आठवणी असतात मनात दडलेल्या
येतात अचानक
नकळत मनाच्या काठावर
अलगद पावलांनी
नि येतात समोर
अनाहुतपणे.....
आठवणी कधीकधी भासाच्या
कधीकधी त्रासाच्या
मनात रुजलेल्या
पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या
घट्ट खोल मुळांच्या
काही आठवणी नाजूक
प्रेमाच्या
अलगद मोरपिसी आठवणीच्या
अल्लड पाउस नि
तिच्या सोबत चिंब चिंब भीजल्याच्या
गरमागरम चहाच्या
आठवणी नाही होत कधी शिळ्या
नाही उडत त्याचा रंग
त्या असतात रंगीत
आंबट चिंबट
मस्त चवीच्या …!
आपले जुने मातिचे घर
आठवणीतून अलगद येते वर
ती श्रावणातील सकाळ
परीक्षेचा पेपर....
तो कोंबडा छाप ब्लोटिंग पेपर
नव्या पुस्तकांचा करकरीत वास
आपल्या अंतरंगात झीरपतात
मृदुगंधासारख्या ...!!
शाळेला मारलेल्या दांड्या
पोट दुखीचे अस्सल कारण
मग अंगावर पांघरून घेऊन
शुभ्र ढग न्याहाळत
पक्षांच्या रेषा छेदून ढगाला
स्वप्नात हरवल्याचे क्षण
कोठे हरवून गेले
कधीचे …..
शोधात बसतो कधीपण
डोळ्यातला एक थेंब
फक्त साक्षीला ....!!
प्रतिक्रिया
16 Mar 2011 - 11:55 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर आठवणी....
16 Mar 2011 - 12:12 pm | ज्ञानराम
खूप छान
आपले जुने मातिचे घर
आठवणीतून अलगद येते वर
ती श्रावणातील सकाळ
परीक्षेचा पेपर....
तो कोंबडा छाप ब्लोटिंग पेपर
नव्या पुस्तकांचा करकरीत वास
आपल्या अंतरंगात झीरपतात
मृदुगंधासारख्या ...!!
विशेश आवडले..
16 Mar 2011 - 5:40 pm | गणेशा
आठवणी अश्याच असतात चिरतारुण्याचे वरदान लाभलेल्या ..
तुम्ही सुंदर लिहिले आहे .. अप्रतिम नेहमी प्रमाणे
18 Mar 2011 - 7:32 am | चित्रा
आवडली कविता.. खूप मनापासून आतून आली आहे हे प्रत्येक शब्दातून कळते आहे.
18 Mar 2011 - 12:37 pm | पियुशा
मस्त प्रकाश जि :)