अर्धा कप एरंडेल तेलात २ चमचे गोमुत्र टाकुन एका घोटात संपवावं.
(हा उपाय ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या जवाबदारी वर अवलंबवावा. मागाहुन तक्रार खपवुन घेतली जाणार नाही.)
तुम्ही उपाय अथवा औषध मागितले होते. त्यांनी उपाय सांगितल्यावर प्रश्न बदलु नका. शिवाय उपाय असा आहे की औषध लागणार नाही. तरीही लागल्यास गणपाशेठने उत्तम उपाय सांगितला आहे. गाढविणीच्या दुधात शिवांबु मिसळुन प्यायलात तरी उपयोग होउ शकेल. गणपाशपाने लिहिल्याप्रमाणे स्वतःच्या जबाबदारीवर हे औषध घेणे. उपाय न झाल्यास किंवा अपाय झाल्यास मी किंवा मिपा जबाबदार रहाणार नाही.
मनुश्य खुप उन्च व बारिक असेल तरीही पाठ दुखु शकते.
कारण सारखे त्याला वाकुन वस्तु घावी लागते.
मेडिकेटेड गादिवर पाठ ठेकवुन (ताठ)झोपत जा.
उशी घेणे टाळा. खुर्चित बसायची नोकरी असेल तर मधेमधे उठुन फेरी मारुन येत जा.
१.खुर्ची बदला.
२.खुर्चीत बसण्याची पध्दत बदला. पाठीत पोक काढून बसु नका.
३.संगणक वापरत असाल तर किबोर्ड्+माऊस ह्यांची पातळी कोपरापासून हात दुमडुन पुढे केल्यानंतर येणार्या सरळ रेषेत ठेवा.
४.ऑर्थोपेडिकला भेट द्या.
५.एक ओळीचे धागे काढू नका.
तुमचे पोट सुटले आहे का? हे विचारण्याचे कारण म्हणजे बैठ्या कामाने पोट ओघळते तेव्हा पाठीच्या स्नायूंवरचा ताण वाढतो आणि पाठदुखी सुरु होते. जर तुम्ही सडपातळ असाल आणि खुर्चीत बसून पाठ दुखत असेल तर खुर्ची बदला. फिरती आणि बैठक खालीवर करता येणारी खुर्ची सोडून सरळ साधी टणक पाठीची लाकडी खुर्ची वापरा.
पाठदुखी थांबवण्याचा सर्वोत्तम एक्झरसाईझ म्हणजे पाय ताठ करुन भिंतीला तळवे घट्ट चिकटवून झोपायचे आणि बळ एकवटून कमरेतून काटकोनात उठायचे. त्यावेळी हात बाहेरच्या बाजूला फेकायचे. किंवा हात डोक्याखाली घेऊन पाय ^-० या स्थितीत ठेऊन पाठ उंचावायची. टेनिसपटू आणि सैन्यातले जवान हा व्यायाम नियमितपणे करतात त्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास सतावत नाही. या उपायाने माझीही पाठदुखी गेली.
तत्काळ रीलिफ हवा असेल तर पितांबरीचे 'क्युअर ऑन' हे तेल पाठीवर चोळा आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेका किंवा अधून मधून हॉट स्टोन मसाज थेरपी घेत चला.
हल्ली काय दुखलं म्हणून कोण काय उपाय औषध मागेल काय नेम नाही बुवा!
पण या काथ्याकुटामुळे अनेक कौलं मनातल्या मनात पडून गेली!
"मिपावर एखादा वैदूविभाग चालू करावा काय?"
"मिपावर डॉक्टर लोक किती?"
"मिपावर कशाची चलती आहे, अॅलोपथी, होमिओपथी, की आयुर्वेद?"
"मिपावर कशाची चलती आहे, पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, गुडघेदुखी किंवा इतर?"
"डॉक्टर/वैद्य/वैदू नसणार्या मिपाकरांचे सल्ले घ्यावेत का?"
"डॉक्टर/वैद्य/वैदू नसणार्या मिपाकरांनी सल्ले द्यावेत का?"
"टार्या - पराचे प्रतिसाद वाचून कुठले आजार होऊ शकतात, शारिरिक, मानसिक, दोन्ही किंवा इतर?"
गूगल /मायक्रोसॉफ्ट जॉइन करा ना.ते तुम्हाला झोपुन काम अलाउड करतील.
हा हा !. सगळ्यांनीच झोपून काम करायचे ठरवले तर मिटिंगांना कॉन्फरन्स रूम ऐवजी सभाग्रुह लागेल. बाकी डॉट कॉम जमान्यात असल्या कंपन्यांमध्ये कर्मचार्यांना त्यांनी घरी पाळलेली कुत्री/मांजरे आणायची परवानगी होती.
प्रतिक्रिया
6 Apr 2011 - 3:24 pm | मृत्युन्जय
खुर्चीत बसु नका. शिंपल.
6 Apr 2011 - 3:27 pm | परिकथेतील राजकुमार
१) कमोडवर बसत जा.
२) चौरंग आणुन त्यावर संगणक ठेवा.
३) रोज ३ वेळा 'कणा' हि कविता वाचा.
४) 'बसणे' बंद करा.
५) खुर्ची विका. न रहेगा बांस....
६) खुर्चीत उभे रहात जा.
सध्या येवढेच सुचले आहेत.
6 Apr 2011 - 3:32 pm | पप्पू
हे झाले उपाय आता औषध सांगा
6 Apr 2011 - 3:41 pm | गणपा
अर्धा कप एरंडेल तेलात २ चमचे गोमुत्र टाकुन एका घोटात संपवावं.
(हा उपाय ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या जवाबदारी वर अवलंबवावा. मागाहुन तक्रार खपवुन घेतली जाणार नाही.)
6 Apr 2011 - 4:20 pm | धमाल मुलगा
'मागाहुन' तक्रार करण्याची अवस्था तरी राहिल का?
6 Apr 2011 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार
अहो 'तक्रारींचा' जो काय पाऊस पडणार तो 'मागाहुनच' पडनार ना.
6 Apr 2011 - 4:32 pm | मृत्युन्जय
औषधामागुन उपायसुद्धा आला की मग. खुर्चीवर बसायची गरजच पडणार नाही. आपोआप योग्य ठिकाणी जाउन बसतील ते.
बाकी पाकृ मध्ये गणपाशेठचा हात कोणी धरु शकणार नाही हे खरेच आहे हो.
6 Apr 2011 - 4:30 pm | गणपा
हुशार आहत. ;)
तुलाच ते काय ते उमजले. =))
6 Apr 2011 - 3:51 pm | मृत्युन्जय
तुम्ही उपाय अथवा औषध मागितले होते. त्यांनी उपाय सांगितल्यावर प्रश्न बदलु नका. शिवाय उपाय असा आहे की औषध लागणार नाही. तरीही लागल्यास गणपाशेठने उत्तम उपाय सांगितला आहे. गाढविणीच्या दुधात शिवांबु मिसळुन प्यायलात तरी उपयोग होउ शकेल. गणपाशपाने लिहिल्याप्रमाणे स्वतःच्या जबाबदारीवर हे औषध घेणे. उपाय न झाल्यास किंवा अपाय झाल्यास मी किंवा मिपा जबाबदार रहाणार नाही.
6 Apr 2011 - 4:16 pm | आत्मशून्य
6 Apr 2011 - 3:38 pm | गवि
पाठ चेपायला.
6 Apr 2011 - 5:54 pm | वपाडाव
गवि आपल्याला काय म्हणायचे आहे...
चोपायला का चेपायला....
-चेपुन देणारी
6 Apr 2011 - 3:38 pm | सूड
उताणे आणि पालथे पडून करायची योगासनं करा, कदाचित दुखणं कमी होईल !! ;)
उपाय सांगितलाय कृपया औषध विचारू नका.
6 Apr 2011 - 3:41 pm | माझीही शॅम्पेन
उपाय - डॉक्टर कडे जा !
औषध - डॉक्टर सांगेल ते घ्या !!!
6 Apr 2011 - 3:45 pm | पर्नल नेने मराठे
मनुश्य खुप उन्च व बारिक असेल तरीही पाठ दुखु शकते.
कारण सारखे त्याला वाकुन वस्तु घावी लागते.
मेडिकेटेड गादिवर पाठ ठेकवुन (ताठ)झोपत जा.
उशी घेणे टाळा. खुर्चित बसायची नोकरी असेल तर मधेमधे उठुन फेरी मारुन येत जा.
7 Apr 2011 - 7:56 am | नितिन थत्ते
गादीसाठी विजुभाऊंना कॉण्टॅक्ट करा. जपानी गादी मिळेल.
6 Apr 2011 - 4:05 pm | धमाल मुलगा
१.खुर्ची बदला.
२.खुर्चीत बसण्याची पध्दत बदला. पाठीत पोक काढून बसु नका.
३.संगणक वापरत असाल तर किबोर्ड्+माऊस ह्यांची पातळी कोपरापासून हात दुमडुन पुढे केल्यानंतर येणार्या सरळ रेषेत ठेवा.
४.ऑर्थोपेडिकला भेट द्या.
५.एक ओळीचे धागे काढू नका.
6 Apr 2011 - 4:09 pm | स्पा
एक ओळीचे धागे काढू नका.
6 Apr 2011 - 4:11 pm | अरुण मनोहर
तुम्ही खुर्चीत बसू नका............
खुर्चीलाच तुमच्यावर बसवा/
म्हणजे तिची च पाठ दुखेल! सोप्पे!
6 Apr 2011 - 7:25 pm | निवेदिता-ताई
हा हा हा हा ......ह.ह.पु.वा...
6 Apr 2011 - 4:13 pm | पक्का इडियट
कुणाकडून पाठीला साबण लावून चांगली रगडून घ्या .... पाठ बरका !!
6 Apr 2011 - 5:32 pm | टारझन
ह्हा ह्हा ह्हा :) असेच टंकायला आलो होतो .
पण सांगायचा मुद्दा , पप्पु यांचे वय झालेले आहे . आता कामं बिमं करणे सोडा , आणि देव देव करा. उरलेले दिवस मोजा .
- झब्बु
पाठिक काळजी ..
7 Apr 2011 - 1:42 pm | पप्पू
आपण कुणाकडून रगडून घेतली त्यांनाच पाठवा
6 Apr 2011 - 4:30 pm | योगप्रभू
भोचक चौकशीबद्दल आधीच तुमची माफी मागतो.
तुमचे पोट सुटले आहे का? हे विचारण्याचे कारण म्हणजे बैठ्या कामाने पोट ओघळते तेव्हा पाठीच्या स्नायूंवरचा ताण वाढतो आणि पाठदुखी सुरु होते. जर तुम्ही सडपातळ असाल आणि खुर्चीत बसून पाठ दुखत असेल तर खुर्ची बदला. फिरती आणि बैठक खालीवर करता येणारी खुर्ची सोडून सरळ साधी टणक पाठीची लाकडी खुर्ची वापरा.
पाठदुखी थांबवण्याचा सर्वोत्तम एक्झरसाईझ म्हणजे पाय ताठ करुन भिंतीला तळवे घट्ट चिकटवून झोपायचे आणि बळ एकवटून कमरेतून काटकोनात उठायचे. त्यावेळी हात बाहेरच्या बाजूला फेकायचे. किंवा हात डोक्याखाली घेऊन पाय ^-० या स्थितीत ठेऊन पाठ उंचावायची. टेनिसपटू आणि सैन्यातले जवान हा व्यायाम नियमितपणे करतात त्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास सतावत नाही. या उपायाने माझीही पाठदुखी गेली.
तत्काळ रीलिफ हवा असेल तर पितांबरीचे 'क्युअर ऑन' हे तेल पाठीवर चोळा आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेका किंवा अधून मधून हॉट स्टोन मसाज थेरपी घेत चला.
7 Apr 2011 - 1:39 pm | पप्पू
चेष्टा न करता चांगले सांगितले त्याबद्दल धन्यवाद मी हे नक्की करीन
6 Apr 2011 - 4:33 pm | असुर
हल्ली काय दुखलं म्हणून कोण काय उपाय औषध मागेल काय नेम नाही बुवा!
पण या काथ्याकुटामुळे अनेक कौलं मनातल्या मनात पडून गेली!
"मिपावर एखादा वैदूविभाग चालू करावा काय?"
"मिपावर डॉक्टर लोक किती?"
"मिपावर कशाची चलती आहे, अॅलोपथी, होमिओपथी, की आयुर्वेद?"
"मिपावर कशाची चलती आहे, पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, गुडघेदुखी किंवा इतर?"
"डॉक्टर/वैद्य/वैदू नसणार्या मिपाकरांचे सल्ले घ्यावेत का?"
"डॉक्टर/वैद्य/वैदू नसणार्या मिपाकरांनी सल्ले द्यावेत का?"
"टार्या - पराचे प्रतिसाद वाचून कुठले आजार होऊ शकतात, शारिरिक, मानसिक, दोन्ही किंवा इतर?"
--असुर
6 Apr 2011 - 4:39 pm | आचारी
उपाय- उत्तम उपाय म्हण्जे सकळि फिरायल जाणे
औशध- व्यायाम करणे
6 Apr 2011 - 5:13 pm | मितभाषी
घोरपडीचे तेल लावा. पाठीला.
एक दिवसात टकाटक.
6 Apr 2011 - 5:49 pm | चिरोटा
धनुरासन,भुजंगासन आपले मित्र आहेत.
वज्रासन करायलाही हरकत नाही.
6 Apr 2011 - 6:36 pm | मुलूखावेगळी
गूगल /मायक्रोसॉफ्ट जॉइन करा ना.ते तुम्हाला झोपुन काम अलाउड करतील.
अवांतर- रात्री झोपताना पायाखाली उशी ठेवुन झोपा .
बाकि पाठदुखीमुळे तर
पप्पु कान्ट डान्स स्साला ....................
7 Apr 2011 - 7:45 am | चिरोटा