स्वप्नसखी

अनंत भावे's picture
अनंत भावे in जे न देखे रवी...
17 Mar 2011 - 8:37 am

मी कविता लिहू लागलो,तुला मनात ठेउन
भारावून गेलो मी,प्रिये,तुला प्रत्यक्ष पाहुन

ते रुप,ते लावण्य कसे मनात साठवावे
तुझ्या नशिल्या डोळ्यातून किती मद्य प्यावे
तुझ्या मोहक चेहरयात गेलो मी न्हाउन
भारावून गेलो मी,प्रिये.......................!!१!!

तुझी चाल,तुझ्या बोलण्याला तोड नाही
गर्व,स्वार्थीपणा याची जरासुध्दा जोड नाही
कसा जगू आता मी क्षणभर जरी विसरुन
भारावून गेलो मी,प्रिये.......................!!२!!

माझ्या जीवनातील आता तूच प्रकाश आहे
केवळ तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे
तुझ्या प्रकाशाने गेले माझे जीवन उजळून
भारावून गेलो मी,प्रिये.......................!!३!!

कविता

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

17 Mar 2011 - 8:44 am | प्रीत-मोहर

मस्त लिहिलत

अवांतरः कोण म्हणे ही? घरि पोचवु का बतमी?

-प्रीमो

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2011 - 8:54 am | श्री गावसेना प्रमुख

अस कोणत मद्य आहे हो,तुमच्या 'ती, च्या कडे
नगीना च्या श्रीदेवी च्याही वरतान,
आम्हाला आमच्या पारुला पण द्यायचेय,
बाकी छान्,
(आमची पारु)