________
अपूर्ण
प्रतिक्रिया
10 Apr 2011 - 10:19 pm | मदनबाण
जबरदस्त...
भाग ३ ची वाट पाहतोय...
10 Apr 2011 - 10:41 pm | चतुरंग
रामदासांच्या लेखणीनं काय काय आणि किती किती बघितलंय थांग लागेना! __/\__
-(पिटातला)चतुरंग
10 Apr 2011 - 10:53 pm | आनंदयात्री
चला दुसरा भाग आला.
फार भयावह आयुष्य आहे हे, त्याचा कोणे एकेकाळी झालेला हलका स्पर्श आठवला, पुन्हा थरकाप उडवुन गेला.
11 Apr 2011 - 4:01 pm | टारझन
आपला पण शेम गेम झाला !!
लिखाणाला __/\__
10 Apr 2011 - 11:26 pm | सुनील
अप्रतिम. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
11 Apr 2011 - 12:24 am | निनाद मुक्काम प...
येउदे अजून
11 Apr 2011 - 12:54 am | रेवती
किती भयानक लिहिता तुम्ही!
11 Apr 2011 - 2:16 am | गणपा
आज वर केवळ नाटका/चित्रपटातुन पाहिलेल हे विश्व, काकांनी त्यांच्या समर्थ लिखणीने अत्यंत बारकाईने उतरवलय.
पुढे काय घडणार याची उत्सुकता लागुन राहीली आहे.
11 Apr 2011 - 8:45 am | गवि
फार उत्कृष्ट.. अत्यंत वास्तव आणि तरीही आपल्या जगापासून वेगळं जग.
लिहिण्याची शैली अद्भुतसुंदर...
पुढील भागांची तीव्रतेने वाट पाहतोय.
11 Apr 2011 - 12:35 pm | चेतन
क ड क
__/\__
चेतन
11 Apr 2011 - 3:27 pm | असुर
<'हाताची घडी तोंडावर बोट'वाली स्मायली> गोष्ट ऐकतोय!! <'हाताची घडी तोंडावर बोट'वाली स्मायली>
मनातल्या मनात: या भागात हाणामारी न झाल्याचा णीसेद म्हणून आज कँटीनात एक गल्लास फोडण्यात येईल!!
--असुर
11 Apr 2011 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
हळुहळु चित्र उभे रहात आहे...
11 Apr 2011 - 4:56 pm | श्रावण मोडक
जय जय रघुवीर समर्थ!!! :)
11 Apr 2011 - 7:29 pm | प्रभो
वाचतोय.. :) काकांचे लेखन म्हणजे पर्वणीच.
11 Apr 2011 - 7:51 pm | बिपिन कार्यकर्ते
लिहा पुढचं पटपट!
11 Apr 2011 - 9:57 pm | टुकुल
परत एकदा जबरद्स्त लिखाण, पुढचे भाग पटापट येवुद्यात.
--टुकुल
12 Apr 2011 - 9:42 am | क्राईममास्तर गोगो
आवं थांबलात कशापायी.. लिवा न फुडं....
12 Apr 2011 - 5:13 pm | llपुण्याचे पेशवेll
छान छान.
13 Apr 2011 - 4:51 am | सन्जोप राव
तेंडुलकर-पानवलकर आठवतो आहे. तरीही जबरदस्त ओरिजिनॅलिटी. खूपच आवडले.
13 Apr 2011 - 11:18 am | विजुभाऊ
काय काका भाऊ पाध्ये गीयर मध्ये सुटलाय एकदम.
13 Apr 2011 - 8:28 pm | चिगो
खतरा लिहीताय काका... हीला डाला.
14 Apr 2011 - 5:14 pm | गणेशा
वाचतोय ...