पांढरा शुभ्र कापूस जसा
इवला पिटुकला होता ससा
लाजरा बुजरा भित्रा जरा
अवखळ चपळ होता ससा
एकदा मळ्यातून फिरता फिरता
गेला तो तळ्याकाठी तडक
इवल्या पिटुकल्या सशाला
दिसला मोठा एक खडक
खुदकन ससा मनात हसला
ऐटीत खडकावरती बसला
थोड्या वेळाने झाली गम्मत
सशाला वाटली जम्माडी जम्मत
खडक लागला हलायला
ससोबा लागले डुलायला
अचानक घडले तरी काय
सशाचे थरथरले की पाय
सशाला वाटले झाला भूकंप
त्याच्या अंगाला सुटला कंप
पाहिले त्याने पायाखाली
जीव झाला वर खाली
नव्हता पायाखाली खडक
होती कासवाची पाठ टणक
कासवाने हलवली हळूच मुंडी
ससोबाची उडाली घाबरगुंडी
धूम ठोकली सशाने मळ्यात
कासव निघाले निवांत तळ्यात
प्रतिक्रिया
24 Mar 2011 - 2:07 pm | ज्ञानराम
मस्त.....
24 Mar 2011 - 3:51 pm | कच्ची कैरी
विदेशाले विदेशा लिहतोस कसा ?कवितेचा विषय घेतोस ससा
मस्त हं ,नविन बालगीत मिळाले :)
24 Mar 2011 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा
मस्त एकदम.
24 Mar 2011 - 9:14 pm | निवेदिता-ताई
सुंदर...सुंदर.....
25 Mar 2011 - 12:11 pm | पक्या
बालकविता मस्तच एकदम.
25 Mar 2011 - 12:15 pm | गणेशा
एकदम छान बालगीत ..आवडले
25 Mar 2011 - 12:16 pm | गणेशा
एकदम छान बालगीत ..आवडले
25 Mar 2011 - 12:23 pm | निनाव
वाह वाह... मस्तच. एकदम सुंदर. एक नंबर! :)