त्यानं ओतले जाता जाता ओंजळीत माझ्या चांदणे
निसटले ते, विझले सारे - मग मीच मज वेचले
असे दिले त्याने मज ते क्षण मीच होते बहरले
सावत्र जरी दुखं, जपले मी होते त्यानं दिले
तहान राहीली तशीच, अन होडी सागरा मधेच
वारं सगळं घेउन गेला तो, होते त्याने वाहिले
गोष्टी वाचते मी पुन्हा-पुन्हा त्याच्या पुस्तकातल्या
शोधते ते, शब्द सारे - माझेच ते हरवले!
प्रतिक्रिया
6 Mar 2011 - 10:53 pm | काव्यवेडी
छान कविता !!!
7 Mar 2011 - 10:43 am | झंम्प्या
सुंदर कवीता...
7 Mar 2011 - 11:30 am | निनाव
सर्व वाचकांचे आभार.
7 Mar 2011 - 4:16 pm | गणेशा
कविता आवडली ..
मनाची खंत खुपच मस्त मांडली आहे