धंदा -भाग एक

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
5 Apr 2011 - 1:23 pm

आपली भाकरी आणि आपलं मरण जिथं कुठे लिहीलं असेल तिथं माणसाला जावं लागतं . परळ स्टेशनच्या आवारात धंदा होता तेव्हाची गोष्ट . स्टेशनमास्तरपासून बापूजी प्रिंटींग प्रेस पर्यंत सगळी आपलीच माणसं होती .स्टेशनचा स्टाफ (खरा उच्चार स्टाप असा आहे )आपल्याशी दोस्तीत.त्यांना आपला फोन -चहा -नास्टा फुकट .त्यांचं पाणी -न्हाणी-संडास आपल्यासाठी फुकट.व्हिटीला जायचं झालं तर एक कोरं तिकीट घ्यायचं .संध्याकाळी परत आणून ठेवायचं .मास्तर पण पगाराला आकडा लावणार. फिगर फिट्ट नाही बसली तरी वळण झाल्यावर हमालासोबत पैसे पाठवूम द्यायचे. अ‍ॅक्सीडेन झाला की आपलीच पोरं पंचनाम्यावर सही करणार .मुडद्यासाठी मांजररपाट आपल्याकडे नेहेमी तयार असायचं .एखाद्या बॉडीत जीव दिसला की धंद्यावरूनच सगेवाल्यांना फोन करायचा नातेवाईक जीवंत माणसाला असतात आणि अ‍ॅक्सीडेनवाल्यांना सगेवाले असतात .(हे मी केयीएममध्ये शिकलो.) आपला धंदा भोईवाड्याच्या अंडर यायचा. पलीकडच्या भागला एलफिस्टन म्हणायचं. तिकडे तोडणकर कंपनीचा धंदा होता. आपलं आणि त्यांचं बरं होतं. आपले खिलाडी आपल्याकडे त्यांचे रमय्ये त्यांच्याकडे .सकाळी सहाच्या आधीच धंदा चालू व्हायचा.गाळा लिहीणारे उशीरा यायचे पण रायटर पावणेसहाला येऊन बाकड्यावर बसायचा. परेल वर्कशॉपची पब्लीक पहील्या शिफ्टला जाताना आकडा लावून जायची. धंदा फुल्ल होता. टाटा कंपाउंडची दहा बारा पोरं सकाळीच यायची. पलीकडच्या चाळीतल्या काही पोरांचा आपल्या धंद्यावर डोळा होता .त्यांचा गॉडफादर त्या वेळाचा कार्पोरेटर.अधून मधून नडी व्हायची. सिनीअर आपला असल्यामुळे प्रकरण संपायचं .अधून मधून दादरच्या पीसीला कळ लागली की तोडणकरांचा धंदा काही दिवस बंद व्हायचा .मग तिकडची जनता आपल्याकडे. कधी भोईवाडा टाईट असला तर आपली पब्लीक तिकडे.दोम्ही बंद असले तर मात्र कोपर्‍यावर पोरं उभी करूम खडेखडे बिटींग घ्यायला लागायचं.
आमचा धंदा स्टेशनच्या आवारात. दुकान लायनीत -समोरची चार झोपडी पण आपलीच. वर्कशॉपची पब्लीक (खरा उच्चार पपलीक असा आहे )पाना लागला ,जोडी लागली की रात्री पिऊन लास होईपर्यंत धंद्यावरच बसायची. आख्ख्या परळला दारुचं व्यसन आहे. पब्लीक हॉस्पीटलला जाणारं- टाटात जाणारं -वाडीयात जाणारं -केईम ला जाणारं-कस्तुरबाला जाणारं -महात्मा गांधीला जाणारं. हॉस्पीटलच्या बाहेर पडलं की सरळ चारशे मिली मारणार . "स्साला असे तसे पन मरनार मग पिवून मेलो तर काय "असा विचार करत पिणारं पपलीक तराट होऊन स्टेशनजवळ पायर्‍यांना अडखळणार आणि तसंच पडून रहाणार .फायलीतले कागद -एक्सरे वार्‍यावर उडून जाणार .आमचा धंदा समोरच. आपली पोरं पाणी मारणार तरी तशीच पडून राहणार . रात्री नऊला बिटचा राउंड मारायला हवालदार आले की खिसे तपासून रिकामे करणार .
अगदी धंद्यासमोर येऊन एखादा पडला तर आपल्याकडे सूर्यप्रकाश तेल होतंच. सूर्यप्रकाश तेल मालीश तेल होतं .आता कुठे मिळतं की नाही ते माहीती नाही. त्या तेलाचे दोन थेंब नाकपूडीत सोडले की नशा खल्लास. माणूस पायावर उभा राहून खळखळा मुतून थेट ट्रेनमध्ये बसणार.
अशाच एका डिसेंबरची गोष्ट. रात्र लवकर व्हायची .पोरांना दारु प्यायला एक निमीत्त. क्लोजची फिगर यायच्या आसपास बहुतेक जण टाईट. धंदा लवकर सामसूम व्हायचा. पलीकडच्या चाळीची पोरं हाच मोका घेऊन राडा घालायला यायची. एक दिवस संध्याकाळी खबर आली की रात्री पोरं येणारेत म्हणून .अशा दिवशीची रात्र भयंकर पॅरॅनॉईड(हा शब्द तेव्हा माहीती नव्हता) जायची. त्या दिवशी धंद्यावरच्या पोरांना -त्यातल्य त्यात कामाच्या अशा बॉडी बिल्डरना आम्ही कोरडं ठेवलं होतं .
संध्याकाळी एका जाडगेलासा माणूस आकडा लावून गेला होतां नेहेमीचा मेंबर नव्हता म्हणून लक्षात राहीला. धंद्यावर काठीवाले पण बरेच येतात. काठीवाले म्हणजे फिगर काय येणार ते माहीती असणारे -काठीवाला एखादा आला की गल्ला खल्लास करून जायचा. ते जाऊ देत.माणूस लक्षात राहीला खरा. दुपारी चारपाचशे रुपयाची बाजी करून हारून गेला होता म्हणून रायटरच्या ध्यानात पण राह्यला होता. चार पाच वेळा धंद्यावर घुटमळताना बघून पोरं आणखीनच भिरभिर झाली होती.अशी भिरभिर झाली की आपसात टेन्शन सुरु करायची.संध्याकाळी शेठ आले तेव्हा त्यांना कळलं की आज राडा आहे.त्यानी पिसीला फोन लावला.दोनदा वायरलेस येऊन गेली .तो माणूस वायलेसल्याशी काहीतरी बोलताना दिसला्. टेन्शन वाढायला सुरुवात झाली. समोर फेरीवाल्याला माणूस दाखवला .तो म्हणाला नया आदमी है सेठ.अशा वेळी शेठ रायटरला -गाळेवाल्याला मुतायला पण कोणच्या तरी सोबत पाठवायचा. मग रात्रीची फिल्डींग लावली ,भाया आणि हेमंत कोरे समोरच्या झोपडीत. बाकी पोरं अंधार करून आत. अकरा साडे अकरा पर्यंत काही नाही. मग बाटल्या आल्या.जीएम वाले -ओसीवाले-बीअरवाले.मी बीअरवाल्यात. बार वाजता झोपडीतली पोरं आत आली. टाटाकंपाउंड मध्ये विजा रहायचा. त्याच्या घरून डबा आला होता. अंड्याचे पोळे -मच्छी- थोडा सुका जवळा-भाकर्‍या. पाच मिनीटात डबा संपला. बाजूच्या भय्यीणीला आमच्या पोरांची भारी आवड,ती पण हेमंत दिसल्यावर चार टाईम फिरकून गेली. साडेबारा वाजले आणि शटरवर धाडकन कायतरी पडल्याच आवाज आला. एका मिलटात नशा खल्लास. पोरं तार्वटलेल्या डोळ्यानी उभी राह्यली. हेमंत पुढे होणार तेव्हढ्यात बाहेर कोनतरी पडल्याचा पण आवाज आला. बारक्याला स्टूलावर चढवून बघायला सांगीतलं. बारक्या पटकन खाली बसला.शेठ...तोच हाय...
अपूर्ण..

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

5 Apr 2011 - 1:27 pm | छोटा डॉन

पुढे काय ?
पटकन येऊद्यात प्लीज ...

- छोटा डॉन

येच बोल रैलि हे!
एक्दम टकाट़क !
:)

विनायक प्रभू's picture

5 Apr 2011 - 1:33 pm | विनायक प्रभू

वरिजनल

मी_ओंकार's picture

5 Apr 2011 - 1:38 pm | मी_ओंकार

लवकर लवकर

नंदन's picture

5 Apr 2011 - 1:39 pm | नंदन

जादूगाराने पहिली करामत करायच्या आधी पोराटोरांनी अपेक्षेने सरसावून बसावं, तशी पुढच्या भागांची वाट पाहतो आहे :). लेख वाचताना आंबेडकर रोड - नरे पार्क - कामगार मैदान - आरेम्भट शाळा आणि पारशी नावांच्या गल्ल्यांचा तो परिसर डोळ्यासमोर तरळून गेला.

मृत्युन्जय's picture

5 Apr 2011 - 2:15 pm | मृत्युन्जय

जादूगाराने पहिली करामत करायच्या आधी पोराटोरांनी अपेक्षेने सरसावून बसावं, तशी पुढच्या भागांची वाट पाहतो आहे

+१. सालं लोक प्रतिसाद पण लै भारी देतात मिपावर :)

पैसा's picture

5 Apr 2011 - 1:46 pm | पैसा

हे कुठचं जग आहे? आणखी लवकर येऊ द्या!

परिकथेतील राजकुमार's picture

5 Apr 2011 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार

ज ब र्‍या द स्त !
पुढिल भागासाठी उत्कंठा वाढली आहे.

ओपन क्लोज आणि पिवळ्या मळकट चिठ्ठ्या डोळ्यासमोर तरळुन गेल्या.

असुर's picture

5 Apr 2011 - 3:48 pm | असुर

+१
ज ब रा ट!!!
एकदम तुफान सुरुवात!! अशी पहिल्या दुसर्‍या भागातच राड्याला सुरुवात झाली की कसं गार गार वाटतं!!

रामदासकाकांच्या पोतडीतून कधी हिरे-माणकं बाहेर पडतात तर कधी लंगडा-मेंढीच्या चिठ्ठ्या!! केवळ कमाल आहे!!!

--असुर

निखिल देशपांडे's picture

5 Apr 2011 - 1:52 pm | निखिल देशपांडे

पुढचा भाग कधी???

sneharani's picture

5 Apr 2011 - 1:54 pm | sneharani

पुढे? येऊ दे लवकर!

विनीत संखे's picture

5 Apr 2011 - 1:56 pm | विनीत संखे

पुढे?

जबरदस्त लिखाण काका,

तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.

अनुराग's picture

5 Apr 2011 - 2:15 pm | अनुराग

ज ब र्‍या द स्त !
पुढिल भागासाठी उत्कंठा वाढली आहे.

चेतन's picture

5 Apr 2011 - 2:23 pm | चेतन

सही

अवांतरः ही कथातरी पूर्ण करणार का...?

टारझन's picture

5 Apr 2011 - 2:23 pm | टारझन

आयच्या गावात पाणी ... !!!! नेमकं क्रमशः !! होप पुर्ण कराल !

-

आप्पा's picture

5 Apr 2011 - 2:27 pm | आप्पा

गिरणगाव (लालबाग परळ) भाग डोळ्यासमोर उभे राहीले. अजुन परळ स्टेशन भागात एवढा फरक नाही पण ते गिरणी कामगार कुठे आहेत. बाकी आता जुने राड्याचे दिवस संपले आता.

सविता००१'s picture

5 Apr 2011 - 2:35 pm | सविता००१

डेन्जरस दिसतय एकूण

सुहास..'s picture

5 Apr 2011 - 2:38 pm | सुहास..

खल्लास ..पुढे ??

साबु's picture

5 Apr 2011 - 2:39 pm | साबु

लवकर लिवा....

आधी गोव टीम आली. मग लिखाळ लिहिते झाले सोबत त्यांनी रंगाशेठना पण कोषातुन बाहेर काढलनीत. आणि आता रामदास काका..... सिनियर प्लेअर्स रंगात येउन खेळायला लागले हे, हे नव वर्ष चांगल जाणार याचीच नांदी आहे. :)
.
.
.

काका वाचतोय ,और भी आंदो.

धमाल मुलगा's picture

5 Apr 2011 - 4:31 pm | धमाल मुलगा

अगदी हेच्च म्हणतोय.

कधी नव्हे ते म्हैन्याच्या २५-२७ तारखेला खेळायला जावं आन काच्चकन चक्री लागावी, चक्री बसली म्हणून पुन्ना आकडा लावावा तर दुसर्‍या टायमाला ज्याकपॉट बसावा असा आनंद झालेला आहे. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 3:16 pm | llपुण्याचे पेशवेll

आपुन कदी आकडा लावला नसल्याने काय षा* कळलं नाय!

अफलातून विषय आहे.. वेगळंच जग..

ग्रेटच..

वाचतोय...

गणेशा's picture

5 Apr 2011 - 3:37 pm | गणेशा

छान लिहिले आहे ..
पुढेल भागाच्या प्रतिक्षेत ...

लिहित रहा ... वाचत आहे ...

गणेशा's picture

5 Apr 2011 - 3:37 pm | गणेशा

छान लिहिले आहे ..
पुढेल भागाच्या प्रतिक्षेत ...

लिहित रहा ... वाचत आहे ...

पिव्वर माल.
मस्त.
वाचत आहे .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2011 - 3:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी .....! पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

पक्का इडियट's picture

5 Apr 2011 - 3:59 pm | पक्का इडियट

मेंढी .... !!!!!

श्रावण मोडक's picture

5 Apr 2011 - 4:07 pm | श्रावण मोडक

हे पूर्ण करणार आहात ना?

मस्त लिहिलेय.
आकडे लावणारे कशातूनही आणि कुठूनही सारासार संबंध जोडतात
सट्ट्यासाठी आकडा लावणार्यांसाठी आजू बाजूचा कोणीही काही आकडा बरळला तरी चालतो.
बघा हा जरा आता...........................
सकाळपासून चार वेळा जावून आलो. त्याच्या हातात टमरेल आणि ह्याच्या डोक्यात चार हा आकडा.
आयला ट्रेन आज २ तास लेट झाली राव. दोन

किंवा मग लहान पोराला पकडून हातातल्या कागदावर कोणतेही ३/४ आकडे लिहायला सांगायचे.
कोणी जर पायाळू असेल तर त्याला जाम भाव असतो असल्या लोकांकडून.
अन्दी-धुंदी शॉट बसला तर मग काय विचारु नका.

धमाल मुलगा's picture

5 Apr 2011 - 4:34 pm | धमाल मुलगा

आत्ता उजेड पडला डोसक्यात!
_/\_

ही तीच गोष्ट आहे ना मुनीवर्य? असेल तर आम्ही पीटातली जागा पकडून बसलेलोच आहोत. येऊंद्या पुढचा भाग!

एकदम वेगळ !! झिणझिण्या आल्या वाचताना.

पुढे?

अरुण मनोहर's picture

5 Apr 2011 - 6:18 pm | अरुण मनोहर

थोर!
__/\__

लेखन आवडलं.
सूर्यप्रकाश तेल म्हणजे काय ते समजलं नाही.

चतुरंग's picture

5 Apr 2011 - 7:16 pm | चतुरंग

आहे म्हटलं की काम कसं होणार ह्याची चिंता करायची नाय आपलं काम फक्त सिनेमा बघण्याचं, तसं बघायला बसलोय!
पुढचं रीळ लावा!

(मटकाकिंग्)रंगा खत्री

धनंजय's picture

6 Apr 2011 - 12:30 am | धनंजय

आणखी एक वेगळाच अनुभव!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Apr 2011 - 1:52 am | निनाद मुक्काम प...

आता अजून काय बोलावे
एकदम राडेबाज लेखन .

प्राजु's picture

6 Apr 2011 - 1:52 am | प्राजु

तुफान!
लवकर लिहा.
रामदास काका... ब्यॅक इन फिल्ड!!

निशदे's picture

6 Apr 2011 - 2:25 am | निशदे

पुढचा भाग लवकर.............जास्त वाट बघायला लावू नका.....:)

पुढील भागाची वाट पाहतोय...

मदनबाण's picture

6 Apr 2011 - 8:40 am | मदनबाण

जल्दी लिखींग... हम वाट बघिंग... ;)

(छपरी) ;)

मुक्तसुनीत's picture

6 Apr 2011 - 8:51 am | मुक्तसुनीत

निराळ्या जगाची सफर घडली. मजा आली. चित्रण वास्तवदर्शी आहे खरं.

पिवळा डांबिस's picture

6 Apr 2011 - 11:00 am | पिवळा डांबिस

करा! करा राडा!!!!
आम्ही फुकटची गिर्‍हाईकां गावलोय नाय?:)
पोटात गोळा घेऊन वाट बघतोय पुढं काय व्हईल याची!!!!
आमच्यासारख्या पेद्रट भटाबामणांना वगीच भिववायचां!!!
स्वामी, शोभत नाय तुमाला हे!!!!
:)

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Apr 2011 - 11:56 am | बिपिन कार्यकर्ते

कडक पयल्या धारेचा माल!

अवांतर: गोडबोला चचला काय?

श्रावण मोडक's picture

6 Apr 2011 - 4:28 pm | श्रावण मोडक

अवांतर: गोडबोला चचला काय?

नाही. तो 'माती' उकरत बसला आहे. "ओके"?

का उगीच त्या बिकाला लिहायला भाग पाडताय.
त्यानं लिहिलं तर वाचवणारे का?

श्रावण मोडक's picture

6 Apr 2011 - 7:17 pm | श्रावण मोडक

आली बहिणाबाई लगेच भावाची बाजू घ्यायला. लिहू दे तर खरं त्याला आधी...
आम्ही वाचू. तुम्ही नका वाचू. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Apr 2011 - 2:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदास काका, पुढचा भाग लवकर टाका.

आनंदयात्री's picture

7 Apr 2011 - 4:36 am | आनंदयात्री

काका, आधीच्या अपूर्ण कथांची हुरहुर अजुन ताजी आहे म्हणुन निषेध व्यक्त करायला या कथेतल्या या भागावर प्रतिसाद देणार नाही. साला आम्ही लोक तुमच्या कथांवर जीव लावुन बसायचे अन पुढचा भाग अनंत काळापर्यंत येतच नाही.

-
आंद्या कल्याण

सन्जोप राव's picture

7 Apr 2011 - 8:41 am | सन्जोप राव

काय लिहू? दिवस कारणी लागला....

चिगो's picture

8 Apr 2011 - 2:46 pm | चिगो

झक्कास.. स्वॉलिड स्पिड आहे... पुभाप्र..

NAKSHATRA's picture

13 Dec 2020 - 7:56 pm | NAKSHATRA

लेखन आवडलं.

NAKSHATRA's picture

13 Dec 2020 - 7:56 pm | NAKSHATRA

लेखन आवडलं.

NAKSHATRA's picture

13 Dec 2020 - 7:57 pm | NAKSHATRA

लेखन आवडलं.

NAKSHATRA's picture

24 Jan 2021 - 7:04 pm | NAKSHATRA

जबराट, आवडले